उबो, दिलेली लिंक वाचली. त्यात दिलेल्या संज्ञेचा इथे काय संबंध हे समजले नाही.
यात बिझनेस आहे असे का वाटतेय ? व्यवस्था असेल तर ती भांडवली आहे असे का वाटते ?
Submitted by रघू आचार्य on 22 December, 2023 - 22:58
> > >परत एकदा विचारतो की मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे? > > >
परिक्रमा हा बिझनेस नाही व परिक्रमा वासीना दानधर्म करणे हा ही व्यवसाय नाही . व्यवसायामध्ये देवाण-घेवाण असते .इथे दात्यांसाठी फक्त देवाण आहे . आणि परिक्रमावासींसाठी फक्त घेवाण आहे . तरी देखील याच्या मागचे मॉडेल काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे
> > >अन्न, वस्त्रे, पादत्राणे, झोळी, आसन, कमंडलू, पूजा साहित्य वगैरे फुकटात कोण वाटते? का वाटले जाते? > > > पूर्वी मनुष्य गुहेमध्ये राहायचा तेव्हा त्याच्या जेवणापुरते अन्न गोळा करून थांबायचा . नंतर कालांतराने त्याला घर बांधण्याचे ज्ञान प्राप्त झाले आणि गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली . आजही पहा प्रत्येक मनुष्य त्याच्या गरजेपेक्षा अधिक गोळा करून बसलेला आहे . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला भविष्याची चिंता आहे . मधमाशा मुंग्या ह्या जशा गरजेपेक्षा अधिक साठा करून ठेवतात तशीच सवय माणसाला लागलेली आहे . त्यामुळे परिक्रमावासींना देण्यात येणाऱ्या वस्तू या अशा प्रकारे गरजेपेक्षा अधिक साठा केलेल्या वस्तूंमधूनच येत असतात . क्वचित प्रसंगी ज्याच्याकडे गरजेपेक्षा अधिक वस्तू नाहीत असा मनुष्य देखील त्याच्याजवळ असलेल्या वस्तू परिक्रमा वासीना देऊन टाकतो .
> > >परिक्रमा करणाऱ्यांना फुकटात अन्न वाटणारे लोक, स्वत:चे पोट कुणाच्या जिवावर भरतात? > > >
परिक्रमावासींना दानधर्म करणारे लोक स्वतः शेतकरी किंवा कोळी किंवा शेतमजूर किंवा पशुपालक आहेत . हे स्वतःचे पोट स्वतः कष्ट करूनच भरतात . आपण यथेच्छ जेवणे । उरले ते अन्न वाटणे ॥ या रामदास स्वामींच्या वचनाप्रमाणे ते जगत असतात . परंतु ज्याच्याजवळ पोटभर जेवण्यासाठी नाही असा मनुष्य देखील परिक्रमावासी जे कष्ट उचलत आहे त्याला त्याचा पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वतः उपाशी राहतो परंतु त्याच्या घासातला घास काढून आम्हाला देतो .
> >हे सर्व दाते कुबेराचे वंशज आहेत की त्यांच्या दारात कल्पवृक्ष आहे जो मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात देतो. > > > निसर्गाचा साधा सोपा नियम आहे . तुम्ही त्याला एक द्याल तर तो परत देताना कित्येक पटीने देतो . तुम्ही जमिनीला कणसातील एक दाणा दिला तर जमीन परत देताना शंभर दाण्याचे कणीस देते . तोच अनुभव इथे दान करणाऱ्या लोकांना येत असतो . मुळात त्यांना जेवणाच्या बदल्यात जेवणच मिळेल असे नाही . परंतु उपाशी जीवाच्या चेहऱ्यावर विलसणारे विलक्षण समाधान पाहिल्यावर त्यांना आतून मिळणारा जो आत्मिक आनंद आहे त्या आनंदासाठी मनुष्य सर्व प्रपंच करीत असतो . आनंद आणि वेळ या दोन गोष्टींची किंमत पैशांमध्ये करता येणे अवघड असते . कारण आनंद सहजासहजी मिळविता येत नाही आणि वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही .
> > > हे परिक्रमा मॉडेल, बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्याशी सुसंगत नाही. > > >
There is no free lunch हे वाक्य कोणी लिहिले आहे ते मला माहिती नाही . परंतु हे वाक्य सत्यच आहे असे जे गृहीतक तुम्ही मनामध्ये धरलेले आहे त्याच्यामुळे ही विसंगती येथे दिसते आहे .मी पूर्वीच सांगितले त्याप्रमाणे जग काळे आणि पांढरे अशा दोन रंगांमध्ये रंगविता येत नाही . अमुक अमुक तत्व हे अर्थशास्त्राचे प्रमुख गृहीतक आहे असे मानणे चुकीचे आहे . अर्थ या शब्दातच त्याचे उत्तर आहे . प्रत्येक ठिकाणी संदर्भानुसार ज्याचा अर्थ बदलतो तो खरा अर्थ . एका विशिष्ट प्रकारे छापलेला पैसा म्हणजे अर्थ असेल तर मोदींनी तो पूर्वीच खोटा ठरवून टाकला होता . पैसा म्हणजे अर्थ नव्हे तर ज्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळू शकते असे काहीही देणे किंवा घेणे याला अर्थ असा अर्थ प्राप्त होतो . अशा अर्थाचे हे शास्त्र आहे . हे अत्यंत जटिल आणि सूक्ष्म आहे . स्थळ काल परिस्थितीनुसार त्याचे संदर्भ बदलत राहतात . एखादे गृहीतक डोक्यात धरून तुम्ही गुढ शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही किंवा आकलन तर होणारच नाही . There is no knowledge transfer possible with reserved mind polluted with assumptions. So better keep it open and rethink.
नदी जशी एका सरळ रेषेमध्ये वाहत नाही तसेच हे मॉडेल देखील आहे . उतार बघून परिस्थिती बघून त्या दिशेला जाते . प्रत्येकावर हे मॉडेल समान पद्धतीने कार्य करेलच असे नाही .आपले प्रतिसाद मनापासून आलेले वाटले म्हणून सविस्तर उत्तर लिहायचा प्रयत्न केला . हेच उत्तर तुमच्यासाठी बरोबर असेल असे देखील नाही .व्यक्ती तितक्या प्रकृती . परिक्रमेचा टेक अवे हेच ज्ञान आहे ! नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 22 December, 2023 - 23:05
> >>निसर्ग पैसा ही currency वापरीत नाही. नदीकडून पाणी घेताना आपण तिला काय देतो? झाडावरची फळे तोडतो तेव्हा झाडाला पैसे देतो का? तेव्हा पैसा ही संकल्पना अत्यंत यशस्वी असली तरी तिच्याशिवाय चालणारे एक भले मोठे जग आहे. हे जग circular closed loop मध्ये चालते. What goes around comes around. When we pollute nature we are externalizing the cost of pollution to the nature. But it will come around soon! > > >
तुम्हाला परिक्रमेचा गर्भित अर्थ कळला ! सर्क्युलर क्लोजड लूप म्हणजेच परिक्रमा . जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा येणे म्हणजे परिक्रमा .अशी परिक्रमा कोण कोण करत आहे ? घड्याळात वेळ दाखविणारे काटे घटी केंद्रा भोवती अखंड परिक्रमा करीत आहेत . आकाशातून पडलेले पाणी नदीच्या रूपाने वाहून व पुन्हा समुद्रातून वाफ बनून ढग होत बरसून एक परिक्रमा अनुभवत आहे . अणु केंद्राभोवती इलेक्ट्रॉन परिक्रमा करत आहेत . चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे . पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत आहे . सूर्य देवयानी आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिक्रमा करत आहे . जिथे अशा प्रकारचे सर्क्युलर लूप आहे तिथले व्यवहार थोडेसे वेगळे असतात आणि एका सरळ रेषेत पुढे जाणाऱ्या लोकांचे व्यवहार वेगळे असतात . So there's a free lunch iff you are in Parikrama!
Submitted by Narmade Har on 22 December, 2023 - 23:20
<< इथे दात्यांसाठी फक्त देवाण आहे . आणि परिक्रमावासींसाठी फक्त घेवाण आहे . >> मान्य आहे. हे पटण्यासारखे आहे.
हे मॉडेल इतर ठिकाणी पण दिसते का? मैया सर्व काही फुकटात देते, असा केवळ नर्मदा परिक्रमेचा उदोउदो का होतो? इतर ठिकाणांचा का होत नाही?
<< सर्क्युलर क्लोजड लूप म्हणजेच परिक्रमा. >> परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. लोक गिरनार परिक्रमा करतात, मानस सरोवराची पण प्रदक्षिणा करतात, तिथे पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप कसे काय होत नाही? किंवा होत असले तर त्याचा इतका गवगवा कसा होत नाही जितका नर्मदा परिक्रमेचा होतो.
पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप हे परिक्रमावासियांसाठी केले तरच पुण्य मिळते असे दात्यांना वाटते का? इतर यात्रांमध्ये (अमरनाथ यात्रा, वारकरी यात्रा वगैरे) सबकूछ फुकट असा प्रकार का होत नाही?
<< गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली. >> यात माणसाची प्रगल्भ बुद्धीमत्ता दिसून येते. त्यामुळेच मनुष्याला इतर पशू-पक्षांप्रमाणे रोज पोट भरण्यासाठी फिरावे लागत नाही.
<< ज्याच्याकडे गरजेपेक्षा अधिक वस्तू नाहीत असा मनुष्य देखील त्याच्याजवळ असलेल्या वस्तू परिक्रमा वासीना देऊन टाकतो. >> इतर लोकांकडून फुकटात सर्व गोष्टी घेऊन परिक्रमा करण्यापेक्षा, लोकांना दान करून जास्त पुण्य मिळते का?
एकदा परिक्रमा पूर्ण झाली की लोक परत संचय करायच्या मागेच लागतात ना? की त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन ते "एक दांडीला आणि एक xxडीला" असे आयुष्य जगायला सुरुवात करतात?
<< नदीच्या रूपाने वाहून व पुन्हा समुद्रातून वाफ बनून ढग होत बरसून एक परिक्रमा अनुभवत आहे . अणु केंद्राभोवती इलेक्ट्रॉन परिक्रमा करत आहेत . चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे . पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत आहे. >> हे सांगायचा उद्देश कळला नाही. हे विश्व मात्र अजूनही प्रसरण पावत आहे, परिक्रमा करत नाहीये.
Submitted by उपाशी बोका on 23 December, 2023 - 00:15
@ लेखक, मी लेखमाला वाचलेली नाही. तुम्हाला लेखनासाठी शुभेच्छा.
--------
उबोंमुळे ही जुनी चर्चा आठवली, मी लिहिलं असतं तर पुन्हा असंच काहीसं लिहिलं असतं म्हणून लिहिलंच नाही. ही चर्चा कृपया सर्वांनी वाचावी अशी विनंती. मला अजूनही बिनपैशाचं काही महिने- पुरेसं अन्नपाणी व शिक्षण नसलेल्या अंधश्रद्ध आयजीच्या जीवावर सुखवस्तू-सुशिक्षित बायजीने 'स्पिरिच्युअल किक'साठी 'परिव्राजक- परिव्राजक' खेळल्यानं आध्यात्मिक प्रगती कशी काय साध्य होणार आहे हे गमक कळलेलं नाही. Spirituality should be exploitation free zone..! त्यात तथ्य असेल तर मला याचा लक्षांशावा भाग सुद्धा व्हायला आवडणार नाही. नसेल तर या पोस्टीकडे दुर्लक्ष करा.
उबो, हेच विचार डोक्यात येत होते.
पण ज्याची अपार श्रद्धा आहे, तितका भाव मनात आहे त्याच्यासाठी हे वर्क होत असावं.कसं ते माहीत नाही.किंवा परिक्रमा करतानाच या अडचणींना सामोरं जायची मनाची तयारी असावी.
> >एकदा परिक्रमा पूर्ण झाली की लोक परत संचय करायच्या मागेच लागतात ना? की त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन ते "एक दांडीला आणि एक xxडीला" असे आयुष्य जगायला सुरुवात करतात? > > मला असे करणारे काही लोक भेटले तिथे . त्यांनी परिक्रमेतच पूर्णवेळ साधूवृत्ती स्वीकारली आणि घरी परतलेच नाहीत . त्यात तरुणही होते .
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 01:03
> >पुरेसं अन्नपाणी व शिक्षण नसलेल्या अंधश्रद्ध आयजीच्या जीवावर सुखवस्तू-सुशिक्षित बायजीने 'स्पिरिच्युअल किक'साठी 'परिव्राजक- परिव्राजक' खेळल्यानं आध्यात्मिक प्रगती कशी काय साध्य होणार > > सुशिक्षित बायजी शक्यतो परिक्रमा झाल्यावर अशा अंधश्रद्ध आयजींना भरघोस आर्थिक आणि धान्यादीची मदत आठवणीने आवर्जून करतात . मी जागोजागी क्रमांक दिलेले आहेत . पेटीएम करो !
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 01:06
> >लोक गिरनार परिक्रमा करतात, मानस सरोवराची पण प्रदक्षिणा करतात, तिथे पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप कसे काय होत नाही? किंवा होत असले तर त्याचा इतका गवगवा कसा होत नाही जितका नर्मदा परिक्रमेचा होतो.
पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप हे परिक्रमावासियांसाठी केले तरच पुण्य मिळते असे दात्यांना वाटते का? इतर यात्रांमध्ये (अमरनाथ यात्रा, वारकरी यात्रा वगैरे) सबकूछ फुकट असा प्रकार का होत नाही? > > >
वरील सर्व यात्रांमध्ये मोफत अन्नदान व दानधर्म भरभरून होतो . कदाचित त्याबद्दल आपण फारसे वाचत नसू तसेच काठिण्य पातळी व कालावधी पाहता नर्मदा परिक्रमा प्रदीर्घ असल्यामुळे याचा गवगवा अधीक होत असावा . तसेचits totally unplanned travel.
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 01:10
<<पूर्णवेळ साधूवृत्ती स्वीकारली >>
शक्यता आहे शेकडो परिक्रमावासियांमध्ये १-२ असे भेटण्याचे. गौर गोपाल दास पण इंजिनिअर झाल्यावर साधू झालाच की (ते पण कुठलीही परिक्रमा न करता).
पण इतर परिक्रमावासियांचं काय? ते संचय करायचं सोडतात का?
<भरघोस आर्थिक आणि धान्यादीची मदत आठवणीने आवर्जून करतात. पेटीएम करो ! >>
म्हणजे हे आहे तर मदत करण्याचे बिझनेस मॉडेल. कळले आता.
Submitted by उपाशी बोका on 23 December, 2023 - 01:30
मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे.
जर ते मायबोलीवर आले असते तर उत्तरं देत बसले असते, राजकीय धाग्यांवर कुस्ती खेळले असते, ड्युआयड्या काढत बसले असते.
विनोदी लेखक फॉर्वर्डच्या धाग्यांवर रमले असते..
मग साहित्यनिर्मिती कोण करणार ?
Submitted by रघू आचार्य on 23 December, 2023 - 01:53
उपाशी बोका, तुमचा प्रश्न विचारण्याचा टोन जरा चुकीचा वाटतोय.
मी नर्मदे हर ह्यांचे ब्लॉग पोस्ट अजून वाचले नाहीत.
पण काही लोकांकडून प्रत्यक्ष जे ऐकले आहे, ते अनुभव अतिशय रॉ किंवा उघडं सत्य म्हणतात त्या प्रकारचे आहेत. म्हणजे माणूस म्हणून असलेली मर्यादा , लायकी किंवा निसर्गाची ताकद ह्या सगळ्याचा जबरदस्त आणि जवळून अनुभव ह्या परिक्रमा दरम्याने मिळतो.
गो. नी. चे कुणा एकाची भ्रमण गाथा पाहिले १५ भाग ऐकले तिथेही हेच जाणवते.
बरेचसे लोक तुमच्या आमच्या सारखे मध्यमवर्गीय घरातून आलेले असतात.
त्यांचा हेतू फुकटात काही मिळावे हा नसतो. पण त्याचे स्वरूप असे आहे की तिथे प्रत्येक गावागावात सर्व सोयी सुविधा नसतात, हॉटेल नसतात, सहा महिने शिधा gheun चालणे तर अशक्यप्राय च . त्यामुळे गावागावात घरांमध्ये लोक आपणहून परिक्रमावसिना उतरवायची सोय करतात. त्यामागे काही संघटन नसते. आपल्यातलेच दोन घास ते त्यांना देतात.
अजुन एक गोष्ट एकीने सांगितले,
त्या बाईंना सुरुवातीला वाटायचे की ही गरीब लोक आहेत, ह्यांनी त्यांच्यातलच आम्हाला दिलं म्हणून ती जाताना काही रुपये ठेवत असे..
पण ती म्हणाली की हळू हळू मला वाटायला लागलं की इथे 'मी 'येतोय, शेवटी मनात येते तिने दिलं पण मी पैसे तर ठेवले..
तर हा मी मध्ये येतोय, आणि ते मी पण विसरण्यासाठी जर परिक्रमा करतोय तर हे बरोबर नाही. त्यांनी पैसे देणं बंद केलं...
Submitted by छन्दिफन्दि on 23 December, 2023 - 02:24
गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली. >> यात माणसाची प्रगल्भ बुद्धीमत्ता दिसून येते. त्यामुळेच मनुष्याला इतर पशू-पक्षांप्रमाणे रोज पोट भरण्यासाठी फिरावे लागत नाही. >
उबो, या विधानातल्या प्रगल्भ या शब्दाविषयी मला शंका आहे! Human race might be smarter but is it wiser?
नर्मदे हर, earth is a closed loop system but it does have a continuous, external, primary source of energy - Sun. त्यामुळे सारे विश्व closed loop मध्ये चालते असे विधान तितके योग्य नाही. उबो म्हणतात तसे विश्व प्रसरण पावत आहे.
तुमच्या पेटिएम करो या आवाहनाशी देखील मी फार सहमत नाही. नर्मदा परिक्रमेशी प्रत्यक्ष संलग्न असाल तरच त्या लूपमध्ये रहावे. माझ्या मते आपल्याकडील अनेक यात्रा आणि परिक्रमांचे (उदा. पालखी, नर्मदा परिक्रमा, गिरनार, चारधाम इत्यादी) उदात्तीकरण आणि बाजारीकरण होतंय ही फार खेदाची गोष्ट आहे. अस्मिताने लिहीलं आहे त्याप्रमाणे सुखवस्तू यात्रा/परिक्रमा ही त्या उपक्रमाच्या मूळ हेतूला हरताळ फासणारी आणि तेथील निसर्गाला हानी पोचणारी ठरू लागली आहे. IMHO, this model has some carrying capacity and will fail if that capacity exceeds. We need to respect the boundaries.
Submitted by जिज्ञासा on 23 December, 2023 - 03:06
फ्री लंच हे कुणीही किंमत भरली नाही अश्या अर्थाने वापरले जाते. >>> बिझनेस मॉडेलमधे आवळा देऊन कोहळा काढणे या अर्थाने असेल असे तो लेख वाचून वाटले होते.
गोरक्षा आश्रमात गाईंवर मोफत इलाज होतो / मथुरेतले विधवाश्रम किंवा अशा सेवाभावी संस्थात फ्री लंच नसते हे प्रत्यक्ष बघितल्याने सांगू शकतो. हे मॉडेल दाखवून मोठ्या देणग्या मिळतात. कमी मिळाल्या तर नुकसान.
काही तीर्थयात्रांमधे यात्रेकरूंची सोय मोफत होते. तिथे गरीब भाविक जाऊ लागल्यावर श्रीमंत सुद्धा येतात. त्यावर तिथला पर्यटन व्यवसाय चालतो.
पण मान सरोवर इथे स्थानिक लोक नाहीत. अमरनाथ किंवा तत्सम पहाडी आणि उंचावरच्या यात्रेदरम्यान छोटी गावे लागतात ज्यांना आपल शिधा लांबून आणावा लागतो. इथे फ्री मिळणे अशक्य आहे. इथे हातावर पोट आहे. पर्यटनावर लोक अवलंबून आहेत.
नर्मदा परिक्रमा पहिलेली नाही. पण ट्रेकिंग म्हणून पाहिले तर खडतर मार्ग पार करण्यासाठी इतर ठिकाणच्या यात्रेकरूंप्रमाणे झुंडीच्या झुंडी येत नसाव्यात. दूर दूर असलेली गावे, पर्यटकांसाठी नसलेल्या हॉटेल व इतर सुविधा यामुळे असेल. म्हणून तुरळक संख्येने येणार्यांसाठी नि:स्वार्थी भावनेने मदत केली जात असेल. उद्या रोजचे हजारो पर्यटक येऊ लागले तर स्थानिक कुठून त्यांना खायला घालतील ?
उलट हॉटेल्स सुरू होतील.
तसेच अन्नछत्र, आश्रमांची संख्या वाढेल. त्यासाठी देणग्या गोळा करणारी पद्धतशीर यंत्रणा काम करू लागेल. त्याला बिझनेस मॉडेल म्हणता येईल.
Submitted by रघू आचार्य on 23 December, 2023 - 03:11
जि व अस्मिता पोस्ट आवडल्या.
माझ्या मते आपल्याकडील अनेक यात्रा आणि परिक्रमांचे (उदा. पालखी, नर्मदा परिक्रमा, गिरनार, चारधाम इत्यादी) उदात्तीकरण आणि बाजारीकरण होतंय ही फार खेदाची गोष्ट आहे>>>> हेच नर्मदा परिक्रमेबाबत होतंय असं परिक्रमा करून आलेली मैत्रीण म्हणाली. अमरनाथ यात्राही सुनियोजित असते काही अघटित घडलं तर आर्मी मदतीला तत्पर असते.
परिक्रमा हे *तप* आहे त्याची तुलना कशाशी होऊ नाही शकत.
उलट हॉटेल्स सुरू होतील.
तसेच अन्नछत्र, आश्रमांची संख्या वाढेल. त्यासाठी देणग्या गोळा करणारी पद्धतशीर यंत्रणा काम करू लागेल. त्याला बिझनेस मॉडेल म्हणता येईल.>>>>>> चितळे पतीपत्नीबद्दल प्रचंड आदर आहे. माझ्या माहितीतील एक काका अन्नछत्रासाठी देणगी (पैसा/धान्य) गोळी करतात तसेच सेवा देण्यासाठी इच्छुक लोकांचे वेळापत्रक तयार करतात. जीवे भावे शिव सेवा हे जरी खरं असलं तरी आपण परिक्रमावासिंयांच्या तपात बाधा आणतोय ना?
> >तुरळक संख्येने येणार्यांसाठी नि:स्वार्थी भावनेने मदत केली जात असेल. उद्या रोजचे हजारो पर्यटक येऊ लागले तर स्थानिक कुठून त्यांना खायला घालतील ? > >
या प्रश्नात खात्री कमी आणि अनुमान जास्त आहे . असेना . स्वानुभव सांगतो .
९० % परिक्रमावासी आजकाल ओंकारेश्वर वरून परिक्रमा उचलतात . त्यातील केवळ दहा-बारा टक्के लोकांची परिक्रमा पूर्ण होते असे आकडेवारी सांगते . 2022 या सालातील आकडेवारी सांगतो . दोन लाख साठ हजार लोकांनी पायी परिक्रमा उचलली . त्यातील बारा पंधरा हजार लोकांची परिक्रमा पूर्ण झाली . त्यामुळे ओंकारेश्वर ते समुद्र या मार्गावरील आश्रमांमध्ये देव दिवाळीच्या नंतर अक्षरशः हजारो लोकांच्या झुंडी येत असतात व त्या सर्वांना मोफत अन्नदान केले जाते . आपण लेख मला वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की लोक जाताना जे पैसे आम्हाला देतात त्याचे अक्षरशः ओझे होत असते . त्यामुळे परिक्रमावासी देखील धानधर्म आवडीने करतात . व तो बरेचदा स्वीकारला जातो .
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 05:30
> >मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे. > > : P
ह ह लो अर्थात ROFL
( हसून हसून लोळलो )
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 05:32
> >पण मान सरोवर इथे स्थानिक लोक नाहीत. अमरनाथ किंवा तत्सम पहाडी आणि उंचावरच्या यात्रेदरम्यान छोटी गावे लागतात ज्यांना आपल शिधा लांबून आणावा लागतो. इथे फ्री मिळणे अशक्य आहे. > >
जिथे जिथे हिंदु जनसंख्या कमी आहे तिथे तिथे भाविक भक्तांची गैरसोय होते . हे विधान सरसकट बरोबर नाही परंतु तरीदेखील मी एक विधान धाष्ट्रयाने करतो . की समजा अशी कल्पना करा की बहुतांश परिक्रमावासी रिकामटेकडे आणि काही उद्योगधंदा नसलेले लोक आहेत . त्यांना बाकी काही करायला काम उरले नाही म्हणून परिक्रमा करत आहेत . अशी एक कल्पना करून पाहूयात . परंतु ते आपल्या समाजाचा भाग आहेत हे तर उघड आहे . आणि त्यांना आपणच म्हणजे मानवसमाजाने जन्माला घातले आहे हे देखील सत्य आहे . मग ते कसेही असेनात का त्यांचा सांभाळ करणे हे एक प्रगल्भ उन्नत समाज म्हणून आपले कर्तव्य आहे . इंग्लंडमध्ये जसे बेरोजगारांना भत्ता मिळतो तसे काहीतरी समजा . हिंदू धर्माने अशा लोकांची देखील सोय करून ठेवलेली आहे . अशा लोकांना काही ना काही माध्यमातून किमान दोन वेळचे जेवण मिळेल इतकी काळजी पाप-पुण्याच्या नावाखाली करून ठेवलेली आहे . परंतु जिथे हिंदू संस्कृती मानणारी लोकसंख्या कमी होत जाते तिथे मात्र अशा लोकांचे हाल होतात . मी माझ्या लेखमालेमध्ये वेळोवेळी अशा गावांची नावे देखील दिलेली आहेत . व पुढे देखील देणार आहे . कैलास मानसरोवर यात्रेचे नेमके तेच झालेले आहे .अमरनाथचेही तेच झालेले आहे . आपल्या भारतामध्ये भावसार समाज आहे त्यांची देवी हिंग्लजमाता पाकिस्तान मध्ये आहे . तिथे त्यांच्याकडून प्रचंड पैसा लुटला जातो . तीच अवस्था कैलास मानसरोवर यात्रेच्या चायनीज फीज च्या बाबतीत आहे . जबजब हिंदू घटा तब तब देश बटा . आता हे योग्य का अयोग्य हे ज्याचे त्याने आपापल्या विवेकानुसार आणि जनुकांनुसार ठरवावे .
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 06:15
अतिथी म्हणजे न सांगता, अचानक आलेला पाहुणा. त्याला देव मानणारी आपली संस्कृती आहे.
संपुर्ण भारतभरात विशेषतः ग्रामीण भागात अतिथी देवो भव ह्या उक्तीप्रमाणे वागणारी माणसे दिसून येतात.
ती माणसे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कुठ्ल्याही पातळीवर ती असली तरी त्यांची अनोळखी माणसाशी वागण्याची रीत (शहरी मानसिकतेशी विपरीत) समोरच्यावर विश्वास टाकणारी आणि आदरातिथ्य करणारी असते.
आमच्या कोकणातल्या तालुक्याच्या गावी असलेल्या घरात परतीची मुक्कामी जाणारी गाडी चुकली म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणाने
अमक्याचा तमक्या अशा ओळखीवरच नव्हे तर संपुर्ण अनोळखी माणसे ओटीवर मुक्काम करून (couchsurfing) आमटी भात खाऊन गेलेली आहेत जे मी स्वतः शाळकरी वयाचा असताना स्वतःही बघितले आहे.
पण त्याला आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत आता असे कोण करत असेल असा माझा माईंड सेट / विचार झालेला असताना मला नुकताच एक सुखद अनुभव आला.
मला असा अनुभव नुकताच आणि पुण्यापासून फार दूर नसलेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या विंझर गावात आला.
सरावाकरता म्हणून सिंहगड किल्ला पुणे दरवाज्याकडून चढून कल्याण दरवाज्या तून मागच्या बाजूला असलेल्या विंझर गावात उतरून परत पावली यायचे असा प्लॅन होता. विंझर गावात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे असे कळले होते. त्यामुळे बरोबर जास्त पाणी न बाळगता, दोन बाटल्या ठेवल्या त्यातले पाणी संपले की विंझरमधून रिफील करून घ्यायचे असे ठरवले होते. गावात भेटलेल्या ग्रामस्थांकडे त्याबद्दल चौकशी केली असता, टाकीतून कशाला , चला की आपल्याकडे असे म्हणून त्यातल्या एकाने आम्हाला त्यांच्या घरी नेऊन आमच्या बाटल्यातून पाणी तर भरून दिलेच वर चहा प्यायल्या शिवाय जायचे नाही असे सांगून चहा पाजूनच सोडले.
सिंहगडासारख्या व्यापारी वृतीची लागण झालेल्या गडाच्या पुण्याच्या बाजूच्या वाडी वस्तीत आता सायकल पार्क करण्याचे पैसे शाळकरी मुलांकडूनही आकारले जातात त्या पार्श्वभुमीवर हा अनुभव सुखद आश्चर्याचा धक्का देणारा ठरला.
तर सांगायचा मुद्दा जगात अजूनही काही माणसे अशी आहेत ज्यांचे असे वागणे हे काही मिळवण्याकरता म्हणून नसते तर त्यांची जगण्याची पद्धतच अशी आहे.
कंटाळवाणा झाला आता हा धागा. परिक्रमा राहिली बाजूला आणि जो तो स्वतःचे पराक्रमच सांगत सुटलाय. हे असं स्वतःचं उदो उदो करत बसता त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी नर्मदामैया बोलवण्याऐवजी कंपनीमैया बोलवत असते.
नर्मदे हर , तुम्ही प्रत्येकाचे म्हणणे खोडून काढत आहातच, पण जे म्हटलेले नाही ते शब्द पदरचे घालून खंडन करताय हे चुकीचे आहे. माझ्या प्रतिसादात हिंदू लोकसंख्या कमी आहे असा शब्दप्रयोगच नाही.
मान सरोवर कैलास या भागात रहिवास आहे का ? हिंदूच काय कुठल्याही धर्माचा आहे का याची तपासणी करा. हिमालयातले ट्राईब्ज हे संख्येने तुरळक असतात. जिथे नद्या नाहीत,, शेती पिकत नाहीत तिथले लोक बर्याच गोष्टींसाठी अवलंबून असतात. ते काय मदत करणार हा मुद्दा आहे. तुम्ही भलतीकडेच वळवत आहात.
जितके कमी प्रश्नोत्तरामधे रमाल तितके चांगले हे आधीच सांगितले होते. लेखकाच्या धारणा, पूर्वग्रह समोर आलेले नसताना त्याची चिकित्सा करणे चुकीचेच पण ते समोर आले कि मग त्याच्या लिखाणाची त्याच पद्धतीने चिकित्सा होत जाणार. शेवटी आपली मर्जी.
Submitted by रघू आचार्य on 23 December, 2023 - 09:28
रघु आचार्य आपला गैरसमज झालेला दिसतो आहे .
मी खालील वाक्य बोललो आहे .
> >जिथे जिथे हिंदु जनसंख्या कमी आहे तिथे तिथे भाविक भक्तांची गैरसोय होते . हे विधान सरसकट बरोबर नाही परंतु तरीदेखील मी एक विधान धाष्ट्रयाने करतो . की समजा अशी कल्पना करा .. > >
यातील हिंदू जनसंख्या कमी आहे . .हे तुमचे नाही माझे मत
आहे . आणि हे विधान सरसकट बरोबर नाही असे मी माझ्या पुढील वाक्याबद्दल बोलतो आहे इथे माझ्याकडून व्याकरणात पण चूक झाली आहे हे लक्षात घ्यावे . तुम्ही असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही . आणि विषय भरकटण्याचा देखील काहीही संबंध नाही . परिक्रमेमध्ये मला हिंदू जनसंख्या कमी असलेल्या गावात आलेले अनुभव मी नावासकट दिलेले आहेत वाचून पाहणे . प्रश्न उत्तरामध्ये मी किती रमावे हा माझा प्रश्न आहे असे आपल्याला वाटत नाही का ? आज प्रश्न उत्तरांमध्ये रमू नका सांगत आहात .उद्या परिक्रमेविषयी काही सांगू नका असे देखील म्हणू शकता ! मुळात मी प्रश्न उत्तरांमध्ये रमत नाही आहे तर जे प्रश्न मला मनापासून विचारलेले वाटत आहेत त्याची माझ्या परीने उत्तर देत आहे . या कमेंट जर ब्लॉगवर आले असता तर तिथे देखील मी अशीच उत्तरे दिली असती . मानसरोवर येथे वस्ती जरी कमी असली तरी तिथे नियंत्रण भारतीय सरकारचे नसून कम्युनिस्ट सरकारचे आहे त्याचा हा परिणाम आहे असे मला म्हणायचे आहे . लोकशाही पद्धतीने चाललेली छान सकारात्मक चर्चा वेगळ्या वळणाकडे आपण नेऊयात नको . मी फक्त लेख लिहावे आणि चर्चेत भाग घेऊ नये अशी आपली अपेक्षा असेल तर ती निष्फळ ठरणार आहे . आणि आपल्याला प्रतिसाद नको असेल तर सादच देऊ नये . मी पुन्हा पुन्हा सर्वांना एकच आवाहन केलेले आपल्याला आढळेल की परिक्रमेविषयी काही शंका असतील तर विचाराव्यात . इथे स्वतः कदाचित काही पावले देखील न चालणारे विद्वान अधिक आहेत असे मला त्यांच्या प्रतिक्रिया वाचून जाणवत आहे (हे तुमच्याबद्दल बोलत नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी ). सर्व प्रतिसाद वाचणाऱ्या लोकांचा बुद्धिभ्रम होऊ नये म्हणून त्यांनी काही चुकीचा मुद्दा मांडला तर त्याचा योग्य प्रतिवाद करणे हे माझे कर्तव्य आहे . माझी उत्तरे ऐकून कोणाला लिखाण वाचायची इच्छा न होईल तर त्याला माझा निरुपाय आहे . मुळात माझे लिखाण कोणी वाचावे आणि कोणी वाचू नये हेच ठरवणारी एक वेगळी शक्ती कार्यरत आहे असे मानणारा मी आहे . असो . चूक भूल देणे घेणे . एक पूर्णविराम चुकीच्या ठिकाणी पडल्यामुळे आपला गैरसमज झाला .
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 11:21
मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती . प्रथमच मी इथे काहीतरी लिखाण टाकले आणि त्यावर इतक्या प्रतिक्रिया येतात याची देखील मला कल्पना नव्हती . एकंदर सर्व प्रतिक्रियांचा सूर पाहता इथे या विषयावरील लिखाण अस्थानी आहे असे सांप्रत माझे मत झालेले आहे . त्यामुळे आपल्या सर्वांच्या झालेल्या कालापव्यासाठी आपणा सर्वांची क्षमा मागून काही वेळातच मी मायबोली या प्रकाराचा निरोप घेत आहे . माझ्या ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवीन . माझ्या गतीने सुरू ठेवीन .त्यासाठी कुठल्याही दबावाची मला सवय नाही . पहिले काही लेख लिहायला मी आठ महिने लावले होते . उठ लिहायला बस आणि लिहून पूर्ण कर अशा प्रकारचे हे लिखाण नाही आहे . आतून प्रेरणा स्फूर्ती झाली की लिहायला बसत असतो . बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आणि लिखाणासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार . नकारात्मक प्रतिक्रिया अधिक वाढू नयेत ही एक परिक्रमावासी म्हणून माझी जबाबदारी समजतो . आधीच परिक्रमा करण्याची इच्छा कोणाला होत असेल आणि अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाचून ती मरत असेल तर ते पातक माझ्यामुळे घडू नये इतकी माफक अपेक्षा आहे . त्यामुळे इथून पुढे एकाही कमेंटला कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर न देता काही ठराविक वेळ झाला की माझे सर्व लिखाण मी मायबोली वरून उडवून टाकणार आहे आणि मायबोलीचा निरोप घेतो आहे . एखाद्याला हे लिखाण फार चांगले वाटले तर तो तसेही कुठे ना कुठे त्याला प्रसिद्धी देईलच . त्याची सत्यासत्यता तपासत मी स्वतः येऊन प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची गरज नाही हे बहुतेकांचे म्हणणे योग्य आहे . नर्मदा परिक्रमे विषयी अधिक माहिती हवी असेल तर तिचे स्मरण करा .योग्य मार्ग मिळेल ! नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 11:41
विषय भरकटलाच आहे तर, अन्नदान करणे हे केवळ हिंदूच करतात, इतर लोक नाही हे सरसकटीकरण चुकिचे आहे. मुस्लिमही करतात, अमेरिकेत अनेक चर्चेस फूड बँक चालवतात. परिक्रमेला एखादा दलित गेला तर त्याला काय वागणूक मिळेल ?
परिक्रमा केली, एक उत्कट अनुभव आला, तो शेयर करावासा वाटला म्हणून शेयर केला, हे पुरेसे नाही का? विनाकारण वादविवाद कशाला ? चितळे बाईंचे व्हिडिओ बघितले तर तिथे असा कोणताही अभिनिवेश नाही. आलेला अनुभव प्रांजळपणे शेयर करणे , इतकेच करतात त्या.
Submitted by vijaykulkarni on 23 December, 2023 - 11:44
उबो, दिलेली लिंक वाचली.
उबो, दिलेली लिंक वाचली. त्यात दिलेल्या संज्ञेचा इथे काय संबंध हे समजले नाही.
यात बिझनेस आहे असे का वाटतेय ? व्यवस्था असेल तर ती भांडवली आहे असे का वाटते ?
> > >परत एकदा विचारतो की
> > >परत एकदा विचारतो की मुळात या नर्मदा परिक्रमेमागे नक्की बिझनेस मॉडेल काय आहे? > > >
परिक्रमा हा बिझनेस नाही व परिक्रमा वासीना दानधर्म करणे हा ही व्यवसाय नाही . व्यवसायामध्ये देवाण-घेवाण असते .इथे दात्यांसाठी फक्त देवाण आहे . आणि परिक्रमावासींसाठी फक्त घेवाण आहे . तरी देखील याच्या मागचे मॉडेल काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे
> > >अन्न, वस्त्रे, पादत्राणे, झोळी, आसन, कमंडलू, पूजा साहित्य वगैरे फुकटात कोण वाटते? का वाटले जाते? > > > पूर्वी मनुष्य गुहेमध्ये राहायचा तेव्हा त्याच्या जेवणापुरते अन्न गोळा करून थांबायचा . नंतर कालांतराने त्याला घर बांधण्याचे ज्ञान प्राप्त झाले आणि गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली . आजही पहा प्रत्येक मनुष्य त्याच्या गरजेपेक्षा अधिक गोळा करून बसलेला आहे . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला भविष्याची चिंता आहे . मधमाशा मुंग्या ह्या जशा गरजेपेक्षा अधिक साठा करून ठेवतात तशीच सवय माणसाला लागलेली आहे . त्यामुळे परिक्रमावासींना देण्यात येणाऱ्या वस्तू या अशा प्रकारे गरजेपेक्षा अधिक साठा केलेल्या वस्तूंमधूनच येत असतात . क्वचित प्रसंगी ज्याच्याकडे गरजेपेक्षा अधिक वस्तू नाहीत असा मनुष्य देखील त्याच्याजवळ असलेल्या वस्तू परिक्रमा वासीना देऊन टाकतो .
> > >परिक्रमा करणाऱ्यांना फुकटात अन्न वाटणारे लोक, स्वत:चे पोट कुणाच्या जिवावर भरतात? > > >
परिक्रमावासींना दानधर्म करणारे लोक स्वतः शेतकरी किंवा कोळी किंवा शेतमजूर किंवा पशुपालक आहेत . हे स्वतःचे पोट स्वतः कष्ट करूनच भरतात . आपण यथेच्छ जेवणे । उरले ते अन्न वाटणे ॥ या रामदास स्वामींच्या वचनाप्रमाणे ते जगत असतात . परंतु ज्याच्याजवळ पोटभर जेवण्यासाठी नाही असा मनुष्य देखील परिक्रमावासी जे कष्ट उचलत आहे त्याला त्याचा पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वतः उपाशी राहतो परंतु त्याच्या घासातला घास काढून आम्हाला देतो .
> >हे सर्व दाते कुबेराचे वंशज आहेत की त्यांच्या दारात कल्पवृक्ष आहे जो मनात आलेल्या सर्व गोष्टी आपोआप, फुकटात देतो. > > > निसर्गाचा साधा सोपा नियम आहे . तुम्ही त्याला एक द्याल तर तो परत देताना कित्येक पटीने देतो . तुम्ही जमिनीला कणसातील एक दाणा दिला तर जमीन परत देताना शंभर दाण्याचे कणीस देते . तोच अनुभव इथे दान करणाऱ्या लोकांना येत असतो . मुळात त्यांना जेवणाच्या बदल्यात जेवणच मिळेल असे नाही . परंतु उपाशी जीवाच्या चेहऱ्यावर विलसणारे विलक्षण समाधान पाहिल्यावर त्यांना आतून मिळणारा जो आत्मिक आनंद आहे त्या आनंदासाठी मनुष्य सर्व प्रपंच करीत असतो . आनंद आणि वेळ या दोन गोष्टींची किंमत पैशांमध्ये करता येणे अवघड असते . कारण आनंद सहजासहजी मिळविता येत नाही आणि वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही .
> > > हे परिक्रमा मॉडेल, बेसिक इकॉनॉमिक्सच्या There is no free lunch याच्याशी सुसंगत नाही. > > >
There is no free lunch हे वाक्य कोणी लिहिले आहे ते मला माहिती नाही . परंतु हे वाक्य सत्यच आहे असे जे गृहीतक तुम्ही मनामध्ये धरलेले आहे त्याच्यामुळे ही विसंगती येथे दिसते आहे .मी पूर्वीच सांगितले त्याप्रमाणे जग काळे आणि पांढरे अशा दोन रंगांमध्ये रंगविता येत नाही . अमुक अमुक तत्व हे अर्थशास्त्राचे प्रमुख गृहीतक आहे असे मानणे चुकीचे आहे . अर्थ या शब्दातच त्याचे उत्तर आहे . प्रत्येक ठिकाणी संदर्भानुसार ज्याचा अर्थ बदलतो तो खरा अर्थ . एका विशिष्ट प्रकारे छापलेला पैसा म्हणजे अर्थ असेल तर मोदींनी तो पूर्वीच खोटा ठरवून टाकला होता . पैसा म्हणजे अर्थ नव्हे तर ज्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळू शकते असे काहीही देणे किंवा घेणे याला अर्थ असा अर्थ प्राप्त होतो . अशा अर्थाचे हे शास्त्र आहे . हे अत्यंत जटिल आणि सूक्ष्म आहे . स्थळ काल परिस्थितीनुसार त्याचे संदर्भ बदलत राहतात . एखादे गृहीतक डोक्यात धरून तुम्ही गुढ शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही किंवा आकलन तर होणारच नाही . There is no knowledge transfer possible with reserved mind polluted with assumptions. So better keep it open and rethink.
नदी जशी एका सरळ रेषेमध्ये वाहत नाही तसेच हे मॉडेल देखील आहे . उतार बघून परिस्थिती बघून त्या दिशेला जाते . प्रत्येकावर हे मॉडेल समान पद्धतीने कार्य करेलच असे नाही .आपले प्रतिसाद मनापासून आलेले वाटले म्हणून सविस्तर उत्तर लिहायचा प्रयत्न केला . हेच उत्तर तुमच्यासाठी बरोबर असेल असे देखील नाही .व्यक्ती तितक्या प्रकृती . परिक्रमेचा टेक अवे हेच ज्ञान आहे ! नर्मदे हर !
> >>निसर्ग पैसा ही currency
> >>निसर्ग पैसा ही currency वापरीत नाही. नदीकडून पाणी घेताना आपण तिला काय देतो? झाडावरची फळे तोडतो तेव्हा झाडाला पैसे देतो का? तेव्हा पैसा ही संकल्पना अत्यंत यशस्वी असली तरी तिच्याशिवाय चालणारे एक भले मोठे जग आहे. हे जग circular closed loop मध्ये चालते. What goes around comes around. When we pollute nature we are externalizing the cost of pollution to the nature. But it will come around soon! > > >
तुम्हाला परिक्रमेचा गर्भित अर्थ कळला ! सर्क्युलर क्लोजड लूप म्हणजेच परिक्रमा . जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा येणे म्हणजे परिक्रमा .अशी परिक्रमा कोण कोण करत आहे ? घड्याळात वेळ दाखविणारे काटे घटी केंद्रा भोवती अखंड परिक्रमा करीत आहेत . आकाशातून पडलेले पाणी नदीच्या रूपाने वाहून व पुन्हा समुद्रातून वाफ बनून ढग होत बरसून एक परिक्रमा अनुभवत आहे . अणु केंद्राभोवती इलेक्ट्रॉन परिक्रमा करत आहेत . चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे . पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत आहे . सूर्य देवयानी आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिक्रमा करत आहे . जिथे अशा प्रकारचे सर्क्युलर लूप आहे तिथले व्यवहार थोडेसे वेगळे असतात आणि एका सरळ रेषेत पुढे जाणाऱ्या लोकांचे व्यवहार वेगळे असतात . So there's a free lunch iff you are in Parikrama!
<< इथे दात्यांसाठी फक्त देवाण
<< इथे दात्यांसाठी फक्त देवाण आहे . आणि परिक्रमावासींसाठी फक्त घेवाण आहे . >> मान्य आहे. हे पटण्यासारखे आहे.
हे मॉडेल इतर ठिकाणी पण दिसते का? मैया सर्व काही फुकटात देते, असा केवळ नर्मदा परिक्रमेचा उदोउदो का होतो? इतर ठिकाणांचा का होत नाही?
<< सर्क्युलर क्लोजड लूप म्हणजेच परिक्रमा. >>
परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. लोक गिरनार परिक्रमा करतात, मानस सरोवराची पण प्रदक्षिणा करतात, तिथे पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप कसे काय होत नाही? किंवा होत असले तर त्याचा इतका गवगवा कसा होत नाही जितका नर्मदा परिक्रमेचा होतो.
पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप हे परिक्रमावासियांसाठी केले तरच पुण्य मिळते असे दात्यांना वाटते का? इतर यात्रांमध्ये (अमरनाथ यात्रा, वारकरी यात्रा वगैरे) सबकूछ फुकट असा प्रकार का होत नाही?
<< गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली. >> यात माणसाची प्रगल्भ बुद्धीमत्ता दिसून येते. त्यामुळेच मनुष्याला इतर पशू-पक्षांप्रमाणे रोज पोट भरण्यासाठी फिरावे लागत नाही.
<< ज्याच्याकडे गरजेपेक्षा अधिक वस्तू नाहीत असा मनुष्य देखील त्याच्याजवळ असलेल्या वस्तू परिक्रमा वासीना देऊन टाकतो. >> इतर लोकांकडून फुकटात सर्व गोष्टी घेऊन परिक्रमा करण्यापेक्षा, लोकांना दान करून जास्त पुण्य मिळते का?
एकदा परिक्रमा पूर्ण झाली की लोक परत संचय करायच्या मागेच लागतात ना? की त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन ते "एक दांडीला आणि एक xxडीला" असे आयुष्य जगायला सुरुवात करतात?
<< नदीच्या रूपाने वाहून व पुन्हा समुद्रातून वाफ बनून ढग होत बरसून एक परिक्रमा अनुभवत आहे . अणु केंद्राभोवती इलेक्ट्रॉन परिक्रमा करत आहेत . चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे . पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत आहे. >> हे सांगायचा उद्देश कळला नाही. हे विश्व मात्र अजूनही प्रसरण पावत आहे, परिक्रमा करत नाहीये.
@ लेखक, मी लेखमाला वाचलेली
@ लेखक, मी लेखमाला वाचलेली नाही. तुम्हाला लेखनासाठी शुभेच्छा.
--------
उबोंमुळे ही जुनी चर्चा आठवली, मी लिहिलं असतं तर पुन्हा असंच काहीसं लिहिलं असतं म्हणून लिहिलंच नाही. ही चर्चा कृपया सर्वांनी वाचावी अशी विनंती. मला अजूनही बिनपैशाचं काही महिने- पुरेसं अन्नपाणी व शिक्षण नसलेल्या अंधश्रद्ध आयजीच्या जीवावर सुखवस्तू-सुशिक्षित बायजीने 'स्पिरिच्युअल किक'साठी 'परिव्राजक- परिव्राजक' खेळल्यानं आध्यात्मिक प्रगती कशी काय साध्य होणार आहे हे गमक कळलेलं नाही. Spirituality should be exploitation free zone..! त्यात तथ्य असेल तर मला याचा लक्षांशावा भाग सुद्धा व्हायला आवडणार नाही. नसेल तर या पोस्टीकडे दुर्लक्ष करा.
https://www.maayboli.com/node/77911?page=2
उबो, हेच विचार डोक्यात येत
उबो, हेच विचार डोक्यात येत होते.
पण ज्याची अपार श्रद्धा आहे, तितका भाव मनात आहे त्याच्यासाठी हे वर्क होत असावं.कसं ते माहीत नाही.किंवा परिक्रमा करतानाच या अडचणींना सामोरं जायची मनाची तयारी असावी.
> >एकदा परिक्रमा पूर्ण झाली
> >एकदा परिक्रमा पूर्ण झाली की लोक परत संचय करायच्या मागेच लागतात ना? की त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन ते "एक दांडीला आणि एक xxडीला" असे आयुष्य जगायला सुरुवात करतात? > > मला असे करणारे काही लोक भेटले तिथे . त्यांनी परिक्रमेतच पूर्णवेळ साधूवृत्ती स्वीकारली आणि घरी परतलेच नाहीत . त्यात तरुणही होते .
> >पुरेसं अन्नपाणी व शिक्षण
> >पुरेसं अन्नपाणी व शिक्षण नसलेल्या अंधश्रद्ध आयजीच्या जीवावर सुखवस्तू-सुशिक्षित बायजीने 'स्पिरिच्युअल किक'साठी 'परिव्राजक- परिव्राजक' खेळल्यानं आध्यात्मिक प्रगती कशी काय साध्य होणार > > सुशिक्षित बायजी शक्यतो परिक्रमा झाल्यावर अशा अंधश्रद्ध आयजींना भरघोस आर्थिक आणि धान्यादीची मदत आठवणीने आवर्जून करतात . मी जागोजागी क्रमांक दिलेले आहेत . पेटीएम करो !
> >लोक गिरनार परिक्रमा करतात,
> >लोक गिरनार परिक्रमा करतात, मानस सरोवराची पण प्रदक्षिणा करतात, तिथे पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप कसे काय होत नाही? किंवा होत असले तर त्याचा इतका गवगवा कसा होत नाही जितका नर्मदा परिक्रमेचा होतो.
पूर्णतः फुकट अन्नवाटप, वस्तू वाटप हे परिक्रमावासियांसाठी केले तरच पुण्य मिळते असे दात्यांना वाटते का? इतर यात्रांमध्ये (अमरनाथ यात्रा, वारकरी यात्रा वगैरे) सबकूछ फुकट असा प्रकार का होत नाही? > > >
वरील सर्व यात्रांमध्ये मोफत अन्नदान व दानधर्म भरभरून होतो . कदाचित त्याबद्दल आपण फारसे वाचत नसू तसेच काठिण्य पातळी व कालावधी पाहता नर्मदा परिक्रमा प्रदीर्घ असल्यामुळे याचा गवगवा अधीक होत असावा . तसेचits totally unplanned travel.
नर्मदे हर, चांगले वाटले
नर्मदे हर चांगले वाटले वाचून. आभारी आहे. बरेचदा हे स्पष्ट कळत नाही. सगळ्यांनी असाच मार्ग स्विकारलेला व हे नॉर्मलाईज झालेलं बघायला आवडेल.
शक्यता आहे शेकडो
<<पूर्णवेळ साधूवृत्ती स्वीकारली >>
शक्यता आहे शेकडो परिक्रमावासियांमध्ये १-२ असे भेटण्याचे. गौर गोपाल दास पण इंजिनिअर झाल्यावर साधू झालाच की (ते पण कुठलीही परिक्रमा न करता).
पण इतर परिक्रमावासियांचं काय? ते संचय करायचं सोडतात का?
<भरघोस आर्थिक आणि धान्यादीची मदत आठवणीने आवर्जून करतात. पेटीएम करो ! >>
म्हणजे हे आहे तर मदत करण्याचे बिझनेस मॉडेल. कळले आता.
नर्मदे हर, अतिशय संयम ठेवून
नर्मदे हर, अतिशय संयम ठेवून प्रश्नांची उत्तरं देताय हे स्तुत्य. आता पुढचे 2-3 भाग पण आणा ना इथे.
मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा
मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे.
जर ते मायबोलीवर आले असते तर उत्तरं देत बसले असते, राजकीय धाग्यांवर कुस्ती खेळले असते, ड्युआयड्या काढत बसले असते.
विनोदी लेखक फॉर्वर्डच्या धाग्यांवर रमले असते..
मग साहित्यनिर्मिती कोण करणार ?
उपाशी बोका, तुमचा प्रश्न
उपाशी बोका, तुमचा प्रश्न विचारण्याचा टोन जरा चुकीचा वाटतोय.
मी नर्मदे हर ह्यांचे ब्लॉग पोस्ट अजून वाचले नाहीत.
पण काही लोकांकडून प्रत्यक्ष जे ऐकले आहे, ते अनुभव अतिशय रॉ किंवा उघडं सत्य म्हणतात त्या प्रकारचे आहेत. म्हणजे माणूस म्हणून असलेली मर्यादा , लायकी किंवा निसर्गाची ताकद ह्या सगळ्याचा जबरदस्त आणि जवळून अनुभव ह्या परिक्रमा दरम्याने मिळतो.
गो. नी. चे कुणा एकाची भ्रमण गाथा पाहिले १५ भाग ऐकले तिथेही हेच जाणवते.
बरेचसे लोक तुमच्या आमच्या सारखे मध्यमवर्गीय घरातून आलेले असतात.
त्यांचा हेतू फुकटात काही मिळावे हा नसतो. पण त्याचे स्वरूप असे आहे की तिथे प्रत्येक गावागावात सर्व सोयी सुविधा नसतात, हॉटेल नसतात, सहा महिने शिधा gheun चालणे तर अशक्यप्राय च . त्यामुळे गावागावात घरांमध्ये लोक आपणहून परिक्रमावसिना उतरवायची सोय करतात. त्यामागे काही संघटन नसते. आपल्यातलेच दोन घास ते त्यांना देतात.
अजुन एक गोष्ट एकीने सांगितले,
त्या बाईंना सुरुवातीला वाटायचे की ही गरीब लोक आहेत, ह्यांनी त्यांच्यातलच आम्हाला दिलं म्हणून ती जाताना काही रुपये ठेवत असे..
पण ती म्हणाली की हळू हळू मला वाटायला लागलं की इथे 'मी 'येतोय, शेवटी मनात येते तिने दिलं पण मी पैसे तर ठेवले..
तर हा मी मध्ये येतोय, आणि ते मी पण विसरण्यासाठी जर परिक्रमा करतोय तर हे बरोबर नाही. त्यांनी पैसे देणं बंद केलं...
गरीब लोकांनी आपले पोट मारून
गरीब लोकांनी आपले पोट मारून इतरांना खायला घालण हे फ्री लंच नाहीच. फ्री लंच हे कुणीही किंमत भरली नाही अश्या अर्थाने वापरले जाते.
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करून ठेवायची सवय त्याला लागली. >> यात माणसाची प्रगल्भ बुद्धीमत्ता दिसून येते. त्यामुळेच मनुष्याला इतर पशू-पक्षांप्रमाणे रोज पोट भरण्यासाठी फिरावे लागत नाही. >
उबो, या विधानातल्या प्रगल्भ या शब्दाविषयी मला शंका आहे! Human race might be smarter but is it wiser?
नर्मदे हर, earth is a closed loop system but it does have a continuous, external, primary source of energy - Sun. त्यामुळे सारे विश्व closed loop मध्ये चालते असे विधान तितके योग्य नाही. उबो म्हणतात तसे विश्व प्रसरण पावत आहे.
तुमच्या पेटिएम करो या आवाहनाशी देखील मी फार सहमत नाही. नर्मदा परिक्रमेशी प्रत्यक्ष संलग्न असाल तरच त्या लूपमध्ये रहावे. माझ्या मते आपल्याकडील अनेक यात्रा आणि परिक्रमांचे (उदा. पालखी, नर्मदा परिक्रमा, गिरनार, चारधाम इत्यादी) उदात्तीकरण आणि बाजारीकरण होतंय ही फार खेदाची गोष्ट आहे. अस्मिताने लिहीलं आहे त्याप्रमाणे सुखवस्तू यात्रा/परिक्रमा ही त्या उपक्रमाच्या मूळ हेतूला हरताळ फासणारी आणि तेथील निसर्गाला हानी पोचणारी ठरू लागली आहे. IMHO, this model has some carrying capacity and will fail if that capacity exceeds. We need to respect the boundaries.
फ्री लंच हे कुणीही किंमत भरली
फ्री लंच हे कुणीही किंमत भरली नाही अश्या अर्थाने वापरले जाते. >>> बिझनेस मॉडेलमधे आवळा देऊन कोहळा काढणे या अर्थाने असेल असे तो लेख वाचून वाटले होते.
गोरक्षा आश्रमात गाईंवर मोफत इलाज होतो / मथुरेतले विधवाश्रम किंवा अशा सेवाभावी संस्थात फ्री लंच नसते हे प्रत्यक्ष बघितल्याने सांगू शकतो. हे मॉडेल दाखवून मोठ्या देणग्या मिळतात. कमी मिळाल्या तर नुकसान.
काही तीर्थयात्रांमधे यात्रेकरूंची सोय मोफत होते. तिथे गरीब भाविक जाऊ लागल्यावर श्रीमंत सुद्धा येतात. त्यावर तिथला पर्यटन व्यवसाय चालतो.
पण मान सरोवर इथे स्थानिक लोक नाहीत. अमरनाथ किंवा तत्सम पहाडी आणि उंचावरच्या यात्रेदरम्यान छोटी गावे लागतात ज्यांना आपल शिधा लांबून आणावा लागतो. इथे फ्री मिळणे अशक्य आहे. इथे हातावर पोट आहे. पर्यटनावर लोक अवलंबून आहेत.
नर्मदा परिक्रमा पहिलेली नाही. पण ट्रेकिंग म्हणून पाहिले तर खडतर मार्ग पार करण्यासाठी इतर ठिकाणच्या यात्रेकरूंप्रमाणे झुंडीच्या झुंडी येत नसाव्यात. दूर दूर असलेली गावे, पर्यटकांसाठी नसलेल्या हॉटेल व इतर सुविधा यामुळे असेल. म्हणून तुरळक संख्येने येणार्यांसाठी नि:स्वार्थी भावनेने मदत केली जात असेल. उद्या रोजचे हजारो पर्यटक येऊ लागले तर स्थानिक कुठून त्यांना खायला घालतील ?
उलट हॉटेल्स सुरू होतील.
तसेच अन्नछत्र, आश्रमांची संख्या वाढेल. त्यासाठी देणग्या गोळा करणारी पद्धतशीर यंत्रणा काम करू लागेल. त्याला बिझनेस मॉडेल म्हणता येईल.
जि व अस्मिता पोस्ट आवडल्या.
जि व अस्मिता पोस्ट आवडल्या.
माझ्या मते आपल्याकडील अनेक यात्रा आणि परिक्रमांचे (उदा. पालखी, नर्मदा परिक्रमा, गिरनार, चारधाम इत्यादी) उदात्तीकरण आणि बाजारीकरण होतंय ही फार खेदाची गोष्ट आहे>>>> हेच नर्मदा परिक्रमेबाबत होतंय असं परिक्रमा करून आलेली मैत्रीण म्हणाली. अमरनाथ यात्राही सुनियोजित असते काही अघटित घडलं तर आर्मी मदतीला तत्पर असते.
परिक्रमा हे *तप* आहे त्याची तुलना कशाशी होऊ नाही शकत.
उलट हॉटेल्स सुरू होतील.
तसेच अन्नछत्र, आश्रमांची संख्या वाढेल. त्यासाठी देणग्या गोळा करणारी पद्धतशीर यंत्रणा काम करू लागेल. त्याला बिझनेस मॉडेल म्हणता येईल.>>>>>> चितळे पतीपत्नीबद्दल प्रचंड आदर आहे. माझ्या माहितीतील एक काका अन्नछत्रासाठी देणगी (पैसा/धान्य) गोळी करतात तसेच सेवा देण्यासाठी इच्छुक लोकांचे वेळापत्रक तयार करतात. जीवे भावे शिव सेवा हे जरी खरं असलं तरी आपण परिक्रमावासिंयांच्या तपात बाधा आणतोय ना?
Asmita plus 200.
Asmita plus 200.
People are refraining from paying it forward giving convenient reasons.
Also main author supports demonetisation.
> >तुरळक संख्येने येणार्
> >तुरळक संख्येने येणार्यांसाठी नि:स्वार्थी भावनेने मदत केली जात असेल. उद्या रोजचे हजारो पर्यटक येऊ लागले तर स्थानिक कुठून त्यांना खायला घालतील ? > >
या प्रश्नात खात्री कमी आणि अनुमान जास्त आहे . असेना . स्वानुभव सांगतो .
९० % परिक्रमावासी आजकाल ओंकारेश्वर वरून परिक्रमा उचलतात . त्यातील केवळ दहा-बारा टक्के लोकांची परिक्रमा पूर्ण होते असे आकडेवारी सांगते . 2022 या सालातील आकडेवारी सांगतो . दोन लाख साठ हजार लोकांनी पायी परिक्रमा उचलली . त्यातील बारा पंधरा हजार लोकांची परिक्रमा पूर्ण झाली . त्यामुळे ओंकारेश्वर ते समुद्र या मार्गावरील आश्रमांमध्ये देव दिवाळीच्या नंतर अक्षरशः हजारो लोकांच्या झुंडी येत असतात व त्या सर्वांना मोफत अन्नदान केले जाते . आपण लेख मला वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की लोक जाताना जे पैसे आम्हाला देतात त्याचे अक्षरशः ओझे होत असते . त्यामुळे परिक्रमावासी देखील धानधर्म आवडीने करतात . व तो बरेचदा स्वीकारला जातो .
> >main author supports
> >main author supports demonetisation > >
I have just mentioned it.
> >मतकरी, पुलं, कुसुमाग्रज,
> >मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे. > > : P
ह ह लो अर्थात ROFL
( हसून हसून लोळलो )
> >पण मान सरोवर इथे स्थानिक
> >पण मान सरोवर इथे स्थानिक लोक नाहीत. अमरनाथ किंवा तत्सम पहाडी आणि उंचावरच्या यात्रेदरम्यान छोटी गावे लागतात ज्यांना आपल शिधा लांबून आणावा लागतो. इथे फ्री मिळणे अशक्य आहे. > >
जिथे जिथे हिंदु जनसंख्या कमी आहे तिथे तिथे भाविक भक्तांची गैरसोय होते . हे विधान सरसकट बरोबर नाही परंतु तरीदेखील मी एक विधान धाष्ट्रयाने करतो . की समजा अशी कल्पना करा की बहुतांश परिक्रमावासी रिकामटेकडे आणि काही उद्योगधंदा नसलेले लोक आहेत . त्यांना बाकी काही करायला काम उरले नाही म्हणून परिक्रमा करत आहेत . अशी एक कल्पना करून पाहूयात . परंतु ते आपल्या समाजाचा भाग आहेत हे तर उघड आहे . आणि त्यांना आपणच म्हणजे मानवसमाजाने जन्माला घातले आहे हे देखील सत्य आहे . मग ते कसेही असेनात का त्यांचा सांभाळ करणे हे एक प्रगल्भ उन्नत समाज म्हणून आपले कर्तव्य आहे . इंग्लंडमध्ये जसे बेरोजगारांना भत्ता मिळतो तसे काहीतरी समजा . हिंदू धर्माने अशा लोकांची देखील सोय करून ठेवलेली आहे . अशा लोकांना काही ना काही माध्यमातून किमान दोन वेळचे जेवण मिळेल इतकी काळजी पाप-पुण्याच्या नावाखाली करून ठेवलेली आहे . परंतु जिथे हिंदू संस्कृती मानणारी लोकसंख्या कमी होत जाते तिथे मात्र अशा लोकांचे हाल होतात . मी माझ्या लेखमालेमध्ये वेळोवेळी अशा गावांची नावे देखील दिलेली आहेत . व पुढे देखील देणार आहे . कैलास मानसरोवर यात्रेचे नेमके तेच झालेले आहे .अमरनाथचेही तेच झालेले आहे . आपल्या भारतामध्ये भावसार समाज आहे त्यांची देवी हिंग्लजमाता पाकिस्तान मध्ये आहे . तिथे त्यांच्याकडून प्रचंड पैसा लुटला जातो . तीच अवस्था कैलास मानसरोवर यात्रेच्या चायनीज फीज च्या बाबतीत आहे . जबजब हिंदू घटा तब तब देश बटा . आता हे योग्य का अयोग्य हे ज्याचे त्याने आपापल्या विवेकानुसार आणि जनुकांनुसार ठरवावे .
Hit another marker.
Hit another marker.
अतिथी म्हणजे न सांगता, अचानक
अतिथी म्हणजे न सांगता, अचानक आलेला पाहुणा. त्याला देव मानणारी आपली संस्कृती आहे.
संपुर्ण भारतभरात विशेषतः ग्रामीण भागात अतिथी देवो भव ह्या उक्तीप्रमाणे वागणारी माणसे दिसून येतात.
ती माणसे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कुठ्ल्याही पातळीवर ती असली तरी त्यांची अनोळखी माणसाशी वागण्याची रीत (शहरी मानसिकतेशी विपरीत) समोरच्यावर विश्वास टाकणारी आणि आदरातिथ्य करणारी असते.
आमच्या कोकणातल्या तालुक्याच्या गावी असलेल्या घरात परतीची मुक्कामी जाणारी गाडी चुकली म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणाने
अमक्याचा तमक्या अशा ओळखीवरच नव्हे तर संपुर्ण अनोळखी माणसे ओटीवर मुक्काम करून (couchsurfing) आमटी भात खाऊन गेलेली आहेत जे मी स्वतः शाळकरी वयाचा असताना स्वतःही बघितले आहे.
पण त्याला आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत आता असे कोण करत असेल असा माझा माईंड सेट / विचार झालेला असताना मला नुकताच एक सुखद अनुभव आला.
मला असा अनुभव नुकताच आणि पुण्यापासून फार दूर नसलेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या विंझर गावात आला.
सरावाकरता म्हणून सिंहगड किल्ला पुणे दरवाज्याकडून चढून कल्याण दरवाज्या तून मागच्या बाजूला असलेल्या विंझर गावात उतरून परत पावली यायचे असा प्लॅन होता. विंझर गावात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे असे कळले होते. त्यामुळे बरोबर जास्त पाणी न बाळगता, दोन बाटल्या ठेवल्या त्यातले पाणी संपले की विंझरमधून रिफील करून घ्यायचे असे ठरवले होते. गावात भेटलेल्या ग्रामस्थांकडे त्याबद्दल चौकशी केली असता, टाकीतून कशाला , चला की आपल्याकडे असे म्हणून त्यातल्या एकाने आम्हाला त्यांच्या घरी नेऊन आमच्या बाटल्यातून पाणी तर भरून दिलेच वर चहा प्यायल्या शिवाय जायचे नाही असे सांगून चहा पाजूनच सोडले.
सिंहगडासारख्या व्यापारी वृतीची लागण झालेल्या गडाच्या पुण्याच्या बाजूच्या वाडी वस्तीत आता सायकल पार्क करण्याचे पैसे शाळकरी मुलांकडूनही आकारले जातात त्या पार्श्वभुमीवर हा अनुभव सुखद आश्चर्याचा धक्का देणारा ठरला.
तर सांगायचा मुद्दा जगात अजूनही काही माणसे अशी आहेत ज्यांचे असे वागणे हे काही मिळवण्याकरता म्हणून नसते तर त्यांची जगण्याची पद्धतच अशी आहे.
कंटाळवाणा झाला आता हा धागा.
कंटाळवाणा झाला आता हा धागा. परिक्रमा राहिली बाजूला आणि जो तो स्वतःचे पराक्रमच सांगत सुटलाय. हे असं स्वतःचं उदो उदो करत बसता त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी नर्मदामैया बोलवण्याऐवजी कंपनीमैया बोलवत असते.
नर्मदे हर , तुम्ही
नर्मदे हर , तुम्ही प्रत्येकाचे म्हणणे खोडून काढत आहातच, पण जे म्हटलेले नाही ते शब्द पदरचे घालून खंडन करताय हे चुकीचे आहे. माझ्या प्रतिसादात हिंदू लोकसंख्या कमी आहे असा शब्दप्रयोगच नाही.
मान सरोवर कैलास या भागात रहिवास आहे का ? हिंदूच काय कुठल्याही धर्माचा आहे का याची तपासणी करा. हिमालयातले ट्राईब्ज हे संख्येने तुरळक असतात. जिथे नद्या नाहीत,, शेती पिकत नाहीत तिथले लोक बर्याच गोष्टींसाठी अवलंबून असतात. ते काय मदत करणार हा मुद्दा आहे. तुम्ही भलतीकडेच वळवत आहात.
जितके कमी प्रश्नोत्तरामधे रमाल तितके चांगले हे आधीच सांगितले होते. लेखकाच्या धारणा, पूर्वग्रह समोर आलेले नसताना त्याची चिकित्सा करणे चुकीचेच पण ते समोर आले कि मग त्याच्या लिखाणाची त्याच पद्धतीने चिकित्सा होत जाणार. शेवटी आपली मर्जी.
रघु आचार्य आपला गैरसमज झालेला
रघु आचार्य आपला गैरसमज झालेला दिसतो आहे .
मी खालील वाक्य बोललो आहे .
> >जिथे जिथे हिंदु जनसंख्या कमी आहे तिथे तिथे भाविक भक्तांची गैरसोय होते . हे विधान सरसकट बरोबर नाही परंतु तरीदेखील मी एक विधान धाष्ट्रयाने करतो . की समजा अशी कल्पना करा .. > >
यातील हिंदू जनसंख्या कमी आहे . .हे तुमचे नाही माझे मत
आहे . आणि हे विधान सरसकट बरोबर नाही असे मी माझ्या पुढील वाक्याबद्दल बोलतो आहे इथे माझ्याकडून व्याकरणात पण चूक झाली आहे हे लक्षात घ्यावे . तुम्ही असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही . आणि विषय भरकटण्याचा देखील काहीही संबंध नाही . परिक्रमेमध्ये मला हिंदू जनसंख्या कमी असलेल्या गावात आलेले अनुभव मी नावासकट दिलेले आहेत वाचून पाहणे . प्रश्न उत्तरामध्ये मी किती रमावे हा माझा प्रश्न आहे असे आपल्याला वाटत नाही का ? आज प्रश्न उत्तरांमध्ये रमू नका सांगत आहात .उद्या परिक्रमेविषयी काही सांगू नका असे देखील म्हणू शकता ! मुळात मी प्रश्न उत्तरांमध्ये रमत नाही आहे तर जे प्रश्न मला मनापासून विचारलेले वाटत आहेत त्याची माझ्या परीने उत्तर देत आहे . या कमेंट जर ब्लॉगवर आले असता तर तिथे देखील मी अशीच उत्तरे दिली असती . मानसरोवर येथे वस्ती जरी कमी असली तरी तिथे नियंत्रण भारतीय सरकारचे नसून कम्युनिस्ट सरकारचे आहे त्याचा हा परिणाम आहे असे मला म्हणायचे आहे . लोकशाही पद्धतीने चाललेली छान सकारात्मक चर्चा वेगळ्या वळणाकडे आपण नेऊयात नको . मी फक्त लेख लिहावे आणि चर्चेत भाग घेऊ नये अशी आपली अपेक्षा असेल तर ती निष्फळ ठरणार आहे . आणि आपल्याला प्रतिसाद नको असेल तर सादच देऊ नये . मी पुन्हा पुन्हा सर्वांना एकच आवाहन केलेले आपल्याला आढळेल की परिक्रमेविषयी काही शंका असतील तर विचाराव्यात . इथे स्वतः कदाचित काही पावले देखील न चालणारे विद्वान अधिक आहेत असे मला त्यांच्या प्रतिक्रिया वाचून जाणवत आहे (हे तुमच्याबद्दल बोलत नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी ). सर्व प्रतिसाद वाचणाऱ्या लोकांचा बुद्धिभ्रम होऊ नये म्हणून त्यांनी काही चुकीचा मुद्दा मांडला तर त्याचा योग्य प्रतिवाद करणे हे माझे कर्तव्य आहे . माझी उत्तरे ऐकून कोणाला लिखाण वाचायची इच्छा न होईल तर त्याला माझा निरुपाय आहे . मुळात माझे लिखाण कोणी वाचावे आणि कोणी वाचू नये हेच ठरवणारी एक वेगळी शक्ती कार्यरत आहे असे मानणारा मी आहे . असो . चूक भूल देणे घेणे . एक पूर्णविराम चुकीच्या ठिकाणी पडल्यामुळे आपला गैरसमज झाला .
मायबोली हा काय प्रकार आहे
मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती . प्रथमच मी इथे काहीतरी लिखाण टाकले आणि त्यावर इतक्या प्रतिक्रिया येतात याची देखील मला कल्पना नव्हती . एकंदर सर्व प्रतिक्रियांचा सूर पाहता इथे या विषयावरील लिखाण अस्थानी आहे असे सांप्रत माझे मत झालेले आहे . त्यामुळे आपल्या सर्वांच्या झालेल्या कालापव्यासाठी आपणा सर्वांची क्षमा मागून काही वेळातच मी मायबोली या प्रकाराचा निरोप घेत आहे . माझ्या ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवीन . माझ्या गतीने सुरू ठेवीन .त्यासाठी कुठल्याही दबावाची मला सवय नाही . पहिले काही लेख लिहायला मी आठ महिने लावले होते . उठ लिहायला बस आणि लिहून पूर्ण कर अशा प्रकारचे हे लिखाण नाही आहे . आतून प्रेरणा स्फूर्ती झाली की लिहायला बसत असतो . बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आणि लिखाणासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार . नकारात्मक प्रतिक्रिया अधिक वाढू नयेत ही एक परिक्रमावासी म्हणून माझी जबाबदारी समजतो . आधीच परिक्रमा करण्याची इच्छा कोणाला होत असेल आणि अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाचून ती मरत असेल तर ते पातक माझ्यामुळे घडू नये इतकी माफक अपेक्षा आहे . त्यामुळे इथून पुढे एकाही कमेंटला कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर न देता काही ठराविक वेळ झाला की माझे सर्व लिखाण मी मायबोली वरून उडवून टाकणार आहे आणि मायबोलीचा निरोप घेतो आहे . एखाद्याला हे लिखाण फार चांगले वाटले तर तो तसेही कुठे ना कुठे त्याला प्रसिद्धी देईलच . त्याची सत्यासत्यता तपासत मी स्वतः येऊन प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची गरज नाही हे बहुतेकांचे म्हणणे योग्य आहे . नर्मदा परिक्रमे विषयी अधिक माहिती हवी असेल तर तिचे स्मरण करा .योग्य मार्ग मिळेल ! नर्मदे हर !
विषय भरकटलाच आहे तर,

Pages