Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठी शब्द उच्चार कोश असतात
मराठी शब्द उच्चार कोश असतात का ?
सर्वसाधारण आपण सगळे आपल्याला शाळेत जे उच्चार शिकवले जातात त्याप्रमाणे करतो. पण काही शब्दांच्या बाबतीत दुमत असू शकते.
वरील उत्सुकता शमवण्यासाठी
वरील उत्सुकता शमवण्यासाठी जरा शोध घेतल्यावर हे उत्तर मिळाले :
साभार ! https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...
प्रमेह
प्रमेह
= लघवीचा रोग
ह्याचे एकवीस प्रकार आहेत. त्यापैकी एक :
मधुमेह ( मधु = गोड + प्रमेह = भरपूर लघवी)
दाते शब्दकोश
एक गमतीदार योगायोग लक्षात आला
एक गमतीदार योगायोग लक्षात आला.
इंग्लिश वर्थ चा विरुद्ध मराठी शब्द व्यर्थ!
समानार्थी: फार लांब - far
समानार्थी: फार लांब - far long
Me - मी Gherao - घेराव
Me - मी
Gherao - घेराव
घेराव मूळ इकडलाच शब्द घेतला
घेराव मूळ इकडलाच शब्द घेतला आहे इंग्रजीत.
स्कंद या शब्दाचा अर्थ
स्कंद या शब्दाचा अर्थ वीर्याची चिळकांडी असा कोणीतरी वरती का अन्य धाग्यात सांगीतलेला स्मरतो. इंग्रजी स्पंक (spunk) या शब्दाचा एक अर्थ तोच आहे असे आज वाचले.
माहितीचे आदान-प्रदान आणि
माहितीचे आदान-प्रदान आणि उत्तम शब्दचर्चा !
***********************************************************
शाम्पू
या शब्दाचा भाषाप्रवास रंजक आहे.
संस्कृत : चपयति = मालिश करणे >>
हिंदी : चंपन >> चांपो >>
shampoo = मालिश करणे >> फेसाळ पाण्याने केस धुणे
मराठीत स्वीकृत
मूळ क्रियापद पण आता नाम म्हणूनही वापर.
https://www.etymonline.com/word/shampoo#etymonline_v_23339
उपयुक्त माहिती.
उपयुक्त माहिती.
संस्कृत :
कपायतीचपयति/चम्पयतिह पा धन्यवाद ! सुधारणा केली
ह पा
धन्यवाद ! सुधारणा केली.
तिथे capayati असे का आहे माहीत नाही. h ?
उपयुक्त माहिती. +1
उपयुक्त माहिती. +1
चम्पी/ चंपी त्यापासून झाला असावा.
संदर्भ:
दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ
कहो तो तुम्हारी हम चंपी कर दे
c हा च साठी फार पूर्वीपासून
c हा च साठी फार पूर्वीपासून वापरतात. त्यात C आणि c वेगळा उच्चार, c वर की खाली दांडी असेल तर वेगळा असेही काही ठिकाणी आहे.
चरक चे स्पेलिंग अनेक ठिकाणी Caraka वाचले आहे, जुन्या पुस्तकात.
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
अस्मिता, हो
शशी थरूर यांच्या त्या प्रसिद्ध रेपरेशन्सवाल्या भाषणात त्यांनी 'तुम्ही आमचे शब्द - चंपी वरून शाम्पू, .... (अजून काही उदाहरणं) .... घेतले, इतकंच नाही, तर शब्दशः 'लूट' हा शब्द बाकी लुटीसोबत घेऊन गेलात' अश्या अर्थाचं म्हटलं आहे.
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव.
रोचक एकाक्षरी ( गोरे कोश)
रोचक एकाक्षरी ( गोरे कोश)
टुं = लहानशा बाबतीतली तक्रार ; विशेषतः स्त्रियांकडून वापर
( जरा टुं झालं की चालली नवऱ्याकडे तक्रार करायला)
ट्या = लहान जातीचा पोपट
ठी = अर्धवट डाव सोडण्याची खूण; आठवण; मर्यादा
ठे = खोकल्याचा आवाज
( याचं रात्रभर ठेठे चाललं होतं)
छान धागा. बरेच नवे शब्द
छान धागा. बरेच नवे शब्द समजले.
बॉम्ब ला मराठी शब्द आहे का?
स्फोटक?
स्फोटक?
बॉम्बला मराठी शब्द >> ध्वम
बॉम्बला मराठी शब्द >> ध्वम ( म पायमोडका)
असा वाचला होता.
( अणुध्वम)
बॉम्ब ला स्फोटक म्हटले तर
बॉम्ब ला स्फोटक म्हटले तर “बॉम्बस्फोट” झाला हे कसे सांगायचे ?
(No subject)
माहितीकरता आभार!
माहितीकरता आभार!
मराठी व्याकरणतज्ज्ञ यास्मिन
मराठी व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/yasmin-shaikh-life-journey-...
‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत’… असं म्हणत यास्मिन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थीवर्ग हे त्यांच्या जगण्याचं फलित आणि संचित.
अभिष्टचिंतन !
एराउ
एराउ
हे एक छानसे लघुरुप ‘देशाचा विकास’ या विषयावरील लेखात पूर्वी वाचायला मिळाले होते.
कोणाला त्याचे दीर्घरुप ओळखता येते आहे का ते बघूया . . .
राष्ट्रीय उत्पन्न ? ए काय
राष्ट्रीय उत्पन्न ? ए काय असेल?
राष्ट्रीय उत्पन्न ? ए काय
यास्मिन शेख _/\_
एकूण राष्ट्रीय उत्पन्न
एकूण राष्ट्रीय उत्पन्न
छान, बरोबर !
सोपा शब्द होता. मी एकीकृत
सोपा शब्द होता. मी एकीकृत मागे गेलो.
सकल राष्ट्रीय उत्पन्न वाचल्यासारखं वाटतंय. सगळे तत्सम शब्द.
सकल राष्ट्रीय उत्पन्न >>>
सकल राष्ट्रीय उत्पन्न >>> +१
एराउ हा शब्द पर्यावरण लेखक दिलीप कुलकर्णी यांच्या लेखनात येत असतो.
यास्मिन शेख _/\_
यास्मिन शेख _/\_
Pages