गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा काही थांबत नाही Lol

कोणीही कुठल्याही धाग्यावर शाहरूखचं नाव घेतल्यावर ऋन्मेषकडे Lol तरीच मगाशी आरतीत उचक्या लागत होत्या Proud

मायबोलीकर - छान, सहमत, +१, अगदी अगदी
काही (लेख/प्रतिसाद) लेखक -
Happy.jpg

मायबोलीकर - असं कसं?, असहमत, नाही पटलं
काही (लेख/प्रतिसाद) लेखक -
Angry.jpg

सगळे मीम्स जबरदस्त!
फारएण्ड, 'ठरलं तर मग' नावाची मालिका आहे. स्टार प्रवाह बहुतेक. भरपूर मटेरियल आहे.
आता फारएण्ड मालिका शोधायला गेला आणि आपण त्यावर त्याने लिहिण्याची वाट बघतोय असं मीम येऊद्या!

अगं, किती क्यूट आहे हा स्पॉन्जबॉब Lol

वावे, आता फारएण्डला आणू दे मीम. खूप झाले हसून... Lol ठरलं तर मग..! Happy

Lol काही सुचले तर टाकेन, पण तुम्ही लोक थांबू नका मीम्स आणायचे. धमाल मीम्स आहेत Happy

स्पंजबॉब तर भारी आहेच Happy पण मागचे दोन आपल्यावर कोणी मीम करतील या भीतीने तसे बसले आहेत ते कोण आहेत? Happy

सन्योजक ही आयडियाची कल्पना ज ब र द स्त आहे , ८ पान वाचुन सगळ्या मीम कर्त्याना टोपीकाढु सलाम!! अजुन येवु द्यात..

>>>>>>>>>>अगं, किती क्यूट आहे हा स्पॉन्जबॉब Lol
Happy
>>>>>>>>>>पण मागचे दोन आपल्यावर कोणी मीम करतील या भीतीने तसे बसले आहेत ते कोण आहेत? Happy
नाही फा ते रडतराऊ घाबरले नाहीयेत तेही आशाळभूतच आहेत . कारण अस्मिता अगदी हार्मलेस आणि फनी मीम्स टाकणार याची खात्री. Happy तिला कोणी घाबरत नाही.

तिला कोणी घाबरत नाही. >>>> खरंच. मला कुणीही घाबरत नाही. Lol काही दराराच नाही माझा, श्शा....

सामो, हे घे तुझ्यावर. लहानपणी सामोला जेव्हा कवितेबद्दल कळले. Happy
poetry-meme.jpg

-------
माझेमन Lol

रावण वाला Lol
( यावर एक कमेंट ईमेल मधे आलेली)

बुरा था इसिलिए अवतार नही ले सका |
वर्ना अवतारी पुरूष कहा जाता |

सगळेच मीम्स जबरदस्त Rofl Lol

सामी सुटलेय एकदम Lol

सामी, ओला/उबर जबराट Lol

ॠतुराजभाऊ साॅलिड फेमस आहेत माबोवर हे नवीन ज्ञान मिळालं Proud

ubmitted by मेधा२००२ on 10 September, 2024 - 10:30 >>> हो ना ! वविपासून.
खरं तर त्यांनी आधीचं नाव बदललं असेल, ते त्या वेळी ठाऊक नसल्याने आता तुम्ही पूर्वी कोण होता असे विचारायची चोरी असल्याने कळायला मार्ग नाही. Happy
( या धाग्यावर सगळं बोलून घेता येतंय)

>>@ स्वरूप
त्यासाठी ववि ला कशाला जायला पाहिजे, माबोचा अभ्यास कमी पडतोय.

हो हो!!..... या धाग्यावरचे मीम्स बघून हे प्रकर्षाने जाणवतेय!!
पूर्वीची मायबोली राहिली नाही.... श्या!! Wink

Pages