Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी यादीत चुकून सनी लिओनी असं
मी यादीत चुकून सनी लिओनी असं वाचल सनी देओल ऐवजी. मला वाटलं सेकंड इंनिंग म्हणून या सगळ्यांनी मिळून नवा picture काढला आणि आपल्याला काहीच माहित नाही का काय. मग परत वाचल्या वर कळलं आपण सनी म्हणलं की default सेटिंग वर जातोय : D
Picture जुनाच आहे.
श्रद्धा यांचा जाहीर सत्कार करायला हवा. खुद्द जडेजा ला पण ओळखणार नाही आपण या गाण्याच्या सिनेमात काम केलंय. पण श्रद्धानी चटकन ओळखलं
आज असंच वेगळं काही शोधत
आज असंच वेगळं काही शोधत असताना हा धागा समोर आला.त्यामुळं लगे हाथ उपयोग:

क्लू:
1. हा चित्रपट मी पाहिलेला नाही.तुम्ही पण बहुतेक पहिला नसेल.
2. यातली दिसणारी मासा कव्हरड नायिका तुम्ही कुठेतरी गेल्या 1 वर्षात पाहिलीय.
3. यात न दिसणारा नायक तुम्ही मागच्या 2 वर्षात कुठेतरी पाहिलाय.
अजून क्लू तुम्ही मागितले तर देते.
कवर करायला मासा न वापरता माशी
कवर करायला मासा न वापरता माशी वापरली आहे हे नम्रपणे नमूद करते.
ओह, ही इतकी ढोली माशी आहे का
ओह, ही इतकी ढोली माशी आहे का?मला खरंच क्लाऊनफिश नारिंगी ऐवजी पिवळा केलाय वाटलं.
गाणे ओळखाच्या आधी चित्र ओळखा
(No subject)
आ कही दूर चले जाये हम -
आ कही दूर चले जाये हम - लावारीस.
बापरे, यापेक्षा जास्त वेळ तर
बापरे, यापेक्षा जास्त वेळ तर मला इमेज वर माशी टाकायला लागला.
इतक्या लवकर कसं ओळखलं? गुगल लेन्स की काय?
या धाग्यावर एकदाही गुगल लेन्स
या धाग्यावर एकदाही गुगल लेन्स ने अचूक उत्तर दिलेले नाही.
या इमेजवरून सर्च दिला तर माशांचे फोटो, व्हिडीओज आले. एरव्ही ड्रेस, केशरचना, टोप्या , दागिने सगळं येतं पण गाणं नाही.
गाणं ओळखलं नाही. क्ल्यू तर एकदम गोंधळात टाकणारा होता. क्ल्यू वरून गेल्या वर्षभरात पदार्पण केलेली नायिका आणि नायक असा समज होत होता, पण ड्रेस अलिकडच्या काळातला वाटत नव्हता.
प्या हुआ चुपके से , मनिषा कोईराला असा सर्च दिला होता. तेव्हां लावारीस चं हे गाणं पण खाली होतं. या गाण्यात ती फ्रेम दिसली.
नाहीतर अजिबात शंका सुद्धा आली नसती कि हे दोन नग असतील.
वाह!! स्टेप्स ना पूर्ण मार्क.
वाह!! स्टेप्स ना पूर्ण मार्क.
ती रेखा आहे का? मला सिलसिला
ती रेखा आहे का? मला सिलसिला वाटलेला
मनीषा कोईराला आहे.
मनीषा कोईराला आहे.
उकल मस्त..
उकल मस्त..
अजून एक अजून एक येऊदे...
मला पण ओळखायचंय गाणं..
हे एक अतिशय सोपं.
हे एक अतिशय सोपं.

नेटफ्लिक्स वरचा मूव्ही असेल
नेटफ्लिक्स वरचा मूव्ही असेल तर पास.
अभय देओल आहे का ? (आत्ता व्हिडीओ पाहणे शक्य नसल्याने विचारतोय)
नेटफ्लिक्स वरचा नाहीये
नेटफ्लिक्स वरचा नाहीये.थिएटरमध्ये आलेला, सर्वांना एक्सेस असलेलाच आहे.
दिल चाहता है - तनहाई
दिल चाहता है - तनहाई
ताना हाय्यय्या हे बर्फेश रेशममियाचे गाणे पण असेच आहे.
नाही तनहाई नाहीये.
नाही तनहाई नाहीये.
क्लू देते
क्लू देते
1. नायिकेचे सर्व चित्रपट किमान 3 शब्दी आहेत.
2. या चित्रपटात प्रेमात पडण्याचा इतका गोंधळ आहे की नक्की कोण कोणाला फसवतं हे नीट समजायला नोट्स काढाव्या लागतात.(हा चित्रपट इथे चिरफाड मध्ये यायला एकदम योग्य उमेदवार आहे.)
तुम्ही देखों ना गाण्यातला
तुम्ही देखों ना गाण्यातला शाहरूख खानचा ओव्हरकोट, टी शर्ट जुळतंय. बॅकग्राऊंड किंचितसं वेगळं वाटतंय ...
मितवा मधे टी शर्ट थोSSS ड्डा वेगळा आहे.
मुदोक ची सगळी गाणी पाहून झाली. ट्रेन आहे पण नेमकी ती फ्रेम नाही.
सलाम-ए-इश्क का?
सलाम-ए-इश्क का? या रब्बा ?
मैं बेवफ़ा - प्यार इश्क़ और
मैं बेवफ़ा - प्यार इश्क़ और मोहोब्बत
नायिका - कीर्ति रेड्डी
नायक - अर्जुन रामपाल
???
यस झिलमील.
यस झिलमील.
यात
1. एक नायक दुसऱ्या नायकाला परदेशी गेलेल्या नायिकेच्या प्रेमात पडायला पैसा देतो.
2. तोपर्यंत तिसरा नायक नायिकेच्या प्रेमात पडतो.
3. नायिका या पैसे असईनमेंट वर असलेल्या च्या प्रेमात पडते.
4. मग हा पैसे असाईनमेंट वाला दुसऱ्या नायिकेच्या खोटा प्रेमात पडून खोटा साखरपुडा करून पहिल्या नायिकेचं दिल तोडतो आणि पैसे कमावतो.
5. तोवर मुद्दा 2मधला नायक दिल तुटलेल्या नायिकेला समजावून तिच्याशी साखरपुडा अलमोस्ट करतो.
6. तोवर मुद्दा 1 मधला कॉन्ट्रॅक्ट प्रेमी येतो आणि तिला शपथ देऊन सुखी राहण्यासाठी मुद्दा 2 मधल्या नायकाशी लग्न करायला सांगतो.
7. तोवर मुद्दा 1(पैसे देणारा) आणि मुद्दा 2 चे वडील येतात आणि कॉन्ट्रॅक्ट प्रेमी ला नायिकेच्या फोटोसह पकडतात.
8. नायिकेला मत विचारल्यावर ती नायक (मुद्दा 2 मधला) पसंत आहे असं खोटं म्हणते.
9. शेवटी खूप जण त्याग करून कॉन्ट्रॅक्ट प्रेमी चं नायिकेशी लग्न होतं आणि बाकी दोघांना पण उरलेल्या नायिका असाईन होतात.
(इथे हे लक्षात ठेवून लिहेपर्यंत माझे 200 केस गळले.)
बाप्रे! मी_अनु, या पिक्चरचा
बाप्रे!
मी_अनु, या पिक्चरचा एक झकास रिव्ह्यू तुझ्या शब्दात होऊन जाऊदे. 
लाडू पिठले
लाडू पिठले
येस्स आचार्य
येस्स आचार्य
प्यार इश्क और मुहोब्बत अन्
प्यार इश्क और मुहोब्बत अन् दीवाने हुये पागल दोन्ही there is something about Merry वर बेस्ड आहेत
वर्षाविहार धाग्याची लिंक -
वर्षाविहार धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/85290
मायबोली वर्षाविहार २०२४ नावनोंदणीचा गुगल फॉर्म - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...
मायबोली वर्षाविहार २०२४ चे शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे
अरे व्वा! वर आला धागा.
अरे व्वा!
वर आला धागा.
मासा कव्हरड नायिका >> मला
मासा कव्हरड नायिका >> चित्रावरून मला वाटलं माशीच्या नवर्याला मासा म्हणतात.
Pages