हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
मित्र म्हणे ने haircut केला>>
मित्र म्हणे ने haircut केला>> तसाच त्या व्हायफळने केला तर खूपच बरं होईल.. गेला बाजार जरा हेअर बँड लावून मागे तरी सारावेत.
मी चिडून ते unsubscribe केलं सतत ते १ मिन चे कट विडिओचे पण updates येतात आणि त्यात तेच केस दिसतात
विकटहास्यद्वयी>> हे तर नो गो ..
बिचारे प्रयत्न करतायत असे म्हणून सपोर्ट करायचा (नि एकीकडे पिसं काढायची)
विद्याधर जोशींची मुलाखत>> पहायला हवी.
मलाही सतत anchor स्ट्रगल विचारून छळत असेल तर अजिबात आवडत नाही. ही मेन्टॅलिटीच किती वाईट आहे.. नसेल अगदी सांगण्याइतपत स्ट्रगल मोठा तर काय प्रॉब्लेम आहे ? सरळ सगळं छान planned केल्यासारखं असेल एखाद्याचं आयुष्य तर ते ऐकल्यावर यांच्या का पोटात दुखणारे ?पण नाही! त्यातून त्यांना ३० ३० sec ची रिळे फिरवून like नि सब्स्क्राइब हवे असतात
विकटहास्यद्वयी
विकटहास्यद्वयी
राहुल देशपांडेची मुलाखत बघितली अमुक तमुकवरची. छानच बोलला आहे. गाण्यामागची विचारप्रक्रिया सविस्तर उलगडून दाखवली आहे. प्रगल्भता जाणवली त्याची.
विकटहास्यद्वयीला मात्र सुधारणेला भरपूर वाव आहे. 'उपासना' किंवा 'अभ्यास' च्या जागी चक्क 'आसक्ती' शब्द वापरला त्याने. शिवाय अतीच अनौपचारिक वाटतात.
मी बहुतेक या धाग्यावर आधी एकदा उल्लेख केला होता. २००५/६ साली पुण्याला डीएसके गप्पा कार्यक्रमात अतुल कुलकर्णीची सुधीर गाडगीळांनी घेतलेली मुलाखत बघितली होती. तेव्हा त्याच्या विचारप्रक्रियेबद्दल ऐकून मी खूप प्रभावित झाले होते. त्याची आठवण झाली राहुल देशपांडेची मुलाखत ऐकताना.
>> निष्कारण खळबळजनक वक्तव्य
>> निष्कारण खळबळजनक वक्तव्य केल्याने आगामी काही दिवसात उषा नाईक सुद्धा सगळीकडे दिसतील असं वाटतंय.>> नक्कीच. नाईक आडनावामुळे मला काम मिळालं नसेल हे काहीतरी नवीनच. परत मला गॉडफादर नाही हे त्या कमीत कमी ४ वेळा म्हणाल्या आहेत. अवॉर्डचं काही नाही म्हटलं तरी न मिळाल्याचं वैषम्य डोकावतंच आहे बोलण्यातून.
'अमुक तमुक' मध्ये कॅमेऱ्या
'अमुक तमुक' मध्ये कॅमेऱ्या समोरील प्रत्येकाने किमान एकतरी पाय सोफ्यावर घेऊन बसावे, असा नियम आहे बहुतेक.
अनघा
अनघा
वायफळ वरची सगळ्यात आवडलेली
वायफळ वरची सगळ्यात आवडलेली मुलाखत सकर्षणची...साधा,सरळ्,ओघवता,...खरोखर नम्र असा जाणवतो तो...कुठलाहही अभिनिवेश न आणता बोलण...आवडल त्याच बोलण.
प्राजक्ता अगदी अगदी
प्राजक्ता अगदी अगदी
प्राजक्ता +१
प्राजक्ता +१
संकर्षणची चांगली होती.
संकर्षणची चांगली होती. स्पृहाचीही छान होती. दोघेही मला साधे वाटतात.
प्राजक्ता+१
प्राजक्ता+१
संकर्षण बद्दल सहमत.
संकर्षण बद्दल सहमत.
बियर बायसेप्स वर आर. माधवन आला होता. ह्यावेळी मला मुलाखत थोडी विस्कळीत वाटली. सुरुवात चांगली झाली, पण निम्म्या वेळानंतर थोडा रटाळपणा जाणवला. ह्यावेळी रणवीर ची तयारी थोडी कमी वाटली. माधवन नेहमी प्रमाणे मस्त बोलत होता.
स्वतःच्या मुलाच्या यशाबद्दल कसलाही गर्व नाही, एवढंच नाही तर, त्याच्या पेक्षाही भारतात कितीतरी मुलं गुणी आहेत पण त्यांचा एवढा गाजावाजा होत नाही, ह्याची जाणीव मुलाला करून देतात, हे ऐकून बरं वाटलं.
भाडीपा चे 'ऐकावे जनाचे ' हा
भाडीपा चे 'ऐकावे जनाचे ' हा कार्यक्रम मुलाखती पेक्षा संवाद स्वरूपाचा आहे. दोन्ही भाग आवडले.
दुसऱ्या ' मुलांना जन्म द्यावा का? ' मध्ये ममता सकपाळ मला खूप जास्त impressive वाटल्या आणि मुलाखतकार जरा अपरिपक्व.. पण त्याचे वय - अनुभव बघता ते कदाचित नैसर्गिक असावं.
मुलाखतीचा विषय वाचल्यावर
मुलाखतीचा विषय वाचल्यावर 'ऐकावे जनाचे' हे भाडिपा चे आहे, ह्याचेच आश्चर्य वाटले.
मुलाखतकार जरा अपरिपक्व.. >> त्याच्या टी शर्ट वरील ग्राफिटी वरूनच अंदाज येतो.
मित्र म्हणे च्या मित्राचे
मित्र म्हणे च्या मित्राचे डोक्याचे केस कट झाले आणि मिशी आली त्याला. बर वाटतंय बघायला आता. विद्याधर जोशिंची मुलाखत पाहिली नाही पूर्ण पण shorts पाहिले. चांगली वाटते आहे. सवडीने पाहीन
बाप रे! आनंद नाडकर्णी यांनी
बाप रे! आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली, शरद बाविस्कर यांची मुलाखत मस्त वाटली.
- One is relevant so long as one thinks
- झिजुन मरेन पण थिजुन मरणार नाही
- आयुष्य हे एक आव्हान आहे, जितके लवकर स्वीकाराल, तितके चांगले.
- झिजायचे तर आहे, संघर्ष तर आहे पण त्या श्रमाला, दिशा हवी.
- आपल्या आयुष्यातून आपणच एक सुघड लेणं कोरायचं असतं.
- भाषा शिकण्याची सुरुवात असते अंत नसतो! Language is an aesthetic object. .................................. क्या बात है!!
- शब्दकोषामधले हडकुळे, कुपोषित शब्द जेव्हा साहित्यकृतीमध्ये येतात तेव्हा ते धष्टपुष्ट बनतात. ...........................अति सुंदर!!!
- We are not perfect, but we are perfectable, and perfectability is more than perfection.
- शिक्षणाला फक्त उपयुक्ततामूल्य नसतं तर त्या शिक्षणातून आपल्या मेंदूची काय जडणघडण झाली की मी समाजात relevent राहू शकलो ... अर्थपूर्ण रहाणे.
समृद्धी म्हटली की - Cultual capital, linguistic capital अर्थात सांस्कॄतिक , भाषिक भांडवल जे की इतिहासदत्त घटक झाले , काही काही व्यवस्थादत्त घटक झाले, काही व्यक्तीनिष्ठ घटक (उदा - निसर्गदत्त चैतन्य, व्हायटॅलिटी) ....... असे काही मुद्दे, या मुलाखतीत आलेले आहे. निदान, उभे रहायला जागा देणे अथवा नाकारणे हा झाला व्यवस्थादत्त घटक आणि एकदा तशी जागा मिळाल्यानंतर, स्वतःला, जगाला पालटवुन टाकणे हा झाला व्यक्तीनिष्ठ घटक.
-------------------------
प्रचंड वैचारिक झेप आहे. नाडकर्णी यांनी इतकी सुंदर facilitate केलेली आहे ही चर्चा.
अमुकतमुकवर ‘मेनोपॉज’वर मुलाखत
अमुकतमुकवर ‘मेनोपॉज’वर मुलाखत आली आहे. चांगली माहितीपूर्ण आहे. होस्टचं वेडगळ हसणं सोडलं तर तो प्रश्न नेमके विचारतो.
येस सायो तो एपिसोड चांगला
येस सायो तो एपिसोड चांगला होता.
स्पेशली आयांचं मुलांना त्याच त्याच गोष्टी परत सांगणं, अ ती काळजी करणं हे अगदी पटलं. आयांचा मेनोपॉज आणि त्यांच्या मुलामुलींचं वयात येणं साधारण वेळ एकच येते तेही खरंच आहे.
अमुकतमुकवर ‘मेनोपॉज’वर मुलाखत
अमुकतमुकवर ‘मेनोपॉज’वर मुलाखत आली आहे>>मुलाखत चांगली आहे. डॉ. पाठकांचं बोलणं विशेष आवडलं. चांगली माहिती सांगितली.
( बाकी मुलाखतकाराकडे दुर्लक्ष केलं तर त्या दुसऱ्या डॉक्टर बाईच बऱ्याच ठिकाणी विनाकारण हसत होत्या. )
बीअरबायसेप्सचा निलेश ओक
बीअरबायसेप्सचा निलेश ओक यांच्यासोबत मॉडर्न टूल्स टू डिकोड महाभारत ॲंड रामायण हा एपिसोड
The diary of CEO
The diary of CEO
बघायला आवडतय..
रमित सेठी, त्याचा Netflix वर पण शी होता.
बीअरबायसेप्सचा महाभारताचा भाग
बीअरबायसेप्सचा महाभारताचा भाग मलाही आला. मी माधवनची मुलाखत बघत बसले. चांगली आहे पण उत्तम वाटली नाही. इथं पहिल्या पानावर बिअरबायसेप्सला 'न्यू फाऊंड लव्ह' म्हटलं होतं पण आता कंटाळा आला, 'लव्ह' आटलं.
सारखं एकाच होस्टचं पॉडकास्ट
सारखं एकाच होस्टचं पॉडकास्ट बघितलं गेलं तर कंटाळा येतो/येऊ शकतो.
अस्मिता, बियर बायसेप्स बद्दल
अस्मिता, बियर बायसेप्स बद्दल सेम फिलिंग. हल्ली आवर्जून बघावं असं होत नाही. रणवीर हल्ली निष्कारण आपल्या वयापेक्षा मोठं असल्याचा आव आणतो आणि त्या प्रयत्नात विषयाच्या तयारीत कमी पडतो, असं वाटतं.
रणवीरचे सर्वच पॉडकास्ट मी
रणवीरचे सर्वच पॉडकास्ट मी नाही पाहत. कारण तो थोडा उथळ वाटतो मला. कुणी एखाद्या विशिष्ट एपिसोडबद्दल सांगितलं तरच पाहते. हा एपिसोड नवर्याने सुरू केला व वेगळा वाटला म्हणून कंटिन्यू केला.
हो अनघा, मला आवडायचा रणवीर.
हो अनघा, मला आवडायचा रणवीर. एवढ्या तरुणपणी त्याची अध्यात्मातली रुची बघून 'इवॉल्वड्' वाटायचा. तरुण, एनर्जेटिक व काही तरी रिफ्रेशिंग होतं त्याच्या अप्रोचमधे पण आता तोच कंटाळल्यासारखा वाटतोय. तो तसा जेनुईन आहे, त्यामुळे त्याला कंटाळा लपवता येत नाहीये.
अमृतनयना म्हणून नयना आपटे
अमृतनयना म्हणून नयना आपटे यांच्या अमृत महोत्सवाची मुलाखत आहे. फारच आवडली. त्या आवडतातच त्यामुळे अजूनच मजा आली. किती छान मराठी... शेवट त्यांनी एकच प्याला मधलं, ' प्रभु अजि गमला, मनी तोषला ' गाऊन केला. मुलाखतीचा अगदी परमोच्च बिंदूच नक्की ऐका, यू ट्यूब वर आहे. चार भागात आहे.
बीअरबायसेप्सचा निलेश ओक
बीअरबायसेप्सचा निलेश ओक यांच्यासोबत मॉडर्न टूल्स टू डिकोड महाभारत ॲंड रामायण हा एपिसोड
>>>>> अर्धा बघितला. पि.व्हि. वर्तकांच्या 'वास्तव रामायणाची' पुनरावृत्ती वाटली. ज्यांनी ते पुस्तक वाचलेले नाही त्यांना नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल. मला काहीच नवीन वाटलं नाही. अर्ध्यावर सोडून दिले. करीना कपूरची मुलाखत बघत बसले नंतर.
---------
लंपन, धन्यवाद.
हल्ली त्यांना सुमित राघवनच्या 'वागले की दुनिया' मधे मावशीच्या- भारती आचरेकर यांच्या बहिणीच्या रोल मधे बघितले. अगदी तशाच दिसतात.
या धाग्यावर आलं कि वाटतं किती
या धाग्यावर आलं कि वाटतं किती काय काय बघायचं राहतंय! नोट करून ठेवते पण त्याची आठवण कोण करणार
आठवण करून द्यायला एक धागा
आठवण करून द्यायला एक धागा काढायला हवा.
काल भडीपा वर "घर भाड्याचे की
काल भडीपा वर "घर भाड्याचे की स्वतः चे..?" बघितलं.
स्वतः चे घर घेतानाच प्रवास - दमछाक, ताण, नियोजन ह्यातून ही गेले य.. आणि भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तीही स्थिती अनुभवते य त्यामुळे व्यक्तिशः या कार्यक्रमाला बरीच रीलेट झाले . ..
Pages