इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
सावली, फूट स्टेप नव्हती
सावली, फूट स्टेप नव्हती टेस्ट ड्राइव्ह फॉर्च्युनरला.
मला असे वाटते की आपली बसण्याची पद्धत आणि ज्येज्येनांची पद्धत वेगळी असते. गाडीत बसताना आपण एक पाय उचलुन तो आत टाकुन बसतो.
ज्येज्येना तसे न करता दोन्ही पायावर तोल संभाळत, हाताने आधार घेत आधी बुड टेकवुन बसतात. सीटची उंची कमी असेल तर असे बसण्यास अधिक कष्ट पडतात. मग एक पाय उचलुन आत घेतात, मग दुसरा. यातही सीटची उंची कमी असेल तर पाय उचलण्यास त्यांना अधिक कष्ट पडतात.
अच्छा है लक्षात आलं नव्हतं.
अच्छा है लक्षात आलं नव्हतं.
पाय काटकोनात राहणे यामुळे खूप
पाय काटकोनात राहणे यामुळे खूप आरामदायी प्रवास होतो. >>> हा अनुभव आहे. आमची पहिली गाडी अॅम्बेसिडर कार होती. तिच्यात एकदा बसले कि उठताना त्रास व्हायचा. पण पाय नीट रहायचे. अर्थात त्या वेळी लहान असल्याने पण असेल. नंतर मारूतिच्या क्रेझमधे व्हॅन होती. व्हॅन मधे पाय काटकोनात राहत असल्याने कधीच त्रास झाला नाही. व्हॅन मधे ज्यें ना चढणे उतरणे सुद्धा सोपे व्हायचे.
मानव यांनी हा मुद्दा छान हायलाईट केला आहे. इथून पुढे कार घेताना याचाही विचार करता येऊ शकतो. मी हे आधी लिहीले आहे.
मानव हा मुद्दा लक्षात आला
मानव हा मुद्दा लक्षात आला नाही. वडिलांकडे इनोव्हा आहे आणि ते सिटी मध्ये बसायला तयार नसतात. मी सवय म्हणून त्याकडे पाहत होतो.
धक्क्यांबद्दल मी असे ऐकले की एसयूव्ही ला बॉडी रोल जास्त आहे. सस्पेंशन चांगले असेल तर सेदान आणि एसयूव्ही ला सारखाच फील यायला हवा. यात काही मिसिंग आहे का?
80,000 किमी नंतर मला सिटी चे सस्पेनशन वीक झालंय असा वाटतंय. हा प्रॉब्लेम एसयूव्ही पण येईल का?
मुळात बॉडीस्टाईल मध्ये फरक
मुळात बॉडीस्टाईल मध्ये फरक असल्यानी एसयूव्ही आणि सेदानच्या रोड स्टेबिलिटी मध्ये जरासा फरक असेल असं मला वाटतं (मी एसयूव्ही हायवेज वर लाँगटर्म अशी चालवली नहीय). पण आताशा शक्यतो सगळ्या गाड्यांत इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल हे फिचर असतं सो फार काय फरक पडत नसेल.
रच्याकने, काल युट्यूबवर ऑटोकार इंडीया चॅनल वर हॅरिअर, कंपास आणि एक्सयूव्ही ७०० च्या डिझेल ऑटो व्हेरीअंट्स चा कंपॅरिझन व्हिडिओ आलेला आहे. इच्छूकांनी पाहून घ्यावा, एक्स्यूव्ही चं डिझेल इंजिन सगळ्यात चांगलं आहे आणि या प्राईस ब्रॅकेट मध्ये ती सगळ्यात जास्त व्हिएफएम आहे असं त्यात दिलंय जे की खरंही आहे.
योकु, धन्यवाद.
योकु, धन्यवाद.
लिंक दिली तर बरे होईल. अर्थात थोडे शोधावे लागले तरी चालेल.
खूप नावाजलेले चॅनल्स आहेत हे.
खूप नावाजलेले चॅनल्स आहेत हे.
अजून एक - एखाद्या कार चे मोस्ट व्हीएफएम मॉडल कुठलं किंवा कुठलं मॉडल हे value + फिचर्स च बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे - व्ही थ्री कार्स या यूट्यूब चॅनेल च्या - द अल्टिमेट ऍनालेसीस या शो मध्ये देतात. उत्तम चॅनल आहे हे ही.
आज एक होंडा अॅकॉर्ड वाला
आज एक होंडा अॅकॉर्ड वाला डाव्या बाजूने पहिल्या आणि दुसर्या लेनच्या मधे गाडीला जवळपास घासून गेला. होंडा बद्दलचा रिस्पेक्ट कमी झाला. कुणालाही का विकतात अशा कार्स असे वाटले. ड्रायव्हिंगची टेस्ट घेऊन मगच कार विकली पाहिजे.
मित्रहो, टाटा अल्ट्रोझ डीसीए
मित्रहो, टाटा अल्ट्रोझ डीसीए घेतली. आऊटडोअर्स ने दिलेल्या रेकोचा हीच गाडी घ्यायचा निर्णय घेताना मदत झाली.
टाटा अल्ट्रोझ डीसीए घेतली
टाटा अल्ट्रोझ डीसीए घेतली
>>
वेलकम टू द क्लब
वेलकम टू द क्लब गिरीकंद.
वेलकम टू द क्लब गिरीकंद.
गाडी कशी वाटते आहे?
इथे कोणी Park+ चा FASTag
इथे कोणी Park+ चा FASTag वापरत आहे का? वापरत असल्यास अनुभव कसा आहे???
आडो, अँकी, धन्यवाद.
आडो, अँकी, धन्यवाद.
टाटा आल्ट्रोझ XMA+ Petrol मॉडेल आहे. ऑन रोड ९.८१ लाखाला मिळाली.
या वर्षातले दोन संकल्प होते , गाडी चालवायला शिकायची आणी नविन गाडी घ्यायची. पहिल्या तिमाहीतच दोन्ही संकल्प पुर्ण झाल्यामुळे आणी पहिलीच गाडी असल्यामुळे कार चालवण्याचा आनंद आहेच. सद्ध्या रोज ऑफिसला गाडी घेऊन येतोय जेणेकरुन सगळे फिचर्स लवकरात लवकर समजतील.
काही गोष्टी बदलायचा विचार आहे जसे की हॅलोजन च्या ऐवजी LED headlamps, रिवर्स सेंसरच्या ऐवजी रिवर्स कॅमेरा वगैरे.
रिवर्स सेंसरच्या ऐवजी रिवर्स
रिवर्स सेंसरच्या ऐवजी रिवर्स कॅमेरा वगैरे.
>>
दोन्ही असलेलं बरं.
एकस्टेंडेड वॉरंटी असेल तर मात्र जपून.
ते लोकं अशा कुठल्याही फिटमेंट साठी वॉरंटी संपवतात.
दोन्ही असलेलं बरं. >>> नोटेड.
दोन्ही असलेलं बरं. >>> नोटेड.
एकस्टेंडेड वॉरंटी नाही घेतली.
गिरीकंद, फेसबुकवर असाल तर
गिरीकंद, फेसबुकवर असाल तर ‘टाटा अल्ट्रोझ डिसीए ओनर्स‘ असा ग्रूप आहे तो जॅाईन करा व त्यावर वॅाट्सअॅप ग्रूप जॅाईन करता येईल. तिथे प्रॅाब्लेम्स/शंका विचारता येतील.
असे कार्सचे गृप्स असतात
असे कार्सचे गृप्स असतात त्यांचा नक्की काय उपयोग असतो?
मामी, बरेच जण पहिल्यांदाच कार
मामी, बरेच जण पहिल्यांदाच कार चालवणारे असू शकतात. त्यांना काही प्रश्न असतात. त्याची उत्तरं त्यांना मिळू शकतात. उदा.- आज गाडीत असा असा प्रॅाब्लेम येतोय ते अगदी इन्शुरन्स कोणता घ्यावा? गाडीवर स्क्रॅचेस आले आहेत तर काय करू? मायनर ठोकली आहे गाडी तर इन्शुरन्स कं. ला फोन करावा कां? किंवा मी गाडीत अमुक तमुक अॅक्सेसरीज बसवल्या आहेत अशी मोठ्ठी रेंज असू शकते. कोणत्या माहितीचा आपल्याला केव्हा उपयोग होईल नाही सांगता येत.
ओह हा. आलं लक्षात. थँक्स आडो.
ओह हा. आलं लक्षात. थँक्स आडो.
इथली चर्चा वाचून, बऱ्याच
इथली चर्चा वाचून, बऱ्याच शोरुम च्या वाऱ्या करून, अनेक लोकांचे अनुभव ऐकून शेवटी ह्युंदाई क्रेटा बुक केली आहे. इथलीच चर्चा वाचून addas फीचर नाही घ्यायचे असं ठरवलं त्यामुळे टॉप वर्जन न घेता अलीकडचे वर्जन घेतलं. ऑटो, s(o) ivt.
नवी गाडी घेतलेल्यांचे अभिनंदन
नवी गाडी घेतलेल्यांचे अभिनंदन. घेऊ पाहाणार्यांना बेश्ट आफ लक!
मी वर कुथेतरी लिहिलेलं आहेच पण पुन्हा - कुठल्याही गाडीचं वॅल्यू प्रेपोझिशन एकदा जरूर पाहा. टॉप रेकमंडेड व्हेरीअंट कुठले हे पाहाणं माझ्यामते आवश्यक आहे. कारण आजकाल प्रत्येक कार मध्ये पेट्रोल, डीझेल, बाय फ्यूल, निरनिराळे गिअरबॉक्सेस इ. आणि याच्यावर नंतर फिचर्स असा सगळा गोंधळ असतोच शक्यतो.
www.v3cars.com ही साईट हे फार उत्तमरित्या समजावून सांगते. एकदा जरूर ट्राय करून पाहा.
सान्वी,
सान्वी,
तुम्हाला डीलरने काही Discount Offer केला का..?
मी चौकशी करतोय पण सगळेच डीलर No Discount म्हणून सांगतायत.
ह्युंडाई आपल्या गाड्यांची
ह्युंडाई आपल्या गाड्यांची क्रॅश टेस्ट करते कां? ग्लोबल एनकॅपवर काय रेटिंग्ज आहेत?
मी मागे वाचलं होतं तेव्हा चेक करत नाहीत असं कळलं होतं. काही गाड्यांचं रेटिंग २ स्टार्स वगैरे होतं.
www.v3cars.com ही साईट हे फार
www.v3cars.com ही साईट हे फार उत्तमरित्या समजावून सांगते
>>
Yes
V3 Cars आणि MotorOctane चे यूट्यूब चॅनल पण बरे आहेत. (MotorOctane चा रचित हिरानी काही वेळा शब्दबंबाळ होतो, पण ते इग्नोर करून कंटेंट बघणं बेटर)
मोटर ॲाक्टेनचे व्हिडिओज बघते
मोटर ॲाक्टेनचे व्हिडिओज बघते मी बऱ्याचदा. डीडीएस चॅनल पण करते फॅालो.
Pages