Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<भरत, तो केले - केल्या भेद हा
<भरत, तो केले - केल्या भेद हा माझे - माझ्या यासारखा असेल का?>
कळलं नाही.
केले, गेले ही क्रियापदे आहेत. माझे, माझ्या ही विशेषणे.
षष्ठीबद्दल तुम्ही लिहिले आहे त्याच्याशी सहमत.
ज्यांनी जुन्या वैदर्भी बोलतील
ज्यांनी जुन्या वैदर्भी बोलतील पुस्तके वाचली असतील ते सांगू शकतील.
हे जालावर शोधणे अवघड आहे
भरत, क्रियापदे काय किंवा
भरत, क्रियापदे काय किंवा विशेषणे काय, दोन्ही कर्ता वा विशेष्य यांच्या लिंगानुसार आपण सध्या लिहितो. पण विशेषण हे वरच्या उदाहरणात लिंगनिरपेक्ष होते असे दिसते. तसेच क्रियापदातही असावे का - असा तो प्रश्न होता.
ह पा, तुमी इसकटून सांगितलेले
म्हणजे काम केले, चढाई केली...
म्हणजे काम केले, चढाई केली...
तुझा भाव, तुझी पावले ...
जाऊ दे कंटाळा आला. विषय बदलू या. एवढं काही महत्त्वाचं नाहीये ते.
ता. क. नुसते केले हे क्रियापद झाले. पण केले गेले या प्रयोगात केले हे क्रियाविशेषण आहे का?
बावन-न्न
बावन-न्न
या अंकावरून निर्माण झालेले तीन शब्द रोचक आहेत :
१. बावनकशी (सोने)
(बावन वेळां शुद्ध केलेले)
..
२. बावनखणी = वेश्यांची गल्ली ( पुण्यातल्या शुक्रवार पेठेत खाजगीवाल्यांच्या पिछाडीस बावन खणांची एक चाळ होती. तींत वेश्या राहात असत त्यावरून)
..
३. बावनबावन्नी = पत्यांच्या खेळांत तेरा हात करून मिळालेला विजय.
दाते शब्दकोश
मी एक अजून शब्द ऐकलाय
मी एक अजून शब्द ऐकलाय
बावन्न बावन्न !
म्हणजे शोधत बसणे, गोंधळात पडणे -- भरकटणे
" मी बसलो इथे बावन बावन्न करीत, आणि तू ती फाईल घेऊन पोहोचली सुद्धा? कळवायचे तर खरी!"
काय अर्थ असावा नक्की?
मी हे नेहमी ऐकतांना समोरच्याने इतक्या रागात म्हटलेले ऐकले आहे.. की त्याचा मूळ अर्थ कसा असावा हे लक्षात येत नाही!
ह. पा. तुम्ही इथे लिहिलं आणि
छान चर्चा.
ह. पा. तुम्ही इथे लिहिलं आणि एक आठवलं,
मलाही बरेच दिवस एक प्रश्न पडलाय, केलं गेलं, परतल गेलं, मिश्रण भाजल गेलं मध्ये गेल नक्की का वापरतात? ते गरजेचं आहे का?
मी मराठी शिकले त्याला अनेक वर्ष लोटली, घरात मालवणी बोलतात, आणि आता मराठी शी संबंध खूप कमी येतो. जे परिचित मराठी बोलतात तेही ३०-४० % इंग्रजी व वेगळ्या पद्धतीचे मराठी शब्द वापरतात असे माझे निरीक्षण आहे. मी हल्लीच एक परकीय भाषा शिकले तसेच माझी मुलं सध्या मराठी बोलू लागल्याने मला सारखी नजर ठेवावी लागते त्यामुळे मी अती चिकित्सक तर झाले नाही ना असे वाटते. पण हे जास्तीच क्रियापद वापरण्याची गरज वा प्रयोजन काय आहे ?
*बावन्न बावन्न !>>> भारीच !
*बावन्न बावन्न !>>>
भारीच !
कर्तरी , कर्मणी प्रयोग
कर्तरी , कर्मणी प्रयोग
पंतप्रधान, प्रधानमंत्री का
पंतप्रधान, प्रधानमंत्री का महामंत्री ?
वरील तीनपैकी मराठीत कोणता शब्द त्या पदासाठी सुयोग्य आहे यावर भाषा अभ्यासकांमध्ये खल झालेला आहे. त्याचा हा ऊहापोह :
१. पंतप्रधान : यातील पंत या शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे, ते ‘पंडित’चे संक्षिप्त रूप आहे (दाते शब्दकोश). हा शब्द शिवाजी महाराजांनी स्वीकारलेल्या अष्टप्रधान व्यवस्थेच्या काळापासून तरी अस्तित्वात आहे. (त्याच्या हाताखालील अन्य प्रधानांच्या नावाच्या पाठीमागें सुद्धा पंत ही मानाची पदवी असे. जसे की, पंत-प्रतिनिधी, पंत- अमात्य, इ).
२. प्रधानमंत्री : सर्व मंत्र्यांचा प्रमुख म्हणून हा शब्द योग्य असे काहींचे म्हणणे. एका बाजूने पाहता हा शब्द म्हणजे इंग्लिश प्राईम मिनिस्टरचे शब्दशः भाषांतर वाटते.
३. महामंत्री : सुमारे ४५-५० वर्षांपूर्वी केसरी दैनिकाने आग्रहाने आणि सातत्याने हा शब्द वापरलेला होता. त्यांच्या मते, राज्य पातळीवरील सर्वात मोठा मंत्री जर ‘मुख्य’, तर मग देशपातळीवरील सर्वात मोठा ‘महा’.
इंदिरा गांधींच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केसरीने त्यांच्या नावामागे महामंत्री बिरुद लावलेले मला आठवते.
एक महामंत्री आणि दुसरे
गुरुणी
गुरुणी
हा शब्द प्रथमच वाचला :
पत्नीस गृहिणी, माता, सखी, गुरुणी असेही गूढार्थाने कवी कल्पितात.
भूरिशः
भूरिशः
अत्यंत, खूप, खूप वेळा, विविध प्रकारे
......त्या सर्वांचा तो भूरिशः आभारी आहे.
बावन बावन मी पण ऐकले आहे
बावन बावन मी पण ऐकले आहे
भूरिशः - हा शब्द मराठीतही आहे हे बेस्ट. हिंदीत भूरि-भूरि प्रशंसा करतात
* भूरिशः >>> छान. प्रथमच
* भूरिशः >>> छान. प्रथमच ऐकला.
मांजरपाट व गादलापाट
मांजरपाट व गादलापाट
हे दोन कापडाचे प्रकार असून या नावांचा उगम ते तयार होणाऱ्या गावांपासून झालेला आहे :
१. मांजरपाट : मद्रीपोल्लम ( Madapollam), आंध्र प्रदेश येथील जाडेभरडे सुती कापड. ( एकेकाळी इथे ईस्ट इंडिया कंपनीची कापडगिरणी होती).
२. गादलापाट (>> गादीपाट) : गादला, उत्तर प्रदेश येथील काहीसे भक्कम सुती कापड.
मांजरपाट मॅंचेस्टरवरून आले
मांजरपाट मॅंचेस्टरवरून आले असे वाचल्याचे आठवते.
मांजर पट ऐकले आहे, गादला पात
"मांजरपाटाचेच परकर शिवायला लावत सासूबाई आम्हाला...म्हणजे दोन दोन वर्षे फाटायची भिती नाही!... हे असे ? सिल्क आणि सॅटिन ...परकराला?"
इति साबा!
Extempore आणि उस्फूर्त या दोन
Extempore आणि उस्फूर्त या दोन शब्दांत काही नाते आहे का?
नाते नसावे कारण,
नाते नसावे कारण,
tempus = time
व
स्फूर्ति = स्वयंप्रेरणा
मांजरपाट मॅंचेस्टरवरून आले
मांजरपाट मॅंचेस्टरवरून आले असे वाचल्याचे आठवते >> +१
कुमार सर , नाते म्हणजे मला
कुमार सर , नाते म्हणजे मला म्हणायचे होते की उस्फूर्त शब्द हा Extempore वरुन आला आहे का?
अर्थ तर सेम च आहे ना?
त्या दोन्ही शब्दांमध्ये
त्या दोन्ही शब्दांमध्ये काहीसा फरक असावा. अधिक विचार करावा लागेल.
उस्फूर्त साठी spontaneous हा अधिक योग्य वाटतो
उस्फूर्त साठी spontaneous हा
उस्फूर्त साठी spontaneous हा अधिक योग्य
+ १
शाळेत Extempore speech competition असा प्रकार असायचा. ऐन वेळी चिठ्ठी उचलून विषय निवडायचा असे. मराठीत काय म्हणायचे त्याला ते आठवत नाही.
मराठीत त्याला बहुधा एक शब्द
मराठीत त्याला बहुधा एक शब्द नसावा.
आयत्यावेळी दिलेला विषय अशी स्पर्धा असे म्हणता येईल.
..
या प्रकारच्या भाषणाबाबत इंग्लिशमध्ये बोलायचे झाल्यास त्यासाठी
impromptu व extemporaneous
हे दोन भिन्न शब्द असून त्यांच्यामध्ये काहीसा फरक आहे.
तो इथे छान सांगितला आहे : https://docs.google.com/presentation/d/1YTTB58FhCJP0dvius3hFrDVntNFpQUzA...
..
'उस्फूर्त 'साठी impromptu अधिक योग्य वाटतो का ?
खुल(भर)
खुल(भर)
= (पाणी, दूध इ. चा) चुळका
सं. क्षुल्ल >> प्रा. खुल्ल = लहान >> खुल
खुलभर दुधाची सोमवाराची पौराणिक कहाणी आहे.
अलिकडे सुनंदा अमरापूरकर यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी' हे पुस्तक लिहिलंय.
सुरंग = रक्तचंदन
सुरंग = रक्तचंदन
कृष्णाच्या पायांना सुरंग हे विशेषण वाचले तेंव्हापासून किडा वळवळला. नाहीतर मला हिंदीतला भूयार किंवा मराठीतली सुरंगीच माहीत होते.
रक्तचंदन म्हणजेच आळता का?
रक्तचंदन म्हणजेच आळता का?
आमच्याकडे रक्तचंदनाची बाहुली होती.
रक्तचंदन म्हणजेच आळता का? >>
रक्तचंदन म्हणजेच आळता का? >>> नाही दोन्ही वायले वायले.
Pages