नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नर्मदे हर!
विषयच इतका भारी की नक्की वाचणार.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत

फोटोज मस्त आहेत.सुरुवात पण.

भाग इथेच आणलेत तर वाचायला मजा येईल(अर्थात ब्लॉग वर पण वाचायला हरकत नाही, पण इथे प्रतिसाद चर्चा होते.)

लेखाअखेरच्या फोटोत एकदम तेजस्वी साधू दिसताय.नारायण धारपांच्या अशोक समर्थ कॅरेक्टर चा रोल कोणी करावा, असं विचारल्यास तुमचा हा फोटो डोळ्यासमोर येईल.

नर्मदे हर हर! ___/\___

नर्मदा माईची ओढ आहेच. करोनापुर्वी २-३ वर्ष लागोपाठ नर्मदा माईला भेट दिली..अर्थात आपण कोण जाणारे? शेवटी तिचीच ईच्छा असते.

आजवर परिक्रमेवरची अनेक पुस्तके/ब्लॉग वाचुन काढले.. युट्युबवर पण पाहिले. अगदी सर्वात पहिली परिक्रमा करणारे कोकणातील र.रा. गुणे यांच्या पासुन तर जगन्नाथ जी कुंटे , सतिश चुरी, भारतीताई ठाकुर, सुरुची यांचा ब्लॉग..
आपण इथे पहिला धागा टाकल्याबरोबर , धीर नव्हता म्हणुन आपल्या ब्लॉगचेही २०-२५ भाग धडाधड झपाटल्यासारखे वाचुन काढले. Happy
जबरदस्त झालीय परिक्रमा! आपणास सादर प्रणाम! ___/\___

आणखी एक गम्मत झाली... की दिवाळीपुर्वी घरातली सगळी धार्मिक पुस्तके (मग त्यात परिक्रमेवरची पण होती), ती एखाद्या लायब्ररीला देउ म्हणुन बाहेर काढली. ऑफीसच्या आणि एका लायब्ररीला विचारुन ही झाले. पुस्तकांचा बॉक्स दहावेळा बाहेर काढला, पुन्हा मधे ठेवला. आणि काही कारणाने पुस्तके द्याय्चे राहुन गेले.
मायबोली चाळतांना मधेच परिक्रमेचे आपले अनुभव टाकण्यासाठी टाकलेला आपला धागा दिसला अन कान नव्हे नव्हे डोळे टवकारले गेले. अन आता वाटतेय.. ती पुस्तके देउ नये ही मैय्याचीच इच्छा दिसते आहे. Happy

फार जुनी इच्छा आहे परिक्रमा करायची, पूर्ण होईल का माहित नाही, पण तुमच्या लेखानातून मानस परिक्रमा नक्की घडेल. त्यामुळे नक्की लिहा इथं. तुमच्या ब्लॉग वर जाऊनही वाचता येईल पण इथं वाचायला जास्त आवडेल

तुमच्या ब्लॉगवर वाचतेय. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक दिली असतीत तर जास्त सोयीस्कर पडलं असतं. प्रत्येक भागानंतर अनुक्रमणिकेला जावं लागतंय.

या खूप सुंदर विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद..
<<२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो>>
याचा प्रत्यय दोन्ही फोटोत स्पष्ट दिसतो, विशेषतः डोळ्यात..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

सुंदर लिहीले आहे आणि फोटोही सुंदर! ब्लॉगवर काही लेख वाचले.

भाग इथेच आणलेत तर वाचायला मजा येईल(अर्थात ब्लॉग वर पण वाचायला हरकत नाही, पण इथे प्रतिसाद चर्चा होते.) >>> सहमत.

अप्रतिम आहे blog. मी देखील ३२ भाग एकामागोमाग एक वाचून काढले. आता पुढच्या भागांची ओढ लागली आहे

तीन एक वर्षांपूर्वी नर्मदा परीक्रमे विषयी पहिल्यांदा utube व्हिडिओ बघितला.
तेव्हापासून उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतरही काही चुरस गोष्टी पत्यक्ष गेलेल्यांकडून ऐकायला मिळाल्या.
पहिल्यांदाच इतके फोटो ही बघायला मिळाले.

आता जमेल तसा तुमचाही ब्लॉग / किंवा इकडे टाकलात तर इकडे वाचन.

अजून छायाचित्र कसे लेखामध्ये बसवायचे / घुसवायचे याचे तंत्र मला अवगत झालेले नसल्याम>>> दोन img tags मध्ये एक लाईन सोडून - द्या म्हणजे चित्र वेगळी दिसतील.

सर्व वाचकांचे व प्रशंसकांचे तसेच सल्लागारांचे शतशः आभार ! या लिखाणास इतका हृद्य प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे . आपण फक्त एक परिक्रमा वासी ! नर्मदे हर ! आताशी १५ दिवसांचे अनुभव लिहून झालेले आहेत पुढील १५० दिवसांचे अनुभव लिहीण्यास निश्चितच हुरूप आला आहे . मला एक डायरी व पेन फुकट देऊन लिहीण्यास प्रवृत्त करणारा अज्ञात दुकानदार व जाता येता " बाबा जी एक फोटू " म्हणत फोटो काढून मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठविणाऱ्या शेकडो नर्मदातट वासी छायाचित्रकारांचे विशेष आभार मानले पाहीजेत . नुसत्या वर्णनाने प्रसंगचित्र उभे करण्या इतकी प्रज्ञा या पामरा जवळ खचितच नाही . चित्रे ते काम सोपे करतात . अजूनही काही सूचना असतील तर आवर्जून कराव्यात ही प्रार्थना ! नर्मदेऽ ऽ ऽ हर !

.तुमची शैली रसाळ आहे. >>>>> +111
मी तुमचे ब्लॉग वरचे लेख वाचले. छान आहेत.

जाता जाता एक वैधानिक इशारा - ज्या उत्कट श्रद्धेने तुम्ही लेख लिहिले आहेत त्या श्रद्धेची मायबोलीवर टिंगलटवाळी होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की. तशी मानसिक तयारी ठेवूनच इथे पोस्ट करा.

ला एक डायरी व पेन फुकट देऊन लिहीण्यास प्रवृत्त करणारा अज्ञात दुकानदार व जाता येता " बाबा जी एक फोटू " म्हणत फोटो काढून मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठविणाऱ्या शेकडो नर्मदातट वासी छायाचित्रकारांचे विशेष आभार मानले पाहीजेत>> मस्त

छान सुरबात. सगळे अनुभव लिहा. वाचायला आवडेल.

श्री जनार्दन कुंट्यांचे नर्मदे हर वाचुन समस्त जनांसारखी मलाही सुरसुरी आलेली. यु त्युबवर सौ. चितळे यांचे अनुभव ऐकले. इतर काही जणांचेही अनुभव ऐकले. नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. सगळ्यांनाच अश्वत्थामा भेटायला लागल्यावर अश्वत्थाम्यावरचा विश्वास उडायला लागला Happy

ईच्छा आजही आहे पण कितपत जमेल हे माहित नाही आणि सर्व व्याप सोडुन परिक्रमा करेन एवढे निर्मम मन अजुन झालेले नाही. एकट्याने करायचे म्हणजे खुपच धैर्य गोळा करावे लागणार. ते कितपत जमेल माहित नाही.

चमत्कारांपलीकडे जाऊन परिक्रमावासीचे एक वेगळे व्यक्तिमत्व कसे घडत गेले. विचारांमध्ये का, कसा व कुठल्या थेट किंवा अप्रत्यक्ष घटनांमुळे फरक पडत गेला हे वाचावेसे वाटते. तुमच्यात फरक पडला हे लिहिलेत, तोही प्रवास कसा झाला हे वाचायला आवडेल.

ब्लॉगची लिंक देण्यापेक्षा इथे लिहा.

- ज्या उत्कट श्रद्धेने तुम्ही लेख लिहिले आहेत त्या श्रद्धेची मायबोलीवर टिंगलटवाळी होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की. तशी मानसिक तयारी ठेवूनच इथे पोस्ट करा. >>>>>

हो, हे इथे होणारच कारण इथे मिक्स क्राऊड आहे. पण तुमचा आत्मिक प्रवास खरोखरच तुम्ही लिहिलात तसा झाला असेल तर टीकेची पर्वा करायची तुम्हाला गरज पडायला नको.

ला एक डायरी व पेन फुकट देऊन लिहीण्यास प्रवृत्त करणारा अज्ञात दुकानदार व जाता येता " बाबा जी एक फोटू " म्हणत फोटो काढून मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठविणाऱ्या शेकडो नर्मदातट वासी छायाचित्रकारांचे विशेष आभार मानले पाहीजेत>>>>

हे लिहिल्याबद्दल आभार. सोबत काही घेतले नाही हे वाचल्यामुळे फोटो कसे काढले गेले हे कळत नव्हते.

ज्या उत्कट श्रद्धेने तुम्ही लेख लिहिले आहेत त्या श्रद्धेची मायबोलीवर टिंगलटवाळी होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की. तशी मानसिक तयारी ठेवूनच इथे पोस्ट करा. >>>>>

हो, हे इथे होणारच कारण इथे मिक्स क्राऊड आहे. पण तुमचा आत्मिक प्रवास खरोखरच तुम्ही लिहिलात तसा झाला असेल तर टीकेची पर्वा करायची तुम्हाला गरज पडायला नको.>>> हे पटलं

सौ. चितळे>> नाव आठवत नव्हतं.. मी पण ह्यांचेच व्हिडिओ बघितलेला.

स्वतः परिक्रमा करण्यापूर्वी मी स्वतः देखील परिक्रमेचे सर्व श्रेय नर्मदा मातेला देणाऱ्या लोकांची मनातल्या मनात का होईना पण टिंगल टवाळी करणाऱ्यांपैकीच एक होतो हे प्रामाणिकपणे नमूद करतो . त्यामुळे मी त्यांची भावना समजू शकतो . जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत अनुमान हाच श्रेष्ठ गुरु असतो ! मी स्वतः अतिशय नास्तिकतेकडे झुकणारा मनुष्य आहे . विज्ञाननिष्ठा हा माझ्या जीवनाचा पाया राहिलेला आहे . त्यामुळे नर्मदेविषयी आलेल्या बहुतांश अनुभवांची माझ्या परीने चिकित्सा करून ते सोपे करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे . परंतु मला आलेले अनुभव नाकारून ते लपवून ठेवण्याचे दुष्कर्म मात्र माझ्या हातून कदापि घडणार नाही . जे आहे ते आहे आणि जसे आहे तसेच लिहिले आहे . म्हणून सुरुवातीलाच सांगितले आहे की अनुभव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार असतो . एखाद्या स्त्रीकडे पाहून मला आई असा अनुभव येत असतो त्याच स्त्रीकडे पाहून माझ्या वडिलांना पत्नीचा अनुभव येत असतो . जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ! नर्मदे हर !

Pages