भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पान, कात, चुना, सुपारी आणि पंचम म्हणजे तंबाकू. Happy
पुलंच्या (बहुधा) पानवाल्यात हे वर्णन आलं आहे.

तंबाखूयुक्त पानात 120, 300 इत्यादी आकडे ऐकले होते. परंतु या आकड्याचा असा संबंध आज समजला Happy

पानावरुन आठवले :

सरदारांना / सेनापतींना “पाचा पानाचा विडा देणे”असे जुन्या दरबारी मराठी पत्रात वाचलयं.

नेमकं आठवत नाही पण order of termination - पदमुक्तीचा आदेश असा अर्थ होता.

पदमुक्तीचा आदेश
या अर्थी ' श्रीफळ देणे' असाही वा प्र आहे.

हो Happy

सोबत शाल दिली तर सत्कार नाही तर पदमुक्ती

पानांची 'पंचम' चर्चा आवडली. मामींचे वरणही भलतेच आवडले आहे.

अनिंद्य, छान माहिती. एकाच शब्दाचे वाक्प्रचार व म्हणींमधे लपलेल्या अर्थछटा अगदी मजेदार असतात.

पान आणि विडा यात सुद्धा बराच फरक असतो.
पानावरून उठणे, याशिवाय पान न हलणे, विडा उचलणे, तोंडाला पानं पुसणे.

पान आपले साधे आणि विडा रोमॅन्टिक वाटतो. 'असा रंगला विडा, अशा रंगल्या राती' नावाची कथा रणजित देसाई यांच्या 'गंधाली' नावाच्या कादंबरीत आहे. भलतीच रोमॅन्टिक आहे, त्यामुळे विड्याची मनातली प्रतिमाच बदलली. Happy

विड्याचा रोमांस + १

पटकन मात्र खानाने उचललेला विडाच आठवतो Happy आणि पान म्हटले की रसपान आणि मदिरापान !

सेम अर्थाचा तांबूल जरा पुस्तकी थाटाचा शब्द.

“पान” चर्चेत अजून एक भर :

विंचू चावल्यास “काटा मोडला” आणि साप चावल्यास “पान लागलं” असं म्हणतात. साप-नाग-विंचू अशी नावं घेऊन बोलल्यास विष जास्त चढते असा समज त्यामागे आहे.

काटा मोडला >>> छान.
याचा अजून एक अर्थ :

काटा मोडणे = किंचित उष्ण होणें.
( थंड पाण्याचा थोडा काटा मोडला)

मस्तच.
>>>पानांची 'पंचम' चर्चा आवडली.>>>+९९

व्यसन
या शब्दाचा संकट हा देखील एक अर्थ आहे.

'समानशीले व्यसनेषु सख्यं '
या मध्ये संकट शब्द दोन्ही अर्थानी (नाद; संकट ) वापरता येतो.
..
व्यसन
Addictedness. A bad habit; a vice. A calamity.
(वझे शब्दकोश)

समान व्यसनाचें सख्य-न. १ एकाच व्यवसायाच्या, आवडीच्या, संवयीच्या माणसांची एकी. २ संवय इ॰ च्या सारखेपणामुळें होणारें सख्य. ३ सारख्याच संकटात पडलेल्याचें सख्य. ४ सामान्य विपत्तीमुळें होणारें सख्य.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%...

घोरकष्टोद्धरण स्तोत्र असेही वाचलेले आहे तसेच घोरकष्टोद्धारण स्तोत्र असेही वाचलेले आहे.
बरोबर काय आहे? द्ध की द्धा? उद्धरण की उद्धारण?
अजुन एक - उद्धार या शब्दाशी काही नाते आहे का?
रामाने, अहिल्येचा उद्धार केला.
उद्धरण म्हणजे काय? वर काढणे का?

स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयीचे लेखन वाचत असतांना दोन ठार अपरिचित शब्द आले. दोन्ही शब्द याआधी कधीही ऐकले-वाचले नाहीत म्हणून अर्थासह इथे डकवतो आहे :

मायगोसावीण आणि कनकवर

कनकवर = कधीच मासिक पाळी न आलेली, न येणारी, मासिकधर्म बंद झालेली तरुण स्त्री.

मायगोसावीण = सवाष्ण विधवा (!)

याबद्दल बृहद्कोशातील माहिती खालीलप्रमाणे :

राजरा किंवा राजेश्वरी देवीच्या कुलधर्मात सवाष्ण म्हणून सांगितलेली विधवा. या कुलधर्मांत एक घरचें मेहूण, एक बाहेरचें मेहूण, एक ब्राह्मण, एक सुवासिनी, एक ब्रह्मचारी आणि एक विधवा अशीं साडेसात माणसें (ब्रह्मचारी अर्धा माणूस) भोजनास बोलवतात. या विधवेला “मायगोसावीण” म्हणतात व देवी मानून तिचें पूजन करितात.

कनकवर = कधीच मासिक पाळी न आलेली, न येणारी, मासिकधर्म बंद झालेली तरुण स्त्री.
हे वैद्यकीयदृष्टया दुर्मिळ उदाहरण असेल ना ?

मायगोसावीण = सवाष्ण विधवा (!)
((एक विधवा अशीं साडेसात माणसें (ब्रह्मचारी अर्धा माणूस) भोजनास बोलवतात. या विधवेला “मायगोसावीण”...)))

म्हणजे या पूजेनंतर तिला सवाष्ण विधवेचा दर्जा मिळतो का ?

नो आयडिया !

मला दोन्ही शब्द आणि त्यांचे अर्थ नवीनच आहेत

वैद्यकीयदृष्टया दुर्मिळ उदाहरण …. याबद्दल डॉक्टर कुमार सांगू शकतील.

वैद्यकीयदृष्टया दुर्मिळ >>>
स्वासु, बरोबर.

१. कधीच पाळी न येण्यामागे मेंदूतील hypothalamus/ pituitary या ग्रंथींचे मोठे बिघाड किंवा शरीररचनेतील मोठे दोष असतात.
२. सर्व लैंगिक अवयव नॉर्मल असूनही वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत पाळी न येणारी उदाहरणे असतात - लोकसंख्येच्या सुमारे १%

माझ्या ओळखीतील एका मुलीला गर्भाशयच नव्हते त्यामुळे तिला पाळीच कधी आली नाही. मात्र पुढे तिचे एका विधुराशी लग्न झाले.

[सं. नक्तं = रात्र]>>>>> करंज वृक्षाला संस्कृतमध्ये नक्तमाल म्हणतात.
रात्रीशी निगडित अर्थ आहे काहीतरी.....

करंज वृक्ष
याला बृहदकोशाने मुद्रांचें झाड असेही म्हटले आहे.
रात्रीचा संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C

या झाडाची मोत्यासमान फुले रात्री गळल्यानंतर फार सुंदर दिसतात.

सांडणे
या शब्दाचा हरवणे हा देखील अर्थ असून तो कोल्हापूर भागात प्रचलित आहे.

“बुगडी माझी सांडली ग ..” या गाण्यात तो अर्थ अभिप्रेत आहे.
..

Pages