लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या टिचन किप्स थोडे थंडावले आहे. त्याजागी आता “स्वस्थ संजीवनी” स्वस्थ बसू देत नाहीय.

IMG_7520.jpeg

हीच ती शब्दांची “रारीबी” Lol

स्वयंपावक - अग्निहोत्र असलेल्या घरात म्हणत असतील असा उगाच उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाऊट दिला मी.

स्वयंपावक...
किती ती प्रतिभा...आपण उगीच स्वयंपाक म्हणतो.
स्वयं पावक आहे जिथे स्वयं पाक घडतो तिथे

रारीबी >>> Lol

स्वयंपावक >>> आपले आपण पाव तयार करून घेणारं ते स्वयंपावक. कदाचित ओव्हनसाठीचा शब्द असेल Wink

स्वयंसेवक सारखाच स्वयंपावक शब्द आहे.
आजकाल घरीच पाव तयार करायचे ( व दगडासारखे पाव परिचितांना देऊन 'होम मेड आहेत हं' अशी तंबी द्यायचे) खूळ आले आहे. अशा लोकांना स्वयंपावक म्हणतात.

IMG-20241116-WA0020.jpg

गर्भधारणेच्या वेळी? गर्भावस्थेत?
'गरोदरपणात' हा शब्द इतका कठीण आहे का सुचायला?

वरचे वाचुन रिडर्स डायजेस्टमधला एक जोक आठवला.

one married woman took appointment of a dentist for a treatment but she started having second thoughts about it because the couple were thinking about starting a family and the woman thought starting a dental treatment at such time may not be a good idea. but she forgot to cancel her appointment.

when the receptionist at the dental clinic called up to confirm the appointment, this lady hesitatedly said, you see, i am trying to get pregnant, so…..

before she could complete her sentence , the receptionist said, ok ok, i will call up after some time.

e45b0ca5-e222-4e29-b0bf-49a04b9637e3.jpeg

पहिलेच वाक्य वैश्विक सत्याला हात घालणारे ! क्रीम जाऊन जाणार कुठे ?

“मसालापणा” हा नवीन शब्द मराठी भाषेला भेट म्हणून नजर केलाय Lol

Lol मसालापणा!

पहिल्याच वाक्याला फुटले! जर तुम्ही प्रत्येक भारतीय घराच्या फ्रीजमध्ये क्रीम ठेवली तर तुम्हाला ती नक्कीच मिळेल - म्हणजे काय? क्रीम ठेवल्यावर क्रीमच मिळणार ना? Proud या वाक्यापुढे फेंगशुई मधला काहीतरी आयटम असेल असं पण वाटून गेलं.

टिचन किप्स - एक रत्नखणी

IMG_7599.jpeg

गौळयात ? Lol

गोळा उरण का ? पनवेल का नाही ?

“अक्कास” आणले ते झक्कास केले. अण्णास का नाही बोलावले ? Proud

वडोवट - वड, वट (वृक्षांवर किती ते प्रेम)

एकदम अक्कास टिप्स आहेत.

हरवी मिरची बरोबर.
शालू हरवा पाचू नि मरवा
हरवा, मरवा...बघा किती योग्य यमक जुळत...

वडोवट - वड, वट (वृक्षांवर किती ते प्रेम)>>>>> वडोवट आहे तुमचं Lol

… i will call up after some time... >>>
गर्भावस्थेत >>>
स्वयंपावक म्हणतात. >>> Lol

अग्नी करता "पावक" असाच काहीतरी शब्द आहे ना?

स्वयंपावक - अग्निहोत्र असलेल्या घरात म्हणत असतील असा उगाच उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाऊट दिला मी. >>>

सापडली पोस्ट Lol आधी मिस झाली होती. उच्चभाषिक बेनिफिट ऑफ डाउट ही फ्रेज म्हणजे लोल मधे अजून एक लोल आहे.

Pages