लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती विहीर आहे म्हणे.
म्हणजे आता रस्त्यावरून मोठे वाहन नेताना इतिहासाचा नीट अभ्यास करून कुठेकुठे विहिरी होत्या ती लोकेशन्स टाळून जायचे Happy

New stock from Kitchen Tips Marathi :

IMG_7171.jpeg

तासांचे पाणी
दिवसांचे पाणी
आठवड्यांचे पाणी
पंधरवाड्यांचे पाणी
महिन्यांचे पाणी

चालणारच नाही का ?

वरील सर्व गलथानपणाच्या मुळाशी मराठी भाषेबद्दलची अनास्था हेच कारण आहे. या संदर्भात प्राध्यापक द दि पुंडे यांच्या ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ या पुस्तकातील एक अनुभव उद्धृत करतो :
एकदा ते आणि त्यांचा मित्र पुण्याच्या सदाशिव पेठेतून फिरत चाललेले होते. तिथे एका फलक रंगवणाऱ्या माणसाने त्यांना थांबवले आणि हातातला कागद समोर धरून तो म्हणाला,

“अहो साहेब, हा इंग्रजी फलक मी रंगवतो आहे खरा, पण या मजकुरातले एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकलेले आहे असे मला वाटते. तर बरोबर स्पेलिंग सांगता का ?”
मग या प्राध्यापक द्वयीने योग्य ते स्पेलिंग सांगितले.

त्याचवेळी त्या दोघांचे लक्ष त्याने शेजारीच रंगवून ठेवलेल्या एका मराठी फलकाकडे गेले. त्यामध्ये ‘जाहिर, नागरीक, प्रतीसाद’ असे बरेच अशुद्धलेखन होते. ते त्या दोघांनी त्याच्या नजरेस आणले.

त्यावर तो लगेच उद्गारला,
“ ह्या ! ते मराठी ना, त्यात काही नाही. पहिली-दुसरी वेलांटी-उकार झाला तरी काही फरक पडत नाही; काहीच बिघडत नाही”.

. . .

अशी अनास्था आता रंगारी पातळीपासून थेट संपादक पातळीपर्यंत मुरलेली आहे. आणि हे लोक ह्रस्व-दीर्घच्या चुकांना तर अशुद्ध समजतच नाहीत. पण त्याही पुढे जाऊन शब्द आणि वाक्यरचनेच्या मूलभूत चुकांचीही त्यांना फिकीर नाही.

असो . . .

बोटात तोंडे Rofl ती एकूण बातमीच इंटरेस्टिंग दिसतेय. वाचली पाहिजे.
किचन टिप्स हे एकंदरीत मनोरंजनाचं साधन दिसतंय अनिंद्य Lol

अनास्था + १

ह्रस्व-दीर्घ, शब्द आणि वाक्यरचनेच्या मूलभूत चुका सोडा आता अर्थ लागला नाही तरी चालेल असे आहे.

वर आलेले “वर्षांचे” पाणी निरर्थ आहे, चूक नाही.

अनिंद्य,
तुमच्या "टिचन किप्स" वाचून भारी मजा येते.

Submitted by वावे on 22 September, 2024 - 12:32

Happy होय

पाण्यासाठी वर्षभर वाट बघायची असेल तर चिप्स “झटपट” कसे होणार ?

Happy

तेथे विहीर आहेच. शनिपारासमोर जी महाराष्ट्र बँक आहे (जनमंगल) त्या बँकेच्या इमारतीखालीही विहिरच आहे. (Deposit, locker वगैरे सगळे लवकरात लवकर बघून घ्या)

=====

मित्रांनो,

आपण झाडांची मुळे जमिनीत जाताना बघतो. काही मृतदेहही जमिनीत पुरले जातात. 'खड्ड्यात गेले' हा शब्दप्रयोग तर प्रत्येक नवं-गृहिणीच्या तोंडात असतोच. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसल्यामुळे व श्रीकृष्ण या सारथ्याने सारथ्य सोडून भलताच सल्ला दिल्याने महाभारताचा शेवट व्यासांच्या इच्छेविरुद्ध झाला हे प्रखर सत्य आजच्या युगाला माहीत नसेलच! अधेमधे काही सरकारेही अचानक जमिनीत जातात. पावसाचे पाणी जमिनीत गेल्यामुळे शेत पिकते हे काही आता नवीन राहिलेले नाही. जमिनीत कधीकधी छुपे खजिनेही मिळतात पण ते सरकारजमा करावे लागतात ही दुर्दैवी अवस्था आज ओढवलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक अत्यंत थरकाप उडवणारी बातमी हाती आली आहे. त्या बातमीचा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. जमिनीत काय काय जाऊ शकते हे कळल्यावर तुम्ही विचलीत व्हाल. शेवटी 'माती असशी, मातिस मिळशी' या उक्तीनुसार आज ना उद्या आपण सगळेच जमिनीत जाणार आहोत यात शंका नाही. शेवटी आयुष्य म्हणजे काय, तर जन्म घ्यायचा, जगायचे आणि मरायचे. एक दिन बिक जायेगा माटी के मोल असे मुकेश यांना म्हणायला लावून राज कपूर गाजलेले आहेतच. जमिनीवरून झालेले वाद एकीकडे जगात अस्थिरता निर्माण करत असताना स्वेच्छेने व कोणतीही जीवितहानी न होऊ देता जमिनीत जाण्याचे अध्यात्मिक कार्यही या भूतलावर होत आहे. त्यामुळेच, सिटी पोस्टाखालील पौराणिक विहिरीतील अंतर्गत जलप्रवाहामुळे रस्ता खचून एक अवजड वाहन जमिनीत गेले.

ही करूण कथा व व्हिडीओ बघून आपल्या तिखट शब्दांत समाचार घ्या.

अवघे ७७ वयोमान !

IMG_7219.jpeg

Her age is same as her father Randhir Kapoor’s age. He was born on 15 Feb 1947 and became Karishma’s father when he was about 4 months old !!!!!

कालचा लोकमत Lol

तोंडे बोटात Rofl

करिष्मा >>> Lol आता राज कपूरने काय अट ठेवली असेल याची उत्सुकता वाटू लागली आहे Proud

… आता राज कपूरने काय अट ठेवली असेल….

ही स्पीड पाहाता पुढच्या चार महिन्यात पणतवंडाचे तोंड बघण्याची ? Proud Proud

On serious note, थोडे तरी बघावे लिहितांना. अपलोड करतांना एकदा तरी पुन्हा वाचावे की. Very bad.

Pages