भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
ती विहीर आहे म्हणे.
ती विहीर आहे म्हणे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे आता रस्त्यावरून मोठे वाहन नेताना इतिहासाचा नीट अभ्यास करून कुठेकुठे विहिरी होत्या ती लोकेशन्स टाळून जायचे
* इतिहासाचा नीट अभ्यास करून >
* इतिहासाचा नीट अभ्यास करून >>.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुणेकर काहीही करू शकतात.
पुणेकर काहीही करू शकतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतर गावांत तोडांत बोट घालतात. इथे उलटे होते
आपण पायात चप्पल घालतो ना. . .
आपण पायात चप्पल घालतो ना. . .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसे आहे ते !
आश्चर्याने तोंडे बोटात घातली
आश्चर्याने तोंडे बोटात घातली >>
हे मी आधी नीट वाचलं नव्हतं
पायात चप्पल >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंडे बोटात घातली
तोंडे बोटात घातली![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
New stock from Kitchen Tips
New stock from Kitchen Tips Marathi :
तासांचे पाणी
दिवसांचे पाणी
आठवड्यांचे पाणी
पंधरवाड्यांचे पाणी
महिन्यांचे पाणी
चालणारच नाही का ?
वर्षांचे पाणी
वर्षांचे पाणी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वर्षांचे पाणी >>> ते
वर्षांचे पाणी >>> ते छानपैकी मुरलेले पाणी असते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा यांचे पाणी - असं
वर्षा यांचे (घरचे) पाणी - असं म्हणायचं असेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पावासांचे पाणी.
पावासांचे पाणी.
वरील सर्व गलथानपणाच्या मुळाशी
वरील सर्व गलथानपणाच्या मुळाशी मराठी भाषेबद्दलची अनास्था हेच कारण आहे. या संदर्भात प्राध्यापक द दि पुंडे यांच्या ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ या पुस्तकातील एक अनुभव उद्धृत करतो :
एकदा ते आणि त्यांचा मित्र पुण्याच्या सदाशिव पेठेतून फिरत चाललेले होते. तिथे एका फलक रंगवणाऱ्या माणसाने त्यांना थांबवले आणि हातातला कागद समोर धरून तो म्हणाला,
“अहो साहेब, हा इंग्रजी फलक मी रंगवतो आहे खरा, पण या मजकुरातले एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकलेले आहे असे मला वाटते. तर बरोबर स्पेलिंग सांगता का ?”
मग या प्राध्यापक द्वयीने योग्य ते स्पेलिंग सांगितले.
त्याचवेळी त्या दोघांचे लक्ष त्याने शेजारीच रंगवून ठेवलेल्या एका मराठी फलकाकडे गेले. त्यामध्ये ‘जाहिर, नागरीक, प्रतीसाद’ असे बरेच अशुद्धलेखन होते. ते त्या दोघांनी त्याच्या नजरेस आणले.
त्यावर तो लगेच उद्गारला,
“ ह्या ! ते मराठी ना, त्यात काही नाही. पहिली-दुसरी वेलांटी-उकार झाला तरी काही फरक पडत नाही; काहीच बिघडत नाही”.
. . .
अशी अनास्था आता रंगारी पातळीपासून थेट संपादक पातळीपर्यंत मुरलेली आहे. आणि हे लोक ह्रस्व-दीर्घच्या चुकांना तर अशुद्ध समजतच नाहीत. पण त्याही पुढे जाऊन शब्द आणि वाक्यरचनेच्या मूलभूत चुकांचीही त्यांना फिकीर नाही.
असो . . .
बोटात तोंडे ती एकूण बातमीच
बोटात तोंडे
ती एकूण बातमीच इंटरेस्टिंग दिसतेय. वाचली पाहिजे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किचन टिप्स हे एकंदरीत मनोरंजनाचं साधन दिसतंय अनिंद्य
अनास्था + १
अनास्था + १
ह्रस्व-दीर्घ, शब्द आणि वाक्यरचनेच्या मूलभूत चुका सोडा आता अर्थ लागला नाही तरी चालेल असे आहे.
वर आलेले “वर्षांचे” पाणी निरर्थ आहे, चूक नाही.
It's so bad that it isn't
It's so bad that it isn't even wrong, असं का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राज ठाकर्यांची ‘प्रकट’ की
राज ठाकर्यांची ‘प्रकट’ की ‘परखड’ मुलाखत???
अनिंद्य,
अनिंद्य,
तुमच्या "टिचन किप्स" वाचून भारी मजा येते.
Submitted by वावे on 22
Submitted by वावे on 22 September, 2024 - 12:32
पाण्यासाठी वर्षभर वाट बघायची असेल तर चिप्स “झटपट” कसे होणार ?
वर्षा बंगल्यावरचे पाणी
वर्षा बंगल्यावरचे पाणी म्हणायचं असेल त्यांना!
(No subject)
(No subject)
अरे देवा ! छापील आवृत्तीतही
अरे देवा ! छापील आवृत्तीतही तोंडे बोटात घातलीत. पुणेकर काय करतील आणि काय नाही, काही सांगता येत नाही.
तेथे विहीर आहेच. शनिपारासमोर
तेथे विहीर आहेच. शनिपारासमोर जी महाराष्ट्र बँक आहे (जनमंगल) त्या बँकेच्या इमारतीखालीही विहिरच आहे. (Deposit, locker वगैरे सगळे लवकरात लवकर बघून घ्या)
=====
मित्रांनो,
आपण झाडांची मुळे जमिनीत जाताना बघतो. काही मृतदेहही जमिनीत पुरले जातात. 'खड्ड्यात गेले' हा शब्दप्रयोग तर प्रत्येक नवं-गृहिणीच्या तोंडात असतोच. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसल्यामुळे व श्रीकृष्ण या सारथ्याने सारथ्य सोडून भलताच सल्ला दिल्याने महाभारताचा शेवट व्यासांच्या इच्छेविरुद्ध झाला हे प्रखर सत्य आजच्या युगाला माहीत नसेलच! अधेमधे काही सरकारेही अचानक जमिनीत जातात. पावसाचे पाणी जमिनीत गेल्यामुळे शेत पिकते हे काही आता नवीन राहिलेले नाही. जमिनीत कधीकधी छुपे खजिनेही मिळतात पण ते सरकारजमा करावे लागतात ही दुर्दैवी अवस्था आज ओढवलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक अत्यंत थरकाप उडवणारी बातमी हाती आली आहे. त्या बातमीचा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. जमिनीत काय काय जाऊ शकते हे कळल्यावर तुम्ही विचलीत व्हाल. शेवटी 'माती असशी, मातिस मिळशी' या उक्तीनुसार आज ना उद्या आपण सगळेच जमिनीत जाणार आहोत यात शंका नाही. शेवटी आयुष्य म्हणजे काय, तर जन्म घ्यायचा, जगायचे आणि मरायचे. एक दिन बिक जायेगा माटी के मोल असे मुकेश यांना म्हणायला लावून राज कपूर गाजलेले आहेतच. जमिनीवरून झालेले वाद एकीकडे जगात अस्थिरता निर्माण करत असताना स्वेच्छेने व कोणतीही जीवितहानी न होऊ देता जमिनीत जाण्याचे अध्यात्मिक कार्यही या भूतलावर होत आहे. त्यामुळेच, सिटी पोस्टाखालील पौराणिक विहिरीतील अंतर्गत जलप्रवाहामुळे रस्ता खचून एक अवजड वाहन जमिनीत गेले.
ही करूण कथा व व्हिडीओ बघून आपल्या तिखट शब्दांत समाचार घ्या.
Submitted by बेफ़िकीर on 22
Submitted by बेफ़िकीर on 22 September, 2024 - 23:43
अवघे ७७ वयोमान !
अवघे ७७ वयोमान !
Her age is same as her father Randhir Kapoor’s age. He was born on 15 Feb 1947 and became Karishma’s father when he was about 4 months old !!!!!
कालचा लोकमत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अति महान
अती महान![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उपसंपादकाचा करिश्मा
उपसंपादकाचा करिश्मा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
तोंडे बोटात
तोंडे बोटात![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
करिष्मा >>>
आता राज कपूरने काय अट ठेवली असेल याची उत्सुकता वाटू लागली आहे ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
… आता राज कपूरने काय अट ठेवली
… आता राज कपूरने काय अट ठेवली असेल….
ही स्पीड पाहाता पुढच्या चार महिन्यात पणतवंडाचे तोंड बघण्याची ?
On serious note, थोडे तरी बघावे लिहितांना. अपलोड करतांना एकदा तरी पुन्हा वाचावे की. Very bad.
Pages