मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.
नुकतंच अॅमेझॉन बेसिक्सचं १००जीएसम जाडीच्या कागदांचं स्केचबुक घेतलंय. मोह आवरुन कुठल्याही नवीन पेन्सिल्स घेतल्या नाहीयेत. २०२४चे हे पहिलेच रेखाटन. आणखी सातत्याने, आळशीपणा न करता रेखाटने केली तर नवीन पेन्सिलींचे रिवॉर्ड घ्यायचे असे ठरवलेय. हा यंदाचा एक संकल्प आहे. बघूया!
हॅपी न्यू इयर!
मांजरडोळे - कलर्ड पेन्सिल स्केच
Submitted by वर्षा on 14 January, 2024 - 17:53
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर काढले आहेत, अगदी जिवंत
सुंदर काढले आहेत, अगदी जिवंत भाव आहेत. छान संकल्प, येऊ द्यात.
सुंदर रेखाटन वर्षा.
सुंदर रेखाटन वर्षा.
सुंदर!
सुंदर!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
केवळ सुंदर
केवळ सुंदर
खूप सुंदर!
खूप सुंदर!
अप्रतिम!
अप्रतिम!
अगदी फोटोच वाटतोय. शेडिंग
अगदी फोटोच वाटतोय. शेडिंग अप्रतिम आहे.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
काय जबरी ___/\___
काय जबरी ___/\___
इतक्या कमी रंगांचा वापर करून! तुसि ग्रेट हो
खूपच सुन्दर!
खूपच सुन्दर!
फोटो काढ्ल्याइतके जिवन्त
फोटो काढ्ल्याइतके जिवन्त वाटतायत..
सुंदर
सुंदर
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
अप्रतिम!
अप्रतिम!
किती छान
किती छान
सुंदर! ❤️
सुंदर! ❤️
सुपरक्लास. बघत राहावंसं
सुपरक्लास. बघत राहावंसं वाटतंय.
वाह सुरेख.. चित्र वाटतच
वाह सुरेख.. चित्र वाटतच नाहीये
अप्रतिम ..
अप्रतिम ..
फारच भारी!
फारच भारी!
जबरदस्त.
जबरदस्त.
किती सुंदर वा वा वा!!!
किती सुंदर वा वा वा!!!
खूपच छान. ..!कोणत्या पेंसिल्स
खूपच छान. ..!कोणत्या पेंसिल्स वापरल्या आहेत ?
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
@स्वान्तसुखाय मी या वापरल्या: Faber Castell F110012 Polychromos Colour Pencils Tin Of 12
>>इतक्या कमी रंगांचा वापर करून
हो अवल. फार शेड्स लागल्याच नाहीत. बारा शेड्सचा बेसिक सेट आहे. त्यातल्या काळी, पोपटी, डार्क हिरवी, ब्राऊन आणि पिवळी याच वापरल्या.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
मस्तच ... तू खूप पूर्वी
मस्तच ... तू खूप पूर्वी टोमॅटो च स्केच इथेच दाखवलं होतंस , ते ही अजून ही लक्षात आहे.
जबरदस्त!
जबरदस्त!
निव्वळ अफलातून.
निव्वळ अफलातून.
भारी !!
भारी !!
Pages