अंत: अस्ति प्रारंभ: ३: {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया}

Submitted by रीया on 17 September, 2024 - 01:29

मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
तेवढ्यात शशकचा तिसरा विषय आला. धागा उघडताच तिच्या हातातल्या करंज्या गळून पडल्या. जणू जबाबदारीची जाणीव ठेवत संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी मायबोलीचा बाप्पा तिला म्हणत होता -

खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आईगो रिया, एक छोटीशी करंजी खा आणि दुसऱ्या दिवशी जास्त वर्कआऊट कर. पण छान आहे की गोष्ट. आवडली . फक्त शोधायला लागली . एवढं आहे ना गणेशोत्सवात वाचायचं, त्या मुळे पटकन दिसत नाही नवीन लेखन.

छान..

अभिनंदन..
मला यंदा सर्वाधिक आवडलेली शशक हीच होती.

Pages