लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर उच्चार साधर्म्यच साधायचे असेल तर लावंण्या आणि लावण्ण्या दोन्ही सारखेच नाहीत का?

मंदिर आणि मन्दिर सारखे ?

की काही व्याकरण नियम वगैरे ?

तो पुण्याचा आहे, माझी हिम्मत नाही फोन करण्याची.

तसेही अर्थ सुस्पष्ट आहे हो.

मुद्दा ही “लष्कराची भाकरी” मोजयची की नाही हा आहे Lol

समजले.

म्हणजे माझी ही “लष्कराची भाकरी” व्ह्यालिड आहे 👍

छान चर्चा.
हीरा आता दिसत नाही मायबोलीवर.
त्याचे प्रतिसाद खूप माहितीपूर्ण असतात.

लावण्या वरून चपला आठवले. पुण्यात एक डॉ चपलाबाई नाव वाचलेले आहे. तेव्हा असे कोण नाव ठेवेल असे मला वाटायचे. पण ते चपळ या अर्थाने चपला असे आहे हे नंतर कळाले.

त्यांच्याबद्दल शोधताना हा एक इंटरेस्टिंग लेख सापडला
https://www.weeklysadhana.in/view_article/mrunalini-desai-on-freedom-fig...

हो उच्चारापुरते आहे. तसेच आदित्य लघुरूप आद्या आणि ज्ञानेश्वरांचा नमोजी आद्या वेगळे उच्चार आहेत. सतीश - सत्या आणि सिनेमा सत्या वेगळे. मराठीत आधीच्या अक्षरावर आघात न देता पुढचे जोडाक्षर म्हणायची काही पद्धत आहे, त्यामुळे हे घोळ होतात. लिहिताना दोन्ही एकच प्रकारे लिहिले जातात.

आघात असलेले उच्चार वेगळे लिहावेत (वरती अनिंद्य यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे) अशी काहींची मागणी आहे. पण मुळात आघात असणे हा तद्भव शब्दांचा नियम आहे आणि आघात नसणे हा अपवाद आहे. अपवादांसाठी नियम पाळणाऱ्या शब्दांना शिक्षा का करावी असा विषय आहे.

"अभ्यास करायला सांगा."
अभ्या: "सारखं सारखं मलाच काय सांगता, मी नाही करणार आता."

सतीश-सत्यावरून आठवलं. श्री. ना. पेंडशांची 'हत्या' नावाची कादंबरी आहे, ते मला 'खून' या अर्थाचं नाव वाटायचं. मी ती कादंबरी वाचलेली नाही, पण तिच्या पुढचा भाग 'कलंदर' वाचला, तेव्हा कळलं की हत्या म्हणजे हनुमंताचा शॉर्ट फॉर्म आहे!
फारएण्ड, चपलाबाई Lol चपला म्हणजे वीज.
चपलाहारपण असतो, त्यात चपलाचा अर्थ काय आहे कोण जाणे.

चपलाहारपण असतो, त्यात चपलाचा अर्थ काय आहे कोण जाणे.>>>
चपला हार म्हणजे खूप लखलखणारा सोन्याचा कोल्हापुरी हार. यावर सहसा लक्ष्मीचे छापे असतात.
(चपला ) वीज चमकल्या सारखा लख्कन् चमकतो

चपलाहार >> फा च्या उदाहरणाप्रमाणे इथे उच्चार आणि अर्थ लावला तर चपळ आहार होईल. Wink

Happy थँक्स वावे, मनिम्याऊ. हे बाकीचे संदर्भ माहीत्/लक्षात नव्हते.

चपळ आहार >>> Happy काल जिव्हाद आज चपळ आहार Happy

चपळ आहार >>> Lol

बरेच दिवसांत इथे टिचन किप्स न आल्याने चैन पडत नाहीये. हल्ली बरोबर लिहायला लागले की काय ते? Happy

बरेच दिवसांत इथे टिचन किप्स न आल्याने चैन पडत नाहीये. हल्ली बरोबर लिहायला लागले की काय ते?
खरंच की.
तसे जरा सुधारले आहेत.

… टिचन किप्स न आल्याने चैन पडत नाहीये. …

इथे टिचन किप्स शेयरल्यापासून त्यांना जास्त हिट्स मिळू लागल्याचा रिपोर्ट आहे. 😂

Pages