Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो अर्धा न आपोआप त ला जोडला
तो अर्धा न आपोआप त ला जोडला जातो. त्यामुळे इथे लिहिता येणं अवघड आहे.
>>> +११
मी तीनदा प्रयत्न केला आणि मगच अक्षरे सुटी करून लिहिली.
हाच अनुभव द्ध च्या बाबतीत येतो (द् ध )
स्न्त असं का?
स्न्त
असं का?
स पूर्णच हवा
स पूर्णच हवा
सरबत / शरबत / सर्बत
सरबत / शरबत / सर्बत
या मधुर पेयाचा भाषाप्रवास देखील रंजक आहे :
अर. शरब(त) >> फा. शरबत >> तुर्की serbet
पुढे युरोपीय भाषांमध्येही प्रवेश :
इंग्रजी : zerbet, cherbet >>> sherbet
इटालीय : sorbetto
फ्रेंच : sorbet(au cafe) परंतु हे अल्कोहोलयुक्त असायचे
कोट्यधीश हे बरोबर आहे की
कोट्यधीश हे बरोबर आहे की कोट्याधीश?
भाषेच्या नियमानुसार
भाषेच्या नियमानुसार कोट्यधीश हे बरोबर आहे.
परंतु कोट्याधीश हे दुसरे रुप रुढ झाल्यामुळे काही शब्दकोशांनी स्वीकारलेले आहे.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%...
हयनयसो
हयनयसो
हा एक छान कोकणी शब्द आहे
= संदिग्ध; आहे-नाहीच्या सीमेवरचे
अघ
अघ
= पाप.
अनघ =
१. निष्पाप, निर्मल. (अनघ जीवन)
२. सुंदर ( अनघ उरोज)
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%98+
>>>>>>अनघ
>>>>>>अनघ
हा शब्द स्तोत्रांमध्ये बरेचदा येतो.
पापौघनाशक, अनघ
--------------
जरी महाभारतांतर्गत असलेले विष्णू सहस्रनाम प्रसिद्ध असले तरी, गरुड/नारद व स्कंद या तीन पुराणात विष्णू सहस्रनाम आलेले आहे.
या तीनही पुराणांत विष्णूचे, एक नाम आहे कालमूषकभक्षक. मला ते मजेशीर वाटते. काळाला मूषक म्हणण्यामागे काय प्रत्यावय (शब्द बरोबर आहे का?) असेल?
का श्रीविष्णूंनी, नरसिंह हे व्याघ्ररुपधारी म्हणजे मार्जार कुळातील रुप धारण केल्याने तसे म्हटलेले आहे?
छान.
छान.
पापौघनाशक = पाप + ओघ + नाशक
गीतेत अर्जुनाला अनघ म्हटले आहे.
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तम् मयानघ (= मया + अनघ)
* १. कालमूषकभक्षक. मला ते
* १. कालमूषकभक्षक. मला ते मजेशीर वाटते. >> +१
..
* २. अर्जुनाला अनघ म्हटले >>> छान.
हे मुलाचे नाव ठेवलेले कधी ऐकले नाही.
मुलीचे अनघा अगदी सर्रास आहे
पापौघ :
पापौघ :
रुद्राष्टकात दुःखौघ येते, ... जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं...
कालमूषकभक्षक :
जगनियंत्याच्या शक्तीपुढे साक्षात काल सुद्धा मूषकाप्रमाणे तुच्छ, powerless, small असे असावे.
अरे पापौघ म्हणजे पाप + ओघ होय
अरे पापौघ म्हणजे पाप + ओघ होय? मला वाटे पाप + अघ मग ते पापाघ झाले असते.
>>>>>जगनियंत्याच्या शक्तीपुढे साक्षात काल सुद्धा मूषकाप्रमाणे तुच्छ, powerless, small असे असावे.
शक्य आहे.
इति गुह्यतमं
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तम् मयानघ (= मया + अनघ)
+१
'अनघालक्ष्मी' ही दत्तगुरूंची पत्नी आहे असं मानतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी छोट्या मुलींना 'अनघालक्ष्मी' मानून पूजा करतात. आमच्याकडे बघितले आहे.
अनघालक्ष्मी= white money?
कष्टाने मिळवलेली संपत्ती, वाममार्गाने नाही.
* कष्टाने मिळवलेली संपत्ती >>
* कष्टाने मिळवलेली संपत्ती >>> छान !!
कालमूषक म्हणजे काळा उंदीर असे
कालमूषक म्हणजे काळा उंदीर असे सोपे कुणाच्या डोक्यात आले नाही का?
माझ्या एका भाचीच्या मुलाचे
माझ्या एका भाचीच्या मुलाचे नाव अनघ आहे फार आवडलं ते नाव. सोरं, साधं, अर्थपूर्ण!
कालमूषकभक्षक :
जगनियंत्याच्या शक्तीपुढे साक्षात काल सुद्धा मूषकाप्रमाणे तुच्छ, powerless, small असे असावे. - वा अनिंद्य. पटलं
कालमूषकभक्षक >> हे माहीत
कालमूषकभक्षक >> हे माहीत नव्हतं. एखादा श्लोक द्याल का, ज्यात ते नाव आलंय?
अनघालक्ष्मी= white money? >>
*भाचीच्या मुलाचे नाव अनघ आहे
*भाचीच्या मुलाचे नाव अनघ आहे >>>
चला, एक तरी ऐकला असा. बरे वाटले !
उत्तम चर्चा . . .
सोरं नाही, सोपं :कपाळावर हात
सोरं नाही, सोपं :कपाळावर हात मारणारी अवल:
संपादनाची वेळ गेली
काल = काळ + एखाद्या काळ्या,
काल = काळ + एखाद्या काळ्या, भिती/त्रास दायक प्राण्याचे नाव असा शब्द तयार करून काळाची (पक्षी मृत्युची) भिती अधोरेखित करायची असेल
उदा. कालसर्प, कालदैत्य तसं कालमूषक
काळापेक्षा जास्त बलवान असा हा अर्थ अभिप्रेत असावा.
समस्तदुर्गतित्राता
समस्तदुर्गतित्राता जगद्भक्षकभक्षकः ।
उग्रेशोऽसुरमार्जारः कालमूषकभक्षकः ॥ ८२॥
- नारद तसेच पद्म पुराणांतर्गत
अरे यात तर मांजर आले, म्हणजे
अरे यात तर मांजर आले, म्हणजे मी गेस केला तो अर्थ नसावा मग.
धन्यवाद सामो. हो, ह्यात
धन्यवाद सामो. हो, ह्यात मांजराचा संदर्भ आहे. कालमूषकाचे भक्षण करणारा असुरमार्जार. आता असुरमार्जार म्हणजे काय ते शोधणं आलं. ही कुठली मांजर?
आभार हपा.
आभार हपा.
हा काळ बरीच रूप घेतो अस दिसतय
हा काळ बरीच रूप घेतो अस दिसतय.
शाळेतील सुभाषित आठवलं. त्यात तो लांडगा झालाय.
अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे ।
इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजम् ॥
एकूण काळ सोकावलाय....
कालवृक!!!!
कालवृक!!!!
लांडग्यासाठी “वृक” किमान २० वर्षांनी वाचला. अद्भुत !
BTW, “वृक्क” हा मराठीत किडनी साठी वापरतात ना ? की pancreas ?
वृक्क - kidney
वृक्क - kidney, मूत्रपिंड
स्वादुपिंड - pancreas
ऋतुराज. आभार
ऋतुराज.
आभार
*लांडग्यासाठी “वृक” >>> हा
*लांडग्यासाठी “वृक” >>> हा शब्दकोड्यात दर आठवड्याला एकदा तरी येतोच
तसेच वारण (हत्ती) आणि रासभ (गाढव) हे पण त्यांचे आवडते शब्द.
Pages