दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ नय्यो नय्यो.
मागे मीच दिलेलं गाणं म्हणून ओळखता आलं.

बरोबर.
आता येऊ द्यात रेग्युलरली.

पिक्चर हिट नाही.नवा पण नाही.पण हे गाणं कदाचित तुम्ही जिम वर्क आऊट ला वापरलं असेल.याचा हिडीस बीट्स, स्क्रॅच रिपीट, किंवा पंजाबी रॅप टाकलेला बॉलिवूड रिमिक्स अजून आला नाहीये(गॉड फॉरबीड).
क्लूज लागणार नाहीत, लागले तर देते.
IMG_20240105_125815.png

सोनाली हॅट्स ऑफ. कसं ओळखलं उत्सुकता आहे.

अनु, लहान असताना एक काचेचा तुकडा असायचा ज्याला दोन्ही बाजूंनी कागद चिकटवलेला असायचा, त्याच्यावर फिल्मस्टर्सचे फोटो असायचे. विशिष्ट पद्धतीने घडी घातली कि काचेतून ते चित्र दिसायचं. तसं धाग्याचं मुखपृष्ठ झालं आहे.

चेचेन्या... Lol
पर्फेक्ट रआ. दुसर्याच क्षणी उत्तर आलं. Happy

क्लू द्या क्लू
हे दिल दिवाना नाहीये, मौसम आशिकाना है नाहीये

<<<टीना मुनीम वाटतेय. तो ऋषी कपूर आहे का कर्जमधला ?<<
र आ ...तुमच्या या वाक्यातील दोन शब्द बरोबर आहेत. Happy

काही आयडीज आत्ता हजर असतील तर दुसर्‍या / तिसर्या सेकंदाला उत्तर येईल. गाणे गाजलेले आणि चित्रपट सुद्धा. ही फ्रेम सुद्धा.

yuva.jpg

१. या गाण्याच्या गायिकेला बॉलिवूडमधे ओळख मिळवून देणारे गाणे.
२. नायकाला या चित्रपटात पहिल्यांदाच एव्हढी सकस भूमिका मिळाली होती.
३. यातल्या नायिकेबरोबर त्याचा आणखी एक चित्रपट खूप गाजला. त्यात नायकाच्या घरातील अन्य दोन सदस्यांनी काम केले होते.
४. वरच्या क्ल्यु मधल्या चित्रपटात ज्या गायिकेने गाणे म्हटलेले आहे तिचा एक अल्बम खूप गाजला ज्यात स्त्रीवाद आणि देशप्रेम दोन्ही हातात हात घालून येतात.

१ आणि ३ क्लू वरून मला अशोककुमार मधुबालाचा महल वाटला. दृश्य पण त्या चित्रपटात खपून जाईल.

Pages