मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.
नुकतंच अॅमेझॉन बेसिक्सचं १००जीएसम जाडीच्या कागदांचं स्केचबुक घेतलंय. मोह आवरुन कुठल्याही नवीन पेन्सिल्स घेतल्या नाहीयेत. २०२४चे हे पहिलेच रेखाटन. आणखी सातत्याने, आळशीपणा न करता रेखाटने केली तर नवीन पेन्सिलींचे रिवॉर्ड घ्यायचे असे ठरवलेय. हा यंदाचा एक संकल्प आहे. बघूया!
हॅपी न्यू इयर!
मांजरडोळे - कलर्ड पेन्सिल स्केच
Submitted by वर्षा on 14 January, 2024 - 17:53
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
जबरदस्त
जबरदस्त
Pages