गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरूप, रमड, ऋतुराज, र आ, सामी, अni फारच धमाल Lol
अनु आणि मांजर कलेक्शन पण धमाल आहे. Happy
नोबिता, कोकोनटकडून आभार. Happy पिसं कृष्णधवल टीव्ही मीम्स Lol
माझ्यावरचे सगळे मीम्स आवडले आहेत, असाच लोभ असू द्या Happy .

कृष्णधवल टीव्ही, स्पायडरमॅन मेक्सिकन स्टॅण्ड ऑफ, बच्चन-वेमा, हेमाशेपो च्या मागचे खरे विचार, बीस साल बाद, जल लिजिये, एखाद्या धाग्यावर काय लिहायला हवे होते ते झोपायच्या वेळेस आठवून झोप न येणे , माबो लघुरूप खंड, मोदक कॅलरीज, ७४ धागे, हर्पाची धातू रूपावलि, सोसायटीतील कुत्र्यांना काय म्हणतेस- Lol

मी_अनु - तो माणूस पाकच्या एका सामन्यातील प्रेक्षक आहे. इथे पाहा
https://www.vice.com/en/article/disappointed-cricket-fan-meme/

वावे आणि दोन चंद्र...
two-moons-by-liam-pannier-v0-atup72dnzdvb1.png

चिकवा प्रेमी आणि दोन चंद्र...
Screenshot_20240909_110011.jpg

वावे वर काही करून मीम करायचेच होते कारण ती वेगळे आणि चांगलेच लिहीत असते. Happy

Lol लाडू, आता रेसिपी येऊ द्या. मी खिळा घेऊन अंगावर येणारी डिंपल शोधत होते पण ही सौम्यच सापडली. Happy

वावेचे दोन चंद्र, करवा चौथ आणि वेगास मधे लाडू - तिन्ही भारी Lol

करवा "चौथ" चा पूर्ण गोल चंद्र इथेही आहे Happy पण इथे त्याला शाखाच्या डोक्यामुळे खंडग्रास ग्रहण लागले आहे Happy

डिंपल सौम्य असली तरी तिच्या डोक्यातील विचारांकरता मागच्या पानावरची "हेमाशेपो" मीम पाहा Happy

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टिव्ही आणि पिसं ही डोकॅलिटी भन्नाट आहे.
टंचनिका Happy . ( ती खट्याळ आणि कामचोर मदतनीस म्हणून छान आहे).

मध्यलोक, काल विपू केली आहे . Lol
मीम भारीच.

बीस साल बाद >> ख त र ना क. मीमला पण सलाम आणि मेम-री ला पण.

मृ , सगळ्यांच्या सगळे लक्षात असते येथे...
धन्यवाद आचार्य. Happy

अतुल माबोकरांसाठी जेम्स वेब टेलिस्कोप फिरवताना Happy
telescope-hubie-dubois.gif

हेमाशेपो बघितली आहे फा. बाहेरून हेमाशेपो, आतून डेडली आत्या Wink
हिंदी सिनेमातला चंद्र असाच असतो , करवाचौथची वटपौर्णिमा ? Happy

करवाचौथची वटपौर्णिमा ? >>>
बाहेरून हेमाशेपो, आतून डेडली आत्या >>> Lol

टेलिस्कोप मीम ही धमाल आहे Happy

अस्मिता, rmd...... दंडवत
वावे - दोन चंद्र, बीस साल बाद आणि वेगास मधे लाडू - जबरी मिम्स Biggrin

जलवा Lol

जल लिजीये सुद्धा हेच म्हणेल Happy किंवा ते लिहीणारे बिहारी हिंदीत हेच म्हणतील Happy

अस्मिता Lol

परवा एका मराठी मालिकेत गप्पा चालल्या होत्या की उद्या गणेश चतुर्थी. तयारी काय करायची? वगैरे. पुढच्याच सीनमधे पूर्ण चंद्र! Proud

ऋतुराज, घ्या आता. Happy
पानाफुलांच्या पोस्ट लक्षपूर्वक वाचणारे ऋतुराज Happy
a975cf0b032b3b3905aae58371c77451.jpg

कहर आहात सगळे
एकसे बढकर एक meme
सामी तर रोहित शर्मापेक्षा फॉर्मात Lol

अमर्याद लांबीच्या पाण्याच्या नळीवर संशोधन करणारे फारएण्ड. Wink
संदर्भ: डेडली आत्या /\
sddefault.jpg

अस्मिता (स्वगतात) - आणि लोकांना 'इन्फिनिटी' ही तरीही एक संकल्पनाच वाटते.

Couldn't resist फा.. Lol

अस्मिता Lol त्या सीनमधला तो नोकर या मीममधे इमॅजिन करून टोटल फुटलो. इन्फिनिटीचा तुझ्या त्या लेखातील संदर्भही लक्षात आला.

Pages