लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही बातमी पुढे पूर्ण वाचली. मला मजा आली. तुम्ही सुद्धा आनंद घ्या :

IMG_7927.jpeg

* * *

IMG_7926.jpegIMG_7925.jpeg

* * *

टीप: पतौडी भावंडांची नावं माहिती असलेल्यांनाच “सगळ्या खली खान” चा अर्थ समजेल.

सं कं ट, 'न बा व' वगैरेंकडे दुर्लक्ष करालच. Lol

अनिंद्य,
सगळा नवीन माल, धमाल आहे.
Rofl

खली खान कुटुंबाची बातमी मजेदार आहे. तुम्ही त्यातले शब्द हायलाईट करायला जितके कष्ट घेतले आहेत, तितकेही कष्ट ते लिहिताना बातमीदाराने घेतलेले दिसत नाहीत.

आजचा कोटा :

पट्ट होईल
बोर्ड डाळी
चाईल्डटमचे
ग्राइनडरमचे फिरवले ?

2e1c8213-0450-41d2-ab51-2a844400194b.jpeg

बघा काही अर्थ लागतोय का.
अगरचे तुम समझ सको मुझे भी समझाना Lol
मला खान वाटेल.

अनिंद्य,
खान आहेत कीप्स्
डोळे वारिक करून ४ क्रमांकाचं वाक्य वाचलं
त्यात काहीच मजा नाही Lol
बोर्ड डाळी, चाईल्डटमचे >>>>. Lol

४ नंबरचं वाक्य चुकलंय का? त्यात काहीच गंमत दिसत नाहिये. फाऊल धरायचा का?
बाकीची वाक्य कशी लौकिकाला साजेशी आहेत.

… ४ नंबरचं वाक्य…

हे सिद्ध करते की ह्या चुका मुद्दाम करत नाहीत ते. त्या जस्ट होतात Lol

हे सिद्ध करते की ह्या चुका मुद्दाम करत नाहीत ते. त्या जस्ट होतात>> असं कसं असं कसं?? चुका त्यांनी नाही केल्या तर कोण करणार! आणि मग आपली इतकी घनघोर करमणूक कशी होणार? ना चोलबे!

… घनघोर करमणूक …

हे मात्र खरे. माझ्या बोअर आयुष्यात या टिचन किप्सनी गडगडाटी, महामूर, प्र चं ड हास्य फुलवले आहे. On daily basis. नो डाउट!!

आठवेलदोडे जा एक चीर म्हणजे काय? Lol नेमका कुठला शब्द आहे, कुठे तोडायचा आहे काहीही समजत नाहीये.

पातेलं गॅस वर ठेवून बोर्ड कसा गरम होईल? Lol

सेल मधे पुरण भरायचंय बहुतेक Proud

चाईल्डटमचे>>> हे काय आहे जो सांगेल त्याचा जाहीर सत्कार केला जाईल Biggrin

हे मात्र खरे. माझ्या बोअर आयुष्यात या टिचन किप्सनी गडगडाटी, महामूर, प्र चं ड हास्य फुलवले आहे. On daily basis. नो डाउट>>>> मधे माझ्या मनात आलेलं या पेज ची तक्रार मनसे कडे करायची,.....पण शेवटी माणूस स्वार्थी असतो हेच खरं Rofl

टिचन किप्स ने माझी झोप उडवली... हस हस हसलेय! बापरे काय तुफान आहे हे
आणि त्यावर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स...
मराठी ए आय वगैरे लिहितं का हे? इतकं कसं तिनताड Lol

Pages