भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही काय शिकणार? आमचा ओपिऑइड्सशीही संबंध येत नाही आणि सेमेटर्‍यांशीही आणि आपांशीही!
मी कश्यावरूनच काहीच शिकत नाही. याच्यावरून सलिभचं काही बघू नये हे पण मी शिकणार नाही.
आलम हातीमताई मधली दगडी मूर्ती असते ती एक मंत्र ॲक्टिव्ह झाला की वटवटते. तशी वाटली.
तवायफरूपी निष्काम कर्मयोगी वाटल्या.
अजून थोडा असता तर "काला पत्थर" मधे खपून गेले असते. काही कलाकार म्हणून, काही दगड म्हणून
>>>> Biggrin Biggrin

पण तिला रिव्हाइव्ह वगैरे करण्याचा जराही प्रयत्न न करता मल्लिकाजान लगेच डिक्लेअर करून टाकते. >>> ती काय टॅरंटिनो आहे येता जाता ओडी'ड लोकांना वाचवायला?

अमितव >>> अगदी अगदी. जुने स्पाय थ्रिलर्स बघून पण बरेच शिकता यायचे. आता थ्रिलर्समधले असले आडाखे सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाहीत.

र आ >> संलीभच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी पोस्ट आवडली. मला पण असेच काहीसे वाटते. म्हणजे HDDCS नंतर त्याची घसरण सुरु झाली.

आलम हातीमताई मधली दगडी मूर्ती असते ती एक मंत्र ॲक्टिव्ह झाला की वटवटते >>> Lol

सगळे लोक अंगावर मेक अप सारखा तो काळा रंग का बाळगून आहेत? अजून थोडा असता तर "काला पत्थर" मधे खपून गेले असते. काही कलाकार म्हणून, काही दगड म्हणून>>> देवा Lol

ईथली चर्चा वाचून शेवटी बघायला सुरुवात केलीच . ईतकी काही टाकाउ वाटली नाही .
सगळ्यात जास्त मकोच आवडली .
आलमपेक्शा सायमाच जास्त सुन्दर आणि expressive आहे . उगाच नाही मलिकाजान तिच्यावर वैतागत असते .
फा च्या ग्लोरिफिकेशन च्या मुद्द्याला अनुमोदन . सगळ्या चकचकाटात आणि उंच महालात दू:ख किंवा कारूण्य कुठेच प्रकर्शाने जाणवत नाही .
फक्त मध्ये मध्ये या मुली आपाप्सात बोलत असतात तेवढचं .

अजून थोडा असता तर "काला पत्थर" मधे खपून गेले असते. काही कलाकार म्हणून, काही दगड म्हणून
>>>> Lol
ती काय टॅरंटिनो आहे येता जाता ओडी'ड लोकांना वाचवायला? >>>> Lol
स्वाती आणि अमित >>> Lol
स्वस्ती, दुःख जाणवत नाही. +१
आचार्य, चांगली पोस्ट. वाचली.
-----------

आपल्याच भाचीने आलमच्या व्यक्तिरेखेचा दगड केलेला बघून संलिभ मनातल्या मनात "हम तेरे प्यार में सारा 'आलम' खो बैठे है" म्हणत असतील. Proud

अस्मिता, Lol
तू संलीभ ला अहो काहो म्हणतेस?
Happy

त्या उस्तादजी बद्दल कुणीच काही लिहिलं नाही?
किती छान काम केलेय त्याने!
कोण आहे तो कलाकार?

आणि पूर्ण चित्रीकरण सेपिया टोन मध्ये केलंय संलीभ ने!

शाईचे पेन होते तेव्हा? तो नबाब तिला पेन ने बोचाकरतो....!!!

उस्तादजीचं काम करणारा इंद्रेश मलिक. मस्त काम केलंय त्याने. फक्त तो मलिकाजान आणि फरिदानकडे दोघीम्कडेही काम करतो हे जरा मला ऑड वाटलं, त्या दोघींचं पटत नसताना.

आचार्य, संजय (मर्कट) लीला भंसाळीचा १०० गुण मिळवलेला सिनेमा म्हणून तुम्ही हम दिल दे चुके सनम चा उल्लेख केलाय, हे तितकंसं वावगं नसलं तरी खामोशी कदाचित कांकणभर सरस होता. पहिलाच मूव्ही असल्यामुळे तो कुठल्याही प्रतिमेत अडकला नव्हता. (खामोशी ते हीरामंडी असा मनीशा कोईरालाच्या करियरचा एक ग्राफ होईल).

१०० गुणांचा सिनेमा असं म्हणालो नाही. हम दिल दे चुके सनम हा जर बेस्ट असेल, आणि त्याची स्केल शंभर गुण धरली तर...
(खामोशी पाहिलेला नाही)

मुलाखतीत सुध्दा ती आलमजेब मख्खपणे शायरी म्हणून दाखवतीये.. वर अदिती रावला attitude दाखवतीये.. अदिती को लगता है सिर्फ वही सही है..

तिला ईतकं troll केलय लोकांनी की तिने तिचं फेसबुक अकाऊंटच बंद केलं म्हणे..

तवायफत्व>>> Rofl
तो साहेब मेल्या वर ती दुसर्याकडे वळत असावी, म्हणजे सत्व टिकून राहिल..

लेख आत्ता वाचला. परत शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
इतिहासाची हवी तशी क्रिएटिव्ह मोडतोड केली की काय होतं ते भावनिक न होता फार छान सांगितलं आहे.

She ate and left no crumbs, असं लिहून मग माग धी धी नाना नाना ना मग बेबोजान गजगामिनी आणि एक second झाले की वेगळीच गजगामिनी walking in her apartment hall. या अशा रील मला सतत येतायेत अनेको गज गामन्यांनी चालून चालून उच्छाद मांडलाय माझ्या recommendation feed वर Sad

लेख वाचला. (कॉमनली) तवायफ म्हणजे नक्की काय हे कन्फ्युजन झाले आता. त्या उत्तम गायिका, नर्तिका असत, पण सेक्शुअल फेवर्स जनरली इन्क्लुडेड असत की नाही ? माझा एन्टरटेनर + मिस्ट्रेस असा काहीसा समज होता हीरामंडी बघण्यापूर्वीसुद्धा.

लेख वाचला, आवडला.
सारांश - संलिभच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे त्याने ऐतिहासिक घटनांमधे योगदान देणाऱ्या, कलासक्त, उच्च अभिव्यक्ती आणि अभिरुची असलेल्या, नृत्यांगना ज्या कवियत्री होत्या. त्यात काहीजणींच्या ठुमऱ्या ग्रामोफोनवर रेकॉर्ड झाल्या होत्या. ज्या नुसत्या रूपगर्विता नसून उत्तम गायिकाही असायच्या. त्या गायन शिकलेल्या असायच्या, आजन्म शिकत रहायच्या. त्यांची निर्मिती ही कलेच्या ओढीतून झालेली असायची. त्यांना समाजात/ राजदरबारी प्रतिष्ठा असायची. कट्यार काळजात घुसली मधे जशी शंकर महादेवनला होती तशी?!

तवायफ ह्या कलाकार न रहाता फक्त शरिरविक्रय करणाऱ्या, साहेबासाठी व त्याच्याकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी वखवखलेल्या, एकमेकींच्या खूनाचे बेत रचणाऱ्या कुरघोडी करण्यासाठी आसुसलेल्या, जरदोजी भरतकाम केलेले महागडे कपडे घालणाऱ्या सर्वसाधारण वेश्या म्हणून उरल्या. नृत्यगायन शिकणं हे बिनमहत्त्वाचं असल्याने महाल सांभाळायची, कुत्सित बोलायची, नवाबांना मुठीत ठेवायची अहमहमिका लागलेली हीरामंडीत दाखवली गेली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संलिभने लेंहगा, महाल आणि शरिरविक्रय एवढ्यापुरतीच पात्र दाखवून तवायफ-इतिहासात ढवळाढवळ केली आहे.

-
मग मूळ तवायफ शरिरविक्रय करायच्या नाहीत का ? त्या फक्त रिलेशनशिप मधे असायच्या का ? म्हणजे नाचंगाणं राजासाठी आणि बॉयफ्रेंड मात्र प्रधान असं काही होतं का?
हे प्रश्न पडलेत.

>>> या उत्तम गायिका, नर्तिका असत, पण सेक्शुअल फेवर्स जनरली इन्क्लुडेड असत की नाही ?
त्यात प्रकार असत असं त्या लेखात म्हटलंय.
त्यांचं नृत्यगायन हे प्रामुख्याने श्रुंगारिक असणं अध्याहृतच असणार, पण सेक्शुअल देवाणघेवाणीची काय सिस्टीम होती काय माहीत.
माझं या विषयातलं ज्ञान सीरियल्स/सिनेमांतूनच आलं आहे, पण अगदी आत्ताच्या काळातही ही उतरंड असावी असं वाटतं. म्हणजे अगदी स्ट्रिपर्ससुद्धा अंगाला हात लावू देत नाहीत असं पाहिल्याचं आठवतं - कारण ते त्यांचं काम नाही. (कुठे पाहिलं ते आठवते आहे!)

मराठीत हमीदाबाईची कोठी हे नाटक आहे. त्यात हमीदाबाईचा एक पॅट्रन असतो. ती फक्त गाते - उपशास्त्रीय. पॅट्रन गेल्यावर आर्थिक मदत बंद होते. त्याच वेळी बोलपट, रेकॉर्ड्स आल्याने तवायफचं गाणं ऐकायला येणारे लोक कमी होतात आणि विपन्नावस्था येते. मग तिच्याकडे असलेली तरुण तवायफ चरितार्थासाठी देहविक्रय करू लागते.

उमराव जान, पाकीजा, मिर्जा गालिबच्या नायिका तवायफ आहेत.

नर्गिस, बेगम अख्तर यांच्या आया तवायफ होत्या.

नर्गिस, बेगम अख्तर यांच्या आया तवायफ होत्या.
>>> हे ऐकून आहे. नीतू सिंगची आईपण बहुतेक... नक्की माहीत नाही.

हमीदाबाईची कोठीबद्दल विजया मेहता यांचं कौतुक करताना नीना कुलकर्णीने रंगपंढरीमधे सांगितले होते. त्यापेक्षा जास्त माहिती नाही.

Pages