लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

plumber board.jpg

एका झाडावरील या पाटीच्या खाली त्यांचा चलभाष क्रमांक दिलेला होता. वरील सर्व मजकूर योग्य आणि शुद्ध लिहून त्यांना संदेशाद्वारे पाठवला आहे.

मी मध्यंतरी आमच्या जवळच्या गिरणीवाल्याला 'दिर्घकाळ' नाही 'दीर्घकाळ'. 'अंनशिका' नाही, 'अंशिका' वगैरे सांगितल्यावर त्याने मला 'ताई, तुम्ही टीचर आहात का?' असं विचारलं!! मी त्याला भविष्यकाळात काही नवे बोर्ड करणार असाल, तर मी शुद्धलेखन तपासून देईन' अशी ऑफर दिली आहे.

कामाला तर बोलवले नाही, फक्त चूक काढली म्हणुन त्याला कोप येऊन "यांचे बाथरुम चोकोप होवो" असा शाप न दिला म्हणजे मिळवले.

मध्यंतरी आमच्या जवळच्या गिरणीवाल्याला
>>> गिरणीवरून हा एक भारी किस्सा. तो प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या भाषाविषयक लेखात लिहिलेला आहे.

त्यांच्या गावच्या गिरणीच्या भिंतीवर एक वाक्य रंगवलेले होते. ती दाराजवळची भिंत अरुंद असल्याने तिथे एका ओळीत तीनच अक्षरे मावत होती. मग त्या रंगारी व्यक्तीने खालीलप्रमाणे लिहून काढले :

येथेपि
ठाचीगि
रणीचा
लूआहे

पुंडे तेव्हा शालेय वयात होते आणि त्यांच्या मित्रांमध्ये ही पाटी वाचण्याचा कार्यक्रम रोज होत असे.

अनया, मानव >>>>> भारीच

गिरणीवरून हा एक भारी किस्सा.>>>>
द दि पुंड्यांच पुस्तक भारी आहे ते.
त्याच मुखपृष्ठ सुद्धा असेच मजेशीर आहे

भ यंकरसुं दरम राठी भाषा

भ यंकरसुं दरम राठी भाषा
अ -ग - दी !
ते मी वाचलेय. खूप छान आहे.
साधारण सन 2000 च्या दरम्यान भयंकर हे विशेषण आपण आपण सुंदर गोष्टींसाठी वापरू लागलो होतो.

साधारण सन 2000 च्या दरम्यान भयंकर हे विशेषण आपण आपण सुंदर गोष्टींसाठी वापरू लागलो होतो.>>>>

कुठल्यातरी मराठी शिकलेल्या बंगाल्याने हे भिषण सुंदर काम केले असणार…

जबरदस्त! हे नेक्क्ष्ट लेव्हल ए आय आहे. शस्त्र हे रोमन लिपीत स्पेलिंग शास्त्र असे वाचले गेले, मग ते वापरणारे शास्त्रज्ञ आणि समनार्थी संशोधक झाले असावेत. रामाचा पक्या करतात ना, तसे झाले. रामा >> मारा >> पीटो >> टोपी >> क्याप >> पक्या

मानव Lol

जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची मुलाखत इथे आहे: https://m.youtube.com/watch?v=dvP0656MbVE
त्यात त्यांनी सांगितलेला एक भन्नाट किस्सा.

एकदा एका वाहिनीसाठी त्यांची मुलाखत होती. प्रश्न आधी ठरवलेले नसून आयत्या वेळेला काही जण ते विचारणार होते. त्यापैकी एकाने त्यांना विचारले,
कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी यात काय फरक आहे?

हे ऐकल्यावर पालव यांना कपाळावर हात मारून
घ्यावासा वाटला !

कॅल्शिअमयुक्त दगडी पेन्सिलीने लिहीतात ती कॅलिग्राफी आणि सोनेरी रंगाच्या पेनाने लिहीतात ती सोनोग्राफी

आता ह पा डोक्यावर हात मारतील बहुदा. Wink

लग्नाचं आमंत्रण देऊन लिव्ह-इन करता आशीर्वाद मागण्याची युक्ती असेल. एकदा आशीर्वाद दिले की भरपूर दारू, गांजा पाजूनच लोकांना परत पाठवत असतील, सकाळी उठले की मेमरी ब्लॅकआउट.

Pages