माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
* इथे summer चा अर्थ sum
* इथे summer चा अर्थ sum करणारा>>> मस्तच !
*****
असेच एक छान चकवा देणारे वाचले :
शोधसूत्र : filling station
अपेक्षित पाच अक्षरी असा :
* * * a *
?? गुगल न करता प्रयत्न करून पाहिले तर मजा आहे
filling station >>>
filling station >>>
याचे उत्तर शोधताना बहुतेक जण पेट्रोल पंपाभोवती रेंगाळत राहतात ( “भरणे”) ! परंतु तिकडे न जाता आपण थेट दंतवैद्याच्या खुर्चीत जाऊन बसले की उत्तर मिळते :
. . .
. . .
molar
दाढेमध्ये ते डॉक्टर जे भरतात ते filling आणि म्हणून दाढ station.
मी dental clinic ला पर्यायी
मी dental clinic ला पर्यायी पाच अक्षरी शब्द शोधला सकाळी.
दाढच फिलिंग स्टेशन हे मात्र नाही आले डोक्यात.
छान शब्द आहेत
छान शब्द आहेत
>>KISS>>> हे भारीच
bully (नाम)
bully (नाम)
याचे काळाच्या ओघात बदलत गेलेले अर्थ पाहणे रंजक आहे :
boel हा मूळ डच शब्द (= प्रेमिक, भाऊ) >>
सन 1530 मध्ये sweetheart हा अर्थ >>>
सन 1680 : धमकावणारा
सन 1706 : वेश्येचा संरक्षक किंवा पालक >>>
https://www.etymonline.com/search?q=bully
आज एका शब्दखेळात expensing
आज एका शब्दखेळात expensing असा शब्द आला. expense हे क्रियापदही आहे, हे कळले.
: to charge to an expense account
: to write off as an expense
ही अकाउंटिंग मधली संज्ञा वाटते. नाम expense आहेच.
expend हेही क्रियापद आहे, ते क्वचित पाहिले आहे. . या शब्दांच्या अर्थांच्या छटांत काही भेद असावा. expend हे थोडेसे शासकीय वाटते.
spend हे अधिक वापरले जाणारे आणि साधे रूप असावे.
ex·pend·a·ble
ex·pend·a·ble
/ikˈspendəb(ə)l,ekˈspendəb(ə)l/
adjective
of little significance when compared to an overall purpose, and therefore able to be abandoned.
"they are being made to feel like their work is expendable"
Similar:
dispensable
able to be sacrificed
replaceable
nonessential
inessential
not essential
unimportant
unnecessary
unneeded
not required
superfluous
extraneous
disposable
throwaway
one use
single-use
Opposite:
indispensable
important
(of an object) designed to be used only once and then abandoned or destroyed.
"the need for unmanned and expendable launch vehicles"
https://g.co/kgs/Mww562S
https://g.co/kgs/Mww562S
There is a 4 movie series named Expendables with Sylvestor Stallone, Jason Statham, Bruce Willis etc.
हो. या अर्थानेच वाचनात आलाय
हो. या अर्थानेच वाचनात आलाय हा शब्द.
अलीकडे अमेरिकी
अलीकडे अमेरिकी शब्दकोड्यांमध्ये विशेषनामे देखील अपेक्षित असतात. एक मजेदार उदाहरण :
शोधसूत्र आहे Ten-gallon hat
आणि त्याचे उत्तर
. .
..
..
Stetson आहे.
हे मुळात एका हॅटसाठीचे व्यापारनाम आहे.
या हॅटला Ten-gallon असे का म्हटलय याचे कारण मात्र मजेशीर आहे. या Gallon चा द्रव पदार्थ मोजण्याच्या मापाशी काही संबंध नाही. मुळात हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ,
‘सुशोभीकरणासाठी वापरलेली रंगीत पट्टी’ असा आहे.
तिकडे पूर्वीच्या काही हॅट्समध्ये अशा दहा पट्ट्या वापरल्या जायच्या. हॅट्च्या उंचीमुळे ती घातल्यानंतर त्या दहाही पट्ट्या उठून दिसतात हा त्याचा अर्थ !
A kangaroo court
A kangaroo court
हे घाईगर्दीत स्थापन केलेले न्यायालय असते ज्यामध्ये कायद्याची मूलभूत तत्वे पायदळी तुडवून भराभर निष्कर्ष काढून निकाल दिला जातो.
याचा उगम सन 1850 च्या सुमारास अमेरिकेतील कॅलिफोर्निया गोल्ड रश प्रकरणावरून झाला.
या न्यायालयाला कांगारूची उपमा का दिली आहे हे निश्चित माहित नाही. एक अंदाज असा आहे की या प्रकारचे न्यायाधीश सतत गावोगावी बदलून जात असत आणि फारसा विचार न करता झटपट न्याय द्यायचे.
शब्द छान आहेत
शब्द छान आहेत
हॅट तर मस्तच आहे
to catfish ( क्रियापद)
to catfish ( क्रियापद)
= सार्वजनिक जाल माध्यमांवर खोटे सदस्यत्व तयार करून दुसऱ्या व्यक्तीला सापळ्यात अडकवून फसवणे.
सन 2010 मध्ये Catfish नावाचा एक चित्रपट आला होता ज्यात हा विषय हाताळला आहे. त्यावरून हे क्रियापद रुढ झाले. सध्या नेटफ्लिक्सवर ‘स्वीट बॉबी’ नावाचा एक माहितीपट याच विषयावर असून तो इंग्लंडमधील सत्यकथेशी संबंधित आहे.
सध्या मी डॅशील हॅमेटची red
सध्या मी डॅशील हॅमेटची red harvest नावाची कादंबरी वाचायला घेतली आहे. ही माफिया वर लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी आहे. hard boiled फिक्शन. ह्याला धरून काही film-noir सिनेमे बनलेले आहेत. पण ह्यात भरपूर स्लॅग आहेत. म्हणून नेट वर शोध घेतला तर भरपूर "शब्दकोश" मिळाले.
https://www.yourdictionary.com/articles/1920s-gangster-slang
https://mafiahistory.us/maf-glos.html#G
https://en.wikipedia.org/wiki/Glossary_of_Mafia-related_words
"गरजूंनी" अवश्य "लाभ" घ्यावा.
असा मराठी शब्द संग्रह कुणाला माहित आहे का? मला पाहिजे आहे. भाषांतर करण्यासाठी.
Scientific American मध्ये आजच
Scientific American मध्ये आजच वाचलेला लेख You Don't Need Words to Think. भविष्यात AI आणि LLM च्या संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. भाषाप्रेमींनी जरूर वाचण्यासारखा.
Scholars have long contemplated the connection between language and thought—and to what degree the two are intertwined—by asking whether language is somehow an essential prerequisite for thinking.
You Don't Need Words to Think
You Don't Need Words to Think.
विचारणीय !
एका कोड्यात आज rebus हा शब्द
एका कोड्यात आज rebus हा शब्द आला.
: a representation of words or syllables by pictures of objects or by symbols whose names resemble the intended words or syllables in sound
also : a riddle made up of such pictures or symbols
आपल्यातले बरेच जण हा खेळ खेळले असतील. मायबोलीवरही हा आला असेल. त्याचं नाव माहीत नव्हतं.
इथे दिलेल्या उदाहरणातला शब्द मात्र मला ओळखता आला नाही.
वरील सर्व प्रतिसाद छान व
वरील सर्व प्रतिसाद छान व माहितीपूर्ण
**********************************************
pale हा मजेदार शब्द आहे. बहुतेक वेळा आपण तो विशेषण म्हणूनच वापरतो आणि त्याचा ‘फिकट रंगाचा’ हाच अर्थ आपल्या डोक्यात पक्का बसलेला असतो ( रक्तन्यूनतेमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर येणारा फिकटपणा - pallor- हा तर डॉक्टरांच्या नित्य परिचयाचा).
आज एका शब्दखेळाच्या निमित्ताने beyond the pale या अनोख्या वाक्प्रचाराचा परिचय झाला आणि paleचा नाम म्हणून असणारा अन्य अर्थही समजला. तो म्हणजे,
‘एक टोक अणकुचीदार असलेला लाकडी किंवा धातूचा खांब’ अर्थात मेढा किंवा खुंट.
हा जमिनीत खुपसून कुंपण तयार करण्यासाठी वापरतात .
या अर्थाने त्या शब्दाचा इतिहास खूप रंजक असून तो आपल्याला पार चौदाव्या शतकात युरोपीय वसाहतवादापर्यंत घेऊन जातो https://www.worldwidewords.org/qa-pal2.html
एखाद्या देशाची दुसऱ्या देशात असलेल्या वसाहतीची हद्द दाखवण्यासाठी pale चा वापर केला जाई.
चांगला वाक्प्रचार.
चांगला वाक्प्रचार.
ह्याचा अर्थ अस्वीकार्य किंवा अक्षम्य असा देखील होतो बहुधा.
snake oil
snake oil
= भोंदू औषधोपचार
हा खास अमेरिकी शब्दप्रयोग.
हे तेल सापांच्या चरबीपासून तयार केले जाते आणि 19 व्या शतकात त्याचा गावठी इलाज म्हणून वापर केला जाई. त्याच्या वापराने सांधेदुखी, गाऊट आणि बहिरेपणा बरा होतो असा दावा केला जाई.
https://www.etymonline.com/search?q=snake%20oil
elevator pitch (or speech)
elevator pitch (or speech)
हा एक छान शब्दप्रयोग आहे. एखाद्या व्यापारी प्रतिनिधीने दुसऱ्याला आपली ओळख (किंवा कामाचे स्वरूप) अर्धा ते एक मिनिटात पण प्रभावीपणे करून देणे, हा त्याचा अर्थ.
लिफ्टमधून वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या छोट्या वेळात करून दिलेली ओळख, असा त्याचा उगम.
खिशाला चाट बसणे या अर्थाची
खिशाला चाट बसणे या अर्थाची burn a hole in someone's pocket ही फ्रेज आहे.
* burn a hole in>>> छान आहे.
* burn a hole in>>> छान आहे.
roach
roach
याचे विभिन्न अर्थ रोचक
=
एकदा पाच अक्षरी wordle मध्ये होता.
आज मला एका कोड्यात twang हा
आज मला एका कोड्यात twang हा शब्द आला.the sound that is made when you pull a tight piece of string, wire or elastic and then let it go suddenly.
atmosphere
atmosphere
हा नित्य परिचयाचा शब्द आहे. परंतु त्यातील atmo- या पूर्वप्रत्ययाचा अर्थ वाफ (vapor, steam) आहे हे लक्षात आले नव्हते.
Phrazle (https://solitaired
Phrazle (https://solitaired.com/phrazle) या दैनंदिन इंग्लिश शब्दखेळातून गवसलेले काही अनवट वाक्प्रचार. त्यापैकी काहींच्या साधारण अर्थाने जवळ जाणारे मराठी वाक्प्रचार कंसात देतोय :
. bet the farm (सर्वस्व पणाला लावणे)
. curses are like chickens; they always come home to roost (करावे तसे भरावे)
.five finger discount (उचलेगिरी, भामटेगिरी)
. to each his own ( व्यक्ती तितक्या प्रकृती, पिण्डे पिण्डे मातिर्भिन्ना )
. treat someone with kid gloves (नाजूक काम)
. go with the flow ( ?)
( कंसातले मराठी : याहून अधिक योग्य सुचल्यास सांगावेत)
go with the flow - प्रवाहपतीत
go with the flow - प्रवाहपतीत, चाकोरीबद्ध?
go with the flow >>
go with the flow >>
प्रवाहपतित योग्य वाटतो.
वारा पाहून पाठ देणे
वारा पाहून पाठ देणे
Pages