Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह तो हा का(तो सदरा त्या
ओह तो हा का(तो सदरा त्या सदरात पडला होय..)
तो बारीक झाल्याने किंवा बऱ्याच वर्षाने पाहिल्याने ओळखू नाही आला.54 चा वाटत नाही.कोणतं अँटी एजिंग क्रीम लावतो बघायला हवे
अनु अनु अगं काय चाललंय!!
अनु अनु अगं काय चाललंय!!
स्वतःच्या आनंदासाठी करावा
स्वतःच्या आनंदासाठी करावा Happy (इथे आनंदा हे बॉयफ्रेंड चे नाव नाही)>>>> अनू अगं आशा करते की तुमचे "हे" माबो वर नसावेत. असते तर झिट येऊन पडले असते एव्हाना
"हे" ड्युओ लिंगो वर असतात
"हे" ड्युओ लिंगो वर असतात
हे नमूद करावे लागत आहे की प्रत्यक्षात सदर प्रतिसादलेखिका एक पाल पिल्लू मारायला पण 2 लोकांवर परावलंबी आहे.
बाया ड्यांजर झाल्यात !
बाया ड्यांजर झाल्यात !
हाहाहा. श्या नाव अ ने सुरु
हाहाहा. श्या नाव अ ने सुरु होत असलं तरी ह्या अनु अस्मिता सारखा सेन्स ऑफ ह्युमर नाही ब्वा माझ्याकडे. बाकी मर्डर आणि विल्हेवाट वगैरे वाचून एकीकडे भीतीही वाटली. रुद्रम आठवली. त्यात बरेचदा नंतर प्रतिकात्मक दाखवलं, पहील्यांदा फक्त डीटेल्स होते.
भ्रमयुगम.. जबरदस्त.. थोडफार
भ्रमयुगम.. जबरदस्त.. थोडफार तुंबाडच्या जवळ जाणारा. आवडला. sony liv
यात काही नाहीये गं भीती
यात काही नाहीये गं भीती वाटण्या सारखं
आता भीती वाटेल मग वाटेल करत पिक्चर संपतोच.
ब्रह्मयुगम बघायचा आहे मला.सोनी लिव्ह पेड घ्यावं लागेल का?
संजय कपूर ची अशी एकही हिस्टरी
संजय कपूर ची अशी एकही हिस्टरी नसावी.तो फक्त फेसबुकवर j1 झालं का विचारून मैत्री करणाऱ्या विवाहित पुरुष मंडळींसारखा,>>>> येस्स मधेच तो एकदा खाया पिया कुछ नही ग्लास तोडा टाईप्स डायलॉग पण मारतो
अरे! आमचा वॉल्टर व्हाईट केमिकलने बॉडी डिसइंटिग्रेट करतो. फक्त ते जेसी सारखं बाथटब मध्ये न करता पिंपात करायचं येवढं फक्त लक्षात ठेवायचं होतं. माझ्या मनात ते कोरलेलं वगैरे आहे. ते आठवू नये!>>>>>>>>>>>> हा हा त्यानंतरचा तो जेसीचा रास्पबेरी स्लशी वाला डायलॉग फार आवडतो
बाया ड्यांजर झाल्यात !
बाया ड्यांजर झाल्यात !
>>> मी नाही हं त्यातली, ही मी चालले 'बाळा गाऊ कशी अंगाई' बघायला. आपण बरं आणि आपली 'साधीभोळी मीरा का राधा' जी कोणी आहे ती बरी.
अनुने दाणादाण उडवलेली दिसतेय.
अन्जुताई , तुझे प्रतिसादही वाचल्या जातातच बरं. स्क्रोल करत नाही कधी.
भ्रमयुगम नोटेड. आता शैतानची वाट बघायची गरज नाही.
प्रतिसाद स्किप करत नाही. पण
प्रतिसाद स्किप करत नाही. पण जेव्हां स्पॉयलर अॅलर्ट यायला लागतात तेव्हां करतो. इथे एक प्रतिसाद खालून वर वाचला . मग स्पॉयलर अॅलर्ट वाचलं
सिनेमा पाहून होईलच याची खात्री नाही पण स्पॉयलर टाळतो.
अन्य संकेतस्थळावर स्पॉयलर
अन्य संकेतस्थळावर स्पॉयलर फॉन्ट म्हणून द्रुपल कस्टमायझेशन आहे.ते केलं की निवडलेल्या टेक्स्ट ला आपोआप फॉन्ट कलर व्हाइट टॅग लागतो.
चांगली सोय आहे ही.
चांगली सोय आहे ही.
मायबोलीवर स्वतःच्या विपुत
मायबोलीवर स्वतःच्या विपुत स्पॉयलर लिहुन त्याची लिंक इथे देण्याची सोय आहे.
किचकट वाटतं हे. ब्लॉगवर
किचकट वाटतं हे. ब्लॉगवर लिहून लिंक दिल्यासारखं.
मायबोलीने आता स्मायल्या, टेक्स्ट फॉरमॅट ऑप्शन यासाठी बाबा आदमच्या जमान्यातल्या पद्धती बदलल्या पाहीजेत. अर्थात त्यासाठी आर्थिक ताण येत नसेल तर.
निवडलेल्या टेक्स्ट ला आपोआप
निवडलेल्या टेक्स्ट ला आपोआप फॉन्ट कलर व्हाइट टॅग लागतो. >>> इंटरेस्टिंग....
ते ज्यांना वाचायचंय त्यांनी काय करायचं? :बेसिक प्रश्नः
ते ज्यांना वाचायचंय त्यांनी
ते ज्यांना वाचायचंय त्यांनी काय करायचं? >>> त्या मोकळ्या दिसणार्या जागेवर क्लिक / डबल क्लिक करायचं.
इथे काहीही न वाचता (मुद्दामच)
इथे काहीही न वाचता (मुद्दामच) मेरी ख्रिसमस पाहिला. माझ्या सिनेमाकडून जितक्या माफक अपेक्षा असतात, त्यात मला आवडला. मी सहसा ऑल्टरनेट थियरीजचा विचार करत नाही, सस्पेन्स सिनेमातलं कोडं सोडवायचा प्रयत्न करत नाही - म्हणजे हे दोन्ही प्रकार जमतच नाहीत. समलैंगिक संबंध न दाखवल्यामुळे पात्रांना खोली लाभत नाही असं मानत नाही. जेवताना मूव्ही बघत असल्यामुळे बाथरूम सीन्स नसलेले, मुलं आल्यावर रिमोट शोधायला न लागणारे, डोक्याला माफकच त्रास देणारे, सिनेमे मला आवडतात, त्यामुळे मला आवडला. अडीच तास मजेत गेले.
समलैंगिक संबंध न दाखवल्यामुळे
समलैंगिक संबंध न दाखवल्यामुळे पात्रांना खोली लाभत नाही >
Poor things बघितला. मस्तच आहे
Poor things बघितला. मस्तच आहे. एम्मा स्टोन तर मस्तच पण मार्क रफालोसुद्धा छान.
अपेक्षेपेक्षा खूप विनोदी होता. बऱ्याच ठिकाणी खळखळून हसू आले.
किसमसच्या चर्चेने टाईमपास
किसमसच्या चर्चेने टाईमपास झालाय. मी अनु
शैतान इतर बायांबरोबर थेट्रात पाहिला. तसंच करावं नेहमी म्हणजे मजा येते. माधवनने मस्त काम केलंय. पांढर्या दाढीच्या खुंटात पण स्मार्ट दिसतो. पण त्याचा चेहराच असाय की तो व्हिलन वाटत नाही. टायटल गाणं भारी. (१० लोक होते पहायला म्हणुन, शेवटी नामावलीत ते गाणे सुरु झाले तेव्हा एकीने त्या गाण्याबरोबर आम्हा सर्वांना शैतानी अभिनय करायला लावून रील पण केला परंतु चांगला नाही झाला म्हणुन काढुन टाकला).
पण जरासा १-२ सीनमधे व्हायलन्स आहे, तितका सहन करा.
निवडलेल्या टेक्स्ट ला आपोआप
निवडलेल्या टेक्स्ट ला आपोआप फॉन्ट कलर व्हाइट टॅग लागतो.
>>
ही सोय जुन्या माबो वर होती.
त्यावेळी लोकं पांशा वापरून लिहायचे
नंतर नवीन माबो आली आणी पांशा मोड ऑन वगैरे ची गराज पडायाला लागली
पांशा नाहीये हो आता html मोड
पांशा नाहीये हो आता html मोड मध्ये पण.फक्त बोल्ड स्त्राईकथ्रू वगैरे आहेत.फॉन्ट कलर टॅगला परवानगी द्यायला हरकत नव्हती.
अँकी पांशा मोड ऑन हे मी
अँकी पांशा मोड ऑन हे मी वाचलेय माबोवर नविन होतो तेव्हा.
मला वाटायचे पांशा कुण्या आयडीचा शॉर्टफॉर्म आहे आणि त्याची नक्कल करण्यास पांशा मोड ऑन असे लिहितात की काय.
आता कळले काय ते.
(सिनेमॅटोग्राफी, संगीत, अभिनय
(सिनेमॅटोग्राफी, संगीत, अभिनय, सेट सगळं आवडूनही) एक कथा म्हणून ब्रह्मायुगम आवडला नाही.बराच स्लो वाटला.सुरुवातीला 1 तास 'ही कुठे फिल्म आहे, इथे तर तो लुंगीवाला बाबाजी नुसताच खुर्चीत बसलाय'झालं. (स्पॉयलर्स देत नाहीये खाली.)
कथा वेगळी आहे.पण वेगवान हवी होती.शिवाय 2 तास सलग 3 पांढरी लुंगी वाली उघडी माणसं बघून बोअर झालं.किमान यक्षी ला अजून जास्त स्क्रीन टाईम हवा होता.
कथेत वापरलेला वाडा सॉलिड आहे.
मेरी ख्रिसमस बघितला. नॉट बॅड.
मेरी ख्रिसमस बघितला. नॉट बॅड. मला आवडला एकूण. खुनाचा प्लॅन अ आणि अ आहे. बाकी पिक्चर चांगला डेव्हलप केलाय. विजय सेतुपतीचा मी आधी कुठला सिनेमा बघितला नव्हता. यात आवडला. तो परत परत जेव्हा तिच्या घराकडे येतो तेव्हा त्याला ओरडून सांगावंसं वाटतं की अरे बाबा, कुठे या भानगडीत पडतोस? घरी जाऊन झोप!
कतरिनालाही चांगलं मिळालंय काम.
फेफ, मस्त पोस्ट.
फेफ, मस्त पोस्ट.
नेटफ्लिक्सवर 'मर्डर मुबारक' बघितला. कालच रिलीज झाला होता. आवडला नाही. विस्कळीत आहे, कुठं जलद तर कुठं संथ गतीने सुरू रहातो. टोपलंभर कलाकार आहेत. संजय कपूर, विजय वर्मा, करिष्मा कपूर, डिंपल कपाडिया, टिस्का चोप्रा ई ई... मुख्य कलाकार तसे सारा अली खान आणि पंकज त्रिपाठी दोघेच आहेत. सारा अली खानला अभिनय येत नाही. तिनं वाट लावली आहे. भावनिक सीन मधे वेडावाकडा चेहरा ठेवून किंचाळते, भांडतानाही तेच आणि रोमान्स करतानाही चेहरा तोच आवाज कमी. पंकज त्रिपाठीने आपापले काम चोख बजावले आहे पण भूमिकेत काहीच नाविन्य वाटलं नाही.
एका उच्चभ्रू क्लबमधे खून होतो आणि हे सगळे मेम्बर्स संशयित म्हणून गृहित धरले जातात. सिरीजसारखं प्रत्येकाला एक भूतकाळ आहे व तो लपविण्यासाठी आटापिटा चालला आहे. प्रत्येकाला पंधरा वीस मिनिटे दिले आहेत. कुणाचंच काम लक्षात ठेवण्यासारखं नाही. अगदी विजय वर्मा सुद्धा 'लो एनर्जी 'वाटला. डिंपलने पुरुषांच्या अंगचटी येणाऱ्या लंपट बाईचा रोल केला आहे. टिस्का साधारण तशाच रोलमधे. संजय कपूर नेहमीचा दिखाऊ चिडका बिब्बा. करिष्मा येते आणि जाते, एकदोन संवाद म्हणते. सगळ्यात दीर्घ लांबीचा रोल साराला आहे आणि तिला काहीच येत नाही.
बंडल वाटला सिनेमा.
'मर्डर मुबारक' बघितला.
'मर्डर मुबारक' बघितला. विस्कळित आहे. ठीक आहे पण. पण सारा मला आवडते त्यामुळे ते तेवढं असो.
आणखी जन्तेने बघितल्यावर मला वेगवेगळ्या स्टेजवर खुनी कोण वाटला आणि बॅक स्टोरी डोक्यात काय तयार झालेली टाईप स्पॉयलर चिर्फाड करायची असेल तर मला बोलवा.
एवढं कुठं अमित, एवढी कळाच
एवढं कुठं अमित, एवढी कळाच नाही सिनेमात. टिपिकल नेटफ्लिक्सची उथळ मर्डर मिस्ट्री आहे. आता 'मेरी ख्रिसमस' उच्च वाटायला लागला मला. उगाच नावं ठेवली.
हो! मेरी ख्रिसमस चांगलाच होता
हो! मेरी ख्रिसमस चांगलाच होता... आता असं लिहिलं आणि कतरिनाचा भकास उगा खोटं हसलं दाखवणारा चेहरा त्या लाल फुलांच्या ड्रेसमध्ये डोळ्यासमोर आला. नको!
Pages