नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तरी टिंगल करत नाहीये. इथली चर्चा वाचून माझे मत बदलले हे इथे मी लिहिले तर त्यात काय चूक?
अर्थात कमोड इत्यादी टिंगल नाहीये हे जाणून आहेच.

<<<फारफेच्ड (in lieu of अजुन विज्ञानाने सिद्ध केलेले नाही.) तेव्हा होइल की नाही माहीत नाही पण अजुन तरी पुरावा नाही.>>>

सिद्ध होण्याची शक्यता जवळ जवळ नाही हे सांगण्याचा मी प्रयत्न करतेय. आपल कपाळ जिथुन सुरू होते (साधारण भुवया जिथे असतात) तिथुन ते मान जिथे सुरू होते तिथपर्यंत कवटीच्या आत असलेल्या पोकळीत मानवी मेंदू आहे. प्रिफ्रंटल कॉर्टेक्स आणि हिपोकॅंपस ह्यामधील अंतर हे साधारण चार बोटे ते अर्धी वित इतकं असावं असं ढोबळ मानाने गृहित धरून चालू. ह्या दोन मेंदुच्या भागांमध्ये कुठलही कठीण आवरण (physical barrier) नाही. तरीही हिपोकॅंपस आणि प्रिफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये निर्माण झालेले तरंग दुसर्या भागात पोहचु शकत नाहीत. म्हणून दोन भाग वेगवेगळ्या फ्रिक्वेंसिवर कार्यरत आहेत. ह्याच मुख्य कारण म्हणजे ते इतके क्षीण आहेत की त्यांचं प्रभावक्षेत्र हिपोकॅंपस किंवा प्रिफ्रंटल कॉर्टेक्स मधील पेशी इतकंच मर्यादित आहे. मग असं असताना एका प्रिफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये विचारांद्वारे निर्माण झालेले तरंग कवटीचे कठीण आवरण भेदून साधारण एक किमी परिघात किमान १ मी (विचार निर्माण होण्यासाठी लागणारा ढोबळ वेळ) ते एक तास सातत्याने प्रसारित होत राहुन त्या परिघात प्रवेश करणार्या अनुकूल व्यक्ती च्या मेंदुत शिरुन त्याच पदार्थाचा विचार निर्माण करतील हे होण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य आहे.

धन्यवाद पर्णीका. खरे आहे. पटले. कळकळही पोचली. बरेचदा तर अज्ञानाची किंवा कमेन्टची दखलही घेतली जात नाही तिथे तुम्ही जीव तोडून इतके एक्स्प्लेन करताय. धन्यवाद.

मला तर या धाग्यावर खूप माहिती मिळत आहे अनेक विषयांवर: उदा: brain waves, neuropathy, telepathy, chemistry, biology, physics, statistics, परिक्रमावासी स्त्रियांवरती दरोडेखोरांनी बलात्कार केलेला आहे वगैरे वगैरे.
पुढील विज्ञानकथेसाठी केशवकूल यांना पण बराच कच्चा माल मिळेल अशी आशा आहे.

<< अज्ञानाची किंवा कमेन्टची दखलही घेतली जात नाही >> हे साफ चूक आहे. प्रत्यक्ष हा धागाच त्याचे (अज्ञानाचे) proof आहे.

गोनीदांनी " कुणा एकाची भ्रमण गाथा" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. लहानपणी ते वाचले होते. आज बघितले तर युट्युब वर अकरा भाग दिसत आहेत. आज रात्री बघेन म्हणतो.

<< हौसेखातर भिक्षेची अपेक्षा >>
मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात आपल्या पदरात पडतात हे बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्या अगदी विरुद्ध आहे.

You are most welcome सामो. फ्रिक्वेंसि ही संज्ञा दोन्ही ठिकाणी वापरली असल्याने तुमचं कन्फ्युजन झाले असं जाणवलं. तसंच ते इतरांचे ही होऊ शकेल असेही वाटले. म्हणून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही खूप मनापासून अप्रिशिएट केलं ह्याने लिहिण्याचा उद्देश सफल झाला त्यामुळे छान वाटले. Happy

परिक्रमावासी स्त्रियांवरती दरोडेखोरांनी बलात्कार केले आहेत, हे तुम्हीच लिहिले ना? मग का काढून टाकायला सांगताय?

उबो
यात मला तरी काही नवीन नाहीये. सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक फिलीप के. डिक ह्यांनी ह्यावर बऱ्याच कथा लिहिल्या आहेत. पण हे निराळे नि ते निराळे.

कालातीत, स्थलातीत, आणि परत परत केलेल्या प्रयोगांचे कन्सिस्टंट निष्कर्ष - हे विज्ञानाचे पायाभूत घटक आहेत.

>> विज्ञान स्थलातीत असतं पण कालातीत असेलच असं नाही. गणित स्थलातीत, कालातीत असतं पण मितीतीत असेलच असं नाही.

जिज्ञासा, वावे आणि पर्णिकाशी सहमत. तुम्हाला जे अनुभव आले त्या मागे काही विज्ञान आहे का याचे कुतूहल वाटून त्यावरून काही हायपोथेसिस मांडणे व तो शास्त्रीय कसोट्यांवर पारखून पाहणे वेगळे, व हे टोटली शास्त्रीय आहे आणि ते ऑलरेडी आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून समजले आहे हे ठसवणे वेगळे.

मी त्या ब्लॉगवर पहिले १६ लेख वाचले आहेत. अगदी वाचनीय लेख आहेत. पुढेही वाचायची उत्सुकता आहे. तुम्ही लिहील्यासारखे अनुभव आल्याचे इतरही (नर्मदा परिक्रमा केलेल्या) लोकांच्या लेखांतून वाचले आहे. पण त्यामागचे शास्त्रीय कारण केवळ एखादी व्यक्ती त्यात तज्ञ आहे म्हणून त्यांना कळेल असे नाही. उद्या आइनस्टाइनने नर्मदा परिक्रमा केली व त्याची श्रद्धा असेल तर त्यालाही कदाचित असे अनुभव येतील. पण केवळ त्याला फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ ई बद्दल प्रचंड माहिती असल्याने त्याचा हायपॉथेसिस हा लोकांनी शास्त्रीय सत्य मानावा असे होत नाही.

खरे म्हणजे श्रद्धा व विज्ञान यांना एकमेकांची फिकीर करण्याचे काही कारण नाही.

फारएण्ड
खरे म्हणजे श्रद्धा व विज्ञान यांना एकमेकांची फिकीर करण्याचे काही कारण नाही.>>>
अगदी खरं आहे. मी जेव्हढे वाचले आहे त्याप्रमाणे वैज्ञानिक श्रद्धेशी कधीच दंगा मस्ती करत नाहीत. पण धार्मिक लोकांनीच पूर्वी वैज्ञानिकांना भरपूर छळले आहे.
सध्या श्रद्धा कशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात ते दाखवण्याचा प्रयत्न चाललेला असतो.

गोनीदांनी " कुणा एकाची भ्रमण गाथा" नावाचे>>> मी ही तोच विचार करत होते. नर्मदा परिक्रमेला येवढीचर्चा सुरू आहे तरी अजून
याचा उल्लेख कसा नाही झाला

जेव्हा शास्त्रीय आधार किंवा कारणमीमांसा सापडत नाही किंवा तर्कशास्त्र काम करत नाही तेव्हा अस वाटतं की कोणीतरी अगाध, अज्ञात शक्ती / जगतनियंता काही घडवून आणतो..
तिथे श्रद्धा चालू होते..
जेव्हा परिस्थिती पूर्ण हाताबाहेर असते तेव्हा श्रद्धा /सकारात्मकता तुम्हाला त्यातून तरून जाण्यास मदत करते.
अर्थात फक्त श्रद्धा उपयोगी नसते बाकी प्रयत्नही चालू ठेवावेच लागतात.

पण हे सगळं खूप सापेक्ष आहे, ज्याचा त्याचा अनुभव.

पर्णिका उत्तम विवेचन.

मी समोचा लिंक वरील लेख वाचला नव्हता पण ते एकच व्यक्तीचा मेंदूच्या दोन भागांमध्ये हाच दुवा असणार ह्याची खात्री होती.
कारण दोन मेंदूमध्ये अस लहरों तर्फे परस्पर interaction होणं, कधी ऐकलं, वाचलं तरी नव्हतं.
Scifi सारखं काही वाटलं.

पण कुणाकडे काही references असल्यास द्या!

> >मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात आपल्या पदरात पडतात हे बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्या अगदी विरुद्ध आहे. > > >
हायझनबर्ग या शास्त्रज्ञाने प्रिन्सिपल ऑफ अन्सरटॅनिटी लिहिले आहे अर्थात अनिश्चिततेचा सिद्धांत . त्याच्या तत्त्वानुसार काळाच्या रेषेवर अनिश्चितता फक्त इकडून तिकडे सरकत असते . आपण वरती आपोआप फक्त गोष्टी पदरात पडतात असे हे वाक्य लिहिले आहे त्यातील काहीही आपोआप किंवा फुकटात पदरात पडत नाही . त्यासाठी परिक्रमावासी उन्हातान्हात दऱ्याखोऱ्यात तळागाळात पाठीवर ओझे घेऊन चालत असतो . ते चालणे किंवा शारीरिक कष्ट त्याच्या uncertainties shift करते आणि त्याला गोष्टी मिळू लागतात . So there's no free lunch still holds true.

कोणीतरी विषय छेडलाच आहे म्हणून सर्व वाचकांच्या माहिती करता सांगतो , नर्मदा परिक्रमा सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित आहे . इथे संपूर्ण परिक्रमेमध्ये स्त्रियांना माताराम असे संबोधले जाते . आणि एखाद्या आईप्रमाणे किंवा बहिणी प्रमाणे त्यांना वागणूक दिली जाते . अतिशय तरुण वयातील अनेक मुली एकट्या परिक्रमा करताना मला भेटल्या . त्यांच्यापैकी कोणालाही एकही विपरीत अनुभव आल्याचे ऐकीवात नाही . त्यामुळे कृपया संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय एखाद्या थोर परंपरेला बदनाम करू नये . कोणाचे अनुमान काहीही असो अनुभव असा आहे की नर्मदा परिक्रमा स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित आहे .

> > >धार्मिक लोकांनीच पूर्वी वैज्ञानिकांना भरपूर छळले आहे. > > > कृपया आपल्याला ज्ञात असलेली काही उदाहरणे दिलीत तर आमच्या ज्ञानात भर पडेल आणि आपल्या डोक्यातील "धार्मिक " ही संकल्पना नक्की काय आहे ते देखील आम्हाला कळेल .

https://en.wikipedia.org/wiki/Catholic_Church_and_science#Copernicus
इथे पूर्ण यादी मिळेल.
सध्या- डार्विनचा सिद्धांत शाळेच्या पुस्तकातून काढून टाकला.
दाभोळकर आणि इतर ह्यांची नावे लिहायला पाहिजेतच काय?

नर्मदे हर,
तुम्हाला तुम्ही केलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल लिहिणं जास्त महत्त्वाचं असेल तर या वादांमध्ये न पडता तुमचे लेख इथे आणलेत तर जास्त चांगलं. मी ते वाचले नसले तरी वर इतर अनेकांनी वाचून ते आवडले असल्याचं लिहिलं आहे.

सध्या श्रद्धा कशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात ते दाखवण्याचा प्रयत्न चाललेला असतो. >> टोटली.

वास्तविक त्या जिलबी-रबडीच्या उदाहरणात मला अगदी साधे उत्तर वाटले होते - मोकळ्या हवेत जवळपास कोणी हे पदार्थ बनवत असतील तर वार्‍याच्या योग्य दिशेने असलेल्या व्यक्तीपर्यंत त्याचा गंध पोहोचून सबकॉन्शसली आत्ता यावेळेस जिलबी मिळायला हवी असे विचार डोक्यात येणे अशक्य नाही. पण हे लॉजिक कोणी अचानक पैसे दिले याला लागू पडत नाही Happy

नर्मदे हर - तुमचे अनुभव अद्भुत आहेत यात शंका नाही, त्याच्या खरेपणाबद्दल - म्हणजे तुम्हाला तसे अनुभव खरोखर आले असतील याबद्दलही कोणी प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही. इथे विरोध आहे तो फक्त त्यातून तुम्ही जी अनुमाने काढली आहेत व ती "शास्त्रीय" आहेत असा दावा केला आहे त्यावर.

बाकी लेख वाचत आहेच.

भूगोलाच्या तास आहे म्हणून बसलो तर विज्ञानाचे मास्तर अगम्य भाषेत काही तरी शिकवायला लागले.

<< प्रिन्सिपल ऑफ अन्सरटॅनिटी तत्त्वानुसार काळाच्या रेषेवर अनिश्चितता फक्त इकडून तिकडे सरकत असते . >>

<< ते चालणे किंवा शारीरिक कष्ट त्याच्या uncertainties shift करते आणि त्याला गोष्टी मिळू लागतात . So there's no free lunch still holds true. >>

हे तुमचे मत १००% चुकीचे आहे, इतकेच बोलून खाली बसतो.

नर्मदेहर, तुमच्या ब्लॉग्जवरचे सगळे भाग वाचून काढले. तुमची लेखनशैली गुंतवून ठेवणारी आहे त्यामुळे एकाच फटक्यात वाचून संपवलं. पूर्वी चितळ्यांची नर्मदा परिक्रमा वाचली होती त्यामुळे परिक्रमावासींना येणारे अनुभव अगदीच नवीन नव्हते. ते खरेच असतील की खोटे असतील या वादात पडायचं नाही. कदाचित ज्याचा अनुभव त्याने घेऊन ठरवावं. मला तरी असं काही करायला जमेलसं वाटत नाही कारण मनात इतकी श्रद्धा, भक्तीभाव नाही. पुन्हा बाथरुम वगैरे सारख्या बेसिक सोयी नाहीत. तेव्हा नुसतं वाचावं हेच बरं.

गोनीदांनी " कुणा एकाची भ्रमण गाथा" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. लहानपणी ते वाचले होते. आज बघितले तर युट्युब वर अकरा भाग दिसत आहेत. आज रात्री बघेन म्हणतो.

Submitted by केशवकूल on 11 December, 2023 - 10:>>
धन्यवाद सांगितल्याबद्दल. मी पुस्तक वाचलं नव्हतं पण वाचण्याची खूप इच्छा होती.

आता भाग ऐकायला सुरुवात केलीय. अप्रतिम पुस्तक!

मी स्वतः अतिशय नास्तिकतेकडे झुकणारा मनुष्य आहे . विज्ञाननिष्ठा हा माझ्या जीवनाचा पाया राहिलेला आहे .>>> तुमचे पाहिले दोन भाग वाचून हे विधान पटत नाही.
नास्तिकते कडे झुकणारा किंवा विज्ञानिष्ठ माणूस व्यक्तिपूजा करणारा नसतो.
अजुन गोंधळ वाढवणारे आहे हे सगळे.

Pages