लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणीतरी ठारकट्या हातांनी स्वयंपाक बडातल्या गहन स्वच्छतेबद्दल लिहीलं आहे. त्या स्वच्छतेसाठी ओठचाच्या सर्व बाजू टोचच्यारोन साफ कराव्यात आणि गॅस पुशप्स आणि ओटा पुलप्स पण कराव्यात.

470006821_916451917278861_1429670795769175332_n.jpg

पेरुभर पाणी
चहा उकडताना
गाळणी मालू
मुळव्याधीचा वाम
बोडेसे हिंगाचे ... पोटावर चौबत
केख्यांचे शाही... सिकरण
>>> अशक्य हसतेय मी! काय आहे हे? Rofl

हो, तेच तर.

सोटा घालावा का डोक्यात असा हिंसक विचार येतो मनात

सहलीला गेल्यावर कोशिंबीर खायची आहे का? त्यातलं पाणी माहिमला टवटवीत ठेवतं म्हणतायत.

समानार्थी शब्द सांगा -
काड्या = काडवा, कारचा, कावा

बाकी पॉईंट नं ६४ अशक्य हहपुवा आहे. फता डेकोरेशन म्हणजे काय? बिज विन झाकण कसलं? वापटा, भाणि, बाटीक... काय काय आणि किती वाचून हसायचं? Rofl

हसून हसून मेलो.
बाटीक प्रिंट चा शोध असा लागलेला दिसतोय.

फता डेकोरेशन, बिज विन झाकण.....
टिचन किप्स वाचून मला सुखून मिळाला

भन्नाट आहेत टिपा

डिकोड करून वाचकांच्या बुद्धीला चालना मिळावी हा सुप्त हेतू दिसतोय Wink

मुद्दाम चुकीचं लिहीतय का?

तसं नाही वाटत. कारण काही पोस्टस् ठीक असतात, म्हणजे अचूक नसतात, पण टिचन किप्स सँडर्डने जितक्या ठीकठाक लिहिता येतील तितक्या Lol

ठरवून इतके चुकीचे लिहिता येईल असे शक्य वाटत नाही मलातरी.

फॉण्ट चा इश्यू असावा. कॉपी पेस्ट जमत नसावे.
मुद्दाम चुकीचं लिहीतय का?>>>> तसं असेल तर हा व्यासंग करण्याची इच्छा आहे Lol

… तर हा व्यासंग करण्याची इच्छा आहे…

मी प्रयत्न करून बघितला. ठरवून असे भयंकर लिहिणे फार कठिण आहे Lol

Submitted by अनिंद्य on 17 January, 2025 - 23:51>>>> अगदी शेवटपर्यंत 'मुळे' ला 'मुले' करतोय की काय याच धास्तीत 'किप्स' वाचली... Rofl

Pages