जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.
या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?
या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.
(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).
धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.
हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.
2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.
या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :
धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)
<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)
धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.
ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.
सर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)
मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.
• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.
• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड
साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.
• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे
• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे
• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर
• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर
• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे
हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.
वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.
कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.
२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.
हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.
२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.
मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास
स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.
यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.
स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.
• शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.
याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.
शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.
२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.
मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.
अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.
कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.
केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)
शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.
वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
धोका कमी करणारे घटक
• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.
• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे
• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).
• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली
• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..
बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :
ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.
प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.
गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….
वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597
तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.
तमाम स्त्री वाचकांनो,
गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !
बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...
2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/
3. Lancet. 2002;360(9328):187-195.
अमा, बरे होण्यास शुभेच्छा!
अमा, बरे होण्यास शुभेच्छा!
(No subject)
अरे वा, छान आहे.
अरे वा,
तुमचा फोटो का ?
Hi Kumar yes
Hi Kumar yes
Weight dropped to 55 kg due
Weight dropped to 55 kg due to abimaciclib side effects. But creatinine is in limits and haemoglobin went up by one point . Still low.
(No subject)
creatinine is in limits and
creatinine is in limits and haemoglobin went up by one point .
>>> हे वाचून बरे वाटले .
आमच्या शुभेच्छा आहेतच . . .
वा अमा मस्त फोटो
वा अमा मस्त फोटो
अमा मस्त फोटो.....+१.
अमा मस्त फोटो.....+१.
मस्त दिसताय अमा!! सर्व
मस्त दिसताय अमा!! सर्व व्हॅल्यू व्यवस्थित आहेत हे उत्तम.
Ama you're looking nice!!
Ama you're looking nice!!
अरे वाह अमा
अरे वाह अमा
प्रसन्न वाटले , छान फ्रेश दिसत आहात
अमा मस्त दिसत आहात. एन्जॉय.
अमा मस्त दिसत आहात. एन्जॉय.
अमा छान वाटले तुम्हाला पाहून
अमा छान वाटले तुम्हाला पाहून ! एकदम प्रसन्न फोटो
छान दिसताय अमा!
छान दिसताय अमा!
अमा, खूप छान दिसत आहात. मस्त
अमा, खूप छान दिसत आहात. मस्त वाटलं बघून
योगायोग कसा असतो बघा. काल
योगायोग कसा असतो बघा. काल सकाळीच मी एका नैसर्गिक कर्करोगविरोधी घटकाबद्दल वाचन केले होते. त्या घटकाचा स्तनांच्या कर्करोगविरोधात पण संबंध आहे. मग एक-दोन दिवसात लिहू त्यावर, असे मनात म्हटले होते. ध्यानीमनी नसताना अचानक काल दुपारी अमा यांच्या फोटोयुक्त प्रतिसादामुळे धागा वर आला !
आता लिहितोच . . .
Mangiferin
Mangiferin
आंबा आणि अन्य काही वनस्पतींमध्ये असणारा हा एक बहुगुणी घटक आहे. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याचे अनेक आरोग्यपूरक आणि रोगप्रतिबंधक गुणधर्म आहेत :
फुफ्फुसे, स्तन, मोठे आतडे इत्यादींच्या संदर्भात हे रसायन कर्करोगविरोधी गुणधर्म दाखवते असे प्राथमिक संशोधनांमध्ये (preclinical) आढळले आहे.
( https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5414237/).
भविष्यात या रसायनाचा औषधोपचारासाठी काही उपयोग करता येईल का, यावर गेली काही वर्षे संशोधन जोरात आहे. त्या संदर्भात काही औषधशास्त्रीय अडथळे पार करावे लागतील. तसे प्रयत्न चालू आहेत.
(https://link.springer.com/article/10.1007/s43450-022-00297-z).
अमा supercool..
अमा supercool..
एकदम सुरेख
Vibing हा मस्त
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
सर्वांचे मनापासून धन्यवाद. अवघ ड साइड इफेक्ट असलेली पण परिणामकारक असलेले औ षध, बरोबरीने मधुमेह हाय ब्लड प्रेश र व एनर्जी काय् म कमी असल्याने होणा री दमणूक - हार्ट डिसीज होइल का हे टेन्शन - साठीला पोहोच लेले वय, मानसिक मध्ये एकटे पणा व डिप्रेशन हे सर्व असतानाही मी ह्या रोगाचा सामना करून नॉर्मल क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करु शकत आहे तर तरुण व मध्यम वयातील महिला नक्कीच ह्या त्रासातून लवकर व यशस्वीरीत्या सुटू शकतात . सर्व प्रतिसादक महिलानी स्वतः व बापे लोकांनी त्यांच्या जीवनातील स्त्रियांना मॅमोग्राफी करवून घ्या. काही नसले तर एक हेल्दी रेकॉर्ड जवळ राहते, असले तर लगेच इलाज चालू करू शकतो. जितके लवकर निदान तितके भले हा मंत्र कायम लक्षात असू द्या.
. मी जी वनातील दिशा व उर्जा नेहमी साधे देमार पट सिनेमे व गाण्यातूनच घेतलेली आहे त्यामुळे मॅ ड मॅक्स फ्युरी रोड एकदम भारी वाट लेला त्यातील फ्युरिओ साची बॅक स्टोरी असलेला पिक्चर बघायला गेले होते. लेकीला कामामुळे व आवड म्हणूनही( हे जेनेटिक असावे. तिचे बाबा पुण्यात फरग्युसनला असताना सेकंड ईअर मध्ये मित्र मैत्री णींबरोबर सलग ७१ दिवस रोज पुण्यात एक मॅटिनी शो बघितलेले नग होते. मी टिपिकल ममव आईबाबाम्बरोबर ते परवानगी देतील तेव्हा बघणार!!!) जवळ जवळ रोज पिक्चर बघणे नाहीतर स्क्रीनिन्ग ला जाणे करावे लागते,तिने मला घरी बसून आराम करताना हाकलवुन बाहेर काढायचा चंग बांधला आहे. त्या तील हा पिक्चर बघणे हा एक भाग होता.
बाहेर गेले की ती व्यवस्थित काळजी घेते मात्र. खाउ नाचोज - पॉपकॉर्न हातात आणून देणे, पाणी थेटरात थंडी वाजली तर माझ्यासाठी स्वेट र ब्यागेत ठेवणे अश्या गोड बाबी करत असते. पिक्चर नंतर साडेबारा दुपारचे झालेले. मी उन्हात शक्यतो बाहेर पडत नाही पण अगदी शेजारीच नायकी स्टोअर आहे तिथून भरपूर खरेदी केली बाहेर आलो तर आटो नाही. सर्व ठाण्याला जा णार्या. मग मी पाण्याची बाटली घेउन बसले चक्क . काही वेळाने मिळाली आटो. शक्ती पात होउन व डिहायड्रेशन ने फार काळ उभे राहता येत नाही. घरी आल्यावर अर्ध्या तासात नॉर्मल ला आले.
हे इतक्यासाठी लिहिले की पेशंट ला एक केअर गिव्हर लागतो व डिटेक्ट झाल्यास ही ड्युटी घेणारे माणूस जबाबदार पाहिजे व आणी बाणीत काय करावे हे माहीत असलेले पाहिजे. पेशंटच्या अगदी स्पेसिफिक काही विचित्र गरजा असू शकतात. उदा पाणी जवळ असलेच पाहिजे. उलटी झाली तर म्हणून डि स्पोजेबल बॅगा बरोब्र हव्यात इत्यादि.
आरोग्य पूर्ण जीवनासाठी शुभेच्छा.
चांगला माहितीपूर्ण लेख.
चांगला माहितीपूर्ण लेख.
अमा तुमच्यात खूप धैर्य आहे.
अमा तुमच्यात खूप धैर्य आहे. खू - प!! लवकर रिकव्हर व्हा.
अमा, फ्रेश दिसताय ! सगळी
अमा, फ्रेश दिसताय ! सगळी काळजी घेताय हे उत्तम! अश्याच एनर्जेटिक राहण्यासाठी शुभेच्छा!
मला उच्च रक्तदाबाचा त्रास
मला उच्च रक्तदाबाचा त्रास बरीच वर्शे आहे. रोज गोळी घेतेच. त्यामुळे कधी इमर्जन्सी लेव्हल त्रास झालेला नाही. आता नोकरी सोडून घरी बसल्याने स्ट्रेस कमीत कमी आहे. त्यामुळे बीपी जरा बॅक बर्नर वर असते. पण सध्या एक नवीन त्रास अधून मधून झाला त्याचे उत्तर आज सापडले.
मला कधी पुर्वी न अनुभवलेली लक्षणे झाली.
पडलेले असतो ते उठून एकदम उभे राहिले की व चालायला लागले की चक्कर येणे.
छातीत- हृदयात फुटल्या फुटल्या सारखे फीलिन्ग येणे. अस्वस्थ वाट नॅ.
९९.८ परेन्त ताप
व सर्वात महत्वाचे म्हणजे कसे ही बसले, उभे राहिले, फेर्या मारल्या, घरातील काम केले, झोपले( चार जागा आहेत. लिविह्ग रूम मध्ये
आरामाचा सोफा/ गादी टाकलेली आहे / दोन बेडरूम मधील आराम दायक बेडस, हव्या तेव ढ्या उश्या. पण अस्वस्थता कमी होत नाही. दोन मिनिटात उठावेसे वाटते. जिवाची घालमेल होते किंवा कलकलणे होते. हे निदान अर्धा तास तरी.
पहिले मला हे औशधाचे साइड इफेक्ट वाटलेले त्या गोळ्या बंद केल्या तरी हे मधू न मधुन होतेच. आजही असेच झाले. शेव टी अगदी गंमत म्हणून
टेबलाशी खुरची वर बसुन( असे बसल्याने जरा आराम वाटतो) बीपी चेक केले तर लो झालेले . १०५ ६२!!! मग गुगल केले. व घरी बीपी लो झाल्यास लिंबू सरबत प्यावे, भरपूर पाणी प्यावे, पाय हृदया पेक्षा वर जागेत ठेवुन पडावे म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा होतो. हे वाचले.
तसे अर्धा तास पड ल्या वर बीपी चेक केले तर ११९- ७५ झालेले. व घालमेल कमी झालेली. कलकलणे थांबले.
ही घालमेल व कलक्लणे म्हणजे साधारण एडी एचडी वाले मूल कसे हे कर लगेच ते कर म्ग तिसरे च काहीतरी कर असे भिरभिरत राहते तसे होते. फारच वाइट परिस्थिती. मला वाट ते अबिमा सिक लीब गोळीचा हाही एक साइड इफेक्ट आहे - लो बीपी.
सोमवारी अर्जंट मध्ये एक पेट स्कॅन करा यचा असे ऑनको नी सांगितल्याने ६.४५ ची अपॉइट मेंट घेत्ली आहे. त्यात पुर्ण दिवस जाईल व थकवा ही फार येतो. पण नाइलाज आहे. सी ए १५-३ टेस्ट रिझल्ट मध्ये फार वर गेले आहे.
बीपी चा धागा सापडला नाही
बीपी चा धागा सापडला नाही म्हणून इथेच लिहिले आहे.
अमा, काळजी घ्या.मला एकदा
अमा, काळजी घ्या.मला एकदा लहानपणी दात काढल्यावर हे झालं होतं.भयंकर विचित्र फिलिंग.
बहुधा जवळ लेज च्या प्लेन चिप्स वगैरे ठेवून फायदा होईल.योग्य काळजी घेत असालच.
पडलेले असतो ते उठून एकदम उभे
पडलेले असतो ते उठून एकदम उभे राहिले की व चालायला लागले की चक्कर येणे.>>> हे Orthostatic Hypotension चे लक्षण वाटते.
तुम्हाला आता कदाचित कमी डोस लागेल बीपीच्या गोळीचा किंवा बदलावीही लागेल.
बीपी गोळी बंद केली की लगेच फरक पडत नाही काही दिवस जावे लागतात. म्हणजे आज पासून गोळी बंद केली तर पुढे दोन तीन दिवस (किंवा जास्त?) असा उभे राहिले की चक्कर येणे त्रास होऊ शकतो orthostatic hypotension मुळे.
डॉकना भेटा, सांगा हा त्रास सगळा वर संगीतला तसा.
Ho and I had coffee in the
Ho and I had coffee in the morning after weeks. I read that coffee lowers bp.
अमा, काळजी घ्या.
अमा, काळजी घ्या.
शक्य असल्यास तुमच्या सोबतीला कोणीतरी असावे असे वाटते
शुभेच्छा.!
अमा, काळजी घ्या.
अमा, काळजी घ्या.
शक्य असल्यास तुमच्या सोबतीला कोणीतरी असावे असे वाटते>>]> मलाही
Pages