भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
इजिट्ट्रु?
इजिट्ट्रु?
हे त्यांचंच आहे.
हे त्यांचेच आहे.
हो, पण त्यांचं मत नाही.
हो, ते त्यांचं मत नाही. सोन्या बागलाणकर नावाच्या पात्राच्या तोंडी ते वाक्य आहे. सखाराम गटणे जसं त्यांचं पाखरांची शाळा मधलं वाक्य आऊट ऑफ काँटेक्स्ट वापरतो, तसं हे कुणीतरी वापरलं आहे.
वरती ते शून्य बद्दल वाचून एक शून्य मी सारखा भास होतो
मला हे अगदी वाचण्यासारखं
मला हे अगदी वाचल्यासारखं वाटलं होतं. 'एक बेपत्ता देश' लेखात.
बरोबरच होतं की अस्मिता, का
बरोबरच होतं की अस्मिता, का काढलं? मी फक्त अधिकची माहिती पुरवली. वाक्य त्यांचंच आहे, म्हणजे त्यांच्याच लेखणीतून आलं आहे. मी जरा नीट हे लिहायला पाहिजे होतं.
छ्या, हे असं होतं आणि मग मी बोलणी खातो.
बोलणी कुठं, किती विश्वास आहे
बोलणी कुठं, किती विश्वास आहे माझा बघ.
(No subject)
धन्यवाद दोघांनाही.
धन्यवाद दोघांनाही.
(No subject)
अगदी! मी हेच टाकणार होतो या
अगदी! मी हेच टाकणार होतो या धाग्यावर
थँक्यू वावे. ही कविता त्या
थँक्यू वावे. ही कविता त्या कॉलेजचे गेट (पुलंच्या नावे गेली काही वर्षे फिरणारी) कवितेपेक्षा पुलंच्या शैलीपासून लांब आहे. कायच्या काय!
कायच्या काय आहे! किमान शैली
कायच्या काय आहे! किमान शैली तरी कॉपी करायची!
ही वपुंची म्हणून जास्त चांगली
ही वपुंची म्हणून जास्त चांगली खपली असती. ते नाती जपणं आणि हळहळणं, 'परत ये' वगैरे म्हणणं त्यांचं 'इंटिमेट' डिपार्टमेंट आहे. पुलं एवढे गळ्यात पडायचे नाहीत.
अस्मिता
अस्मिता
कल्पना छान आहे. आपली न
कल्पना छान आहे. आपली न खपणारी कन्सेप्ट एखाद्या महान व्यक्तिमत्वाचा फोटो टाकून ढकलून द्यायची.
: हाहा: खरंच, किमान शैली तरी
खरंच, किमान शैली तरी कॉपी करायची!
आणि, पु लं च्या कविता?
मी तर एकही नाही वाचलेली.
पण खरंच, असतील तर इथे संदर्भ द्या कुणीतरी.
मला ही कविता ( त्यातल्या त्यात ! ) मंगेश पाडगावकरी वाटली!
छल्ला, "काहीच्या काही कविता"
छल्ला, "काहीच्या काही कविता" आहेत की पुलंच्या. बाकी ओरिजिनल माहीत नाहीत, पण रविंद्रनाथांच्या काही कवितांची पुलंनी केलेली काव्यभाषांतरं आहेत. पोरवय पुस्तकात काही सापडतील.
https://www.ekmarathi.laqsh
https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/kavita-pu-la-deshpande.html
थँक्यू आचार्य.
थँक्यू आचार्य.
"इथे माझा जीव टांगल्यासारखा
"इथे माझा जीव टांगल्यासारखा झाला आहे" आणि वडाच्या झाडाला बांधलेले "बंडल" हे दोन्ही महान आहेत
याशिवाय आणखी कविताही आहेत पुलंच्या. एका कवितेतील एक ओळ "मर्सिडीजचा तारा म्हणतो बळवंतराव होरा चुकला" यातील शब्दरचनेमुळे लक्षात आहे. तसेच वार्यावरची वरात मधल्या कलाकारांवरही त्यांनी खिल्ली उडवणार्या कविता रचल्या आहेत. कोणत्या पुस्तकांत ते लक्षात नाही.
बहुधा "खिल्ली" मधे असलेले "शेवटचे कविसंमेलन" हे तर सुपर धमाल आहे. "जंगलात मंगल करिती, आमचे प्रमुख आतिथी" वगैरे.
या फॉर्वर्डवरून प्रेरणा घेऊन
या फॉर्वर्डवरून प्रेरणा घेऊन खालील संदेश मी व्हायरल करणार आहे.
"
हर्पा,
रविंद्रनाथांच्या काही कवितांची पुलंनी केलेली काव्यभाषांतरं आहेत.
>>>>>>>>>
पोरवय शिवाय 'मुक्काम शांतिनिकेतन' मधेही पुलंनी केलेल्या टागोरांच्या अनुवादित कविता आहेत. ज्यांचा अनुवाद फारच सुरेख जमलाय आणि एक लय-नाद आहे सर्व कवितांना.
तुम्ही निमित्त दिलंत.
रिक्षा -https://www.maayboli.com/node/81737
थँक्यू अस्मिता. बघतो.
थँक्यू अस्मिता. बघतो. मु पो शां पुस्तक वाचायचं बाकी आहे.
शिवाय बटाट्याच्या चाळीतील आख्खी सांगीतिका आहे. तशी ती विडंबनात्मक असली तरी... एकेक शब्द को उधर ऐसा डाल्या...
आचार्य >>
मुपो शां नाही वाचलेलं. पण
मुपो शां नाही वाचलेलं. पण वंगचित्रे मात्र धमाल पुस्तक आहे. इतर अनेक विनोदी पुस्तकांपेक्षा यातल्या विनोदाची जातकुळी तेव्हा तरी फारच आवडलेली आठवतं.
बटाट्याच्या चाळीतील संगीतक हे नवे.. कविता म्हणून चालेल कसा? नळ संग्राम पासून रामा जा चल निघ पुढे ते प्रियसर प्रियसर प्रिय सर - ला पित्रे .. ते पिया गये परदेस...आणि ते विविध गायन शैलीत करणे हा आणखी एक महान प्रकार आहे.
हो
हो
आचार्य
आचार्य
आचार्य
आचार्य
आचार्य
आचार्य
ओ ओ ओ
ओ
ओ
ओ
आचार्य
आचार्य
संगितिका, वंगचित्रे वगैरे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
Pages