Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे चांगलं आहे की! गर्भपात या
अरे चांगलं आहे की! गर्भपात या एकाच मुद्द्यावर चर्चा होत रहावी.
तिकडून फोकस ढळतोय वाटलं की फारतर गन!
हवाय ना त्यांना तो मुद्दा. घ्या! त्यावरुन फोकस ढळूच देऊ नये. २०२४ मध्ये मुद्दा काय तर गर्भपात! किमान तो एक प्रश्न तरी सोडवा.
मोदींनी राममंदिर बांधलं. आता तुम्ही गर्भपात कायदा करा. नाही तर काय परत चार वर्षांनी आहेच परत रो रो रो वी वेड!
शेंडे नक्षत्र तुम्ही मायबोली
शेंडे नक्षत्र तुम्ही मायबोली वर कधीपासून आहात ह्याची कल्पना नाही पण २०११/१२ अबॉर्शन ह्या विषयावर मायबोली वर सविस्तर चर्चा झाली होती. सविता हरपन्नवार ही मराठी/कानडी मुलगी त्यावेळी आयर्लंड मध्ये रहात होती. तिच्या प्रेग्नंसित आठव्या महिन्यात आलेल्या कॉम्प्लिकेशन्स मुळे तिचा गर्भपात करणे, तिचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक होते. ती डेंटिस्ट असल्याने तिला त्याची कल्पना होती आणि तशी विनंती ती डॉ ना वारंवार करत होती. पण आयर्लंड मध्ये त्यावेळी गर्भपात बाबत जे धर्मातील मान्यतेला अनुसरून कायदे होते त्यानुसार तिची इच्छा असुनही त्या अनुषंगाने ट्रीटमेंट सुरू करणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने डॉ ना शक्य नव्हते. परिणामी ती स्वतः आणि तिच्या उदरात असलेला गर्भ ह्या दोघांचाही मृत्यू झाला. ह्या घटनेचे खुप तीव्र पडसाद उमटले ज्यांची परिणीती आयर्लंड मधील गर्भपात यासंबंधीचा कायदा बदलण्यात झाली. पण सविताच्या दृष्टीने अर्थातच त्याला फार उशीर झाला होता.
हे इतक्या सविस्तर इथे लिहिण्याचे कारण इतकेच की तुम्हाला जी बाजु अतातायी आणि अतार्किक वाटते ती तितकी नाही हे स्पष्ट करणे. कृपा करून ह्या मुद्द्याला इतके सवंग करु नका. दोन्ही बाजुचे राजकारणी त्यांच्या राजकीय भूमिकेच्या सोईसाठी आत्यंतिक भुमिका घेत आले आहेत आणि घेत रहातील पण आपण त्याचे अनुकरण करायचे का? हा प्रश्न आहे.
सविता हरपन्नवार जशी हकनाक गेली तसे दुसर्या बाजुचे पण होऊ शकते आणि त्या दृष्टीने तो कायदा अधिकाधिक निर्दोष कसा होईल त्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. पण जन्माला आलेली बालके आयांना सोईची नाहीत म्हणून सर्रास मारुन टाकण्यात येतील असा विपर्यास करून तुम्ही ह्या विषयावर चर्चा व्हायला हवी ह्या तुमच्या मुळ उद्देशालाच तिलांजली देताय. इथली चर्चा एका किमान बौद्धिक पातळीवर राहील हे पथ्य सगळ्यांनी पाळुन यात.
https://youtu.be/JPQpRRPT5BU
https://youtu.be/JPQpRRPT5BU?feature=shared
कमला हॅरीसचे हे मिलवॉकी विस्कॉन्सिन मधले स्पिच बघा. डेमॉक्रेटिक पार्टीच्या डळमळत्या गलबताला मार्गाला लावण्यात व त्याच्या फाटक्या झालेल्या शिडात परत जोमाने कमला हॅरीस वारा घालु शकेल असे वाटते.
सगळ्यात मस्त: अॅज अ फॉर्मर प्रॉसिक्युटर, आय नो डॉनाल्ड ट्रंप टाइप!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता उपाध्यक्ष उमेदवार चांगला निवडला पाहीजे. शपिरो मस्त वाटतो पण तो बहुतेक प्रेसिडेंसीची स्वप्न बघतोय. मला नाही वाटत तो उपाध्यक्ष उमेदवारी स्विकारेल.
बाकी वरच्या नेहमीची अज्ञानी व स्त्रिद्वेष्टी मुक्ताफळे उधळणार्या पोस्टींबद्दल मी परवाच लिहीले होते. उचलली जिभ, लावली टाळ्याला!त्या पोस्टी वाचुन ट्रंप युनिव्हर्सीटी मधे जाउन व शिकुन(?) आलेल्यांशिवाय इतक्या अज्ञानी पोस्टी कोणी लिहुच शकणार नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वातीच्या, मैत्रेयीच्या व अमितच्या सगळ्या पोस्टींना अनुमोदन.
विजय कुलकर्णी, “ शेंडेंच्या पोस्ट वाचून कुणाचाही समज होईल की एनाराय महिला फोनवर बोलताना 'अय्या आपण कित्ती दिवस भेटलो नाही, शनीवारी ओक ट्री वर भेटू, पाणीपुरी, आयब्रो व गर्भपात करून घेऊ !' असे बोलत असतील !“
वि. कु., गेल्या आठवड्यात न्यु यॉर्क- न्यु जर्सीमधे आठ्वडाभर होतो. परवा रविवारीच ओक ट्री वर खासियत मधे पराठा खात होतो. तेव्हा कान उघडे ठेवायला पाहीजे होते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
राज, खास तुझ्या विनंतीला मान देउन मी तो खोसला- मस्क वाद बघीतला. त्या सर्व देवाणघेणीत हा फेसबुकच्या ए आय चिफने मस्कला मारलेला जबरदस्त टोला मला आवडला
He ( Musk) also noted on X that his "smartest friends," including lifelong Democrats, "are excited about Trump/Vance."
Yann LeCun, Meta's chief AI scientist, replied, "Your smartest friends aren't very smart."![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पर्णिका! तुझ्या संयमी
पर्णिका! तुझ्या संयमी प्रतिसादाला त्रिवार मुजरा व अनुमोदन!
आज जे डी व्हांस चे २०२१ मधले अजुन एक मुक्ताफळ बघण्यात आले. त्यात तो म्हणतो की ज्यांना मुल नाहीत त्यांना अमेरिकेच्या भविष्याचा विचार करण्याचा व त्यात भाग घेण्याचा अजिबात हक्क नाही! ( उदाहरणार्थः कमला हॅरीस!) वॉव! असले भंकस विचार असलेल्यांना रिपब्लिकन पार्टीने तिकिट दिले आहे! गो फिगर!
आत्ता एक टिकटॉकर म्हणाला लिझ
आत्ता एक टिकटॉकर म्हणाला लिझ चेनी किंवा रॉमनी ला व्हीपी तिकीट द्यावे. लिझ चेनी आवडला ऑपशन.
युनिटी होईल. आणि तात्याला चपराख बसेल आणि मॉडरेट रीप, बायका, कुंपणावराचे येतील.
उबो, वरचं चित्र पण बदला आता.
उबो, वरचं चित्र पण बदला आता.
रेपिस्ट आणि लायर्सना तुरुंगाची हवा दाखवणारी डी.ए.
वि.
फेलन
असं करुन टाका लगे हात!
<<? जर म्हातार्याला
<<? जर म्हातार्याला निवडणूकीचा प्रचार झेपणार नसेल तर पुढील ७ महिने राष्ट्रपतीपद तरी कसे झेपणार? कमलाबाईला राष्ट्रपती बनवून निदान ७ महिने तरी एक महिला राष्ट्रपती नेमल्याची टिमकी डेमोक्रॅट मंडळींना वाजवता येईल.>>
ही कल्पना वाईट नाही. तेव्हढेच सात महिने कमलाबाई काय करतात ते बघता येईल. त्रंप्या राष्ट्राध्यक्ष असताना काय दिवे लावले ते आपण पाहिलेच. आता ही बया काय करते याची कल्पना येईल, मग त्रम्प्या की बाई याबद्दल निर्णय घ्यायला लोकांना सोपे पडेल.
डेमोक्रॅट्स नि खरेच ही संधी सोडू नये.
Not Going back!
Not Going back!
Vs.
Meh MAGA... Meh! Going back!
व्हान्स बद्दल प्रार्थना.
व्हान्स बद्दल प्रार्थना. त्याचे पेन्स सारखे होऊ नये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कमलाने नेतान्याहू यांच्या
कमलाने नेतान्याहू यांच्या बरोबर बोलणी केली. नंतर नेतान्याहू यांनी भाषण दिले, ते रशिदा तालिब यांना अर्थातच आवडलेले नाही. -Tlaib was born to working-class Palestinian immigrants in Detroit in 1976.
अर्ध्या डेमोक्रॅटसनी नेतान्याहूंच्या भाषणावरती बहिष्कार टाकला होता.
Harris says she ‘will not be silent’ on Gaza suffering while telling Netanyahu to get ceasefire deal done
- https://www.cnn.com/2024/07/25/politics/harris-netanyahu-israel-hamas-ce...
She called Hamas a “brutal terrorist organization.” She read the names of the American hostages still being held, and those who have died in captivity. “Israel has a right to defend itself,” she said, “and how it does so matters.”
अमेरीकेला एका गटाची बाजू घ्यायची काय गरज आहे? कुंपणावर का नाही टिकत आपण?----------------
लॉन्ग आयलंडमध्ये खूप प्रमाणात ज्यू समाज आहे. प्रत्येक दुसर्या घराबाहेर "वी सपोर्ट इझ्राएल', 'वी स्टँड बाय इझ्राएल' असे प्लॅकार्डस दिसतात.
एक भारतिय पट्टाही आहे जिथे भारतिय व बांग्लादेशी दुकाने आहेत. तिथे 'वी सपोर्ट पॅलेस्टाइन' असे लिहीलेली दुकाने दिसतात. पण फार कमी प्रमाणात.
>>व्हान्स बद्दल प्रार्थना.
>>व्हान्स बद्दल प्रार्थना. त्याचे पेन्स सारखे होऊ नये>> नाही होणार. त्याला पलटी मारणे चांगले जमते. मात्र व्हान्समुळे ट्रंपची मते कमी होवू शकतात.
त्यातून मागा वाले परीस्थितीचा दोष सिस्टिम ला देतात, व्हान्सने पर्सनल रिस्पॉन्सिबिलीटीचे गोडवे गायलेत.
पेन्स सरळमार्गी. too nice. मला स्वतःला त्यांची काही विचार कधीच पटले नाहीत तरी ते ज्या चर्चमधून आले ते बघता नवलही वाटले नाही.
You have to salute to Pence
You have to salute to Pence for sticking up for his beliefs and principles in today's ever shifting GOP. Vance appears to be a chameleon.
व्हान्सची निवड का केली असा
व्हान्सची निवड का केली असा मला प्रश्न पडलाय. देशी मतांसाठी की कॅथलिक मतांसाठी? चाईल्डलेस स्त्रीयांबद्दल विधाने करणार्या व्हान्स यांच्याकडून मिसुरीच्या लॉसुटस बद्दल अजून काहीच कॉमेंट नाही.
बरोबर, तात्याचे शब्द व्हान्स
बरोबर, तात्याचे शब्द व्हान्स झेलेल, त्यात शंका नाही. पण MAGA बेस मधले लोकं व्हान्स वर नाराज दिसतायत. एकत्र आधी ट्रम्प वर टीका करणारा. दुसरे म्हणजे बायको गोरी नाही. तिसरे म्हणजे आपल्या पुस्तकात त्याने तिथल्या हिलीबिली लोकांबद्दल बरेच कठोर शब्द लिहिले आहेत. चौथे म्हणजे he has the charisma of a wet log. त्याने नुकतीच विनापत्य स्त्रियांबद्दल जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याचे पडसाद अगदी conservative स्त्रियांकडून सुद्धा येत आहेत.
या सर्व गोष्टींमुळे तो ट्रम्प साठी असेट सोडून लायबलिटी बनला आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना.
>>. .फेसबुकच्या ए आय चिफने
>>. .फेसबुकच्या ए आय चिफने मस्कला मारलेला जबरदस्त टोला मला आवडला<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे तो टोला तुला इतका आवडला असेल तर मस्कच्या मित्रांमधे "लाइफ्लाँग डेम्स" आहेत याची पण नोंद घे..
>>इथली चर्चा एका किमान बौद्धिक पातळीवर राहील हे पथ्य सगळ्यांनी पाळुन यात.<<
दॅट्स ए टॉल ऑर्डर. इथले काहि उथळ प्रतिसाद वाचुन तुम्हाला क्ल्पना आली असेलंच, पण त्याला इलाज नहि..
पर्णिका यांनी शेंडेनक्षत्रांच्या (शेंडे) बाबतीत मांडलेल्या मताशी सहमत. हल्ली आणि यापुर्वि देखील शेंडे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे त्यांच्या भाषेमुळे दुर्लक्षित झालेले आहेत. शेंडे यांनी यावर जरुर विचार करावा. होतं काय, इथले वोक्स्/डावे, मूळ मुद्दा खोडता न आल्याने तो सोडुन भाषेमुळे शेंड्यांना झोडपतात. उदाहरणादाखल, बे एरियातल्या रिडक्शन इन पुलिस फोर्स बाबत शेंडे यांनी मागे आवाज उठवला होता. वोक्स्नी तो हसण्यावारी नेला. आता बेनिऑफ्च म्हणतोय पुलिस फोर्स वाढवा आणि मेयरला पण उपरती होत आहे. मस्क ऑलरेडि स्पेसेक्स टेक्ससला मुव करण्याच्या तयारीत आहे, बे एरियाच्या मेयरने वेळीच उपाय योजना केली नाहि तर सेल्स्फोर्स पण बे एरियाला रामराम ठोकेल..
अन्डॉक्युमेंटेड क्रिमिनल्स्ची माहिती लोकल लॉ-ऑर्डर ऑथरिटिजनी आइसला देणं आता बंधनकारक होतेय. हा अजुन एक डाव्यांचा जिव्हाळ्याचा विषय, शेंड्यांनी पुर्वि माडलेला, जो आता मोडित निघतोय. ते काय म्हणतात ते - बेटर लेट दॅन नेव्हर, किंवा सुबह का भूला, शामको लौट आये...
>>> You have to salute to
>>> You have to salute to Pence for sticking up for his beliefs and principles
Sorry, can't!
How did those beliefs and principles not get in the way of accepting VP ticket with Trump?
How did those beliefs and
How did those beliefs and principles not get in the way of accepting VP ticket with Trump? >> मी त्याच्या पुढे जाऊन बघत होतो. १६ मधे तात्या पुढे जाऊन एव्हढे गुण उधळेल अशी माझी तरी कल्पना नव्हती. त्याच्या एकंदर इमेजवरून त्याला तेंव्हाहीमाझा विरोध होता पण प्रेसीडेंट झाल्यावर तो नॉर्मल वागेल अशी भाबडी आशा होती. त्यामूळे मी पेन्स च्या त्या गोष्टीपलीकडे जाऊन बघायला तयार आहे. त्याची स्त्रियांबद्दलची एकंदर मते कर्मठ आहेत ह्यात शंकाच नाही पण जी आहेत त्यात बदल झालेला नाही जो क्रूकि, वान्स इत्यादीमधे दिसतो. ह्या बोटांवरची थुंकी तिथे करायला फारसा वेळ लागत नाही.
<<<हो, हो, मला भरपूर
<<<हो, हो, मला भरपूर "कपेन्सेशन" मिळते. काळजी नसावी!>>>
हे "कपेन्सेशन" रोख रकमेच्या स्वरुपात मिळते का? त्यासाठी कुठे अर्ज करायचा? म्हणजे मी पण तुमच्यासारखेच लिहून पैसे मिळविन.
त्याचे काय आहे, मायबोलीवर कितीहि बोंब मारली तरी राजकीय परिस्थितीत काही फरक पडत नाही. अनेक रिपब्लिकन नि अनेक डेमोक्रॅट् राष्ट्राध्यक्ष बघून अजूनहि मी सुरक्षित आहे. फक्त आपले पैसे नि आपले कुटूंब सुखरूप ठेवावे.
बाकी अमेरिकेत करायचे काय, तर जमेल तसा पैसा गोळा करायचा, लाज लज्जा सोडून. पैशाने जगातच सगळे काही विकत घेता येते. जे पैशाने विकत घेतल्या जात नाही त्याची काही गरज नाही.
फक्त आपली नि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या, नि नुसते पैसे जमा करा. ज्या देशात त्रंप्या नि त्याचे चमचे यांच्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख लोक आहेत, तिथे पैसे कमावणे काही कठिण नाही! अहो, शेंडेनक्षत्रांना मिळतात तर इतरांना काय कठिण?
https://x.com/Acyn/status
https://x.com/Acyn/status/1817007890496102490?t=xddYDwrVcNWNuk8FGexoxg&s=19
Trump: You have to get out and vote. You won’t have to do it anymore. Four years, it will be fixed, it will be fine. You won’t have to vote anymore.. In four years, you won’t have to vote again.
जास्त लक्ष देऊ नका त्याच्या
जास्त लक्ष देऊ नका त्याच्या बोलण्याकडे. तो बोलतो ते सगळे खरेच नसते.
त्याचा विनोदाचा ढंग काही वेगळाच आहे.
जेंव्हा अनेक माणसे कोविडने मरत होती तेंव्हा लोकांना दिलासा द्यायला, त्यांचे थोडे मनोरंजन करायला त्याने उपहासाने म्हंटले होते की काही वेगळे वेगळे उपाय सुचवले होते. लोकांना ते कळले नाही.
तो लोकांना नावे ठेवतो तोहि एक विनोदाचाच भाग आहे, म्हणून तर टेड क्रुझची बायको कुरुप आहे, टेडच्या बापाचा केनेडी हत्येमधे भाग होता, असे सगळे खरे मानाल तर तुम्हाला त्याचा विनोद कळतच नाही!!
तर जरा अमेरिकन व्हा, म्हणजे तुम्हाला हे सगळे कळेल. मग तुम्ही पण त्रंप्यालाच मते द्याल, अगदी मरायला टेकलात तरी आपली सगळी संपत्ति त्रम्प्याच्या नावाने करून त्याला मत देऊन मगच मरा.
काय शेंडेनक्षत्र, जमताय का
काय शेंडेनक्षत्र, जमताय का मला पण?
मग कधी पाठवता आहात पैसे?
<< काय शेंडेनक्षत्र, जमताय का
<< काय शेंडेनक्षत्र, जमताय का मला पण?
मग कधी पाठवता आहात पैसे? >>
------ प्रत्येक वाक्यात थेरडा, म्हातारा, म्हातारबा, भ्रमिष्ट असे कुठलेही key words वापरले नाही - म्हणून पैसे मिळणार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उदय, खरे आहे.
उदय, खरे आहे.
पण तेव्हढी विनोदबुद्धि मला नाही.
प्रयत्न करतो नंतर पुनः केंव्हातरी. पण आता बायडेन गेला.
हॅरिसची सोमी/ टीकटॉक टीम भारी
हॅरिसची सोमी/ टीकटॉक टीम भारी काम करतेय. प्रत्येक मुद्द्यावर आपल्या बाजूच्या किंवा विरुद्ध सिक्सर मारत आहेत.
पण ते सगळं माझ्या डोळ्याला तरी गोड आणि टोटल प्रेसिडेनशियल वाटत होतं.
आज तर हाईट झाली. मेंडी केलिंग बरोबर कमला कांदा चिरत होती ... लिटरली... शेंड्या सारखे अलंकार वापरात नाहीये... आणि डोसे घालणार होत्या. सगळा विड्यू नाही बघितला.
डबल हेटर्स... हा एक नवा शब्द फॉक्स वर ऐकला... म्हणजे तात्या आणि बायाडन दोघे न आवडणारे.. हॅरिस कडे झुकत आहेत. हे फॉक्स वर ऐकलं. विस्कॉन्सिन ला तात्या एका पॉइंट लीड वर आहे. बाकी सगळ्या स्विंग स्टेट मध्ये दोघे समान किंवा कमला लीड वर आहे. हे ही फॉक्स वर ऐकलं.
येस वी कॅम!
ट्रम्पचा "गोळी लागलेला" कान
ट्रम्पचा "गोळी लागलेला" कान पण ठणठणीत झाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज तर हाईट झाली. मेंडी केलिंग
आज तर हाईट झाली. मेंडी केलिंग बरोबर कमला कांदा चिरत होती ... लिटरली.
>>>>> ऑं? अमेरीकन प्रेसिडन्सीसाठी कांदा चिरणे हे स्किल कधीपासून ॲसेट ठरायला लागले? बाई कित्ती फॅमिली ओरिएंटेड, मातीशी जोडलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का हा? असेल तर अगदीच वाईट आहे.
डोळ्यात पाणी आलेला व्हिडीओ
डोळ्यात पाणी आलेला व्हिडीओ घ्यायचा असेल पण कुणीतरी त्यासाठीच्या पूर्व तयारीचा व्हिडिओच लीक केला असे तर नव्हे ना?
>>. मेंडी केलिंग बरोबर कमला
>>. मेंडी केलिंग बरोबर कमला कांदा चिरत होती ..>> हा जुना विडीओ असावा. कारण २०२० च्या इलेक्शनच्या वेळी बायडनची रनिंगमेट असताना कमला हॅरीसची फॅमिली बॅकग्राउंड, इंडियन रुट्स वगैरेबद्दल बोलत एक डोसा सेशन झाले होते.
हो. हा जुना व्हिडिओ दिसतोय.
हो. हा जुना व्हिडिओ दिसतोय. प्रेसिडेंट उल्लेख होता त्यामुळे ड्रॉप व्हायच्या आधी चा असेल. मी आत्ता बघितला. कांदा स्किल नाही माझेमन, देसी अपब्रिंगिंग वर आहे.
स्वाती२, धन्यवाद.
बरं आता चॅटजीपीटीने लिहिलेली
बरं आता चॅटजीपीटीने लिहिलेली फक्कड लावणी ऐका
(कमला हॅरिस)
आली मी अमेरिकेची उपराष्ट्रपती,
प्रीत वाढवाया, हो प्रीत वाढवाया,
जनतेच्या मनात बसते माझी माया,
सपने सजवाया, हो सपने सजवाया।
(डोनाल्ड ट्रम्प)
मी आहे ट्रम्प, माझं नाव मोठं,
सत्ता हवी आहे, हो सत्ता हवी आहे,
आणखी एकदा व्हायचंय राष्ट्राध्यक्ष,
मी लढतोय, हो मी लढतोय!
(दोघे मिळून)
दोघं मिळून गातो लावणी,
जनतेच्या मने जिंकायला,
राजकारणाची लावणी,
मग कोण म्हणतंय आपल्याला?
(कमला हॅरिस)
लढणं-भांडणं, मतभेद नेहमीच असतात,
पण देशाच्या सेवेत, हो देशाच्या सेवेत,
रंग भरतोय नवे, नव्या आशा लावत,
भविष्य घडवायचं, हो भविष्य घडवायचं!
(डोनाल्ड ट्रम्प)
मी म्हणतो अमेरिका फर्स्ट,
सपने पूर्ण करणार, हो सपने पूर्ण करणार,
देशातली लोकं हवीत सुखी,
प्रगतीसाठी लढणार, हो प्रगतीसाठी लढणार!
(दोघे मिळून)
दोघं मिळून गातो लावणी,
जनतेच्या मने जिंकायला,
राजकारणाची लावणी,
मग कोण म्हणतंय आपल्याला?
(कमला हॅरिस)
स्वप्नं मोठी, मनात आशा नवी,
देशाला नेणार, हो देशाला नेणार,
संवाद साधून, समृद्धी गाठून,
एकता वाढवणार, हो एकता वाढवणार!
(डोनाल्ड ट्रम्प)
मी आहे ट्रम्प, नेहमीच भिडतो,
चुकीला सावरायला, हो चुकीला सावरायला,
तयारीनं उभा, नव्या लढाईला,
आणि विजयी होणार, हो विजयी होणार!
(दोघे मिळून)
दोघं मिळून गातो लावणी,
जनतेच्या मने जिंकायला,
राजकारणाची लावणी,
मग कोण म्हणतंय आपल्याला?
Pages