भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना आवडलेल्या माणसाबरोबर प्रेमाचे व अनुषंगाने येणारे सगळेच संबंध असायचे. एक्स्लुझिव्ह रिलेशनशिप म्हणा. सामाजिक बंधनांमुळे घरीच रहायला गेल्या नाहीत तरी नवरा-बायकोसारखी (त्याचा समाजमान्य संसार असला तरी) निष्ठा अपेक्षित असायची. तो माणूसही अर्थातच आर्थिक बाबी सांभाळायचा पण फक्त शरीरविक्रयाच्या मोबदल्यात नव्हे. अर्थात सामान्य माणसाबरोबर असे संबंध परवडले असते का ही दुसरी बाजू.

वरच्या पोस्ट वाचुन उलगडा होतोय.
नथ उतराई आणि आखरी मुजरा वर अती फोकस दिला नसता आणि अर्ध्या मिनिटाचा 'पान देताना कसं द्यायचं' इतपत ट्रेनिंग फक्त न दाखवता गायनाचं/ नाचाचं/ लेखनाचं प्राची ला गच्ची यमकं जुळवण्याचं ट्रेनिंग दाखवलं असतं तर आहे त्या फॉर्म मध्ये जरा प्रतारणा कमी ठरती.

नथ उतराई >>> हा मात्र खरोखरच विक्रय होता, टू द हायेस्ट बिडर…जनरली नेहमीच्या आणि खास व्हिजीटर्सकडे ही माहिती पोहोचवली जायची. ‘मेमॉयर्स ऑफ गेएशा’ मध्येही असा उल्लेख आहे. रादर गेएशा व तवायफ कल्चरमधे खूपच साम्य आहे.

तेच लिहायला आले होते..
गैशा आणि तवायफ..!!
वरील सगळे ग्लोरिफिकेशन ग्राह्य धरले तरी .. शेवटी शरिरविक्रय हा महत्त्वाचा आस्पेक्ट होताच. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून, तवायफ असणारी स्त्री..कितीही सुंदर गायिका, कवयित्री,
नर्तिका..असली तरी तिला पुरुषाच्या नजरेतून लस्ट ने पाहिले जाणारच....आणि ते अपेक्षितच असावे.

Happy अनुभवावरून..म्हणजे, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये, पुरुषांच्या मनोवृत्तीचे जे चित्रण झाले आहे, त्यावरून!

गायिका, पोएट, नर्तिका अजिबात नसली आणि चांगली दिसणारी असली तर ती तवाएफ होते का हा प्रश्न आहे. दुसरं एका साहाब बरोबर शेअरिंग द बेड असेल तर त्याला शरीरविक्रय म्हणतात का? इव्हन 'ठेवलेली बाई' हा शरीरविक्रय होतो का?
बाकी लस्ट स्त्रीला ही असेलच की!
परत वाचल्यावर माझी पोस्ट ग्लोरिफाय होऊ लागली आहे की काय असं वाटलं. Happy

>>> तर ती तवाएफ होते का हा प्रश्न आहे.
हा प्रश्न कोणाला आहे हा त्याहून मोठा प्रश्न आहे. Proud

हा प्रश्न कोणाला आहे हा त्याहून मोठा प्रश्न आहे. >>> Lol

बाकी लस्ट स्त्रीला ही असेलच की! >> हो पण कन्सेन्टिंग अ‍ॅडल्ट्स या कल्पनेत जी समानता आहे ती यात नाही. दोन अ‍ॅडल्ट्स नी प्रेमात पडून किंवा न पडून, (एकमेकांशी किंवा इतरांशी) लग्न करून किंवा न करून इतर बरेच काही केले असेल तरी त्याव्यतिरिक्त ते दोघे एरव्ही समाजात स्वतंत्र असतात. या संबंधामुळे त्याच्या सामाजिक स्थानात काही फरक पडत नाही. त्यातून होणारे फायदे तोटे दोघांना सारखेच असतात. पण ठेवलेली बाई वगैरे टाइप संबंधात ते नाही.

"इतर बरेच काही" - यापेक्षा मराठीत कोणताही शब्द वापरला - "शारिरिक संबंध" वगैरे तरी अवघडल्यासारखे होते. त्यात काही मजा, आनंद वगैरे आहे याची जराही कल्पना येता कामा नये अशा रीतीने रचल्यासारखे शब्द आहेत मराठीत Happy

फा, Lol

मराठी माणसाची मनोवृत्ती भाषेत अर्थातच प्रतिबिंबित होते.

अहो ते इतकं सोपं गणित नसेल.एखाद्या संस्थानात कलेची कदर करणारे जास्त लोक असतील, काही न करता फक्त कला, गाणं,नृत्य करून पैसे मिळत असतील तर त्या ठिकाणी काही करावं न लागणाऱ्या तवायफा असतील.एखाद्या ठिकाणी लोक अगदीच कंजूस, अजिबात चरितार्थ भागत नाही अश्या ठिकाणी मग इतर ऑफरिंग देण्याला पर्याय उरत नसेल. मी तरी जितकं वाचलं ऐकलं त्यानुसार तवायफ फक्त कलात्मक नाचगाणी करायच्या.(वी आर मिलर्स मध्ये रेचेल ला 'आता स्ट्रीपनृत्यासोबत हेही करावं लागेल शेजारच्या बार च्या स्पर्धेमुळे' हे ऐकूनच तिने नोकरी सोडली.म्हणजे ते जॉइनिंग टर्म मध्ये नसतं.)

हा प्रश्न कोणाला आहे हा त्याहून मोठा प्रश्न आहे>>>> Lol Lol

त्यात काही मजा, आनंद वगैरे आहे याची जराही कल्पना येता कामा नये >>>> अगदी अगदी >>> नाही म्हणायला प्रणयाराधन वगैरे जातात जवळपास पण तेही संधी, समास सोडवा कॅटेगरीतच मोडतात.

जन्माला आल्यावर दादा. बाबा, मामा हे शब्द अर्थाविना शिकत गेलो तसेच हिंदी सिनेमा बघत बघत तवायफ बाबत झाले.

या अशा रील मला सतत येतायेत> मला ही Sad
आणि मी तर अजून हा चित्रपट पाहिला देखिल नाहिये.. फक्त कुतुहला पोटी गजगामिनी रील पाहिला ओरिजनल.. पस्तावा..

नाही म्हणायला प्रणयाराधन वगैरे जातात जवळपास पण तेही संधी, समास सोडवा कॅटेगरीतच मोडतात. >>> Happy हो ना. जेथे संधी जमवायची किंवा साधायची तेथे संधी सोडवायची वेळ येते Happy

Lol
प्रणयाराधन म्हणजे रोमॅन्सची प्रार्थना वाटतं. खरा रोमॅन्स झाला की नाही गुलदस्त्यात रहातं. मराठी प्रणयाराधनाचे उदा. प्रियत्तमा, प्रियत्तमा दे मला एक 'व्हॉटेव्हर'- तर तो व्हाटेव्हर मिळाला की नाही पण ?? नेशन वॉन्ट्स टु नो. यात आणि 'उघड दार देवा आता' मधे काय फरक राहिला? तिकडेही दार उघडले की नाही स्पष्ट नाहीच. असं क्लिफहॅन्गरवर सोडणं पाप आहे. Lol

मराठी सिनेम्याला चुम्मा या कल्पनेच्या जवळपास येण्यासाठीसुद्धा चाळिशी ( अलिबाबा आणि चाळीशीचे चोर) येईतो थांबावं लागलं. त्यात पण च्यूक्क असा नुसता आवाजच मॅनेज केला आहे सो फार Lol

च्यूक्क असा नुसता आवाजच मॅनेज>>> लहानपणी आम्ही फुटक्या फुग्याच्या च्युक्क्या करायचो, मोठेपणी च्यूक्क ऐकतोय. काही करायला गेलं यांचा 'पुणे ५२' होतो. मराठी माणसाचे संन्यस्त जीवन... Lol

तवायफ economic model आपल्या तमाशाच्या फडाशी बरेच मिळते जुळते आहे.
एका पार्टीत 7 8 नाचणाऱ्या असतात. एका थिएटर मध्ये अश्या 2 3 पार्टी.
संध्याकाळी general show असतो ज्यात एक एक मुलगी एका एका गाण्यावर परफॉर्म करते. प्रेक्षकांमध्ये कुणाला एखादा परफॉर्मन्स /मुलगी आवडली तर ते जास्त पैसे भरून तिची खाजगी मैफल घेऊ शकतात. हे पैसे पार्टी मालक, थिएटर यात विभागले जातात. अर्थात चांगली दिसणारी, नाचणारी, गाणारी मुलगी जास्त पैसे आणते. (इथपर्यंत तरी sex offering मध्ये नसतो )

आता यात एखाद्याला एक मुलगी आवडू लागली तर he tries to woo her with gifts , money and other things. पोरगी चलाख असेल तर व्यवस्थित पैसे काढून त्याला आपला मालक बनवते. ती नाचणे थांबवत नाही, पण out of circulation होते. इतर पुरुषाबरोबर ती जात नाही.
आता पुढे मागे या मालकाचा इंटरेस्ट/पैसे संपले तर मुलगी नवीन मालक शोधते .(उमराव जान नवीन मधला सीन आठवा, अभिषेक कडे पैसे नसतात म्हणून शबाना नवीन पट्रोन सुनील शेट्टी बरोबर बोलणी सुरू करते)

यातही काही लोक असतात जे तु हे सगळे सोड आणि माझ्या बरोबर (अर्थात रखेल म्हणून) रहा असे सुध्धा proposal देतात, मग जमीन, कॅश, flat वगैरे तरदुद करून मुलगी प्रोफेशन सोडते (यात ती तिचा व्यवसाय सोडत असल्याने ही ऑफर केलेली भरपाई/ security असते ) but these type of stories are seldom successful love stories though.

As can be seen, तमासगीर is not equal to वेश्या. तवायफ आणि गेयशा संस्कृती पण बऱ्याचश्या या लाईन वरच जातात.

हमारे चित्रपटोंमे तवायफ का एक कोठा होता है | उस कोठे कि सीईओ मुन्नी बाई, हीरा बाई इस तरह के नाम कि कोई महिला होती है, जो पान खाती है और आंखे गरागरा फिराती है | उसकी आंखो मे काजल होता है | चित्रपट का बजेट बरा हुआ तो उसकी ड्रेस चमकिली होती है,जो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मे नही दिखती | कमालामरोही के चित्रपटोंमे महंगी ड्रेसेस होती है और कोठा शीशे का होता है | हर तरफ कारंजी थुईथुई नाचती है और बीच मे तवायफ नाचती है | वहां डान्स देखने के लिये ठाकूर और जमींदार आते है | वह नीचे गद्दे पे लोड को टेकके बैठते है | ये तवायफ होती है | तवायफ लावणी नही करती | उसमे बैठक की लावणी नही होती |

तमाशात कनातीत स्टेज असतं. त्याचे संध्याकाळचे खेळ असतात. त्याला इष्टोरी बी असतीय. ढोलकीवालं, शाहीर अन समदा जामानिमा असतोय ,त्यात तमासगीर नाचती बी अन सवाल जवाब बी करती | आताच्या तमाशात तमासगीर पिच्चरचीच गानी लावून डान्स करत्यात. तमासगिरण्या बैठकीची लावण्या करायच्या पण आता गावोगावचे विकासपुरूष आणि गुंठेशवर प्रसन्न पूर्वी मुंबईला आणि आता पनवेलला डान्सबार मधे जाऊन दौलतजादा करू लागल्याने तमाशा बंद पडला.

वरच्यातले आखे गरागरा फिराती है, एकदम परफेक्ट. कोण होती ती actress, नाव विसरले. बऱ्याचदा त्या रोल मध्ये तीच असायची, काजळ लावून गरागरा डोळे फिरवायची, भीती वाटायची.

Pages