इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
ADAS सोबत अजून एक सेफ्टी फीचर
ADAS सोबत अजून एक सेफ्टी फीचर कारबाईनचं सुद्धा द्यायला हवे
अश्या प्रसंगात उपयोग होईल
थोडं accessories बद्दल
थोडं accessories बद्दल
अल्ट्रोज ला वायर्ड अँड्रॉइड ऑटो आहे, ते वायरलेस कन्व्हर्ट करायला autoflix ची accessory ऑर्डर केली आहे. आली की वापरून मतं देईन.
कुणी ही किंवा या टाईप इतर accessory वापरली आहे का? असल्यास अनुभव शेअर करा.
असंच हेड्स अप डिस्प्ले (OBD+ब्लूटूथ) पण ट्राय करायचं डोक्यात आहे. चांगल्या युनिट्स ची किंमत बऱ्यापैकी आहे (सुमारे २५ हजार), त्यामुळे थोडा रिसर्च करून घेईन. हा प्रकार पण कुणी वापरला असल्यास लिहा. मित्राकडे फोन प्रोजेक्षन टाईप अन् लाईन डिस्प्ले टाईप HUD होते, पण ते फारच बेसिक / फालातू होते. फोन प्रोजेक्षन मधे बॅटरी खूपच ड्रेन होते, डिस्प्ले पण क्लिअर नाही.
डेडिकेटेड स्क्रीन नसलेले HUD विंड स्क्रीन वर प्रोजेक्ट करतात. तिथे स्टिकर लावावा लागतो. ते पण नको आहे.
मी अशा आफ्टर मार्केट
मी अशा आफ्टर मार्केट अॅक्सेसरीज अजून तरी लावल्या नाहीयेत. डॅशकॅम लावायचा आहे केव्हापासून. भविष्यात स्पार्क प्लग्ज व हेड लाईट्स बदलेन असं म्हणतेय.
हेडलॅम्प बदलताना त्या सिस्टम
हेडलॅम्प बदलताना त्या सिस्टम ला सूट होणारेच टाका.
मेकॅनिक लोकं कट आऊट टाकून जास्त क्षमतेचे ( watt ) hedlamp लावतात. ( कट आऊट म्हणजे बहुतेक voltage जास्त करणारे वायरिंग सर्किट) त्यात फ्यूज असतो पण तेव्हा सिस्टीम हिट होउन फ्यूज उडतो तेव्हा फ्यूज शब्दशः वितळलेला असतो. डेंजरस प्रकरण. अनुभव घेउन बसलोय उजेड मात्र छान पडायचा शेवटी शोरूम मध्येच एक वेगळा लॅम्प मिळाला मारुती शिक्का असलेला,ज्याचे फोकस पॉईंट लांबवर होते तो लावला. कंपन्या प्रॉडक्ट मध्येच नीट का देत नाहीत देव जाणे.
हल्लीचे व्हाइट light देणारे LED हेडलाम्प हे पावसाळा आणि धुक्यात डोकेदुखी आहेत चालवणाऱ्याला आणि समोरून येणारयला.
पावसाळा आला कि हॅलोजन लँप
पावसाळा आला कि हॅलोजन लँप पुन्हा टाकायचे. पण हे लक्षात राहत नाही. मी स्वतःच घरी एलईडी लँप टाकलेत. त्यामुळे बॅटरी खूप कमी खर्च होते. रोज एका ठिकाणी भुयारी मार्गातून जाताना हेडलाईट ऑन करावे लागतात. पण नंतर ते बंद करायचे राहून जातात. काही वेळा गाडी पार्क केल्यावर हेडलाईट बंद न केल्याने संध्याकाळी बॅटरी ड्रेन व्हायची. मग धक्कास्टार्ट. त्यासाठी माणसं शोधून आणा इ. एलईडी लावल्यापासून किमान बॅटरी डिस्चार्ज होत नाही.
पावसाळ्यात वेळच्या वेळी बदलण्यासाठी गॅरेज बदललं. तिथला मेकॅनिक पावसाळ्याच्या तोंडावर फोन करून बोलावून घेतो. सर्विसिंगच्या वेळी जुने लँपस बदलून घ्यायचे. आता रूटीन बसले आहे.
डॅशकॅम लावायचा आहे
डॅशकॅम लावायचा आहे केव्हापासून
>>
मला पण...
बाकी accessories लावताना प्लग अँड प्ले टाईप लावल्या नाहीत, अन् वायर टॅप किंवा कट सर्किट लावलं तर वॉरंटी इन्व्हॅलिड होते.
हेड लाईट led मधे कन्व्हर्ट करताना डोक्यात ठेवायची गोष्ट...
कार कम पिक अप ट्रक कुणी
कार कम पिक अप ट्रक कुणी वापरतंय का ?
टाटा सोडून..
अॅंकी, बरोबर. माझ्या
अॅंकी, बरोबर. माझ्या माहितीतला/ओळखीचा असा कोणी कारचं हे काम करणारा नाही म्हणून केलं नाहीये मी अजून. उगाच वायर वगैरे कापली तर वॅारंटीवर गदा यायची. तुझी पण डिसीए आहे कां?
कार कम पिक अप ट्रक कुणी
कार कम पिक अप ट्रक कुणी वापरतंय का ?
टाटा सोडून..
फिबा, नाशिकचे एक माबोकर आहेत, त्यांच्या इकडे ISUZU पीक अप आहे. अधिक माहिती हवी असल्यास विपुत देतो.
डॅशकॅम लावायचा आहे
डॅशकॅम लावायचा आहे केव्हापासून
>>
मला पण...कोणी सुचवू शकेल का? मला बॅटरी ड्रेनची भीती वाटते आहे, म्हणून प्लग अँड प्ले टाईप हवा आहे. मिळतो का?
अधिक माहिती हवी असल्यास विपुत
अधिक माहिती हवी असल्यास विपुत देतो. >>> अनुभव शेअर करता आला तर बरं होईल.
फिबा, त्यांच्या नुसार तर गाडी
फिबा, त्यांच्या नुसार तर गाडी एकदम बेस्ट आहे. रोजच्या वापरात आहे. त्यांच्या फुलांचा व्यवसाय आहे. त्यासाठी मुख्य वापर करतात. ट्रेकसाठी पण गाडी वापरतात. नेमक ज्या ट्रेकला गाडी आणली होती तेव्हा मी जाऊ शकलो नाही आणि नंतर मी इकडे आलो. बाकी आमचे नेहमी बोलणे होते आणि जर त्यात गाडीचा विषय निघाला तर ते गाडी बद्दल खुश आहेत असेच वाटते. माझा आणि गाडीचा प्रत्यक्ष संबंध आला नाहीये त्यामुळे मी खूप काही सांगू शकणार नाही. आणि ते अगदी helpful person आहेत, म्हणून त्यांच्या नंबर देता येईल या साठी ते लिहिले होते.
तुझी पण डिसीए आहे कां >> हो
तुझी पण डिसीए आहे कां
>>
हो
आमचा अल्ट्रोझ डिसीए ओनर्सचा
आमचा अल्ट्रोझ डिसीए ओनर्सचा एक वॅाट्सअॅप ग्रूप आहे त्या ग्रूपमधल्या बऱ्याच जणांनी हा खाली दिलाय तो डॅशकॅम लावला आहे.
70mai Pro Plus+ A500S Dual Channel Car Dash Cam, 2.7K, 5MP IMX335 Sensor, ADAS, Built-in GPS Logger, Route Recorder, App Playback & Share, Optional Parking Monitoring
धन्यवाद आउटडोअर्स.
धन्यवाद आउटडोअर्स.
70mai Pro Plus+ मध्ये फ्रंट आणि रिअर असे दोन्ही कॅम आहेत. रिअरचा विचार नव्हता, पण फक्त फ्रंट घेण्यापेक्षा दोन्ही कॅम असणे फायदेशीर आहे. बघतो लोकल मार्केट मध्ये मिळतो का.
काही वेळा गाडी पार्क केल्यावर
काही वेळा गाडी पार्क केल्यावर हेडलाईट बंद न केल्याने संध्याकाळी बॅटरी ड्रेन व्हायची.
माझ्याकडे आधी डीझायर होती. जर पार्क केल्यावर दिवा बंद करायच्या आधी जर किल्ली काढली तर अलार्म वाजायचा. त्यामुळे हा प्रकार कधीच व्ह्यायचा नाही. तुमच्या गाडीत अशी सोय नाही का?
तसेच आता किया कॅरेन्स आहे. काही दिवसापुर्वी हाच प्रकार झाला. दिवे चालून ठेऊन किल्ली काढली. अलार्म वगैरे काही वाजला नाही पण काही सेकंदांनी गाडीने हे ऑटोमॅटीकली बंद केले. नंतर परत आल्यावर जेव्हा गाडी अनलॉक केली तेव्ह दिवे परत लागले आणि त्यावेळी मी बंद न करता गेलो होतो हे कळले. त्यामुळे दिवे चालू ठेऊन बॅटरी ड्रेन व्ह्यायची शक्यता कमी आहे.
2009 ला अशा सोयी ऐकल्या
2009 ला हे फीचर होते का?
योगी९००, किया कॅरेन्सचा काय
योगी९००, किया कॅरेन्सचा काय अनुभव आहे..?
कृपया तपशीलवार लिहिणार का..?
@अ'निरु'द्ध आधी लिहीला आहे..
@अ'निरु'द्ध आधी लिहीला आहे... आपल्याच प्रतिसादाची कशी लिंक द्यायची ते माहित नाही. खालिल पानावर माझा मोठा प्रतिसाद पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/11451?page=62
ओके, ओके.. वाचतो..
ओके, ओके.. वाचतो..
वाचला.. धन्यवाद..
३) front parking sensor हे
३) front parking sensor हे चांगले फिचर आहे. पण बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये फार त्रास देते. पुढच्या गाडीच्या जरा जवळ गेले तर हे सेंसर बोंबलायला लागतात. हे सेंसर बंद करायचे बटण पण आहे पण गाडीच्या सॉफ्टवेअर चे लॉजिक असे आहे की थोडा वेळ गाडी चालवली की परत हे सेंसर चालू होतात. बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये ह्याचा त्रास होतो.
हे जेव्हा लिहीले तेव्हा माहित नव्हते की front parking sensor चे अॅटोमॅटीक फिचर ON/OFF करता येते. ते जर OFF केले तर हा त्रास होत नाही.
2009 ला हे फीचर होते का?
2009 ला हे फीचर होते का?
काही कल्पना नाही. कुठली गाडी त्यावर पण अवलंबून असेल. पण माझी आधीची डीझायर २०१३ ची होती. कॅरेन्स तर नवीनच आहे.
माझ्यामते आजकालच्या सर्व गाड्यांमध्ये हे फिचर असेल.
इथे ६३ व्या पानावर महिंद्रची
इथे ६३ व्या पानावर महिंद्रची थार कोणी घेतली आहे कां असं विचारलं आहे. मी अगदी आत्ताच थारमधून (पहिली आणि शेवटची) पुण्याच्या आसपास ट्रिप करून आले. तर त्याबद्दल माझे चार आणे.
मला जीपसद्रृश गाड्या आवडत नाहीत किंवा त्यांचं फॅसिनेशनही नाहीये. काडेपेट्या वाटतात त्या मला त्यांचं डिझाईन बघून. त्यामुळे अर्थातच थारही मला कधीच आवडली नव्हती. रस्त्यावर दिसली तरी माझ्या कपाळावर नकळत एक आठी येते.
तर…आम्ही दोघी मैत्रिणी व ड्रायव्हर असे होतो. बर्ड फोटोग्राफीला गेलो होतो त्यामुळे कॅमेरा बॅग, ट्रायपॅाड, कपड्यांची बॅग असं सामान होतं. बूट स्पेसच नाही गाडीला त्यामुळे अर्थातच काही सामान मागच्या सीटवर ठेवावं लागलं.
गाडी खरंतर दोनच माणसांसाठी आहे (मग डिझाईनही तसंच कां नाही केलंय देव जाणे). मागे सीट न देता सामानासाठीच जागा ठेवायला हवी होती. रिअर पॅसेंजर बसणं अपेक्षित नसल्यामुळे असेल त्याचा विचारच केला नाहीये. कारण गाडीत शिरायला मागे दारच नाहीये त्यामुळे प्रत्येक वेळेस द्राविडी प्राणायाम करत गाडीत शिरावं लागतं. पुढच्या पॅसेंजरची पाडून किंवा मग ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या मधून मागे जायचं.
गाडी ४*४ असल्याने पुढच्या पॅसेंजर्सना अॅाफरोडिंगची मजा आली तरी मागच्यासाठी ती सजा होऊ शकते असं वाटलं. कदाचित मला त्या प्रकाराची आवड नसल्यानेही मला तसं वाटत असेल.
गाडीत बाहेरचा नॅाईसही खूप येत होता. इतका की बऱ्याचदा मला मैत्रिणीचं बोलणंही नीट ऐकू येत नव्हतं. त्या गाडीच्या इंटिरिअरमुळे येतो असं कळलं.
आम्ही गेलो ती गाडी अॅाटो पेट्रोल होती. प्रचंड तेल पिते असं कळलं व अनुभवही आलाच.
त्यामुळे मला त्या गाडीत सगळे कॅान्सच दिसले. माझ्याकडून शून्य मार्क थारला.
>>डॅशकॅम लावायचा आहे
>>डॅशकॅम लावायचा आहे केव्हापासून >> मला पण...कोणी सुचवू शकेल का? मला बॅटरी ड्रेनची भीती वाटते आहे, <<
मी सुरुवातीला प्लग-प्ले वाले वापरले, पण त्यांच्यात बरीच लिमिटिशेन्स आहेत. गेल्या ३ वर्षांपासुन माझ्या ट्रकमधे हा डॅश्कॅम लावलेला आहे. अजुन तरी काहि तक्रार नाहि. बेस्ट-बाय कडुन इंस्टाल ($६०) केल्यामुळे लटकत्या वायर्स वगैरे प्रकार नाहि. यात एक पार्किंग फिचर आहे - गाडी पार्क करुन गेल्यानंतर गाडीजवळ काहि मुवमेंट झाली तर ती रेकॉर्ड होते. रियर कॅमेरा ट्रकच्या बेडवर देखरेख ठेवतो. हा सगळा प्रकार गाडी बंद असताना होत असल्याने बॅटरी थोड्या प्रमाणात ड्रेन होते, परंतु इंपॅक्ट मिनिमल. फोनवर अॅप आहे, रेकॉर्डिंग तपासण्या करता.. ओवरॉल गुड वॅल्यु फॉर मनी...
त्यात बहुतेक बॅटरी ड्रेन
त्यात बहुतेक बॅटरी ड्रेन प्रोटेक्शन असते. बॅटरी व्होल्टेज एका पातळी खाली गेले की कॅमेरा बंद होतो.
थार, एक्स्यूव्ही ७०० पेट्रोल
आडो ला मम + मम![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
थार, एक्स्यूव्ही ७०० पेट्रोल मध्ये घेणं पापे. २००० सीसी चं पेट्रोल इंजिन काय मायलेज देणार? त्यात ४ बाय ४ + ऑटो असेल तर हरे राम. ६-७ किमी प्रतीलिटर पेक्षा जास्त मायलेज मिळणं मुश्कील असेल माझ्यामते. राईड कंफर्टही सो सो स्पे. थार मध्ये.
दिल्ली एनसीआर वाल्या लोकांकरता ठीक आहे पेट्रोल पण डिझेल चे वेगळे इश्यूज आहेतच, रनिंग नसेल तर.
रोड प्रेझेंन्स, लूक्स याकरता थार, स्कॉर्पिओ या गाड्या घेतल्या जातात.
सगळ्यात चांगला कंफर्ट हा शक्यतो सेदान मध्ये मिळतो. बूट्स्पेसही चांगली असते. एक ग्राउंड क्लिअरंस चा विषय सोडला तर सेदान तुललेने मायलेज सुद्धा चांगलं देतात आणि रस्त्यावर (स्पे. हायवेज) स्टेबलही असतात.
अर्थात ही नेहेमीप्रमाणे माझी मतं.
योगी९०० या फिचर ला फॉलो मी
योगी९०० या फिचर ला फॉलो मी हेडलॅम्प्स असं नाव आहे.
योकु, छान पोस्ट
योकु, छान पोस्ट
रोजच्या वापराला, एकट्याला (गर्दीत असेल तर) छोटी कार असावी.
सहलीसाठी किंवा 50 किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी सेदान, एसयूवी, एमयुव्ही असावी. काही जण म्हणतात कि 20 लाखाच्या पुढे कार घेऊन पडून राहत असेल तर गरज लागेल तेव्हा ओला /उबेर परवडते. या मताशी पूर्णपणे सहमत आहे. पण घरी वयस्कर लोक असतील तर हक्काची गाडी ठेवावी लागते. रात्री बेरात्री गरज पडली तर.
इनोव्हा विकणार होतो पण एवढ्या एका कारणासाठी राहिली.
मध्य लोक इसुझू खूप महाग आहे.
मध्य लोक इसुझू खूप महाग आहे. रफ वापरासाठी मी बघत होतो. रस्ते नसलेल्या डोंगरदऱ्यात माती, विटा, दगड वाहून नेण्यासाठी आणि कामगार असं स्वरूप आहे. पूर्वी टाटा पिक अप होती.
![IMG-20240122-WA0010.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80263/IMG-20240122-WA0010.jpg)
इसुझू फॅमिली कारच आहे जवळपास. घरगुती सामान न्यायला ठीक. टाटा पिक अप तीन वेळा पलटी झाली डोंगरात. पुन्हा वापरली. त्या वेळी महिंद्राचं एक सेम मॉडल होतं. ते अजिबात दगा देत नव्हते. आता नाही मिळत ते.
त्या वेळी महिंद्राचं एक सेम
त्या वेळी महिंद्राचं एक सेम मॉडल होतं. ते अजिबात दगा देत नव्हते. आता नाही मिळत ते.>>>>
महिन्द्रा इन्व्हेडर होती. डुएल कॅब. स्कॉर्पिओ आणि बोलेरो मध्ये ह ओप्श्न्न होता. बोलेरो इन्व्हेडर ला ग्रामीण भागात तुकडा बोलेरो म्हणतात. महिन्द्रा पिकप पणडुअएल ओप्सऑप्शन आहे बहुतेक पण लोजिस्टिक्स वाले सिंगल कॅबिन वापरतात मोठ्या हौद्यासाठी म्हणून. ती स्टेबल आहे बरीच.
Pages