Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्याला एक अनैतिक माणूस म्हणून
त्याला एक अनैतिक माणूस म्हणून दुर्लक्षित का ठेवले जात नाही? >> बघ बाबा, ह्याच लॉजिक ने तात्या ला अन्नुलेखाने मारावे लागेल नि मग तुझा थययाट होईल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे सगळं तात्याच्या तोंडून ऐकलं आणि नंदीबैलाना माना डोलावताना पाहिलं की सुडोमि! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>सॅन फ्रॅन्सिस्कोच्या विली
.
आता आज काय तर तात्याने
आता आज काय तर तात्याने पुटीनला कोव्हिड टेस्ट पाठवल्या! काय चिंधी माणूसे यार!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वुडवर्ड म्हणतो पाठवल्या, तात्या म्हणतो नाही, तिकडे क्रेमलिन म्हणतं आम्हाला मिळाल्या. यडxx लोक आहेत एकेक. बाकी क्रेम्लिनेपण पाठ फिरवल्यावर आता तात्या कोणाकडे बघणार! एकदाचा हरला की गॅहम पासून शेंड्यांपर्यंत झाडून सगळे साथ सोडतील. की मग खरंच डोंगरावरचं दृष्य बघुन रस्त्याकडे धाव घ्यायची वेळ येणारे.
व्हान्सला विचारले कीं २०२० ची
व्हान्सला विचारले कीं २०२० ची निवडणूक ट्रम्प हारला का नाही? पठ्ठ्या उत्तर द्यायला तयार नाही. पण, मी पेन्स असतो तर निवडणूक सर्टिफाय केली नसती असे म्हणाला.
https://x.com/MeidasTouch/status/1844788902223073664
२०२० च्या निवडणु़कीत अनेक
२०२० च्या निवडणु़कीत अनेक गैरप्रकार जाणूनबुजून केले गेले ज्यामुळे डेमोक्रॅट पक्षाचा फायदा झाला आणि रिपब्लिकन पक्षाचे नुकसान झाले. अनेक राज्यात खोटे मतदान केले गेले. आता हे प्रकार निवडणुकीचे निकाल बदलू शकण्याइतके मोठे होते का? आणि हे कायद्याने सिद्ध करता येईल का हा एक मुद्दा आहे.
हंटर बायडन लॅपटॉप ह्यात अनेक रसभरित गोष्टी होत्या ज्यामुळे बायडनची प्रतिमा डागाळली गेली असती. तर त्या पत्रकाराला विविध सोशल नेटवर्किंग वरून हाकलून देण्यात आले. आणि ही सगळी रशियन कारस्थाने आहेत असे निक्षून (पण पुरेशा कायदेशीर पळवाटा ठेवून) सांगणारे पत्र अनेक उच्च पदस्थ सी आय ए आणि एफ बी आयच्या सहीने प्रकाशित केले. तमाम माध्यमांनी ते उचलून ट्रंप कसा खोटारडा आहे वगैरे बोंब मारणे सुरु केले. एक खरी खुरी खळबळजनक बातमी पूर्ण दाबून टाकण्यात डेमोक्रॅट पक्ष, माध्यमे आणि सरकारी यंत्रणा यशस्वी ठरल्या. जर हे घडले नसते तर बायडनचे किती नुकसान झाले असते हे प्रत्येक जण आपापल्या परीने ठरवू शकतो. निदान काही लोकांना तरी असे वाटते की अशा दबावतंत्रामुळे निवडणूकीचे निकाल बदलले.
ह्याही वेळेस असली धूळफेक, खोटारडेपणा हा सरकारी यंत्रणा राबवत आहेतच. बायडन हा ठणठणीत आहे आणि १८ वर्षाच्या तरूणालाही लाज वाटेल अशा प्रचंड ताकदीने सगळी कामे करण्यात हातखंडा आहे वगैरे थापा आत्ता आत्तापर्यंत समस्त माध्यमे आणि सरकार सांगत होतेच.
>>
>>
वुडवर्ड म्हणतो पाठवल्या, तात्या म्हणतो नाही, तिकडे क्रेमलिन म्हणतं आम्हाला मिळाल्या. यडxx लोक आहेत एकेक. बाकी क्रेम्लिनेपण पाठ फिरवल्यावर आता तात्या कोणाकडे बघणार!
<<
क्रेम्लिन ही इमारत बोलते का? हे नवीनच आहे. असो.
जेव्हा सोयीचे असते तेव्हा रशिया जे सांगते ते ब्रह्मवाक्य म्हणून सत्य मानायचे. पण जेव्हा पुतिन म्हणतो की मला पूर्ण पूर्व युरोप पादाक्रांत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही. मी फक्त आणि फक्त युक्रेनचा काही भाग मिळवण्यासाठी लढत आहे. तेव्हा मात्र त्याचे विधान खोटे ठरवायचे.
ट्रंपला खोटे पाडणारे विधान असेल तर कितीही वाईट कुटिल पाताळयंत्री हुकुमशहा, हिटलरचा अवतार समजला जाणारा जे बोलतो ते साक्षात हरिश्चंद्री सत्य खूपच सोयीची मांडणी आहे.
कमलाबाईने आणि तिच्या सरकारने अमेरिकेची दक्षिण सीमा अगदी सुरक्षित आहे असे धडधडीत खोटे सांगितले आहे. जेव्हा बेकायदा घुसखोरी आजवरचे सगळे विक्रम मोडून ओसंडून वहात आहे असे सामान्य नागरिकालाही दिसते आहे तेव्हा हे धडधडीत खोटे का खटकत नाही?
पुतिनबद्दल खोट्यानाट्या स्टोर्या पसरवून युक्रेनच्या युद्धात अब्जावधी डॉलर ओतण्याचा खोटेपणा का खटकत नाही?
अन्न, धान्य, मांस, दूध अशा आवश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडताना दिसत असताना अर्थमंत्री असणारी येलन धडधडीत खोटे सांगते की ही महागाई तात्पुरती आहे. आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुदृढ होणार आहे. ते खोटे का खटकत नाही?
कमलाबाई आपल्या अर्ध्या वचनात
कमलाबाई आपल्या अर्ध्या वचनात असणार्या कार्यक्रमात जाऊन बियर प्या, गप्पा मारा अशा कार्यक्रमात मग्न आहेत. पण दुर्दैवाने तिथेही तोंडघशी पडत आहेत.
तुम्ही बायडनपेक्षा काय वेगळे करणार आहात? प्रश्न अगदी साधा वाटतो. कमलाबाईने ह्याची तयारी करून जायला हवे होते. पण हा प्रश्न तितका सोपा नाही. बायडनने काही चुका केल्या आणि मी त्या सुधारेन म्हणावे तर पंचाईत आणि बायडनचा कारभार आदर्शवत होता आणि मीही तसाच कारभार करणार म्हणावे तर तीही पंचाईत. त्यामुळे मी बायडन नाही आणि मी ट्रंपही नाही अशी दोन बिनडोक विधाने करून प्रश्नाचे उत्तर दिले.
हॉवर्ड स्टर्न नामक ट्रंपचा तिरस्कार करणारा होस्ट, तिथेही असेच काहीतरी थातुरमातर उत्तर दिले.
व्ह्यू नामक ट्रंपचा तिरस्कार करणार्या म्हातार्या बायकांचा कार्यक्रम असतो तिथेही हाच प्रकार.
निदान एकच प्रश्न तीन वेळा विचारला जातो तर निदान तिसर्यांदा तरी उत्तर जरा बरे देता आले असते. पण नाही.
एक अक्कलशून्य व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा अगदी ठळकपणे लोकांसमोर येत आहे.
२०२० च्या निवडणु़कीत अनेक
२०२० च्या निवडणु़कीत अनेक गैरप्रकार जाणूनबुजून केले गेले ज्यामुळे डेमोक्रॅट पक्षाचा फायदा झाला आणि रिपब्लिकन पक्षाचे नुकसान झाले. अनेक राज्यात खोटे मतदान केले गेले. आता हे प्रकार निवडणुकीचे निकाल बदलू शकण्याइतके मोठे होते का? आणि हे कायद्याने सिद्ध करता येईल का हा एक मुद्दा आहे. >>> अजून आहेच का "मुद्दा". ९० केसेस हरल्यात ऑलरेडी, विविध कोर्टात. तात्याने नेमलेल्या जजेससमोरही. हरलेले तर सोडाच, अनेक केसेस अशा आहेत की ज्यात बाहेर बकबक करणार्यांनी प्रत्यक्ष कोर्टात गैरप्रकार असल्याचे क्लेमच मुळात केलेले नाहीत. स्वतःच्याच भक्तगणाला उल्लू बनवले आहे. सगळे पब्लिक डोमेन मधे आहे.
काय एकेक वल्गना करायचे हे लोक. आता बहुतेकांची नावेही ऐकू येत नाहीत.
क्रेम्लिन ही इमारत बोलते का?
क्रेम्लिन ही इमारत बोलते का? हे नवीनच आहे. >>
यु नेव्हर डिसअपॉइंट!
केव्हढा महत्वाचा मुद्दा
केव्हढा महत्वाचा मुद्दा मांडलात शेंडेनक्षत्र! इमारती बोलत नसतात एव्हढेहि डेमोक्रॅट्स ना कळू नये अं! :फिदीफिदी:
बाकी सगळे कसे अमेरिकन राजकारणासारखेच चालू आहे इथे. अगदी बिनडॉक लोकांचा कारभार.
नवराबायको सारखे, नवरा म्हणेल ते तसे नाहीये! खरे खोटे गेले खड्ड्यात!!
क्रेम्लिन ही इमारत बोलते का?
क्रेम्लिन ही इमारत बोलते का? हे नवीनच आहे.
सही पकडे है !
>>अनेक राज्यात खोटे मतदान
>>अनेक राज्यात खोटे मतदान केले गेले. आता हे प्रकार निवडणुकीचे निकाल बदलू शकण्याइतके मोठे होते का? आणि हे कायद्याने सिद्ध करता येईल का हा एक मुद्दा आहे.<<
शेंडेनक्षत्र - इथल्या ऑडियंस समोर डोकेफोड करण्यात हशील नाहि; नॉट वर्थ योर टाइम. कोबेर किंवा नोवाने तसं म्हटल्याशिवाय त्यांना पटणार नाहि. दॅट सेड, जॉर्जिया मधे अॅब्सेंटि वोट्स मधे सिस्टमॅटिकली गफला कसा केला गेला त्यावर एक उत्तम फिचर फिल्म किंवा डॉक्युमेंटरी होउ शकते..
बाय्दवे, कोर्ट पुरावा मागते. इफ यु कॅनॉट प्रोव्हाय्ड प्रिपाँडरंस ऑफ द एविडंस इन द कोर्ट, यु विल गेट स्क्रुड. जॉर्जिया डेमक्रॅटिक मशिनरी एन्श्युर्ड नो लूझ एंड्स, अँड गवर्नर केंप, रॅफंस्बर्गर केव्ड इन...
तुमच्या पोस्ट्स मधून सतत
तुमच्या पोस्ट्स मधून सतत दिसणार्या घाऊक हेटाळणीकडे दुर्लक्ष करून हे लिहीतोय. कारण त्याच्या मागे कधीतरी एखादा सेन्सिबल मुद्दा सापडतो. मी रिपब्लिकन विरोधक नाही. ट्रम्पच्या पहिल्या टर्म मधे त्याला जितके डेमोनाइज केले गेले तितके प्रत्यक्षात नव्हते हे मी इथेच माबोवर अनेकदा लिहीले होते. अजूनही जुन्या बाफवर आहे. आता प्रोजेक्ट २०२५, अॅबॉर्शन बद्दल भयानक रिग्रेसिव्ह कायदे, ६ जाने. ई नसते तर रिपब्लिकन कन्वेन्शन मधे फक्त अर्धा तास दिसलेला न्यू अॅण्ड इम्प्रूव्ह्ड ट्रम्प व त्याची स्त्रियांबद्दलची वक्तव्ये बाहेर येण्याआधीचा व्हान्स यांच्याकडे मी कदाचित झुकलोही असतो. कारण डेम्सचा इमिग्रेशन बद्दल भोंगळ कारभार व इन्फ्लेशन हे मुद्देही गंभीर आहेत, आणि त्यावर ठोस उपाय त्यांच्याकडे दिसत नाहीत. बाकी वोकनेस ई ही आहेच. पण जॉर्जिया आणि फ्लोरिडा मधले रिग्रेसिव्ह कायदे व प्रोजेक्ट २०२५ बद्दल किमान व्हान्सचा सहभाग व ट्रम्पचे या लोकांना चुचकारणे यावरून हे डेंजरस दिशेला चालले आहे असे मला वाटते.
आज अनेक कुंपणावर असलेले व स्विंग स्टेट्स मधले अनेक लोक याच विचारात असतील. त्यांना २०२० नंतर महागाई वाढलेली दिसते. सॉफ्टवेअर मधल्यांनासुद्धा जाणवत असेल तर इतरांचे काय होत असेल. त्यांना उपलब्ध माहितीवरून तरी बॉर्डरवर पब्लिक येण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे हे दिसते. ते त्यांना नको आहे. सॅन फ्रान्सिस्को व सिअॅटल मधले रस्ते ज्यांनी पाहिले आहेत त्यांना इतर शहरांत असेच होणार का हा प्रश्नही पडतो. पोलिस विरहित व्यवस्था वगैरे मधले धोके त्यांना माहीत आहेत. पण त्यांना अॅबॉर्शन व लग्न यात सरकारी हस्तक्षेप नकोय. इमिग्रंट्सना काही बेसिस शिवाय सरसकट गुन्हेगार ठरवणेही नकोय. आणि निवडणुकीचा निकाल आपल्या मनासारखा आला नाही म्हणून स्वतःच्या झुंडीला घेऊन लोकशाही प्रोसेस थांबवण्याचे प्रकारही नको आहेत.
आज किमान अर्बन लोक हॅरिस-वॉल्झ कडे झुकलेले आहेत, जरी त्यांच्याकडे ठोस उपाय नसले तरीही.
२०२० बद्दल काही नवीन असेल तर सांगा. आधीचे सगळे बघून झाले आहे. त्यात काही दम नव्हता. कोणत्याही स्पेसिफिक गफल्याने निवडणुकीत फरक पडेल इतके काहीही नव्हते.
यांचा प्रॉब्लेम हा आहे की अॅब्सेण्टी वोट्स, मेल इन वोट्स ची पॉवर रिपब्लिकन्सना कळाली नाही. झोपून राहिले. डेम्सनी ती शिताफीने वापरली. मग निवडणुकीनंतर हे जागे झाले. मुळात सगळीकडे "गफला" नव्हता - एखादा कायदाच चलाखीने वापरला होता. पण कोठे गफला असला, तरी इतका मोठा नव्हता की त्याने निवडणुकीवर परिणाम झाला असता. कोर्टाचे सोडा. पब्लिक डोमेन मधे उपलब्ध असलेल्या राज्याराज्यातील माहितीवरूनही तसेच दिसते. पण यात बेकायदा फारसे काही नव्हते - विविध राज्यातील कायदे जवळजवळ वर्षभर आधी पास झाले होते, ते पास करण्यातच काय, इव्हन बिल आणण्यातही रिपब्लिकन्स होते. इथल्याच आधीच्या पानांवर सगळे आहे. पुन्हा कोण खोदत बसणार.
<<<पण कोठे गफला असला, तरी
<<<पण कोठे गफला असला, तरी इतका मोठा नव्हता की त्याने निवडणुकीवर परिणाम झाला असता. >>>
आता हे पण खोटे मानायचे ठरवले तर काय? भांडत रहायचे, तेच तेच मुद्दे घेऊन.
बाय्दवे, कोर्ट पुरावा मागते.
बाय्दवे, कोर्ट पुरावा मागते. इफ यु कॅनॉट प्रोव्हाय्ड प्रिपाँडरंस ऑफ द एविडंस इन द कोर्ट, यु विल गेट स्क्रुड. >>कोर्टाने पुरावा मागणे चुकीचे झालय आता का ? कि पुरावा खोटारड्या क्लेम्स ना सपोर्ट करत नसल्यामूळे .........
त्यांचे म्हणणे बहुधा असे आहे
त्यांचे म्हणणे बहुधा असे आहे की कोर्टात वापरू शकतील असा पुरावा मिळाला नाही पण अनेक गोष्टी प्रत्यक्षात घडत होत्या. १००% घडत असतील. बहुतांश निवडणुकांत होतच होत्या. २००० चे अनेकांच्या लक्षात असेल. पण निकालावर फरक पडेल असे काही घडले आहे हे कशावरून मानावे? सध्या याकरता जी सिस्टीम आहे त्यातून काही निघाले नाही. अॅनेक्डोटल कोट्सवरून हे घडलेच आहे असे मानणारे बरेच आहेत. पण जरा जरी चान्स असता तर फॉक्सने डॉमिनियनला ७०० मिलियन द्यायचे मान्य केले नसते .
- जास्त शक्यता अशी आहे की डेम्स नी कायदा सफाईने वापरून घेतला व रिपब्लिकन्सच्या ते आधी लक्षात आले नाही. पण हे तर रिपब्लिकन्सनीही इतरत्र केले असणारच. एका पार्टीतील लोक चोर आहेत आणि दुसरे नाहीत हे अशक्य आहे.
- सिडनी पॉवेल, रूडी ज्युलियानी पासून ते इतर असंख्य निष्णात लॉयर्स काहीही काढू शकले नाहीत इतक्या फ्लॉलेस पद्धतीने गफले करणे हे सोपे नाही. अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर जुळवून आणायला अनेक लोकांची साखळी लागते, त्यातून कोणीतरी कधीतरी फुटू शकतो.
- सध्या एखाद्या घटनेचे व्हिडीओ शूटिंग करणे अगदी सोपे आहे. एखाद्या अशा कृतीचा नि:संदिग्ध पुरावा मिळणे अशक्य नव्हते. नि:संदिग्ध हे महत्त्वाचे आहे. कोठेतरी एखादी व्यक्ती काही बॉक्सेस इकडून तिकडे हलवत आहे याचे काहीतरी इंटरप्रिटेशन करून तेच खरे आहे हे रेटत राहणे असले प्रकार बरेच होते. पण खात्रीशीर पुरावा एकही नव्हता.
- हे ही क्लिअर होते की या निष्णात वकिलांनी आपली कौशल्ये वापरून एखादी वॉटर टाइट केस करण्यापेक्षा ट्र्म्पला चुचकारण्याकरता कायच्या काय अफाट क्लेम्स केले. प्रत्यक्षात काही बदल घडण्याच्या दृष्टीने त्यात काहीही दम नव्हता.
- त्यामुळे गेल्या ४ वर्षातील इलेक्शन क्लेम्स बद्दल ट्रम्प च्या कल्टमधल्या लोकांची विश्वासार्हता शून्य आहे.
त्यांचे म्हणणे बहुधा असे आहे
त्यांचे म्हणणे बहुधा असे आहे की कोर्टात वापरू शकतील असा पुरावा मिळाला नाही पण अनेक गोष्टी प्रत्यक्षात घडत होत्या. >> हे म्हणजे आत्याबाईंना मिशा असत्या तरचा प्रकार झाला ना ? नि:संदिग्ध पुरावा नसेल तर फुकाच्या बाता ह्यापलीकडे काही नाही. गेली चार वर्षे साप साप म्हणून भुई धोपटून काय निघाले आहे ? तर ओहायो मधे पेट्स खाणारे हैशियन
" कल्टमधल्या लोकांची विश्वासार्हता शून्य" असा नि:संदिग्ध पुरावा हवा ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तू म्हणतोस तसा लॉजिकल विचार करत असते तर इथे किमान तात्याच्या बाजूने लिहित नसते रे.
>>२०२० बद्दल काही नवीन असेल
>>२०२० बद्दल काही नवीन असेल तर सांगा. आधीचे सगळे बघून झाले आहे. त्यात काही दम नव्हता. कोणत्याही स्पेसिफिक गफल्याने निवडणुकीत फरक पडेल इतके काहीही नव्हते.<<
तेच तर म्हणतोय मी. तुम्हि जे पाहिले ते नोवा/कोबेर्च्या तोंडुन; दृष्टि आड सृष्टि. ज्यॉर्ज्यात बाय्डन जेमतेम १२००० मतांनी जिंकला. टोटल अॅब्सेंटि वोट्स साधारण ६ लाख; पाचपट २०१६च्या तुलनेत. हा स्पाइक कसा झाला? कोविड्चा परिणाम म्हणाल तर अर्ली वोटिंग सुद्धा रेकॉर्ड ब्रेकिंग. मूळात असं झालं कि डेम्सने अॅब्सेंटि वोट्स्च्या प्रोसेसच्या लूपहोल्स्चा फायदा उचलला. (हा काहिसा बिहारमधल्या बूथ कॅप्चरिंग सारखाच प्रकार) पुर्वापार चालत आलेली, बॅलटचा आन्वलोप मिळाल्या पासुन वोट काउंटिंग पर्यंतची प्रोसेस फूल्प्रुफ न्हवती. देर वाज नो मॅकेनिझम फॉर पेपर ट्रेल. थोडक्यात काउंट केलेलं वोट लेजिट आहे हे खात्रीने सांगणे अशक्य. त्यात ट्रंपचं, केंप/राफ्स्न्बर्गर्शी फाटलेलं. त्यांनी हात वर केले, आणि बाय्डनच घोडं रेड स्टेटच्या गंगेत न्हालं. आता हि वरची दुक्कल जागी झालेली आहे, आणि सगळे होल्स बुझवले आहेत अशी त्यांची धारणा आहे..
डेम्सनी अॅब्सेंटि वोट्स्ची पावर ओळखली वगैरे हा दिखावा म्हणजे एका जाणुन-बुजुन केलेल्या फ्रॉडला दिलेलं गोंडस नांव आहे. अमेरिकन ज्युडिशियल सिस्टम कशी चालते याचं उत्तर; हा फ्रॉड रिपब्लिकन कोर्टात सिद्ध का करु शकले नाहित.. ओजे निर्दोष कसा सुटला यात आहेत...
तुम्ही म्हणताय ते सगळे
तुम्ही म्हणताय ते सगळे क्लेम्स करून झाले आहेत.
हे एकाही निष्णात वकिलालासुद्धा सिद्ध करता आले नाही की numbers didn't add up, and the missing paper trail was large enough to impact the result. यात केसचा निकाल ही नंतरची गोष्ट आहे. केस मुळात उभी राहायला प्रथमदर्शनी म्हणतात तसे काहीही ठोस नव्हते. पब्लिक डोमेन मधे जी माहिती आहे ती मी बरीचशी बघितलेली आहे. राज्याचे रेकॉर्ड्स, कॉन्झर्वेटिव्ह मिडिया ई. सकट. कोठे कोणत्या प्रकारे किती वोटिंग झाले, ते कायदे कधीपासून तेथे होते, ते कायदे कोणी आणले, त्या खटल्यांमधले जजेस ट्रम्पने नेमलेले होते की नव्हते इथपर्यंत सगळे.
मला डेम्सनी केलेल्या कोणत्याही गोष्टीकरता गोंडस नावे वापरायची गरज नाही. मी डेम्सच्या कल्ट मधे नाही. पण मी तेव्हा जितका अभ्यास केला आहे त्यात मला काही ठोस दिसले नाही. अजूनही दिसले तर मत बदलायला मला काहीही अडचण नाही.
२०२१ मधे नवीन रूल्स आणल्यानंतरही २०२२ च्या मिडटर्म्स मधे २०२० पेक्षा फार वेगळे चित्र दिसले नव्हते. त्यामुळे ट्रम्प फक्त १२,००० ने हरला यात काही आश्चर्य नाही.
थोडक्यात काउंट केलेलं वोट
थोडक्यात काउंट केलेलं वोट लेजिट आहे हे खात्रीने सांगणे अशक्य. >> ह्या वाक्यातच सगळी गोम आहे. हेच उलट करून असे म्हणता येते कि थोडक्यात काउंट केलेलं वोट लेजिट नाही आहे हे खात्रीने सांगणे अशक्य. त्यामूळे सगळी बोंबाबोंब हि फक्त सारवासारव नि गलीबल लोकांना अजून मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे हे उघड होते.
ह्यावरूनच आपण २००० मधल्या दुब्याच्या फ्लोरिडामधल्या प्रकाराबद्दल बोलायचे कि ते कोशर आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>
>>
जास्त शक्यता अशी आहे की डेम्स नी कायदा सफाईने वापरून घेतला व रिपब्लिकन्सच्या ते आधी लक्षात आले नाही. पण हे तर रिपब्लिकन्सनीही इतरत्र केले असणारच. एका पार्टीतील लोक चोर आहेत आणि दुसरे नाहीत हे अशक्य आहे.
<<
बेकायदा मतदान करणे, खोटे मतदान करणे, बनावट बॅलट वगैरे गोष्टींमधे डेमोक्रॅट पक्ष तरबेज आहे निदान आज तरी. आणि त्यामुळे त्यांची अनेकदा सरशी होत आहे. रिपब्लिकन पक्षाची माजी अध्यक्ष रायनो अर्थात निव्वळ नावापुरती रिपब्लिकन होती. त्यामुळे तिने ह्या गैरप्रकारात काहीही लक्ष घातले नाही. (ती बाई कट्टर ट्रंपद्वेष्टा आणि रायनो म्हणून ख्याती मिळवलेल्या मिट रॉमनीची सख्खी पुतणी आहे त्यामुळे तिची निष्ठा कुठे असेल ते ओळखणे अवघड नाही. ) ह्यावेळेस काही प्रमाणात सुधारणा होईल अशी आशा.
कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर न्यूस्कमने मतदानासाठी ओळख मागणे बेकायदा ठरवणारा अध्यादेश पास केला. (कॅलिफोर्निया राज्य हे कायम डेमॉक्रॅटच्या बाजूचे आहे. तिथे पुरेसे मठ्ठ, बिनडोक लोक आहेत जे कुठलाही विचार न करता कायम एकाच पक्षाला निवडून देत आपल्या राज्याचा बट्ट्याबोळ करण्यात अनेक वर्षे गर्क आहेत! त्यामुळे त्याने निवडणुकीवर फार परिणाम होणार नाही) हे असे करणे नैतिक आहे का?
ड्रायव्हिंग करताना, विमान प्रवास करताना, डॉ़क्टरकडे जाताना, प्रिस्क्रिप्शन औषध घेताना सगळीकडे ओळख पटवावी लागते. मग निवडणूकीत का नको? कुणाचा फायदा व्हावा म्हणून ही नाटके चालू आहेत? डेमोक्रॅट लोक असा दावा करतात की काळे आणि अन्य अल्पसंख्य इतके बिनडोक आहेत की त्यांना ओळखपत्र मिळवणे वगैरे गोष्टी माहितच नाहीत! एक तर हे धादांत खोटे आहे किंवा हे लोक अल्पसंख्य लोकांना पुरेशी बुद्धी नाही असा ग्रह बाळगून आहेत.
जे नागरिक नाहीत त्यांना गठ्ठ्याने मते देता यावीत कारण ती सगळी आपल्याच पदरात पडणार आहेत. त्यामुळे सगळा आनंद असा हिशेब करून ह्या नराधमाने हा कायदा केला आहे. एकपक्षीय सरकार असल्यामुळे विरोध होणार नाही हे उघड आहे.
असे अनेक अनैतिक धंदे डेमोक्रॅट लोकांनी केलेले आहेत. पण गर्भपात हा एकच मुद्दा घेऊन अनेक लोक त्यांनाच पुन्हा पुन्हा मत देणार असे दिसते आहे. न जन्मलेल्या अर्भकाला हवे तेव्हा ठार मारता आले पाहिजे ह्या असुरी गोष्टीला स्त्रीमुक्तीचा हुंकार मानून ह्या खुनशीपणाला सोनेरी मुलामा देऊन तो लोकांच्या गळी उतरवला जात आहे हे मोठे गंमतीचे आहे!
कोरोना काळात, व्हाईट हाऊस
कोरोना काळात, व्हाईट हाऊस पोडियम वरुन जंतुनाशक इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता . आज , " I am the father of IVF " हा विनोद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वत: सोबतच स्पर्धा आहे.
https://www.cnn.com/2024/10/16/politics/video/donald-trump-father-of-ivf...
मस्क ने मास्क भिरकावला आहे
मस्क ने मास्क भिरकावला आहे आणि आता जल्लोषांत ट्रम्पसाठी नाचत आहे. तब्बल २० कोटी चहातावर्ग आहे आणि त्याच्या नाचण्याने मोठा फरक पडतो. निवडून आल्यावर त्याला खूप मोठी भूमिका बजावायची संधी आहे.
निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की.
निवडणूकीच्या काही दिवस आधी
निवडणूकीच्या काही दिवस आधी न्यूयॉर्क मध्ये अल स्मिथ डिनर असते. दोन्ही पक्षाचे उमेदवार तिथे नर्म विनोदी भाषण करून एकमेकांना कोपरखळ्या काढतात व जमलेला पैसा चॅरिटी सठी देण्यात होते. ओबामा व मॅककेन यांची उच्च दर्जाची भाषणे आजही यूट्यूब वर आहेत.
यावेळी कमला हॅरिस आल्याच नाहीत. घरीच एक अगदी न विनोदी व्हिडिओ करून पाठवला. तात्या आले होते, पण तात्या आणी उच्च अभिरुची यांचा काही संबंध नाही हे चाणाक्ष वाचकांनी ई ई.. तात्याने अगदी फालतू कमरेखालचे विनोद केले.
निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की.
मला तसे वाटत नाही. विविध बेटींग साईट्स व पोलिंग अॅव्हरेजेस मध्ये सर्व स्विंग स्टेट्स मध्ये तात्या पुढे आहे. "प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप" हे शब्द ऐकायची तयरी करायला हवी.
अल स्मिथ म्हणजे ते व्हाइट
अल स्मिथ म्हणजे ते व्हाइट हाउस करस्पॉण्डण्टस डिनर असते तेच का?
तात्याचे २०१६ चे भाषण थोडेफार ऐकले होते. त्यात होते बर्यापैकी विनोद (हिलरी सुद्धा हसली होती
). त्याला विनोद करताना फारसे एरव्ही पाहिलेले नाही. भाषणात करतो तेवढेच. मुळात सेन्स ऑफ ह्यूमर फार नसावा. असेल इतका काळ गंभीर बेअरिंग घेणे फार अवघड आहे.
कमला का गेली नाही कल्पना नाही. मस्त असतात ती भाषणे जनरली.
कमलाची फॉक्स वरची मुलाखत मजेदार होती.
ते वेगळं असावं.
ते वेगळं असावं.
कमला का गेली नाही कल्पना नाही
कमला का गेली नाही कल्पना नाही. >> ती विस्काँसीन मधे होती प्रचार सभांमधे.
"प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप" हे शब्द ऐकायची तयरी करायला हवी. >> नि समजा नाही झाला तर मग परत ६ जानेवारीची तयारी का विकु ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अ डे ऑफ लव्ह
अ डे ऑफ लव्ह![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तात्याच्या भाषेचा एक्स्पर्ट
तात्याच्या भाषेचा एक्स्पर्ट शेंडेनक्षत्र त्या कॅथलिक डीनरमधले तात्याचे विनोद आपल्याला समजावून सांगेल का ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<<तुम्ही बायडनपेक्षा काय
<<<तुम्ही बायडनपेक्षा काय वेगळे करणार आहात? प्रश्न अगदी साधा वाटतो. कमलाबाईने ह्याची तयारी करून जायला हवे होते.>>>
याचे कारण बायडेनने केले तेच तीहि करणार आहे.
कुत्री मांजरी खाणारे हेशियन्स, एनेमी फ्रॉम विदिन वर मिलिटरी वापरू, सगळ्या इल्लिगल इम्मिग्रंट्सना हाकलून देऊ, टॅरिफ लावू असल्या वल्गना लोकांना सांगायला ठीक आहेत, पण प्रत्यक्षात तसे घडणे कठिण.
कल्पना चांगल्या आहेत, बेकायदेशीर घुसखोरांना हाकलून दिलेच पाहिजे पण बोंबलायला त्यांना पहिले पकडणेच कठिण. अगदी प्रत्येक माणसाचे कागद तपासल्याखेरीज हे शक्य नाही. तेव्हढे पैसे ICE कडे नाहीत. लोकांनाहि असे येता जाता कागद दाखवा हे आवडणार नाही.
ट्रिकल डाऊन इकोनॉमी ची कल्पना थेओरेटिकल आहे. प्रत्यक्षात तसे घडले नाही.
टॅरिफ लावल्यावर बाहेरचा माल महाग होईल नि अमेरिकेतच वस्तू तयार करण्याचे प्रमाण वाढेल हेहि थेअरीत ठीक आहे, प्रत्यक्षात असे होत नाही.
रोजच्या जीवनात आवश्यक असे सर्व काही बाहेरून येते, टॅरिफ मुळे महाग झाले तर लोक महागाई वाढली म्हणून बोंब मारतील.
आताहि कित्येक अमेरिकन लोक होंडा, टोयोटा, Audi, BMW पेक्षा स्वस्त असल्या तरी लोक होंडा नि टोयोटा, लेक्सस, Audi, BMW च घेतात, किंवा हुंडॅ, माझदा, व्होक्स्वॅगन घेतात.पण अमेरिकन नाही. ते का बरे?
किती पैसे लागतील अमेरिकन गाड्या या बाहेरच्या देशाच्या गाड्यांपेक्षा चांगल्या करायला?
अमेरिकेत धंदा चालू करून, चालू ठेवणे हे प्रचंड महाग आहे, कामगारांना भरपूर पगार दिल्याशिवाय ते शक्य नाही. पण श्रीमंत लोक तसे करतील का, की नविन यॅट नि जेट्स घेतील? की ५०० मिलियनची घरे, ४०० मिलियनची पेंटिंग्स घेतील?
हेन्रि फोर्ड हुषार - त्याने कामगारांना भरपूर पगार द्यायला सुरुवात केली, त्यायोगे कामगारांजवळ त्यच्या गाड्या विकत घेण्याची ऐपत आली. पण तेंव्हा बाहेरच्या स्वस्त गाड्या उपलब्ध नव्हत्या. कामगारहि बरे होते, गांजा ड्रग्स करणारे नव्हते. आता तसे नाहीये.
मी पुटिनला सांगून युक्रेनचे युद्ध थांबविन अश्या वल्गना ठीक आहेत, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही.
हे ज्या लोकांना कळत नाही ते त्रंप्याला मते देतील. ज्यांना कळते ते नाही.
मग हॅरिसनी कितीहि उत्तम पॉलिसी सांगितली तरी उपयोग नाही, म्हणून गरज नाही.
एका टीमने २५ गोल केले तर जिंकायला दुसर्या टीमला २६ करावे लागतात. पण दुसर्या टीमचा एकहि गोल होत नसेल तर आपला एकच जिंकण्यासाठी पुरतो.
Pages