Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका जाणकारांनी मला सांगीतलेला
एका जाणकारांनी मला सांगीतलेला अर्थ -
औट घटका हा शब्दप्रयोग फक्त उपभोगाच्या संबंधीत वापरला जातो - जसे राज्य किंवा ऐश्वर्य! आणि तो उपभोग सर्वोच्च असतो तो सणांना. आपल्याकडे साडेतीन मुहूर्त येतात एका वर्षात म्हणजे साडेतीन प्रमुख सण! औट घटकेचे राज्य म्हणजे त्या साडेतीन मुहूर्तांचाही उपभोग घेता येऊ नये
इतक्या अल्प कालावधीचे राज्य - वर्षभरही राजवट टिकू नये.
औट = शब्दश: साडेतीन हे समजले.
औट = शब्दश: साडेतीन हे समजले.
@ माधव,
औट घटका हा शब्दप्रयोग फक्त उपभोगाच्या संबंधीत वापरला जातो हे पटेबल:-)
रच्याकने पिताश्रींना पावकी, नीमकी, पाऊणकी, दीडकी, अडीचकी, औटकी असे बालपणी शिकलेले पाढे अजून आठवतात. परंतु औटघटका सोडून औट हा शब्द इतरत्र वापरलेला त्यांनाही नाही आठवला.
कुणाला माहित असल्यास अवश्य सांगा.
अनिंद्य,
अनिंद्य,
इथे बरेच अर्थ आहेत :
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%94%E0%A4%9F/word
विशेषण म्हणून साडेतीन पण नाम म्हणून इतर अर्थ
'Be the change' साठी मराठीत
'Be the change' साठी मराठीत काहीतरी छान सुचवा, अशी सगळ्यांना विनंती.
त्या अर्थाचे छोटेसे बोधवाक्य
त्या अर्थाचे छोटेसे बोधवाक्य हवे की सामान्य लांबीचे वाक्य चालेल ?
अवांतराबद्दल आधीच माफी.
अवांतराबद्दल आधीच माफी.
औटघटका सोडून औट हा शब्द इतरत्र वापरलेला त्यांनाही नाही आठवला
>>>>>>>> खेळताना औट (आणि टॅम्प्लीज) शब्द वापरला जातो.
.., खेळताना औट ..
.., खेळताना औट ..
वरच्या लिंकमधे औट-डोअर आणि औट-हाऊस दिलेत
मांड
मांड
= मांडी ; जम; जकात
मोल्सवर्थ शब्दकोश
गोव्यातील मांडवी नदीचे नाव या शब्दावरूनच पडले आहे. फार पूर्वीपासून गोवा हे व्यापारी बंद होते. तेव्हा व्यापारी जहाजे अरबी समुद्रातून मांडवी नदीच्या पात्रात येत. तिथे त्यांच्याकडून जकात घेतली जाई.
कुमार दादा, लहानसं बोधवाक्य
कुमार दादा, लहानसं बोधवाक्य हवं आहे.
अनया, 3 सुचवतो :
अनया, 3 सुचवतो :
१. (समाज)परिवर्तन स्वतःपासून
२. परिवर्तनाचे पहिले पाऊल आपुलेच
३. आपली कृती, आपले परिवर्तन !
आधी केले, मग सांगितले
१. आधी केले, मग सांगितले
२. आम्ही बदललो, तुम्ही बदला ना
कुमार दादा, स्वाती दोघांची
कुमार दादा, स्वाती दोघांची वाक्य आवडली. योग्य ठिकाणी कळवते
धन्यवाद !
धन्यवाद !
"'Be the change . . ."
या संदर्भात केदारनाथ सिंह यांचे एक पद्य अवतरण मार्मिक आहे ते असे :
सुबह हुई और उसने सोचा
दुनिया बदलने से पहले
मुझे बदल डालनी चाहिए अपनी चादर
जो की मैली हो गई है l
शहेडे
शहेडे
= शहर + खेडे
(civillage)
अशी ही नवीन संकल्पना आहे.
या दोन्ही ठिकाणांचा समतोल साधणारी निवासी व्यवस्था तिथे असावी अशी अपेक्षा आहे.
छान.
वा, काय सुपीक डोके आहे असे जोडशब्द शोधायला. छान.
याला संडामोड म्हणायला हरकत नसावी आता. /s
निर्मख असा काही शब्द आहे का?
निर्मख असा काही शब्द आहे का?
हो, छल्ला
हो, छल्ला
निर्मळ, निरागस असा काहीसा अर्थ आहे. मोल्सवर्थ मधे बघून सांगते नंतर
हळ
हळ
= उष्ण वाऱ्याचा झोत
हळकणे = सुकणे, वाळणे
(कपडे हळकून वाळवणे)
>>> हळह(हा)ळ
हे नाम की विशेषण यानुसार अर्थभिन्नता आहे :
1. (नाम) = हूरहुर; चित्ताची अस्वस्थता; मोठी काळजी
2. (विशेषण) = कोमट (पाणी, शरीर इ॰).
'आंग हळहळ लागते'
दाते शब्दकोश
पदार्थ - म्हणजे त्याची
.
धाड पडावी पण चीत पडू नये
.
उन्हाळ्यात गरम हवेच्या झळा
उन्हाळ्यात गरम हवेच्या झळा येतात, त्यांना कोकणात आमच्याकडे 'हाळ (अनेकवचन हाळा) ' म्हणतात.
अच्छा.
अच्छा.
म्हणजे हाळ आणि झळ समानार्थीच झाले
हाळी = आरोळी
अजून एक त्यासारखा शबुद
हाळी = आरोळी
इंटरेस्टिंग साठी योग्य मराठी
इंटरेस्टिंग साठी योग्य मराठी शब्द कोणता?
रोचक
रोचक
दिलखेचक, स रस चित्तवेधक
दिलखेचक, स रस
चित्तवेधक
रोचक / रसमय / औत्सुक्यमय
रोचक / रसमय / औत्सुक्यमय
हे तिन्ही वाचलेत.
आभारी आहे!
आभारी आहे!
संत
संत
हा शब्द एकूण तीन प्रकारे लिहिता येतो :
१. संत
२. सन्त
३. स न् त (इथे सर्व अक्षर जोडलेली आहेत असे समजून वाचावे).
वरीलपैकी शेवटचा प्रकार (३) बरोबर आहे का ?
लोकमान्य टिळकांनी शाळेत असताना हे तिन्ही प्रकार लिहून शिक्षकांची शाबासकी मिळवली होती अशी दंतकथा ऐकली आहे.
शब्द न तोडता लिहिला तर बरोबर
शब्द न तोडता लिहिला तर बरोबर आहे. पण इथे शब्द एक करायला गेलं तर तो अर्धा न आपोआप त ला जोडला जातो. त्यामुळे इथे लिहिता येणं अवघड आहे.
टिळक मायबोलीवर असते तर फक्त दोनच प्रकारे लिहू शकले असते.
Pages