Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिंद्य, छान माहिती.+१११
अनिंद्य, छान माहिती.+१११
आभार सर्वांचे.
आभार सर्वांचे.
बाबांना इथली देवदर्शनाबद्दलची चर्चा आणि प्रकार सांगितले तर त्यांनी 'कंगवे विकणारा टकलू आहेस' अशी संभावना केली माझी (कारण क्वचितच देवळात जातो.)
चांगली माहिती.
चांगली माहिती.
आता त्यात "शीघ्र दर्शन" आणि "अति शीघ्र दर्शन" प्रकार पण आलेत.
छान माहिती. यापैकी मुखदर्शन
छान माहिती. यापैकी मुखदर्शन तेवढं माहिती होतं.
छान माहिती, अनिंद्य!
छान माहिती, अनिंद्य!
त्यात अजून आता पेड दर्शन, ऑनलाईन दर्शन असे प्रकार add करायला हवेत.
कलालय
कलालय
= कलादालन
अलिकडे कलालय हा शब्द वापरात नसावा परंतु 50- 60 वर्षांपूर्वीच्या मराठी साहित्यात आढळतो.
कलालय हा शब्द प्रथम नजरेस पडल्यावर एकदम ‘कलाल’शी संबंधित आहे का असे वाटून जाते.
कुठे ती कला आणि कुठे तो कलाल !!
मघाशी सह्याद्री वाहिनीच्या
मघाशी सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांमध्ये,
“. . . पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली”,
अशी बातमी देण्यात आली.
कोअर कमिटीसाठी हे शब्दशः भाषांतर योग्य वाटत नाही. त्याऐवजी कार्यकारी समिती असे म्हटले तर ? किंवा अन्य काही सुचवा.
सुकाणु समिती ?
सुकाणु समिती ?
पण तो steering committee ला वापरतात बहुदा.
मुख्य समिती किंवा मध्यवर्ती
मुख्य समिती किंवा मध्यवर्ती समिती ?
मध्यवर्ती +१
मध्यवर्ती +१
काही संस्थांना नियामक समिती/ मंडळ असतात.
संस्कृत मध्ये संस्कृ असा शब्द
**संस्कृत मध्ये संस्कृ असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वयंपाक करणे.>>>>
याचे अधिक स्पष्टीकरण प्रतिभा रानडे यांच्या पुस्तकात असे आहे :
वेगवेगळी धान्ये, भाजीपाला, मांस इत्यादींवर विविध मसाल्यांचे संस्कार करून स्वयंपाक करणे म्हणजे संस्कृ.
हा ओढुन ताणुन आणलेला/लावलेला
हा ओढुन ताणुन आणलेला/लावलेला अर्थ वाटतो.
चौकातून गाडीवरून न उतरता गाडी
चौकातून गाडीवरून न उतरता गाडी slow करून दगडूशेठ गणपती ला हात जोडणे हा कोणता प्रकार आहे?
व्यग्र दर्शन.
व्यग्र दर्शन.
शंकराच्या पिंडीचे नंदीच्या
शंकराच्या पिंडीचे नंदीच्या शिंगावर अंगठा आणि तर्जनी ठेवून त्यातून घेतलेले दर्शन म्हणजे शृंग दर्शन?
व्यग्र दर्शन
व्यग्र दर्शन
त्या श्रृंग दर्शनाच्या समयी डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा असा नियम आहे.
शाक्तपद्धतीत अजून विचित्र गोष्टी आहेत, इथे न लिहिलेल्याच ठीक
पुढच्याने वाहत्या गर्दीत गाडी
पुढच्याने वाहत्या गर्दीत गाडी स्लो केली की मागचे ज्या नजरेने बघतात (विशेषतः पुण्यात) ते उग्र दर्शन!
>>> त्या श्रृंग दर्शनाच्या
>>> त्या श्रृंग दर्शनाच्या समयी डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा असा नियम आहे.
भगवंता! का ते?! आणि त्याहीपेक्षा कसं ते?!
नंदी बसलेला असतो ना?
कायतरी कामेच्छा दमनासाठी
कायतरी कामेच्छा दमनासाठी वगैरे असते म्हणे. जौद्या.
आता अनेकजण नंदीच्या मूर्ती बारकाईने बघतील हे निश्चित.
>>> कामेच्छा दमनासाठी
>>> कामेच्छा दमनासाठी
नंदीच्या वृषणाला हात घालून आपल्या कामेच्छेचं दमन कसं होणार?
नंदी म्हणत असेल 'Hey, keep me out of this!'
जौद्या हे खरं.
काही "उभा" (उत्तर भारतीय)
काही "उभा" (उत्तर भारतीय) मंडळी असं काही तरी करताना बघीतली होती तेव्हा आश्चर्य वाटले होते.
हा उपद्व्याप 'ब्रह्मचर्य' पालनासाठी असतो हे आज कळले.
महान आहे हे.
महान आहे हे.
भारीच !
.
कलालय
कलालय
कला+आलय / कलालय सारखेच काही इंग्रजी शब्दांना प्रत्यवाय म्हणून तर काही स्वयंभू असे मराठीतले 'आलय" :
aquarium ला मत्स्यालय
restaurent ला भोजनालय
हेअर कटिंग सलून ला केशकर्तनालय
Orphanage ला अनाथालय
दारूच्या गुत्त्याला मदिरालय (भारदस्त वाटते ना एकदम ? गुत्त्यात बेवडे जातात मदिरालयात मद्यपी )
secretariat ला सचिवालय (महाराष्ट्रात मात्र मंत्री लोकांचे कार्यालय म्हणून 'मंत्रालय' नाव आहे. हे सचिवालयाचे मंत्रालय नामांतर करतांना बराच काथ्याकूट झाला होता असे आठवते)
पक्षांच्या (राजकीय नव्हे) घराला मात्र कुठलेही आलय न म्हणता त्यांच्या घरट्याला "अविसाळ' असा शब्द जुन्या मराठीत वापरात होता, आता विलुप्त झाला दिसतो.
अविसाळ >> शब्द छान आहे व
अविसाळ >> शब्द छान आहे व त्याची फोड अशी आहे :
सं. अविस् + आलय
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
पक्षांच्या (राजकीय नव्हे) - >
पक्षांच्या (राजकीय नव्हे) - > पक्ष्यांच्या
पक्ष्यांच्या ओके
पक्ष्यांच्या
ओके
मंत्रालय >> आता सवयीचा
मंत्रालय >> आता सवयीचा झाल्यामुळे खटकत नाही, पण जेव्हा तयार केला तेव्हा खटकला असणार. मंत्री + आलय = मंत्र्यालय पाहिजे. मंत्रालय = मंत्र + आलय. असो. आता बदलायला नको. आहे तो सगळ्यांना कळतो ना बरोबर, मग जाऊ द्या.
जेव्हा तयार केला तेव्हा खटकला
जेव्हा तयार केला तेव्हा खटकला असणार…
हो. खूप चर्चा झाली होती. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण फार आग्रही होते “मंत्रालय“ नाव हवे म्हणून
बरोबर, तो वाद आठवतो.
बरोबर, तो वाद आठवतो.
हा वाद निर्माण व्हायचे कारण म्हणजे भारतात आपण सेक्रेटरी म्हणजे सचिव - म्हणजे नोकर- या अर्थाने तो शब्द घेतो.
ब्रिटिशांनी जेव्हा secretariat हे नाव दिले होते तेव्हा त्यांना संबंधित मुख्य व्यक्तीचा दर्जा मंत्र्याचा अपेक्षित असावा असे वाटते.
सेक्रेटरीचा अमेरिकी अर्थ हा आहे :
US meaning :
the head of a government department, chosen by the president.
https://dictionary.cambridge.org/dictionary/english/secretary
Pages