अंत: अस्ति प्रारंभ: ३: {सर्वसिद्धीकर प्रभो}-{रीया}

Submitted by रीया on 17 September, 2024 - 01:29

मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
तेवढ्यात शशकचा तिसरा विषय आला. धागा उघडताच तिच्या हातातल्या करंज्या गळून पडल्या. जणू जबाबदारीची जाणीव ठेवत संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी मायबोलीचा बाप्पा तिला म्हणत होता -

खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरं सांगू तर मला ही कल्पना सुचली तेंव्हा मला एकदम छान वाटलं होतं पण बाकीच्या इतक्या मस्त कथा वाचून आपल्याला काही नंबर वगैरे मिळणार नाही असं वाटून मी स्वतःलाच वोट नाही दिल. पण मग whatsapp वर ग्रुप मधे अभिनंदन बघून आश्चर्यच वाटलं. इथे येऊन पाहिलं तर चक्क पहिला नंबर. खूप मस्त वाटलं
खोटं कशाला बोलू पण लहान मुलांना होतो तसा आनंद झाला कारण आपण लिहू शकतो याचा कॉन्फिडन्स गेलेला. आपण लिहीलेलं लोकांना आवडतंय हे बघून स्वतःला च प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं.

त्या तिथे पलिकडे तिकडे लोकं म्हणत होती ना स्पर्धा कशाला हवी. त्याचं उत्तर इथे मिळेल Happy

वोट केलेल्या सगळ्यांचे आभार आणि संयोजकांना विशेष प्रेम <३

Pages