लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lamp of race ! Lol

Such चुका are worshipped at our fifth standard Happy

बरोबर आहे.
शर्यत अंधारात ठेवल्यावर दिवा लागणारच Happy

अगदी !
. .
वंशाचा दिवामध्ये जे अभिप्रेत आहे ते व्यक्त करणारा योग्य इंग्लिश शब्दसमूह आहे का ?

progeny, descendant हे शब्द तसे सामान्य अर्थी आहेत

people says हे कपिलचे फेमस वाक्य म्हणून "८३" मधे खूप मजेदार पद्धतीने वापरले आहे. कपिलच्या एकूणच इंग्रजीची खूप खिल्ली उडवली आहे आणि त्यानेही दिलखुलासपणे ती उडवून दिली आहे. आपल्याकडे थोर लोकांनी असे स्वत:वर होउ दिलेले विनोद फार क्वचित दिसतात.

"Like people says - taste the success once, the tongue wants more"
https://www.youtube.com/watch?v=DmgPYFCSWq0&t=60s

clan >>> +1
कुळ ह्या अर्थी हा समर्पक आहे .

मशीन लर्निंग (ML) आणि आर्टिफिशीयल इंटलिजन्स (AI) यातील फरक समजण्यासाठी हे उदाहरण फार चांगले आहे. "वंशाचा दिवा" याचे शब्दशः भाषांतर "lamp of race" हे गूगलच्या मशीन लर्निंगचे उदाहरण झाले. तर torchbearer of family's legacy किंवा light of the lineage हे चॅट जीपीटी चे भाषांतर. यात मराठीचा भावार्थ अचूक पकडला गेला आहे.

जीपीटीने केलेले भाषांतर जास्त बरोबर आहे हे खरे. पण गूगल चे भाषांतर "मशीन लर्निंग" चा प्रकार असेल असे नाही. शब्दशः भाषांतरसुद्धा असू शकेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत टंकलेखन चाचणी परीक्षा सध्या सुरू आहेत. प्रत्यक्ष टंकलेखन चाचणीवेळी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेला ISM V6 प्रणालीवरील remington marathi keyboard layout येथे पाहता येईल.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/6913

ISM V6 प्रणाली म्हणजेच युनिकोड प्रणाली! युनिकोडने आपल्याला विशिष्ट की-बोर्डच्या बंधनातून सोडविले आहे. इन्स्क्रिप्ट / गमभन यासारखे कीबोर्ड नको असतील तर नुसते बोलून टाईप करण्याचे सॉफ्टवेअर देखील विकसित झाले आहे. अशा वेळी या रेमिंग्टन की-बोर्डचा नियम कशासाठी ते मला समजले नाही.
सुमारे ३०० शब्दांपैकी २७० ते २८० शब्द अचूक टाईप करणे अपेक्षित आहे. ह्यात न समजण्यासारखे काही नाही. पण "अचूक" टाईप करणे म्हणजे काय ते समजले नाही. अचूक म्हणजे मराठीच्या शुद्धलेखनाच्या नियमानुसार अचूक की परीक्षेच्या वेळी स्क्रीनवर दिसणारा शब्द जसाच्या तसा (मग तो अशुद्ध असला तरी) टाईप करणे अपेक्षित आहे? हा प्रश्न मी माझी प्रामाणिक शंका म्हणून विचारत आहे, कुणाचा दोष दाखविण्यासाठी किंवा बढाई मारण्यासाठी वगैरे नाही. उदाहरण म्हणून वर दिलेल्या शासकीय प्रसिद्धीपत्रकात "अचूक" हा शब्द एका ओळीत दीर्घ तर दुसर्‍या ओळीत "अचुक" असा र्‍हस्व आहे. उमेदवाराने कसे टाईप करणे अपेक्षित आहे?
ओपन कॅटेगरीतील उमेदवार फक्त २० चुका करू शकतात तर राखीव जागांवरील उमेदवार ३० चुका करून देखील उत्तीर्ण होऊ शकतात हा देखील न समजण्यासारखा मुद्दा आहे. दिव्यांग आणि माजी सैनिक टंकलेखन परीक्षा न देताच "लिपिक टंकलेखक" किंवा "कर सहायक" बनू शकतात. पण सध्याच्या काळात असे मुद्दे नाही समजले तरी चालेल!

खरे आहे ! अभ्यासक्रमांच्या अनेक पातळ्यांवरील प्रश्नपत्रिकांमध्ये शुद्धलेखन आणि तपशीलाच्या चुका हा चिंतेचा विषय झालेला आहे.

जे उमेदवार मराठी टायपिंग "देवनागरी टाईपरायटर" वर शिकलेले आहेत त्यांच्यासाठी(च) रेमिंग्टन की-बोर्ड योग्य आहे.
पण ज्यांना इंग्रजी टायपिंग येते पण मराठी टायपिंग येत नाही त्यांच्यासाठी गमभन हा की-बोर्ड योग्य आहे. गमभन वापरण्यापूर्वी मी फोनेटिक, आयट्रान्स, आकृती, किरण फॉन्ट असे पर्याय वापरत असे. त्यातून नैराश्य, अपेक्षाभंग, चित्तविक्षेप, आर्थिक हानी असे बरेच काही वाट्याला आले. "गमभन"कार ओंकार जोशी यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध पद्धतीने संगणकावरील मराठी देवनागरी एकसमान केली तसेच हा की-बोर्ड कोणत्याही वेबसाईटवर जोडता येईल अशी सोय केली. तेव्हापासून मी तोच की-बोर्ड वापरत आहे. ओपन सोर्स लायसन्समुळे मी देखील त्यात काही योगदान देऊ शकलो.
ज्यांना मराठी किंवा इंग्रजी असा कोणताच टाईपराईटर वापरता येत नाही म्हणजे नव्यानेच टाईप करू लागले आहेत त्यांच्यासाठी इन्स्क्रिप्ट हा केंद्र सरकारने बनविलेला की-बोर्ड योग्य आहे. (Department of Electronics (DoE) and the Ministry of Communications and Information Technology) हा की-बोर्ड सुमारे ३५ वर्षे जुना आहे पण संगणकासाठी उपयुक्त आहे. बहुतेक सर्व केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये हाच वापरला जातो.
राज्य सरकारच्या काही कार्यालयांमध्ये अजूनही देवनागरी टाईपरायटर वापरले जात असतील तर मात्र रेमिंग्टन की-बोर्डची निवड योग्य ठरेल. पण ते कारण असेल तर ती एक चिंतेची गोष्ट आहे. कारण मराठी टाईपरायटरवर बडविलेला कागद हल्ली बघायला देखील मिळत नाही. दुसर्‍या एका दृष्टीने पाहिले तर रेमिंग्टनचा नियमही ठीक वाटतो कारण हा की-बोर्ड इतरांपेक्षा कठीण आहे. त्यावर ३० शब्द प्रति मिनीट या वेगाने ९०% पेक्षा जास्त अचूकता जो उमेदवार देत असेल तो टंकलेखक म्हणूनच नव्हे तर त्याच्याही वरच्या पोस्टसाठी पात्र ठरू शकतो!

बाय द वे (By the way ह्याला मराठी प्रतिशब्द?) मी रायटरमध्ये "अचुक" असे टाईप केले तर अ‍ॅटोकरेक्टने ते आपोआप "अचूक" असे बदलले. नाही तर लिब्रे ऑफिसमधील टूल्स - अ‍ॅटोकरेक्ट - अप्लाय हा पर्याय वापरता येतो. अ‍ॅटोकरेक्ट, थिसॉरस (समानार्थी शब्द), स्पेलचेक अशा साधनांशिवाय मराठीत टाईप करण्याचा मी विचार देखील करू शकत नाही!

* By the way ह्याला मराठी प्रतिशब्द? >>>
1. तसेच,
2. त्या संदर्भात . . . ( हे पण लक्षात घ्यावे)

3. . . . आणि हो, . . . ( हे सुद्धा सांगितले पाहिजे की. . . )
4. जाता जाता . . . (हे सुद्धा लक्षात घेऊयात)

मी क्षणभर विचारात पडलो नाव वाचताच, काहीतरी बरोबर नाही वाटतंय पण काय चुकलंय कळायला दोन क्षण लागले.

Pages