Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या मटा विशेषमध्ये
आजच्या मटा विशेषमध्ये श्रीमती शेख यांनी सध्याच्या मराठी बोलण्यातल्या काही नेहमीच्या चुका पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत. त्या अशा :
• व्यक्ती सहृदयी नव्हे; सहृदय असते.
• मृत व्यक्ती स्वर्गीय नव्हे; स्वर्गवासी असते.
• समारंभ संपन्न झाला नव्हे; साजरा झाला असे म्हटले पाहिजे. संपन्न म्हणजे श्रीमंत होणे
• पाहिजेल हा शब्द मराठीत नाही.
छान उजळणी यास्मिन शेख _/\_
छान उजळणी
यास्मिन शेख _/\_
कडोविकडी
कडोविकडी
= कड्यात कड्या; त्यापासून झालेली गुंतागुंत
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
कडोविकडीचा कौटुंबिक कलह. . .
यास्मिन शेख यांचा लेख ज्या
यास्मिन शेख यांचा लेख ज्या लोकसत्तेच्या अंकात आहे त्यातच जे “मराठी” लिहितात ते या विदुषीला वाचावे लागू नये या शुभेच्छा.
… नेहमीच्या चुका….
अनिंद्य
अनिंद्य
लोकसत्ता "निंद्य" आहे.
जनीं निंद्य ते सर्व सोडून
जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें।
जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।
(No subject)
रच्याकने . . .निंद्य साठी
रच्याकने . . .
निंद्य साठी गर्हणीय हा एक अवघड शब्द आहे.
[सं. गर्ह = निंदा करणे]
आणि
त्याची ग्रहणीय याच्याशी गल्लत करता कामा नये.
काय ग्रहण करायचे, काय सोडून
काय ग्रहण करायचे, काय सोडून द्यायचे हे ठरवतांना बुद्धीलाच ग्रहण लागले तर मग काही खरे नाही
नारायण
नारायण
याचा एक सांकेतिक अर्थ आहे पैसा
संन्याशी लोक रुपयाला थोरला नारायण व पैशास धाकटा नारायण म्हणतात.
दाते शब्दकोश
नगद नारायण असाही अजून
नगद नारायण असाही अजून elaborate शब्द आहे. तोही रोकड, पैसा म्हणून वापरतात. नवकोट नारायण असाही शब्द आहे.
नारायण म्हणजे पैसा हा अर्थ कसा रुढ झाला असावा याची उत्सुकता वाटते.
लक्ष्मी म्हणजे संपत्ती. पैसा
लक्ष्मी म्हणजे संपत्ती. पैसा पुल्लिंगी म्हणून नारायण असेल.
यास्मिन शेख यांनी वयाच्या
यास्मिन शेख यांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केल्याच्या निमित्ताने भानू काळे यांनी लिहिलेला लेख.
https://www.weeklysadhana.in/view_article/bhanu-kale-on-yasmin-shaikh
सुरुवातीला सुप्रसिद्ध ज्यूंचा 'ज्यू' म्हणून केलेला उल्लेख मला जरा विचित्र/अकारण वाटला. पण लेख छानच आहे.
*पैसा पुल्लिंगी म्हणून नारायण
*पैसा पुल्लिंगी म्हणून नारायण
>>> चांगला मुद्दा.
लेख वाचला. मलाही आत्ता आत्ता
लेख वाचला. मलाही आत्ता आत्ता पर्यंत यास्मिन शेख माहिती नव्हत्या.
छान लिहिले आहे.
वैयायोगिनी म्हणजे काय?
वावे, लेखाच्या दुव्याबद्दल
वावे, लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.
छान लेख, मलाही सुरुवातीचा ज्यूचां परिच्छेद अकारण वाटला.
वैयायोगिनी म्हणजे काय?>>>>>व्याकरण तपस्विनी?
व्याकरणकारांना (पाणिनीसारख्या
व्याकरण तपस्विनी- हो, मलापण तसंच वाटलं.
व्याकरणकारांना (पाणिनीसारख्या) वैयाकरणी म्हणतात असं वाटतंय. व्याकरणाचा आयुष्यभर अभ्यास करणाऱ्या, अशा अर्थाने वैयायोगिनी हा शब्द वापरला असेल.
वैयायोगिनी >> ऋतुराज आणि वावे
वैयायोगिनी >> ऋतुराज आणि वावे यांना अनुमोदन
+1वैयाकरण हा योग्य शब्द.
+1
वैयाकरण हा योग्य शब्द.
वैयाकरणी-णीक-पु. (चुकीनें)
दाते शब्दकोश
वैयायोगिनी ? छान नवीन शब्द.
वैयायोगिनी ? नवीन शब्द.
व्याकरणकोविद हा पण चालला असता.
वैयाकरण शब्द पहिल्यांदाच
वैयाकरण शब्द पहिल्यांदाच ऐकतेय. मजेशीर आहे.
व्याकरण हा शब्द 'वैयाकरण' चा अपभ्रंश आहे असं दिसतंय.
बापरे..! व्याकरण या शब्दाचाच
बापरे..! व्याकरण या शब्दाचाच पहिल्यांदा अपभ्रंश झाला....तर बाकीचे शब्द किस झाड की पत्ती!
तो अपभ्रंश नसावा. प्रथमपदाची
तो अपभ्रंश नसावा. प्रथमपदाची वृद्धी झाली आहे. वि+ आ+ कृ असा मूळ धातू आहे. व्याकरणाशी संबंधित अशा अर्थाने वैयाकरणिक असं असावं. इ चा ऐ होतो. सिद्धांत - सैद्धांतिक, विचार - वैचारिक तसं.
गयानातील पाऊस थांबेपर्यंत
गयानातील पाऊस थांबेपर्यंत इथे एक पावसाळी शब्द पाहू
बरसाती
शब्दप्रवास : फारसी >> हिंदी >> मराठी
अर्थभिन्नता पहा :
१. पावसाळ्यातला घोड्यांचा एक रोग
२. पावसाळ्यात ( चिलटे व माशांचा त्रास कमी होण्यासाठी) घोड्यांच्या डोळ्यांवर ज्या चामड्याच्या पट्ट्या बसवलेल्या असतात त्याचा पडदा
(मोल्सवर्थ शब्दकोश)
* हिन्दीतले अर्थ :
१. रेनकोट
२. बंगल्याच्या गच्चीवर बांधलेली नोकरांसाठीची खोली
एक वाचनीय लेख. नसेल वाचला
एक वाचनीय लेख. नसेल वाचला असेल तर अवश्य वाचावा,
https://www.bbc.com/marathi/india-56220672
लेख वाचला. आभार !
लेख वाचला. आभार !
एक जिज्ञासा :
एक जिज्ञासा :
औटघटकातील “औट” हे काही कालमापनाचे परिमाण आहे का ?
घटका सोडून अन्यत्र वापरलेला दिसत नाही.
औट म्हणजे साडे तीन का?
औट म्हणजे साडे तीन का?
औटकी चा पाढा असायचा
होय,
होय,
औट / आउटके = साडेतीन
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
>>>> औटकीं / कें = साडेतीनचे पाढे
एक वायफळ शंका
एक वायफळ शंका
घटका = २४ मिनिटांचा काळ
साडेतीन घटका = ३.५ X २४ = ८४ मिनिटे.
असा शब्दशः अर्थ असावा.
ही पौराणिक कथा आहे :
श्रीयाळशेठच्या या कामाची माहिती बेदरच्या राजाला कळाली.त्यांनी श्रीयाळशेठला बोलावुन घेतले आणि त्याचा कामाचे कौतुक केले. त्याबद्दल बेदरच्या राजाने त्याना काय हवे असे सांगितले . श्रीयाळशेठ त्यांना तुमचे तख्यतावर साडेतीन तास ( ??) * बसण्याचे मागणी केली. त्यानुसार राजाने आपले तख्य सोडले .तेव्हा श्रीयाळ शेठ यांनी त्यावेळी दुरावस्थेत असलेल्या सर्व धर्माच्या मंदिर,मस्जिद यांना राजाच्या खजिन्यातुन देणग्या,इनामे दिली.राजाची औट घटकेची मुदत संपताच त्यांनी बेदर राजाचे तख्त खाली केले .
https://www.uttar.co/question/5d4fc67b622304a9024c805b
( वरील उताऱ्यातील अशुद्धलेखन मूळ उताऱ्यानुसार)
* इथे 'घटका' हवे
Pages