भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
सावली, जाऊदे आता. एक तर मी
सावली, जाऊदे आता. एक तर मी फेसबुकवर नाही आणि झाला तेवढा पाठपुरावा बास झाला तुमचीही पाकृ छान आहे.
गिरणीत अतिप्रसंग
गिरणीत अतिप्रसंग केल्यास
गिरणीत अतिप्रसंग केल्यास तोंडाला पांढरे फासले जाईल
(No subject)
ऋतुराज
तोंडाला पांढरे फासले जाईल
तोंडाला पांढरे फासले जाईल
ऋतुराज
ऋतुराज
भारीच !
भारीच !
म्हणजे माणूस असाही पांढराफटक पडू शकतो तर
ऋतुराज
ऋतुराज
(No subject)
???
थोरांचे मातीचे पाय आणि घरोघरी
थोरांचे मातीचे पाय आणि घरोघरी असलेल्या मातीच्या चुली माहिती होत्या आता त्यात मातीच्या नोटांची भर पडली
Soiled notes चं ते थेट
Soiled notes चं ते थेट भाषांतर दिसतंय. As per RBI, "solied notes are those which have become dirty or slightly cut".
त्यात मातीच्या नोटांची भर
त्यात मातीच्या नोटांची भर पडली>>
अच्छा ! म्हणजे, व्यवहारात
अच्छा ! म्हणजे,
व्यवहारात निरुपयोगी झालेल्या कळकट नोटा
असं म्हणायला पाहिजे.
Google translate वापरून
Google translate वापरून केलेलं भाषांतर असेल तर तिथे जाऊन सुधारणा सुचवलं शक्य आहे का?
>>> Soiled notes
>>> Soiled notes
:कपाळाला हात:
>> Soiled notes
>> Soiled notes
आमची माती (खाल्लेली) आमची माणसं
आपण लहानपणी पैशांचे झाड
आपण लहानपणी पैशांचे झाड लावावे म्हणुन नाणी मातीत पेरून पाणी घालत असू. आता नाणी कोण बाळगतं, आजकालची मुले नोटा मातीत पेरून पाणी घालत असावेत. मग मोठ्यांना कळले की ते या नोटा काढुन बँकेत बदलायला जात असतील. त्यांना एवढी माती लागली असल्याने मातीच्या नोटा म्हणत असावेत.
सोने नोटा आणि माती | आम्हां
सोनेनोटा आणि माती | आम्हां समान हे चित्तीं||ऋतुराज.
ऋतुराज.
धमाल चालली आहे. नोटा घाणेरड्याच असतात, आमची आई नोटांना हात लागला की हात धुवायला लावायची. कोणी कोणी कशाकशाचे हात लावलेले असतील, कुठं कुठं गेलेल्या (अंतर्वस्त्रात वगैरे) असतील म्हणून.
बहुतेक थोडं अवांतर आहे. काल एका बाथरूमच्या भिंतीवर
Please be seated until you finish your performance...!
लिहिलेलं बघितलं. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव हवाच.
पुरुषांनी कमोडवर बसूनच लघवी करावी याबाबतीत मात्र सहमतच आहे. सार्वजनिक/ खाजगी असो स्त्रियांना स्वच्छ कमोड मिळायला हवा.
*पुरुषांनी कमोडवर बसूनच लघवी
*पुरुषांनी कमोडवर बसूनच लघवी करावी
>>> मुद्दा तुमच्या दृष्टीने बरोबर आहे परंतु पुरुषांना नुसती लघवी करताना ही सवय करून घ्यायला खूप वेळ लागेल आणि अवघडल्यासारखे पण होईल !
निदान घरच्या कमोडच्या बाबतीत तरी पुरुषांनी प्रत्येक वेळेला लघवी करताना तो मधला फ्लॅप खाली टाकला पाहिजे. मी तसे करतो.
मंत्रिपद हा शब्द लोकसत्तातील
मंत्रिपद हा शब्द लोकसत्तातील एकाच बातमीत किती प्रकारे लिहिला गेला आहे ते पाहा...
मंत्रिपद 5
मंत्रीपद 1
राज्यमंत्रिपद 1
राज्यमंत्रीपद 3
मंत्रिमंडळ 2
अरूण फडके यांच्या लेखनकोश या पुस्तकाला प्रमाण मानले तर
बरोबरः मंत्रिपद 5, राज्यमंत्रिपद 1
चूकः मंत्रीपद 1, राज्यमंत्रीपद 3, मंत्रिमंडळ 2
तत्सम ऱ्हस्वान्त शब्द समासात पूर्वपदावर आला तरी तो दीर्घ लिहावा अशी "मागणी" बहुतेकांनी केली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही! नियमाप्रमाणे मंत्रिपद हा शब्द योग्य असून मंत्रीपद हा शब्द चुकीचा आहे. या विषयाची अधिक चर्चा मनोगताच्या या पानावर वाचता येईल.
र्हस्व/ दीर्घाला जरूरीपेक्षा जास्त महत्त्व देण्याची गरज नाही या मताशी मी देखील सहमत आहे. पण त्यामुळे वाचनाची लय बिघडते त्याचे काय? न वाचण्याचा पर्याय माझ्यापुढे आहेच. पण तो पर्याय जर अनेकांनी स्वीकारला तर भाषेचे आणि पर्यायाने वृत्तपत्रांचे भविष्य काय असेल? ज्यांचा या विषयावर अभ्यास आहे किंवा ज्यांची नोकरीच या विषयाशी संबंधित आहे ते देखील या बाबतीत असे उदासीन असले तर माझ्यासारख्या "अंकल" टाईपच्या लोकांना लोक कशाला गंभीरपणे घेतील?
सहमत आहे.
सहमत आहे.
मंत्रिमंडळ >> इथे पण तत्समचा
मंत्रिमंडळ >> इथे पण तत्समचा नियम लावल्यास हा बरोबर ठरेल ना?
मंडळ हा शब्द तत्सम नाही
मंडळ हा शब्द तत्सम नाही म्हणून वेगळा नियम आहे का?
कठीण आहे ! हेमवतीनंदन
https://www.loksatta.com/politics/congress-wins-allahabad-constituency-p...
कठीण आहे ! हेमवतीनंदन बहुगुणा पुरुष होते !!
लोकसभेला १९८४ मध्ये उभे राहण्यापूर्वी ते 1975 मध्येच मुख्यमंत्री होते. कंसातला तपशीलही चुकीचा.
पुरुषांना नुसती लघवी करताना
पुरुषांना नुसती लघवी करताना ही सवय करून घ्यायला खूप वेळ लागेल आणि अवघडल्यासारखे पण होईल !
>> डॉ. कुमार.. हे इथे अवांतर होईल. तरीही बसून लघुशंका करणे पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्याने कॅन्सर चा धोका कमी होतो, blader पूर्ण रिकामे होते त्याने... असे बरेच कायकाय फायदे सांगणारा व्हिडिओ इतक्यात पाहिला. त्या व्हिडियो वरील कमेंट्स वाचून मुसलमान पुरुष बसूनच लघुशंका करतात (महंमद पैगंबर यांनी तसे सांगितले आहे) असेही कळले (ही माझ्यासाठी नवीन माहिती होती. सार्वजनिक स्वच्छतागृहात जिथे बसण्याची काही सोय नाही तिथे मुसलमान पुरुष काय करतात?) तर यावर योग्य कुठेतरी मार्गदर्शन होईल असे लिहा.
अर्थात ते खाली बसणे म्हणजे squatting position अभिप्रेत असावी. कमोड वर बसणे अभिप्रेत नसावे.
पियू, रंजक मुद्दा आहे !
पियू, रंजक मुद्दा आहे !
बघूया, या संबंधात काही शास्त्रीय माहिती मिळाली तर युरियाच्या धाग्यावर लिहीन.
squatting position अभिप्रेत असावी. कमोड वर बसणे अभिप्रेत नसावे. >>> अगदी !
माझ्या लहानपणी मी अनेक पुरुष शेतकरी बसून लघवी करताना पाहिलेले आहेत.
@ पियू : हे पाहाhttps://www
@ पियू : हे पाहा
https://www.maayboli.com/node/64830?page=5
NEET परीक्षेतील गोंधळाच्या
NEET परीक्षेतील गोंधळाच्या संदर्भात 13 जून 2024 च्या छापील ‘मटा’मधल्या बातमीत खालील वाक्य आहे :
“. . . या परीक्षेचे पावित्र्य अजिबात कमी होऊ दिले जाणार नाही” असे महासंचालक म्हणाले.
वरील वाक्यात ‘पावित्र्य’ शब्द अयोग्य वाटतो. ‘महत्त्व’ (/ गांभीर्य) योग्य ठरावा.
( मूळ इंग्लिश बातमीत तिथे sanctity हा शब्द असण्याची शक्यता आहे).
पियू आणि कुमारसर, छान चर्चा.
पियू आणि कुमारसर, छान चर्चा. पोच द्यायची राहून गेली पण वाचली होती.
अस्मिता धन्यवाद तुम्ही तो
अस्मिता धन्यवाद !
तुम्ही तो महत्त्वाचा विषय चालू केला होता आणि त्यामुळे त्याच्या काही अन्य पैलूंविषयी पुढे चर्चा झाली.
एका मराठी चित्रपटात हा मुद्दा चांगला दाखवला होता. मला आता त्याचे नाव आठवत नाही पण स्त्रीची भूमिका कादंबरी कदमने केलेली आहे.
ती तिच्या पुरुष जोडीदाराला स्वच्छतागृहात जाताना स्पष्ट सूचना देते की, तो कमोडचा मधला फ्लॅप खाली टाकून मग लघवी करायची.
Pages