मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गाण्यांचे बोल आत्ता आत्ता नीट माहिती होत चालले आहेत.
नाहीतर या धाग्यावरच्या अनेक चुका वाचताना अगदी अगदी झालं.

आफताब हा शब्द अलिकडेच माहिती झाला. त्या आधी आम्ही कबाबच म्हणायचो.

आफताब हो
चंद्र(?)

की माहताब म्हणजे सूर्य?

आफताब हो
चंद्र(?)>>

चौदवी का चांद हो, या (अचौदवीका/उपमारहीत) चांद हो?

चौदवीं का चाँद हो, या आफ़ताब हो?
जो भी हो तुम खुदा की कसम, लाजवाब हो

कवीचं तोंड दूधाने पोळलेलं असल्याने तो ताक सुद्धा फुंकून फुंकून पितोय अशी त्याची मनःस्थिती आहे.
त्याच्या या दोनोळींचा गूढार्थ असा.

तू चौदावीची ( सेकंड इयरची शीतल) चंद्रा आहेस कि (खरे रूप) आग ओकणारा ग्रीष्मातला सूर्य आहेस ? ( हे आत्ताच सांग)
कारण तू जी कुणी आहेस ती माझी बोलती बंद करणारी आहेस हे नक्की.

तू चंद्राप्रमाणे शीतल, नाजूक आहेस की सुर्याप्रमाणे गॅस असलेली, अतिविशाल आहेस?(इथे नायिकेने ठोसा मारल्याने ही ओळ गायल्यानंतर हिरो बेशुद्ध पडून गाणं समाप्त झालंय.)

चौधरी की चादर हो या बेडशीट हो
जो भी हो तुम खुदा की कसम अंथरुण पांघरूण हो.
.
बालमैत्रिणीचं आडनाव चौधरी
तिच्याकडे गप्पा मारायला जाऊन कधी कधी तिथेच झोपणे होत असे तेव्हा आम्ही मुलींनी हे गाणं dedicate केलं होतं.
.
वरचे अर्थ कमाल आहेत Lol

“The Most Abused Song Ever “ पुरस्काराचे मानकरी गाणे “ग़ुलामी” सिनेमातले - सुनाई देती है जिसकी धड़कन, तुम्हारा दिल या हमारा दिल है याबद्दल मला तरी शंका नाही.

गुलज़ारनी अमीर खुसरोच्या काव्यरचनेवरुन प्रेरणा घेऊन लिहिलेले अर्थगर्भ गीत. त्याचे इतके भयानक versions ऐकलेत मी की सांगता सोय नाही.

उदा :

जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश

बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है

सुनाई देती है जिसकी धड़कन

तुम्हारा दिल या हमारा दिल है

याला आमचा एक काव्य रसिक मित्र चक्क

जे हाल मुसक्या मुकुंद बारिश
बाहर हिजडा क्यूँ गा रहा है ?

असे गातो Lol

दुसरा एक जण असे गायचा:

बेहाल मस्ती मकान में बंदिश
बाहार आया बेचारा बिल है

तिसरे version फार अश्लील आहे, ते नाही लिहिता यायचे इथे.

बरं, गाणार्यांचा कॉन्फ़िडेंस बघून ओरिजनल शब्द काय आहेत हे सांगण्याची इच्छा, पेशंस, उत्साहच उरत नाही.

Screenshot from 2024-07-18 15-07-39.png

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

मुकुंद रजनीश : Lol
पण असंच म्हणायचो आम्ही पण.

वर मी अनु चे व्हर्शन धमाल आहे.
हपा धन्यवाद.

Lol बरोब्बर!
उडीक, उडीद, उदीक, उदित, उडीप
यातलं काहीही

मला यापेक्षा वेगळं ऐकू येत. रस्ता उधेड दिया Sad आता अशा उधेडलेल्या रस्त्यावर माही ला बोलावून त्याचा कपाळ मोक्ष करणे किंवा गेला बाजार एखाद्या अवयवा ला प्लास्टर बसवणे हा कुटील हेतू का आहे गाणारी चा असा प्रश्न मला पडायचा पण असेल त्यांची काय ती भानगड असं म्हणून मी विचार सोडून द्यायचे.

मग खरं काये?

माझा मुलगा या वेळच्या निवडणुका झाल्यापासून ' उन्हातान्हाचं.. जाऊया पपिप.. पपिप.. पपिप ' असं एक गाणं अगदी तालासुरात गातो. कोणत्या पक्षाचं गाणं तोंडात बसलय आणि हे पपिप काय आहे कोणास ठाऊक !!

साक़िया आज मुझे नींद नही आयेगी
सुना है तेरी महफीलमें रतज़गा है
मला सुरूवातीला रस जगा है/रंग चढ़ा है वाटायचं. अर्थाच्या दृष्टीनेही ते पटायचं. आशाबाईंच्या उच्चारात दोष नाही. मला तो शब्दच माहित नव्हता. फार नंतर कधीतरी सलमान खानच्या एका टुकार (द्विरुक्ती होतेय का?) चित्रपटातल्या गाण्यामुळे रतज़गा हा स्वतंत्र शब्द असतो हे समजले. सलमान थोर तुझे उपकार!

साथिया……..रतजगा है
फार सुंदर आहेत त्या गाण्याचे शब्द.

उदा:

साकी है और शाम भी, उल्फ़त का जाम भी
तकदीर है उसी की जो ले इन से काम भी

चांस पे डांस ना किया तो क्या फायदा ? Happy

उडीक>>> नवा शब्द समजला… >>>>> +१

माही म्हणजे तिमाही, सहामाही वगैरे समजणारा मी, उडीक कळायला पंजाबी GRE द्यावी लागेल मला.

Pages