Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीन स्पिनर आहेत आपले. कसोटी
तीन स्पिनर आहेत आपले. कसोटी दर्जाचे.
वेगवान गोलंदाजी मध्ये बुमराह सिराज यांनी लवकर विकेट काढून फ्लाईंग स्टार्ट रोखली तर स्पिनरना फायद्याचे ठरेल. मॅच गोलंदाजांनाच सेट करावी लागणार..
मार्शला उचलला!
मार्शला उचलला!
भारत वि. ऑस्ट्रेलिया विश्वचषक
भारत वि. ऑस्ट्रेलिया विश्वचषक चा सामना तोही रविवारी, तरीही स्टेडियम फुल नाही, खूप चिंताजनक आहे.
हार्दिकला आणलाय. कारण स्मिथ
हार्दिकला आणलाय. कारण स्मिथ हार्दीकचा बकरा आहे. बघूया काय होतंय.
ऑस्ट्रेलिया काय दळण दळताहेत!
ऑस्ट्रेलिया काय दळण दळताहेत! आता ज्वारी टाकली आहे.
बॉल फसू लागलेत.. रन आटू लागले
बॉल फसू लागलेत.. रन आटू लागले आहेत.. आणि विकेट येऊ लागल्यात..
ह्या पीच वर अफगाणीस्तानच्या
ह्या पीच वर अफगाणीस्तानच्या दोन मॅॅचेस आहेत. ते त्या दोनी जिंकू शकतात.
मस्त घेतल्या २ आत्ता मगाशी
मस्त घेतल्या २ आत्ता मगाशी जडेजानी. फुल्ल टू प्रेशर ऑन आहे!
जरा रँट/वेंट करतो.
एकतर एशिया कप सुरु असताना इएस्पिएन नी कुठेही आम्ही वर्ल्ड कप प्रसारित करु ह्याचा उल्लेख केला नाही. विच इज वियर्ड. अमेरिकेत खुप देशी लोकं आहेत.
हे काही दाखवणार नाहीत आणि ऑनलाईन माहितीनुसार अमेरिकेत राईट्स विलोकडे आहेत म्हणून मी विलोची मेंबरशिप घेऊन ठेवली. आता परवा नेहमी सारखं लॉग ईन केलं तर म्हणे हा ब्रॉड्कास्ट फक्त विलो टिवि टिवि एवरिव्हेअर कस्टमर्स करताच आहे.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हे टिवि एवरिव्हेअर म्हणजे तुमच्या प्रोवाईडर थ्रु लॉग इन करायचे!
काहीही मैंटलपणा! मग आज सकाळी सुगावा लागला कि इ एस्पि एन वर दिसतोय वर्ल्ड कप. येरे माझ्या मागल्या करत परत इ एस्पिएन सब्सक्रिप्शन घेतलं.
110/2 वरून ऑसी 140/7
110/2 वरून ऑसी 140/7
स्पिन नाही खेळता आला
(पण आपले लोक पण आजकाल तेव्हडा चांगला खेळत नाहीत)
200 चे उद्दिष्ट दिले
200 चे उद्दिष्ट दिले कांगारुनी.
खेळपट्टी स्लो आहे
इंडियन बॅट्समेनला हा पेपर नीट
इंडियन बॅट्समेनला हा पेपर नीट सोडवावा लागेल. विकेट फसवी आहे. स्पिन, पेस-ऑफ, कटर्स हे विकेट-टेकर्स आहेत. ऑस्ट्रेलियाला संधी देऊन चालणार नाही.
कांगारू च्या शेपटानी 60 धावा
कांगारू च्या शेपटानी 60 धावा जोडल्या
आपली (स्लिप) फील्डिंग शेवटी गचाळ झाली. कॅच सुटले, धावा गेल्या. एकुणात थोडं गृहीत धरल्याचा फील आला.
आता बॅटिंग कशी होते बघू...
किशन पहिल्या बॉल वर गेला
किशन पहिल्या बॉल वर गेला
वडापाव दुसऱ्या ओव्हर मधे अंपायर्स कॉल वर गेला
अय्यर नी आम्लेट साठी तिसरं अंडं घातलं
बोंबला
गडगडली
गडगडली
इतके सब्स्क्रिप्शन्स
इतके सब्स्क्रिप्शन्स घेण्यापेक्षा ip tv का घेत नाही बुआ...
ऑस्ट्रेलिया ने निराशा केलीय.. तीनशे तरी पाहिजे होता म्हणजे चेस बघायला मजा आली असती...
रुको जरा रूको सब्र करो. किती
दोन विकेट लवकर गेल्यावर
दोन विकेट लवकर गेल्यावर राहुलला आय्याराच्या आधी पाठवायला हवे होते..
शर्माची एक विकेट छान सेट अप
शर्माची एक विकेट छान सेट अप करून घेतली. बाकी दोघांनी सरळ फेकल्या आहेत. पीच चे टेन्शन न घेता खेळले हे दोघेच तर पुन्हा येऊ एक पार्टनरशिप ने गेममध्ये...
कोहलीची सोडली Turning point
कोहलीची सोडली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Turning point
हो च्रप्स. आहे डोक्यात
हो च्रप्स. आहे डोक्यात घ्यायचं.
बुवा - सेम हिअर. माहिती
बुवा - सेम हिअर. माहिती क्लिअर नाही कोठेही.
त्यात हायलाइट्स पॅकेज मधे गोंधळ आहे. काल द. आफ्रिका वि श्रीलंका चे शोधत होतो. हुलू व इसपीएन दोन्हीवर या टायटल वर प्रत्यक्षात बांगला देश वि अफगाणिस्तान दाखवत होते - म्हणजे त्यांच्याकडे रिलीज केलेली क्लिप गंडलेली असावी. शेवटी यू ट्यूबवर "ऑल इंडिया कबड्डी" या युजर ने लोड केलेली क्लिप पाहिली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेरिकेत फार लफडे आहेत वाटते
अमेरिकेत फार लफडे आहेत वाटते बघायचे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे कोणी टीव्ही बघत नाही म्हणून टाटा स्काय रिचार्ज करणे सोडून दिलेय केव्हाच..
मोबाईलवर हॉटस्टार फ्री दाखवत आहे.
पण वर्ल्डकप कोण मोबाईलवर बघणार म्हणून टीव्ही ला कास्ट करायला गेलो तर पैसे मागितले.
किती तर फक्त १४९ रुपये ३ महिने.
झाली सोय वर्ल्डकपची १४९ रुपयात
लॅपटॉप वर बघायचा प्लॅन ८९९
लॅपटॉप वर बघायचा प्लॅन ८९९ दाखवतोय मला. मोबाईल प्लॅन आहे त्यात लॅपटॉप tv वर नाही दाखवत.
हौ फा! ऑल इंडिया कब्बडी फार
हौ फा! ऑल इंडिया कब्बडी फार उपयोगाला येतो
ऋन्मेष, वांदे असे नाही पण नीट माहिती दिलेली नाही. अॅक्सेस आहे. मार्केटिंग नीट नाही केलं. ह्यावेळेस वेगळं म्हणजे विलो कडे राईट्स असून त्यांना डायरेक्ट त्यांच्या वेबसाईट आणि अॅप फर स्ट्रिमिंग करायचे राईट्स नाही. ह्या आधी असं काही मी तरी अनुभवलेलं नाही. विलो कडे राईट्स असले की फक्त विलो घेतलं की काम व्हायचं.
धन्यवाद कोहली आणि राहूल! नैया पार लगा दी (ऑर ऑल्मोस्ट लगा दी)!
बाकी पीच बद्दल काय मत लोखो? फास्ट आणि स्पिन दोघांना सपोर्ट मिळाला असं वाटलं मला. आपण बॉलिंग करत होतो तेव्हा बुमराहचे काही बॉल तुफान स्किड होताना बघितले मी. जडेजाचे काही बॉल तर काहीच्या काही वळले. हे नवीन वाटलं मला.
नवीन पीच मेकिंग प्रयोग वाटत आहेत. जाणकारांनी उजेड पाडा जरा.
ऋन्मेष, वांदे असे नाही >>> हो
ऋन्मेष, वांदे असे नाही >>> हो ते असेच गमतीने म्हटले.. पण जनरली अशी स्पर्धा सुरू झाली की इथे तुम्हा लोकांची कुठे बघायची यावर चर्चा सुरू होते. मी वाचत नाही ती मन लाऊन. असेच म्हटले..
ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी घ्यायचा
ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी घ्यायचा निर्णय चुकला.
कॉमेंट्रीला बहुतेक इरफान पठाण की कोणीतरी हे सुरुवातीलाच म्हणालेला की पीच दुसऱ्या इनिंगला अंडरलाईट चांगला होईल.. गूड टॉस टू लूज.. आणि मलाही तसेच वाटलेले की हा पीच नंतर सेटल होईल.. म्हणून वर मी म्हटलेले की आपण तीन विकेट अश्याच फेकल्या आहेत. या दोघांची पार्टनरशिप आणि मॅच आपलीच आहे..
राहुल वैतागला शेवटचा सिक्स
राहुल वैतागला शेवटचा सिक्स गेला तर..
त्याला फोर हवा होता .. सेंच्युरी हुकली..
पांड्याची बॅट समोरचा खेळाडू
पांड्याची बॅट समोरचा खेळाडू शतक अर्धशतकाच्या जवळ आला की आपोआप सिक्स मारते.
पांड्या लय पोचलेला आहे..
पांड्या लय पोचलेला आहे.. मुद्दाम करतो...
ह्या लेवलला खेळून जर ही लोकं
ह्या लेवलला खेळून जर ही लोकं इतकी petty असू शकतील तर कमाल आहे. मला नाही वाटत पंड्या मुद्दाम करत असेल.
Pages