भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिची acting (?) आवडलेले पण बरेच रसिक आहेत. Underplay केलय म्हणे तिने. लाजरी, शायरीची आवड असणारी, तवायफच्या दुनियेतून बाहेर पडू पहाणारी पण आईला घाबरणारी..आईच्या भितीने जास्त काही बोलायला घाबरणारी छान दाखवलीये तिने..म्हणे.

शर्मिन कुठेतरी-कुठेतरी I wanted to project Meenakumari's nothingness in Pakija for my character म्हणाली. ज्जे बात...! 'नथिंगनेस'च फक्त उरली आणि मीनाकुमारी 'मिस्टर इंडिया' झाली आहे. मी रिकामटेकडी असल्याचे फेसबुकला ठावूक आहे. मी पण भक्तिभावाने सगळं बघते.

जेमी फार टॅलेन्टेड आहे. बघितल्या आहेत क्लिप्स.

नथिंगनेस'च फक्त उरली आणि मीनाकुमारी 'मिस्टर इंडिया' झाली.. Lol
तिचा मामा म्हणतोय तिने underplay केलय..
ह्याच मुलाखतीत ती संजिदाचं कौतुक करतीये ना?
मागच्या एका मुलाखतीत (कपिल शर्मा?) ती संजिदा व अदितीला फार नावं ठेवत होती.

गजगामिनी वॉक वर रील्स करायला वटहुकूम काढून बंदी घालायहा हवी. काही रील्स मध्ये तर 'हटो जाओ तुम बडे वो हो' मध्ये अनुराग लाडिकपणा वगैरे न दिसता चक्क धमकी देत आहेत असा भास होतो.

धमाल धागा आणि प्रतिसाद. मल्लिका .. आपलं हे... मालिका बघतो आहे. त्यात पहिल्या भागापासून मध्ये मध्ये आग्रेवाली ती तवायफ गायिका आणि तिच्या ग्रामोफोन रेकॉर्डचा उल्लेख आला आहे. हा रिफ्रेनस ग्रेट गायिका गौहर जान हीच्याबद्दल असावा. ती बहुधा ग्रामोफॉन कंपनीने रेकॉर्ड केलेली पहिली गायिका होती. स्वतः किंवा/आणि तिची आई (मलका जान) तवायफ होती. बिब्बो नाव ह्यात आहे, पण मूळ बिब्बी नाव असलेली गायिका बेगम अख्तर तवायफ होती.

"The well- known tawaifs were women of learning, culture and dignity. Many of them were trained in music by the best ustads of the time. In turn these women made great contribution to music and dance. Sardar Bai of Lahore was a famous singer who had learnt music from Us tad Fateh Ali Khan."

ग्लोरीफिकेशन आणि ग्रांजर हे संलिभ ह्याच्या सिनेमांचे आत्मे असतात. त्यामुळे त्यासाठी काहीही दाखवलं जातं. कपड्यांचे रंग वगैरे कुणीतरी लिहिलं आहेच. केस संभार तर अगदी मॉर्डन ईस्टाईल आहेत सगळ्यांचे. उलट जुन्या तवायफ मंडळींच्या फोटोत तेव्हाप्रमाने केस चापून चोपून चपचपित केलेले दिसतात. मोकळे सोडत नसावेत. शिवाय त्या हीरा मंडीच्या बाहेर चक्क दगड का विटांचा किंवा इंटरलॉकिंग ब्लॉक्सचा रस्ता दाखवला आहे. काहीही हा संज्या! तेव्हा तो रस्ता मातीचा असणार.

जुन्या तवायफ मंडळींच्या फोटोत तेव्हाप्रमाने केस चापून चोपून चपचपित केलेले दिसतात. मोकळे सोडत नसावेत. >>>

आपल्या महान संस्कृतीत केस पुरुषांना मोहवतात हा फार जुना (आणि कदाचित खरा) समज आहे. त्यामुळे केस मोकळे सोडणे हे त्याकाळी घरंदाज समजले जायचे नाही. तवायफ झाल्या तरी अदब असणे अपेक्षित होतेच. संलीभ मात्र पाथब्रेकर आहे. त्याच्याकडे राजकन्या, सेमी राजकन्या, राजपूत, रबारी टोळीच्या नायिका, तवायफ सगळ्या केस सोडून...

तेच 'पोन्नीयिन सेल्वन'मध्ये बघा. ऐश्वर्याचा रोलच मोहिनीचा आहे. नवऱ्याला काबूत ठेवताना, नव्या लोकांना आकर्षून घेताना तिचे केस मोकळे असतात/ती केसांशी खेळत असते. पण जेव्हा तिला लोकांसमोर प्रतिमा उच्च ठेवायची आहे, तेव्हा प्रॉपर अप-डू.
उलट कुंदवैचे केस नेहमीच अप-डूमध्ये किंवा आधी वर बांधून मग खाली सोडलेले. फक्त वंद्यदेवनबरोबरच्या एका रोमँटिक सीनमध्ये मोकळे केस (साइन ऑफ इंटिमसी). पण तेव्हाही त्याचे डोळे बांधलेलेच. म्हणून संलीभ मणिरत्नम नाही.

MazeMan मस्तच.
अधून मधून चक्कर टाकत असल्याने कुंदवै डोक्यावरून गेले..

रघु आचार्य

PS1
PS2
बघा

गेम्स नव्हे चित्रपट

माझेमन, भारी निरीक्षण की! Happy
पुन्हा बघते पीएसेस आता - कोणीतरी ही थिअरी कन्फर्म करायला नको?! Proud

>>> काहीही हा संज्या!
Lol

माझेमन, भारी निरीक्षण की!
>>>+१
>> काहीही हा संज्या! Lol

पुन्हा बघते पीएसेस आता - कोणीतरी ही थिअरी कन्फर्म करायला नको?! >>> अभिनंदन. Lol

द्रौपदी सुद्धा वस्त्रहरणाच्या वेळी रजस्वला आणि मुक्तकेशा होती. पुरुषांनी शेंडीची गाठ सोडली की सूड आणि स्त्री मुक्तकेशा असली की अव्हेलेबल असा मेसेज जातो, व्वा!

>>> अभिनंदन
धन्यवाद Proud

कोणीतरी ही थिअरी कन्फर्म करायला नको >>>> हो हो. स्वतंत्र पीअर रिव्ह्यू झालाच पाहिजे.

'वैधानिक इशारा' >>> सिगरेटच्या पाकिटावर असतो तसा Lol

अस्मिता मी मोकळे केस असतील तर वेगळं वाचलं आहे . मागे खूप पूर्वी दिवाळी अंकात एक लेख वाचलेला. वेगवेगळ्या राजांच्या त्यांच्या राण्यांव्यतिरिक्त ठेवलेल्या किंवा शत्रूवर मात करून तिथल्या जिंकून आणलेल्या स्त्रिया एकत्र ठेवायचे (त्याला काहीतरी शब्द आहे विशीष्ट, अर्धवट आठवतोय म्हणून लिहिला नाही), त्या रजस्वला असतील तर केस मोकळे सोडायच्या, त्यांना राजा स्पर्शही करायचा नाही, म्हणजे त्या अवेलेबल नाहीत, असं समजत असत.

स्त्री मुक्तकेशा असली की अव्हेलेबल असा मेसेज जातो >>>
अवेलेबल म्हणण्यापेक्षा राजकारणाच्या चाली खेळताना त्या दोघी काय वापरत आहेत याचे सिम्बोलिझम म्हणा. बुद्धिमान तर दोघीही आहेत. कुंदवैकडे सत्तेचे बाळकडू, कमांडिंग प्रेझेन्स आणि जनप्रियता आहे. अनाथ नंदिनीकडे परावर्तित आणि लिमिटेड सत्ता आहे, फक्त एकच गोष्ट वरचढ आहे ते म्हणजे सौन्दर्य. ती ते वापरते. कुंदवैच्या इतर प्रिव्हिलेजमुळे तिला सौन्दर्य वापरावे लागत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही. (पुस्तकानुसार कुंदवैही तोडीस तोड सुंदर आहे.)

पुरुषांनी शेंडीची गाठ सोडली की सूड आणि स्त्री मुक्तकेशा असली की अव्हेलेबल असा मेसेज जातो, व्वा! >>>

या परंपरेला मुकुल आनंदने इथे छेद दिला होता Happy

बाकी राजकारणावरच्या सर्व चर्चा कधीतरी गांधी/नेहरूंवर पोहोचतात तसे चित्रपट्/सिरीजवरच्या सर्व चर्चा कधीतरी पीएसवर पोहोचतात या ट्रेन्डची ही सुरूवात तर नव्हे Happy

या परंपरेला मुकुल आनंदने इथे छेद दिला होता
>>> अत्यंत समयोचित, संतुलित आणि माहितीपूर्ण पोस्ट. 'वाल्मिकीचा वाल्या' -विदाऊट हेड ॲन्ड शोल्डर्स. Lol

अन्जुताई, हो. Interesting आहे , असं संमिश्र ऐकायला सुद्धा मिळतं खरं. Happy

पुरुषांना, करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया... आहे की.>>> हो. Lol

Pages