चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरे झाली कृतिची चर्चा.. उगाच तिला लेडी शाहरूख बनवू नका. चित्रपट कसा वाटला यावर बोलूया.

द ग्रेट इंडियन फॅमिली पाहिला प्राईमवर.
एका पुजारी कुटुंबातील भजन सम्राट मुलाला एके दिवशी समजते की तो आपल्या आईबापाचा खरा मुलगा नसून मुस्लिम आहे.
हिरो विकी कौशल आहे त्यामुळे अभिनयाचा प्रश्न नाही. एकूणच टिपिकल हिंदू मुस्लिम भाईचारा असलेला छान चित्रपट आहे. या देशात हिंदू मुस्लिम आपापले मोहल्ले बनवून सुखाने समाधानाने आणि शांततेत नांदतात जोपर्यंत त्यांचे रस्ते एकमेकांशी वाकडे होत नाहीत. अश्याच एरियात बालपण गेल्याने वातावरण निर्मिती रीलेट झाली

>>>

धरम सन्कट मैन मधे म्हनुन चित्रपट आला होता ,त्यात असेच होते

स्वरुपसुमित,
धरम संकट मे.. पाहिला होता थोडाफार.. कलाकार चांगले बघून.. पण जरा आचरटपणा वाटला म्हणून पूर्ण पाहिला नाही. आता फार आठवत नाही..
पण हा ग्रेट इंडीयन फॅमिली चांगला वाटला...

तसे तर अजय देवगण आणि पूजा भटचा जखम सुद्धा असाच होता. शेवटी कळते की आई मुसलमान होती. भारी कलायमॅक्स होता. पूजा भट नाव घेतले की मला दोनच गोष्टी आठवतात. दिल है के मानता नाही पिक्चर आणि गली मे आज चांद निकला गाणे..

>>>>>>जेवढे बारीक = तेवढे सुन्दर हे समीकरण हल्ली सगल्ळ्या बायकांच्या डोक्यात फार फिट बसले आहे. इतके की बहुतांशी बायका सतत असमाधानी असतात दिसण्यावरून..

यात क्रिटिकल आणि सुपरफिशिअल नवर्‍यांचा हातभार ९०% असतो आणि स्वतःचा स्लिमनेस , ट्रॉफीप्रमाणे फ्लाँट करणार्‍या बायकांचा १०%.

मी भारतात, गेलेले तर माझी सो कॉल्ड मैत्रिण म्हणजे नवर्‍याच्या मित्राची स्लिम बायको मला माझ्या नवर्‍यासमोर म्हणते " सामो तुझको फॅशन सेन्स सीखाना पडेगा. सीखाती हूं मै" .......... WtF आपण आपल्यात खूष असतो पण काही असमाधानी लोक उगाच त्रास देतात. मेक अप करण्यापेक्षा मी पुस्तक वाचेन एखादं, पॉडकास्ट ऐकेन नाहीत लोळत पडेन. तुझ्या तीर्थरुपांचे काय गेले?

माझी आई मेक अप करत नसे याउलट सासूबाई प्रचंड ... असो. तर साबा म्हणत मेक अप न केलेल्यांची तोंड बघा कशी दिसतात ते.

धरम सन्कट मैन मधे म्हनुन चित्रपट आला होता >>>
धरम संकट मे >>>

ऋन्मेषच्या पोस्टमुळे क्लिअर झाले. आधी मला वाटले आयर्न मॅन, सुपर मॅन सारखा धरम संकट मॅन नावाचा पिक्चर आहे की काय Happy

द ग्रेट इंडियन फॅमिली अगदीच सुपर फिशियल आहे. उगाचच ताणलेला वाटला. कलाकारांची चांगली कामे हा एकमेव युएसपी.

अल्पना थँक्स, सुजाता कानगो बरोबर, नाव नीट आठवतंच नव्हतं, प्रतिमा आठवे आणि ते चुकतंय असंही वाटत होतं. त्या दूरदर्शनवरच्या नाटकातही असायच्या.

सामो तुला छान ग्रेसफुली रहाता येतं की ग, कितीतरी गोष्टी छान कॅरी करतेस तरी असं ऐकून घ्यावं लागतं, माझ्यासारख्याना काय म्हणतील ही लोकं. एनिवे काही कोणाकडे लक्ष देऊ नकोस, तुला ज्यात समाधान मिळतं ते कर.

असामी+१
सर्वधर्मसमभावाचा 'क्रिएटिव्हिटी डेडएन्ड' आला आहे. अपवाद आत्मपॅम्फ्लेट. बाकी शिर्डीवाले साईबाबा, तुझं बाळ माझ्या घरी माझं बाळ तुझ्या घरी, अनहोनीको होनी करदे, हिंदू का खून मुसलमान का खून वगैरेचे सगळे प्रकार व चाचाजान, गॉड ब्लेस यू माय सन टाईप उपप्रकारही करून झाले आहेत. पुरे की राव आता...!

बॉलीवूडने दुर्लक्षित केलेल्या चांगल्या सिनेमापैकी एक. दिनो मोरिया आणि मिनिषा लांबा ह्यांचा हा एक चांगला मूवी. "अनामिका."
"रिबेका" चा अजून एक रीमेक. जर ओरिजिनल "रिबेका" कादंबरी वाचली असेल किंवा इंग्लिश सिनेमा वा "कोहरा" बघितला असेल तरीही अवश्य बघावा असा. तौलनिक अभ्यासासाठी बघा. जर तुम्ही अभिजात सिनेमाचे रसिक असाल आणि सिनिमा तंत्राचे अभ्यासक असाल तर तुम्ही तिनी पिक्चर पाहायला पाहिजेत. I am तो totally sold.
https://www.youtube.com/watch?v=2-eww7BI8Q0

ओके, रिबेका चा रिमेक असेल तर नक्की पाहते. रिबेका मूळ इंग्लिश/मराठी भाषांतर दोन्ही वाचल्यात, लॉरेन्स ओलिव्हिए,जेरेमी ब्रेट, चार्लस डान्स,अलिसीओ बोनी आणि आता नवा एक आला होता तो एक हिरो अशी सर्व रुपांतरे पाहिली आहेत.

हो आता एक नवा रिमेक आला आहे.
वहिदा रेहमान - विश्वजित ह्यांचा कोहरा नाही बघितलात? सपोज टू बी सुपरहिट! तो ही पहा .यू ट्यूब वर आहे.
बाय द वे लॉरेन्स ओलिव्हिएचा रिबेका हा ही यू ट्यूब वर आहे!

द ग्रेट इंडियन फॅमिली अगदीच सुपर फिशियल आहे.
>>>
अश्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात घडत नाहीत. आणि घडल्या तर ते प्रश्न इतके हसत खेळत आदर्श पद्धतीने सुटणार नाहीत, तर आयुष्यात वादळं येईल.
पण तरी ते हलके फुलके वाटावे अश्या पद्धतीने दाखवणे हा एक जॉनर असतो. ते ध्यानात ठेवूनच पिक्चर बघावा असे मला वाटते. अर्थात असा जॉनर आवडतच नसेल तर गोष्ट वेगळी..

Nanpakal Nerathu Mayakkam written and directed by Lijo Jose Pellissery,
यू ट्यूबवर आहे काय?

>>अर्थात असा जॉनर आवडतच नसेल तर गोष्ट वेगळी.. >> पॅसिव्ह अग्रेसिव्हचाही माझ्यासाठी डेडएंड झालाय. दुसरीकडे जाऊन भांडा, आणि कचाकचा भांडा प्लीज. हे असं पॅसिव्ह अग्रेसिव्ह नको.

पण तरी ते हलके फुलके वाटावे अश्या पद्धतीने दाखवणे हा एक जॉनर असतो. ते ध्यानात ठेवूनच पिक्चर बघावा असे मला वाटते. अर्थात असा जॉनर आवडतच नसेल तर गोष्ट वेगळी.. >> हलकएफुलके दाखवणे नि सुपर फिशीयल असणे ह्यात परत शाहरुख खान नि कमाल खान ह्यांच्याएव्हढा फरक आहे.

ज्वेल थीफ ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांच्यासाठी..
निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक यांनी मिळून ज्वेल थीफच्या प्रेक्षकांवर भयाण सूड का उगवावा याचे उत्तर "रिटर्न ऑफ ज्वेल थीफ" पाहून द्यावे. सगळे थकेले नायक, पन्नाशीतल्या धर्मेंद्रापेक्षा अलिकडचे फिफ्टी प्लस, सिक्स्टी प्लस नायक जास्त ताजेतवाने वाटतात. रजनी तर ७३ आहे. जॅकी श्रॉफ सारखा देखणा नट यात पण वयस्कर वाटत होता. तरूण एकच होता देव आनंद. टॉर्चर आवडत असेल तर चुकवू नका.

उतारा म्हणून "ए वतन मेरे वतन" पाहिला. ठीक आहे. उषा मेहता यांच्या कार्याची माहिती झाली. उषा मेहता पथ कुठेतरी पाहिला आहे. बहुतेक मुंबईत. राम मनोहर लोहिया यांच्याबद्दल पण फारशी माहिती नव्हती. आता मिळवून वाचाविशी वाटते.

ग्रेट इंडियन फॅमिली चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य आहे.
याचं या आधीचं काम म्हणजे टशन, धूम 3 आणि ठग्ज ऑफ हिंदुस्तान... त्यामुळे हिम्मत नाही झाली अजून हा सिनेमा पहायची

द ग्रेट इंडियन फॅमिली अगदीच सुपर फिशियल आहे>>+१ मला अर्ध्या तासाच्या वर बघवला नाही. विकी कोउशल आवडत असताना ही.
मेरे वतन प्राईम वर फ्री असून पण इच्छा होत नाही बघायची.
तेरी बातोंमें बघत आहे ..आता शाहिद हॉट दिसू लागला आहे दाढी वगैरे राखून Wink इश्क विश्क मधे अगदीच बाळ्या होता. आता खरा जोमात आलाय. क्रीती बर्फी पासून आवडते, अभिनय, लूक्स, नाच, संवाद सर्व चांगलंय..

अनू- प्राईम वर मेन्शन केलेल्या चांगल्या प्रोग्राम मधे तू हाऊस म्हटलीस..सीरीज आहे का? पूर्ण नाव काय?

हाऊस एम डी >> सिरियलचे काही सीझन्स काही भाग पाहिले आहेत. त्यातलेही काही भाग पाहवले नाहीत. एवढं पहायचं असतं तर स्वतःच डाक्टर नस्तो का झालो! पण तो ह्यू लॉरी माणूस लय भारी आहे म्हणून पहावेसे वाटले.

The trial of Chicago seven - फार सुंदर चित्रपट आहे!
व्हियेतनाम युद्धातल्या अमेरिकेच्या सहभागाविरुद्ध च आंदोलन हिंसक झाल्यावर त्यातल्या ७ (आधी) 8 जणांविरुद्ध झालेली केस हा प्लॉट घेऊन केलाय.

मला एकूण फार भन्नाट वाटला. खूप दिवसांनी अंतर्मुख करणारा चित्रपट पाहिला.

The help - हा पण मला फार आवडतो. आफ्रिकन Americans गुलाम नाहीयेत, पण समान नागरिक नाहीयेt, बायका नुकत्याच घर सोडून बाहेर पडू पाहताहेत (एखादी बाई), अजूनही अनेक जणी नवरा घर सोशियाल सर्कलस ह्यातच अडकलेल्या आहेत - अशा कालखंडातील चित्रपट.
फार सुंदर आहे. हे चित्र आपल्या आजूबाजूचा घरात दिसत नाही अस म्हणू शकत नाही दुर्दैवाने!
निदान आपण अशा वातावरणाला हातभार लावत नाही ना, आपल्याकडे असे वातावरण नाही ना हे प्रत्येकाने जरूर पडताळून पहावे!

तेरी बातो मे...पाहिला , ठीक वाटला, फुल ऑन कॉमेडी करायला भरपुर स्कोप होता...जेवढी कॉमेडी आहे ती पण चान्गली आहे.
क्रितीने रोबोटच काम चान्गल केलय...शाहिद-डिम्पल मावशी -भाचे केमेस्ट्री ,पहिला हाफ अजिबात जमला नाहिये..ते फार बोरिन्ग होत पण चिवटपणे बघत राहिले..गाणी कॅची आणी मेड फॉर शाहिदच आहेत...सुपर जॉब बाय शाहिद.

अमरसिन्ग चमकिला चान्गला वाटला...दिलजित छा गया है! परिनितीचा रोल कमी आहे पण चान्गला केलाय तिनेही...भर्पुर पन्जाबी अर्थातच आहे पण ठिक आहे...मूळ गायक खुप फेमस असल्याने त्याचे बरेच फोटो व्हिडीयो उपलब्ध पण आहेत ते अधुन मधुन खुबिने दाखवले आहेत...एका गरिब दलित शिख घरातला मुलगा ज्या वातावरणात वाढतो तिथुनच जे बघतो ते उचलतो पण समाजात चान्गल समजल जात नाही तीच गाणी तो लिहतो म्हणतो ..एकाच वेळी लोकाना तो हवाहि असतो आणी नकोही..सगळच त्रागड..हे सगळ इम्तियाझ फार सुन्दर उभ केलय..त्याचे त्याचे काही डायरेक्टरल टच पण जाणवतात...दिलजित उत्तम गायक असल्याने त्याने हे छान पेलल आहे..एरवी त्याला कॉमेडी भुमिकेतच बघितल्याने इथे पुर्ण वेग्ळ्या रोल मधे बघायला छान वाटल.
त्यावेळेच चित्रण, फॅशन , घर ,गाड्या ,रेकॉर्डीन्ग स्टुडिओ सगळे बारकावे व्यवस्थित अभ्यास करुन घेतले आहेत त्यामुळे कुठेही ते खोट सेट वर उभ केलय अस वाटत नाही, परिनितीने रोलसाठी १५ किलो वजन वाढवल होत.. फॅशन मधले अनेक बारकावे निट एस्टॅब्लिश केलेत..सोन्याच्या रिन्गा मधे लोबते कानातले...डार्क रेड लिपस्टिक्, मेकप बॉक्स.. एक वेणी...दिलजितच्या फॅशन,बेल बॉटम पॅन्ट्,बच्चन स्टाइल शर्ट..तसे कापलेले केस.
(डन्की मधे इतर सगळ्या बरोबर हा पार्ट मेजर फसला आहे..सगळच खोट हाफ हार्टेड)

तेरी बातो मे उलझा जिया च्या हूक स्टेप्स मस्त आहेत. रिल मध्ये सुद्धा वायरल झाल्या आहेत. स्पेशली ते उलझा जियाची नागोबा स्टेप. करतानाच एक मजा येते.

Pages