Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गाण्यांचे बोल आत्ता आत्ता नीट
गाण्यांचे बोल आत्ता आत्ता नीट माहिती होत चालले आहेत.
नाहीतर या धाग्यावरच्या अनेक चुका वाचताना अगदी अगदी झालं.
आफताब हा शब्द अलिकडेच माहिती झाला. त्या आधी आम्ही कबाबच म्हणायचो.
आफताब हो
आफताब हो
चंद्र(?)
की माहताब म्हणजे सूर्य?
माहताब म्हणजे सूर्य ….
माहताब म्हणजे सूर्य ….
नाही नाही.
आफताब = सूर्य
माहताब = चंद्र
चौदवी का चांद हो, या
आफताब हो
चंद्र(?)>>
चौदवी का चांद हो, या (अचौदवीका/उपमारहीत) चांद हो?
तिच्याकडे पाहून कवीला एकतर
तिच्याकडे पाहून कवीला एकतर चंद्र आठवतो किंवा आफताब
चौदवीं का चाँद हो, या आफ़ताब
चौदवीं का चाँद हो, या आफ़ताब हो?
जो भी हो तुम खुदा की कसम, लाजवाब हो
कवीचं तोंड दूधाने पोळलेलं असल्याने तो ताक सुद्धा फुंकून फुंकून पितोय अशी त्याची मनःस्थिती आहे.
त्याच्या या दोनोळींचा गूढार्थ असा.
तू चौदावीची ( सेकंड इयरची शीतल) चंद्रा आहेस कि (खरे रूप) आग ओकणारा ग्रीष्मातला सूर्य आहेस ? ( हे आत्ताच सांग)
कारण तू जी कुणी आहेस ती माझी बोलती बंद करणारी आहेस हे नक्की.
कारण तू जी कुणी आहेस ती माझी
कारण तू जी कुणी आहेस ती माझी बोलती बंद करणारी आहेस हे नक्की >>>
तू चंद्राप्रमाणे शीतल, नाजूक
तू चंद्राप्रमाणे शीतल, नाजूक आहेस की सुर्याप्रमाणे गॅस असलेली, अतिविशाल आहेस?(इथे नायिकेने ठोसा मारल्याने ही ओळ गायल्यानंतर हिरो बेशुद्ध पडून गाणं समाप्त झालंय.)
मी_अनु चं व्हर्जन सगळ्यात
मी_अनु चं व्हर्जन सगळ्यात बरोबर वाटतंय
चौधरी की चादर हो या बेडशीट हो
चौधरी की चादर हो या बेडशीट हो
जो भी हो तुम खुदा की कसम अंथरुण पांघरूण हो.
.
बालमैत्रिणीचं आडनाव चौधरी
तिच्याकडे गप्पा मारायला जाऊन कधी कधी तिथेच झोपणे होत असे तेव्हा आम्ही मुलींनी हे गाणं dedicate केलं होतं.
.
वरचे अर्थ कमाल आहेत
मानव, आचार्य आणि अनु, फारच
मानव, आचार्य आणि अनु, फारच उद्बोधक चर्चा चालू आहे
>>>>>>आफताब = सूर्य
>>>>>>आफताब = सूर्य
माहताब = चंद्र
धन्यवाद अनिंद्य.
चांद चौधरी कडेच राहिलेला
चांद चौधरी कडेच राहिलेला बेस्टाय
“The Most Abused Song Ever “
“The Most Abused Song Ever “ पुरस्काराचे मानकरी गाणे “ग़ुलामी” सिनेमातले - सुनाई देती है जिसकी धड़कन, तुम्हारा दिल या हमारा दिल है याबद्दल मला तरी शंका नाही.
गुलज़ारनी अमीर खुसरोच्या काव्यरचनेवरुन प्रेरणा घेऊन लिहिलेले अर्थगर्भ गीत. त्याचे इतके भयानक versions ऐकलेत मी की सांगता सोय नाही.
उदा :
जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश
बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है
याला आमचा एक काव्य रसिक मित्र चक्क
जे हाल मुसक्या मुकुंद बारिश
बाहर हिजडा क्यूँ गा रहा है ?
असे गातो
दुसरा एक जण असे गायचा:
बेहाल मस्ती मकान में बंदिश
बाहार आया बेचारा बिल है
तिसरे version फार अश्लील आहे, ते नाही लिहिता यायचे इथे.
बरं, गाणार्यांचा कॉन्फ़िडेंस बघून ओरिजनल शब्द काय आहेत हे सांगण्याची इच्छा, पेशंस, उत्साहच उरत नाही.
या एका गाण्यावर इथे लेख पडलेत
या एका गाण्यावर इथे लेख पडलेत.
(No subject)
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
मुकुंद रजनीश हसून लोळले
मुकुंद रजनीश हसून लोळले
(No subject)
मुकुंद रजनीश :
मुकुंद रजनीश :
पण असंच म्हणायचो आम्ही पण.
वर मी अनु चे व्हर्शन धमाल आहे.
हपा धन्यवाद.
आजा वे माही तेरा रस्ता उडीद
आजा वे माही तेरा रस्ता उडीद दिया....
बरोब्बर!
बरोब्बर!
उडीक, उडीद, उदीक, उदित, उडीप
यातलं काहीही
मला यापेक्षा वेगळं ऐकू येत.
मला यापेक्षा वेगळं ऐकू येत. रस्ता उधेड दिया आता अशा उधेडलेल्या रस्त्यावर माही ला बोलावून त्याचा कपाळ मोक्ष करणे किंवा गेला बाजार एखाद्या अवयवा ला प्लास्टर बसवणे हा कुटील हेतू का आहे गाणारी चा असा प्रश्न मला पडायचा पण असेल त्यांची काय ती भानगड असं म्हणून मी विचार सोडून द्यायचे.
मला ते रस्ता 'उदेख लिया' ऐकू
मला ते रस्ता 'उदेख लिया' ऐकू यायचं. म्हणजे रस्ता फुलांनी सजवला असा काहीतरी शब्द असेल असं वाटायचं.
मग खरं काये?
मग खरं काये?
माझा मुलगा या वेळच्या निवडणुका झाल्यापासून ' उन्हातान्हाचं.. जाऊया पपिप.. पपिप.. पपिप ' असं एक गाणं अगदी तालासुरात गातो. कोणत्या पक्षाचं गाणं तोंडात बसलय आणि हे पपिप काय आहे कोणास ठाऊक !!
रस्ता वे/ओ देख लिया आहे ना?
रस्ता वे/ओ देख लिया आहे ना?
साक़िया आज मुझे नींद नही
साक़िया आज मुझे नींद नही आयेगी
सुना है तेरी महफीलमें रतज़गा है
मला सुरूवातीला रस जगा है/रंग चढ़ा है वाटायचं. अर्थाच्या दृष्टीनेही ते पटायचं. आशाबाईंच्या उच्चारात दोष नाही. मला तो शब्दच माहित नव्हता. फार नंतर कधीतरी सलमान खानच्या एका टुकार (द्विरुक्ती होतेय का?) चित्रपटातल्या गाण्यामुळे रतज़गा हा स्वतंत्र शब्द असतो हे समजले. सलमान थोर तुझे उपकार!
आजा वे माही तेरा रस्ता उडीक
आजा वे माही तेरा रस्ता उडीक दिया...
अर्थ - इंतजार, प्रतीक्षा वगैरे.
उडीक>>> नवा शब्द समजला…
उडीक>>> नवा शब्द समजला…
साथिया……..रतजगा है
साथिया……..रतजगा है
फार सुंदर आहेत त्या गाण्याचे शब्द.
उदा:
साकी है और शाम भी, उल्फ़त का जाम भी
तकदीर है उसी की जो ले इन से काम भी
चांस पे डांस ना किया तो क्या फायदा ?
उडीक>>> नवा शब्द समजला… >>>>>
उडीक>>> नवा शब्द समजला… >>>>> +१
माही म्हणजे तिमाही, सहामाही वगैरे समजणारा मी, उडीक कळायला पंजाबी GRE द्यावी लागेल मला.
Pages