..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंगो माधव.

८/९१:
"गुजरा झाला. एकत्र व्हा ना. यावेळी नाही." असे सांगुन पुढे एका शब्दात निश्चीत वेळ सांगते.
हिंट: त्यावेळेस सूर्य डोक्यावर असतो.

गुजरा हुआ जमा ना, आता नही दो.बारा
तिरकी अक्षरे हिंदी, इतर मराठी. दो.बारा = दोपहर बारा.

८/९२
तिंबूनाना पेपरांचा गठ्ठा घेऊन रद्दीवाल्याकडे गेले. रद्दीवाल्याने वजन करून रद्दी ठेवून घेतली, पण सद्या तंगी असल्यामुळे पैसे नंतर मिळतील असे सांगितले. तिंबूनाना म्हणाले हरकत नाही, पण किती पैसे देशील? आणि केव्हा देशील? तेव्हा रद्दीवाल्याने सांगितले ...

अरे कुठे गेले सगळे जिनियस?
क्लू १ - चित्रपटाचं आणि गाण्याचं नाव सेम आहे
क्लू २ - ही जुन्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा पैशाचा व्हॅल्यू आजच्यापेक्षा खूप जास्त होता

८/९३
भयंकरदुर्गावर रात्रीच्या वेळी चढाईला निघालेले ट्रेकर्स वाट चुकून जंगलात भटकत होते. अखेर त्यांना एक जीर्णशीर्ण झालेले लहानसे खोपट दिसले. त्यांचा लीडर चंदू धीर करून मदत मागण्यासाठी आत गेला. बघतो तर तिथे एक हडळ सुंदर स्त्रीचे रूप घेऊन बसली होती. ती म्हणाली 'ये राजसा, जवळ ये आणि मला तृप्त कर'. असे म्हणून तिने हात पसरले. ते पाहून चंदू भेदरून गेला. कारण तिच्या हातांना पंजांऐवजी चक्क पावलं होती. तो पळत बाहेर आला. त्याच्या मित्रांनी त्याला काय झाले विचारले पण त्याची भीतीने इतकी बोबडी वळली होती की त्याला बोलताच येईना. अखेर पंधरा वीस मिनिटांनी त्याने कसेबसे तोंड उघडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले....

त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले....
<<<<<
'वो बुलाती है मगर जाने का नही'... Proud

(मला माहित आहे, हे उत्तर नाहीये!)

माझेमन, नाही
श्रद्धा, नाही
८/९३ क्लू - गाण्यातल्या हिरोईन चा अकाली मृत्यू झाला

मस्त माधव, आणि कोडे. आणि ते झ झ झ झोपडी मे च च च चारपाई हे ततपप करत सांगितल्या सारखे वाटते.

माधव, बरोबर
त्याची भीतीने इतकी बोबडी वळली होती की त्याला बोलताच येईना. अखेर पंधरा वीस मिनिटांनी त्याने कसेबसे तोंड उघडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले....
झ झ झ झ झोपडी मे च च च च चारपाई

आयडी कुठल्या काळातली गाणी जास्त ऐकतो याचा अंदाज येणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी मी मधुबालाचीच गाणी आठवत होतो Rofl

८/९२ थर्ड अँड फायनल क्लू
गाण्यात एका महिन्याचं नाव आहे.
आणखी थोडा वेळ वाट बघून उत्तर रिव्हील केले जाईल

Pages