मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ओ मुंडे मेरे लुक्स पे मर गये... पुढे इसपे मर गये उसपे मर गये... करता करता पुढे 'पाइल्स पे मर गये' (?) असेही शब्द ऐकू येतात

Submitted by अतुल. on 15 January, 2023 - 12:59
Proud

Submitted by मनिम्याऊ on 16 January, 2023 - 01:15

सखी शेजारीणी तू हसत रहा,
हास्यात पळे गुंफीत रहा.

हे गाणं कायम रेडीओवर लागायचं आणि मला कायम हास्यात फळे गुंफीत रहा ऐकू यायचं. फळे का गुंफायची, अर्थ काय ह्या भानगडीत कधी पडलेच नाही, अजुनही मी कधी गुणगुणले तर फळे हाच शब्द पुढे येतो.

सध्या मुलीच्या शाळेत २६ जानेवारी ची प्रॅक्टिस चालू आहे. अरिजित सिंग च गाणं... खालील प्रमाणे ...

अपना है दिन ये आज का
दुनिया से जाके बोल दो
बोल दो

ऐसे जागो रे साथियों
दुनिया की आँखें खोल दो
खोल दो

लहरा दो लहरा दो
सर्कशी का पंचम लहरा दो
गर्दी में फिर अपनी
सर ज़मीन का पंचम लहरा दो

म्हणजे कुठल्या तरी सर्कशीला खूप गर्दी झाली आहे आणि सर लोक (शाळेतले) जमिनीवर बसले आहेत

चिनी लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा >> तिन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा >> मिनी लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा

खूप खूप दिवसानी लतादीदीनी अजरामर केलेलं 'बीती ना बिताई रैना' ऐकलं गाडीत.. कितीतरी शब्द मला कळत नव्हते ते कळले. कदाचित अनुरिताच्या आवाजात नीट ऐकलं असेल,
बीती ना बिताई रैना,
बिरहा की चाही (जाई) रैना..
(यातलं कीचाही म्हणजे काय हे कधीच माहीत नव्हतं.. अजून एक म्हणजे ....)
बीती हुई बतियां कोई तो हुडाये ( दोहराये).
... (ऐका म्हणजे कळेल.. ) Happy

कानडा हो विठ्ठलु, कर्नाटकु
तेणे मज लावियला वेडू

असं समजत होतो इतके दिवस. नुकताच स्वाती आंबोळे यांचा यावरचा धागा वाचला आणि लक्षात आलं की ते वेधु आहे.

मी हे मागे लिहिलं आहे का आठवत नाही. मी लहानपणी मी रात टाकली हे गाणं चुकून असं म्हणायचो -

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडद्या संसाराची बाई लाज टाकली

एकदा हे आईच्या कानावर पडल्यावर तिनं फटके दिले होते Sad

कुणी आधी लिहीलंय का हे माहिती नाही.

नाजिया हसनचं "आप जैसा कोई मेरी जिंद्गगी मे आये" हे गाणं होतं.
त्यातली
हर किसी को चाहिए तन का मिलन , ही ओळ मला नेहमी
हर किसी को चाहिए तनखा मिलन अशी ऐकू यायची.
प्रत्येकाला तनखा मिळवायचाच असतो हे वैश्विक सत्य असल्याने कधी खटकली नाही.

तनखा मिलन Lol
-----------
तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है
क्या चिज हो तुम कुत्तो में मालुम नही है.

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडद्या संसाराची बाई लाज टाकली हे मला
मीरा तटाकली
मिका?? तटाकली
अस वाटायचं

>>मुडद्या संसाराची

हपा Lol Lol Lol
हाहाहा मारही बसला.

हे मी आधी लिहिलं की नाही ते आठवत नाहीये.

हिल हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिळा

हे मी हिल हिल पोरी हिला, तुझ्या गप्पा लीला टिला म्हणायचे, म्हणतेही, मला लक्षात ठेवून बरोबर म्हणायला लागतं.

मला ते लहानपणी "तुझा कप्पा ढिला ढिला" असे वाटायचे. (म्हणजे वरचा मजला रिकामाा असे तो तिला चिडवतोय असे वाटायचे).

१. मीत ना मिलादे मणका...
२. यारो सब दुवा करो, मिलके फिर याद करो...
३. दिल मे मगर, जलते रहे, चाहत के दिए...
४. सुखी संसाराची लावुनिया वाट, पाउले चालती पंढरीची वाट...
५. माझ्या येलूला लागतं उन्ह, तिथं काय लावलंय हळदीचं बन! सोन्याचं डोरलं, कडंन काळं मणी गं, सुखदेव आप्पा कुंकवाचा धनी गं.. ( कडं अन काळं मणी आहे की कडंनं (कडेकडेने) काळं मणी आहे ते कळत नाही आणि कुंकवाचा धनी कोण हे मला आजवर कधीच नीट ऐकू आलं नाही )
६. गावरान मुंडे

आमच्या ऑफिसात दोघा विवाहितांचे विबासं जुळले आणि त्यांनीही ते लपवायचा फार प्रयत्न केला नाही तेव्हा आमचा एक शिपाई त्यांना बघून
पाउले चालती .... सुखी संसाराची लावुनीया वाट असंच गाणं पुटपुटत असे.

Pages