
तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,आता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे
तो नवाब ताज मुशायरा चालु
तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट ! >>> परफेक्ट!
महा पकाऊ वाटली हिरामंडी.
'मोहन रंग दो लाल' सारखा सेम टु सेम नाच, पाकीजाची आठवण करून देणारे सेटस/शॉटस अणि केस पाण्यात सोडून झोपलेला सीन, GoT ची आठवण येईल असा तो बग्गीतला मको आणि कोणाएका नबाबाचा सीन, कैच्याकै तवायफ centric स्टोरी.... काहीच झेपलं नाही.
मी केवळ पहिलाच एपिसोड पाहिला. तोच इतका एपिक होता की बाकीचे सोडले बघायचे.
मी २५-३० मिनिटे पाहिली. मनिषा
मी २५-३० मिनिटे पाहिली. मनिषा कोईरालाचा आवाज इतका वाईट आहे की बास. जरब दाखवण्यासाठी मंद्रसप्तकात आवाज लावलाय तिने पण तिच्या घशातुन आवाजच धड फुटत नाही. आवाजाला का ही ही वजन नाही. (आठवा आपली रेखा कशी बोलते, कमालीचे वजन आहे आवाजात). कोईरालाच्या घशातुन खोकला झाल्यासारखी घरघर ऐकु येते. नंतर अभिनय कसा केलाय माहिती नाही.
तिची मुलगी झालेली ती बाई इतकी बंडल आहे….. इ त की बंडल आहे की काय सांगावे! त्या लायब्ररीत तिला तो चौकोनी स्टायलीश केसांचा ताज दुसर्यांदा भेटतो व ‘वॅ वॅ‘ करत पुन्हा तिच्या मागे लागतो तेव्हा तिचे लाडीक विभ्रम पाहुन मी हादरले व तत्काळ टीव्ही बंद केला. तेच नंबर एक कारण आहे मी मालिका पहाणे बंद करायचे.
आणि कोईरालाचा आवाज हे दुसरे कारण , कारण त्या दोघींना जास्त काम आहे हे कळलं व ते सहन करायची ताकद अंगात नव्हती.
मला शंका आहे, बन्सालीने डायरेक्शन केलेच नसावे, सर्वांनी स्वतःच स्वतःला डायरेक्ट केले आहे.
स्पॉयलर अॅलर्ट :
स्पॉयलर अॅलर्ट :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो तिचा भाऊच निघणार का?
मामीस्पॉयलर अॅलर्ट
मामी
स्पॉयलर अॅलर्ट
….
.
.
.
नाही
अच्छा. धन्यवाद.
अच्छा. धन्यवाद.
दीपांजली बरं झालं पिसं
दीपांजली बरं झालं पिसं काढायला धागा काढलास.
ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
>>>> हो. व्हायचं असं. ‘मर्द बनना सिखाने के लिए’ टीनेजर्सना कॉलगर्लकडे जाणे/पाठवणे हे वरच्या वर्गात व्हायचं.
कुकातकुका पण तरीही…
त्यांचे कपडेही फार एलिगंट व क्लासी दाखवले आहेत. वरून कलर कोऑर्डिनेटेड. अरे लग्नाचं फंक्शन नाहीये ते, आयव्हरी, बेज, क्रीमचा वापर करायला. त्यावेळी हे इंग्लिश कलर्स होते का वापरात? त्यांनी दिलखेचक दिसणं अपेक्षित आहे. पाकिजातील मीनाकुमारी पहा. ती नृत्याला उभी राहते तेव्हा तिचे लाल, गुलाबी शेडस् वापरते. आणि इतरवेळी बरेचदा पांढरी, लाईट शेड.
हीरामंडी नावावरून आचार्य अत्र्यांची फाळणीच्या पार्श्वभूमीवरची एक कथा आठवली, ज्यात इतर रेफ्युजींबरोबर एक लाहोरची एक प्रसिद्ध गणिकाही असते आणि नेहमीप्रमाणे त्या धामधुमीत तिला नाक मुरडणारे लोकही असतात. दूर्दैवाने ती तुकडी हल्लेखोरांच्या हाती सापडते. व शेवटी ती गणिका नाईलाजाने हल्लेखोरांबरोबर जाऊन इतरांना वाचवते अशी काहीतरी. कुणी वाचलेय का ती कथा?
बाय द वे, आजिओने ‘हीरामंडी’
बाय द वे, आजिओने ‘हीरामंडी’ कलेक्शन आणले आहे. नशिब ऑनलाईन शॉप आहे. दुकानात जाऊन ‘जरा हीरामंडी स्टाईलचे कपडे दाखवा’ किंवा ‘मी आज हीरामंडी स्टाईल लेहेंगा घेणाराय’ किती विचीत्र वाटलं असतं.
नावावरूनच बघायची इच्च्छा होत
नावावरूनच बघायची इच्च्छा होत नाहिये.
त्या लायब्ररीत तिला तो चौकोनी स्टायलीश केसांचा ताज दुसर्यांदा भेटतो>>>> श्या १ पिक टाका ना प्लि़ज निदान कॅरॅक्टर नाव सांगा, खूप उत्सुकता लागून राहिली आहे
मी पण हीरामंडी बघायला सुरुवात
मी पण हीरामंडी बघायला सुरुवात केली.जिकडे तिकडे भन्सालीचे ड्रीम सीन्स अन फ्रेम्स आहेत. पण स्टोरी नीट फुलवता आलेली नाही. बरेच सीन बघून हहपुवा होते आहे. ते अचानक मुलगी दिसली की डायरेक्ट अंगचटीला जाणे अन तिने लगेच लाजणे हे मलाही झेपले नाही!
हे कुठलं पॅरलल युनिवर्स ?असे काहीतरी फीलिंग आलं!
ती नवाब घरातली आज्जी नातवाला ऑक्सफर्ड हून शिकून आलास ते ठीके पण आता तहजीब शिकायला हिरामंडित जायला सुरुवात कर म्हणते ते एक फनी आहेच पण नंतर घरी पार्टीला मलिकाजान आलेली असते तेव्हा नातवाची ओळख करून देताना एखाद्या तोलामोलाच्या थोरामोठ्यांचे स्थळ आल्याबद्दल सांगावं तसे म्हणते "ही मलिका जान बर का. फार मोठी तवायफ आहे! हिच्याच मुलीच्या नथ उतरवण्याचे (!) आमंत्रण आहे तुला"
मी पण हीरामंडी बघायला सुरुवात
. डबल.
मालिकाजान महलातल्या
मालिकाजान महलातल्या प्रत्येकाशी अ ग दी प्रत्येकाशी खुनशी वागते. दास दासी त्यांच्या मुली हरेक तवाएफ गाडीवान. प्रत्येकाशी. तिला पूरे लाहोर मे एकपण विश्वासू साथीदार नाही. तर हिला मारायला सगळ्यांना मिळून आता १० का काय एपिसोड आहेत ते का लागावे? इतकी अन पोलिटिकल अन पढ कोण असेल!!
फरदिनाचा नथ उतराई ( हे फार फनी आहे. नथ उतराई, पेहेला मुजरा, शेवटचा मुजरा, आखरी > पेहेलां इन तेहेजीब इंपॉर्टनस स्केल इ. इ. ज्ञानात भर) सेरीमनी खारिश करायचा म्हणून आपल्याकडची एकमेव नाकीडोळी नीटस, सुरेल गाणारी, हुशार .. थोडक्यात तेहेजिब मे फर्स्ट..
तवाएफ म्हणजे आदिती राव हैदरी. तर हीचा आखरी मुजरा सेम टाईम अल्मोस्ट सेम प्लेस. अरे!! एकदम हेमाशेपो!!
परत तवाएफ उसुलला त्या 'ध्यास अपने पन्ने बदल सकता है लेकीन राजपूत अपने उसुल नही बदलते' च्या वरताण पक्क्या असणार यात शंका नाही. आणि त्या इंकेलाब झिंदाबाद दाढीला सुद्धा हिचा आखरी मुजरा झाल्याचं वाईट वाटतं इतके तवाएफ नुआन्सेस वेल नोन आहेत!
एकूण यात तवायफ बाया एक से एक
एकूण यात तवायफ बाया एक से एक ग्लॅमरस, श्रीमंत, पावरफुल, अन समाजात इतक्या सन्मानित आणि एलिट जीवन जगत आहेत की प्रत्येक सामान्य घरातल्या मुलींना तवायफ होण्याची स्वप्ने पडावीत :डोक्याला हात:
अगदी! ग्लॅमर दाखवायचं म्हणजे
मला गॉट इन्स्पायर्ड वाटलं खूप काही. प्रत्येक एपिसोडला एक तरी लीड ढगात गेलाच पाहिजे. फक्त इथे मात्र अस्सल देसी उसूल पाळून, मेलेल्याला टाईम जंप करुन कुणा रईस नबाबाला बेचलेलं आता ..कितनी मॉ पे गई है ना... डायलॉग मारुन मुलीच्या रुपात पुनर्जन्म मिळतो. मला भन्साळी स्टाईल 'रेड वेडिंग' बघायची अनवार इच्छा आहे. बघू पूर्ण होत्येय का ते.
हीरामंडी नावावरून आचार्य
हीरामंडी नावावरून आचार्य अत्र्यांची फाळणीच्या पार्श्वभूमीवरची एक कथा आठवली, ज्यात इतर रेफ्युजींबरोबर एक लाहोरची एक प्रसिद्ध गणिकाही असते आणि नेहमीप्रमाणे त्या धामधुमीत तिला नाक मुरडणारे लोकही असतात. दूर्दैवाने ती तुकडी हल्लेखोरांच्या हाती सापडते. व शेवटी ती गणिका नाईलाजाने हल्लेखोरांबरोबर जाऊन इतरांना वाचवते अशी काहीतरी. कुणी वाचलेय का ती कथा?>>
ही कथा माहिती नाही पण Guy de Maupassant ची Boule de Suif साधारण अशाच धर्तीवर आहे.
त्यांचे कपडेही फार एलिगंट व
त्यांचे कपडेही फार एलिगंट व क्लासी दाखवले आहेत. वरून कलर कोऑर्डिनेटेड. अरे लग्नाचं फंक्शन नाहीये ते, आयव्हरी, बेज, क्रीमचा वापर करायला. त्यावेळी हे इंग्लिश कलर्स होते का वापरात? त्यांनी दिलखेचक दिसणं अपेक्षित आहे. पाकिजातील मीनाकुमारी पहा. ती नृत्याला उभी राहते तेव्हा तिचे लाल, गुलाबी शेडस् वापरते. आणि इतरवेळी बरेचदा पांढरी, लाईट शेड.>>
अगदी अगदी. तेव्हा असे इंग्लिश कलर्स वापरात नव्हते. तवायफचे कपडे भडक रंगाचे असायचे. ऐश्वर्याच्या उमराव जानमधेही असे पेस्टल इंग्लिश कलर्स वापरले आहेत. जुना उमराव जान, पाकिझा, रेखाचे सलामे इश्क मधले कपडे, मुमताजचा खिलौना मधील केशरी कुर्ता हे बघा जरा.
मी दोन एपिसोड्स पाहिले.
मी दोन एपिसोड्स पाहिले. भन्सालीकडून फार निराळी अपेक्षा नव्हतीच.
हिरावीण खरंच फारच मठ्ठ आहे! आणि तिला ‘प्रोफेशनल’ शायरा व्हायचंय म्हणे! म्हणजे काय ते अल्लालाच ठाऊक. तिची शायरी बेकार आहेच, पण ज्या कुठल्या फेमस शायरच्या मुशायऱ्याला लपून जाते, त्याचीही शायरी तितपतच होती.
किती voluntary suspension of disbelief demand करायचा त्याला काही लिमिट?!
तुम्हाला संवाद आठवतात हे
आशु२९,
पहाते फोटो मिळाला तर.
अमितव, कोणकोण मरतं?
तिची शायरी बेकार आहेच, पण
तिची शायरी बेकार आहेच, पण ज्या कुठल्या फेमस शायरच्या मुशायऱ्याला लपून जाते, त्याचीही शायरी तितपतच होती.
<<<<
टोटली टेम्पो छाप शायरी
भारीच डीजे, प्रतिसादही एकसे
भारीच डीजे, प्रतिसादही एकसे एक. मस्त पिसे काढताय.
>>> टेम्पो छाप शायरी हो
>>> टेम्पो छाप शायरी
हो
पहिला एपि अर्धाच बघू शकले.
पहिला एपि अर्धाच बघू शकले. तेच ते झुंबरं, गालिचे, ती बदबद जड काचेची ज्वेलरी, खोटी संध्याकाळ, कारंजी, खोटे सेट बघून नकोच वाटलं.
त्यात ती जड चेहेर्याची आणि जड आवाजाची मको अजूनच नको. तिची मेंदी इतकी कोरीव कशी त्या काळात? कोनाने काढल्यासारखी.
फरिदा जलालच गोड नॉर्मल वाटली जरा.
आलम संलीभंच्या बहिणीची मुलगी
आलम संलीभंच्या बहिणीची मुलगी आहे. शर्मीन सेहगल.
मीदेखील फरीदा जलाल किती गोड
मीदेखील फरीदा जलाल किती गोड दिसतेय असा विचार करत असतानाच तिनं तोंड उघडून ते तिचे दिव्य विचार सांडले...
पुर्वी गणिकांना दुय्यम समजत
पुर्वी गणिकांना दुय्यम समजत नसत. उलट नवरा गणिकांकडे जातो हेच अप्रूप असे.
आचार्य अत्रे ह्यांची आत्मचरित्र का कथा वाचलेली आठवत आहे. तपशील नीट आठवत नाहीत. पण त्यांच्या का त्यांच्या वडिलांच्या राखीव अश्या गणिका होत्या.
कथेचे नाव आठवत नाही आता, पण त्यांच्या घरातील स्त्रींविषयी वाईट वाटल्याचं आठवतं….
ब्रिटिशांच्या प्रेशरमुळे नवाब
गणिकांना दुय्यम समजत नसत. उलट नवरा गणिकांकडे जातो हेच अप्रूप असे.
<<<<<
यावरून आठवलं,
ब्रिटिशांच्या प्रेशरमुळे नवाब हिरामंडीत जायचे बन्द करतात त्यावेळच्या एका सीनमधे मनिषा कोईराला नवाब झुल्फीकरच्या बायकोकडे जाऊन नवर्याला आणि कम्युनिटी मधल्या इतर जवाबांना पुन्हा एकदा हिरामंडी मधे पाठवा अशी रिक्वेस्ट करायला जाते , तुम्ही सांगा म्हणजे ते ऐकतील असेही सांगते
सर्वांनी छान लिहिलंय परीक्षण.
सर्वांनी छान लिहिलंय परीक्षण.
एकंदर पाहिली नाही हिरामंडी तरी आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण होणार नाही.पाहिल्यास मनीष मल्होत्रा किंवा सब्यासाची पेस्टल ब्रायडल कलेक्शन फॅशन शो पहिल्या सारखे वाटेल.बरोबर का?
एकूण मिस्टर भंसाली हे
एकूण मिस्टर भंसाली हे "Colorfool" दिग्दर्शक आहेत असे मला वाटतय. कुणी प्रेक्षक कलर ब्लाइंड असेल तर त्याचे काय होईल?
मला लहानपणी ते 'आज रात को
मला लहानपणी ते 'आज रात को इसकी नथ उतारनी है' म्हणजे शब्दशः कोणीतरी जाऊन मुलीन्ची खरी खुरी नथ उतरवायला मदत करणे असे वाटायचे. कदाचित जुन्या काळी रात्री वीजेचे दिवे नसल्याने मुलींना स्वःताला नथ काढायला अडचण येत असावी असा समज मी करून घेतला होता..
बहुतेक लहानपणीच्या बाळबोध समजुती या नव्या धाग्याखाली टाकता येईल ही समजून
अजियो”नी त्यांच्या 'एथनिक
अजियो”नी त्यांच्या 'एथनिक कलेक्शन'मध्ये लाहोरच्या 'वेश्यांचा पोशाख' सादर केलाय आणि त्याला 'हिरामंडीपासून प्रेरित' असे म्हंटले आहे.
आता फेमिनिस्ट हे कूल गल्स एथनिक कलेक्शन या नावाने त्यांच्या वॉर्डरोब मध्ये ठेवतील आणि मिरवतील.
याला वेश्या म्हणा किंवा whore म्हणा किंवा सेक्स वर्कर म्हणा किंवा रंडी. पण हे निश्चित की ही जात सुसंस्कृत समाजाच्या अधोगतीचा परिणाम आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की कुठल्याही मुलीच्या किंवा स्त्रीच्या आयुष्याचा शाप असणारा पोशाख अशा पद्धतीने ग्लोरीफाय केला जातोय.
"गंगुबाई काठियावाडी" पासून "हीरा मंडी" पर्यंत या रांडांचे शापित जीवन ग्लॅमरच्या खोट्या वस्त्रात गुंडाळून दिले जातेय परंतु या शापित पोशाखाला आधुनिक संस्कृतीत आधुनिक फॅशन म्हटले जात आहे हे खेदजनक आहे.
लोकशाहीच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैर फायदा घेऊन वस्त्रहरण करण्याचे कसब बाजारातल्या दलालांनी आत्मसात केलेय. आपण बाजारावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि आपण या ड्रग माफिया वेश्यागृह बॉलीवूडला बदलू शकणार नाही त्यामुळे आपल्या निष्पाप मुलींना “हिरामंडी” चे वास्तव समजवायला पाहिजे.स्लट, वेश्या/सेक्स वर्कर/तवायफ यांचे जीवन आणि पोशाख हा एक शाप आहे, फॅशन डिझायनरने सादर केलेले एथनिक कलेक्शन नाही हे या रील्सवाल्या मुलींना कळेल की नाही काय माहीत?
तुम्ही लेखांचं दुकान उघडा ना!
तुम्ही लेखांचं दुकान उघडा ना! हिरामंडी स्पेशल तडका मारके!
Pages