क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिच बद्दल काय मत लोकहो? मी आत्ता बघतोय ते पण ऑन ड्ण ऑफ. अफघाणांना पण जमलं २७३ बनवायला आणि मग आणखिन सुमार झालं का पुढे?

बाकी, आज स्पेशल गणपती (लंबोदर) आरती आणि प्रसादाला वडा पाव ठेवायलाच हवा.
Proud

आजचे विक्रम !

विश्वचषकात वेगवान १००० धावा. जगात पहिला. रोहीत शर्मा.

विश्वचषकात सर्वाधिक ७ शतके. जगात पहिला. रोहीत शर्मा.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार. जगात पहिला. रोहीत शर्मा.

विश्वचषकात वेगवान शतक. भारतात पहिला. रोहीत शर्मा.

या आधीचे वेगवान शतक कपिल देवचे. तो सुद्धा कर्णधार. ८३ चा विश्वचषक. जो आपण जिंकलेला....

शुभसंकेत Happy

बाकी, आज स्पेशल गणपती (लंबोदर) आरती आणि प्रसादाला वडा पाव ठेवायलाच हवा. >> Lol पुढच्या मॅचलाही असाच एफर्ट लेस खेळो असा नवस पण बोला बुवा Happy

आज बुमरा काय आऊट स्विंग मिळवत होता. मजा आली बघायला. असा बुमरा जवळजवळ अनप्लेयेबल असतो. रिस्ट व्हिप करून आत टाकलेला बॉल विचित्र हाईट वरून बाहेर जातो. बॅटस्मन काय आरती ओवाळणार अजून.

बाकी सगळी पिचेस दुसर्‍या इनिंगमधे अशी व्हायला लागली तर त्रास आहे . कोटला तरी नक्की अजून २-३ मॅचेस नंतर आखाडा होईल.

असा नवस पण बोला बुवा>>>>>> व्हय व्हय म्हाराजा! Lol

रिस्ट व्हिप करून आत टाकलेला बॉल विचित्र हाईट वरून बाहेर जातो>>>>> हो, एक नंबर. मी पुर्वी पण लिहिलं आहे, त्याची हाताची अ‍ॅक्शनच एकतर शेमटी/कामटी ला बॉल बांधून तो लाँच केल्या सारखी आहे. हात आजिबात वाकत नाही. आणि मग तो रिस्ट व्हिप, किंवा टर्न करतो. खत्तरनाक आहे. सगळा पेस खांद्यामधून येतो. रन अप पण बेताचाच आहे.
अक्रम होता तसा पुर्वी. शिंचा काही रन अपच नाही! अन पेस + स्विंग! डेंजर!

बाकी सगळी पिचेस दुसर्‍या इनिंगमधे अशी व्हायला लागली तर त्रास आहे>>>>> हीच भिती मला पण आहे. सोप्पे पिचेस जे अजूनच सोपे होत जातात. दुसरी बॅटिंग वाले ग्यारंटीड जिंकणार म्हणजे च्यामारी टॉसलाच निकाल लागणार.

हे मी पहिल्या इंग्लंड न्यूजीलड सामन्यालाच लिहिले होते
>>
खेळपट्टी सुद्धा बरीच सोपी झाली होती दुसऱ्या डावात.
असे सामने फार व्हायला नको.
..

पण आज अफगणने टॉस जिंकला होता. खेळपट्टी दोन्ही डावात चांगली होती. आफ्रिका लंका सामन्यात सुद्धा हेच दिसलेले. आफ्रिका पहिल्या डावात इथे जबरदस्त खेळलेली. त्यामुळे आपले श्रेय नाकारू शकत नाही.

पण आज अफगणने टॉस जिंकला होता. >> ते मला कळले नाही. ड्यू आले तर लाईत खाली येणार नि स्पिन त्यांचे बलस्थान असताना त्यांनी पहिली बॅटींग करणे रिस्की वाटले. रोहित सुद्धा म्हणाला कि त्याणे बॉलिंग च घेतली असती.

दुसरी बॅटिंग वाले ग्यारंटीड जिंकणार म्हणजे च्यामारी टॉसलाच निकाल लागणार. >> बरोबर ! टॉस ने निकाल ठरणॅ अशा मह्त्वाच्या टूर्नामेंट ला विचित्र वाटते. अननुभवी लंकेने सुद्धा आफ्रिकेविरुद्ध प्रेशरखाली खेळताना एव्हढे रन्स केले होते.

लंकेचे रन झाले
पण आफ्रिकेने ४२८ मारले म्हणजे खेळपट्टी पहिल्या डावात देखील तितकीच चांगली होतीच. अजून ५०० तर आता कोणी मारत नाही..

पिच कडून काहीच सपोर्ट नाही म्हणलं की फार अवघड काम आहे राव. बेसिकली सगळी मदार कोण कमी चुका करतं ह्यावर आहे. ठीक आहे. अर्थात ती पण एक कॉंटेस्टच आहे म्हणा. Biggrin

पण आफ्रिकेने ४२८ मारले म्हणजे खेळपट्टी पहिल्या डावात देखील तितकीच चांगली होतीच. >> तो मुद्दा नाहिये. मुद्दा हा आहे कि सध्या कमी सामन्यांमूळे दोन्ही डावांमधे पिच सेम वागतेय. पण ड्यू फॅक्टर आला तर दुसरा बॅटींग करणार्‍यांना फायदा होणार. डे नाईट मॅचेस आहेत नि वर्षाखेर आहे तेंव्हा ड्यू येण्याचे चान्सेस अधिक आहेत. ह्याउलट काही मॅचेस नंतर काही पिचेस चा आखाडा होईल मग दुसरी बॅटींग करणे धोकादायक ठरेल. थोडक्यात टॉस जिंकणे कळीचे ठरेल हा वैताग आहे.

टॉसेस win matches हे टाळायचं असेल तर दिवसा मॅचेस ठेवायला पाहिजे होत्या, पण अत्ता ते शक्य नाही. बाकी सर्व देश एक वेळ तयारही झाले असते पण केवळ पैसाच कमवायचा हा हेतू असलेले BCCI कधीच तयार झाले नसते.

बाकी सर्व देश एक वेळ तयारही झाले असते पण केवळ पैसाच कमवायचा हा हेतू असलेले BCCI कधीच तयार झाले नसते. >> मान्य !

गेलाचा गेला २०-२० वर्ल्डकप टॉस विन मेचं होता. ज्यात आपल्याला पाकने नो लॉस हरवलेला. त्यानंतर अजून एक न्यूजीलांडशी असाच पराभव घेऊन आपण स्पर्धेतून बाहेर पडलो.

पण आतापर्यंतचे बरेच सामने इतके टोकाचे परिस्थिती असलेले झाले नाहीत.
आणि प्रत्येकाला ९ सामने खेळायचे असल्याने एक दोन सामने दुर्दैवी गेले तरी निदान लढायचा स्कोप आहे.

बाकी आखाड्याची भीतीसाठी एका पीचवर किती सामने आणि किती अंतराने आहेत हे बघायला हवे.
तरी बाद फेरीत असे होऊ नये याची काळजी घेतली असावी अशी आशा करूया

BCCI हट्टामध्ये आता मोदी स्टेडियम हट्ट अजून एक वाढला आहे.
पाहिला सामना भारत-ऑस्ट्रेलिया आणि वीकेंडला हवा होता. ओपनिंगल कार्यक्रम हवे होते. जेणेकरून वर्ल्डकप माहोल तयार झाला असता.. वेगळेच गणित चालू आहे..

पाहिला सामना भारत-ऑस्ट्रेलिया आणि वीकेंडला हवा होता. ओपनिंगल कार्यक्रम हवे होते. जेणेकरून वर्ल्डकप माहोल तयार झाला असता.. वेगळेच गणित चालू आहे.
>>
१९९६ ,विल्स वर्ल्डकप ला पण पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड च होता. बीसीसीआय चं गणित पूर्वीपासून असंच आहे.

२०११?
चेक करायला हवे
पण गेले तिनं चार वर्ल्ड कप यजमान देश सुरू करत आहेत असे वाटते

अजून एक कानावर आले आहे ते असे की ओपनिंगला जे नाच गाण्याचे कार्यक्रम होतात ते आता भारत पाक सामन्याला होणार आहेत...

हो, हे मी पण ऐकल आहे. सेलिब्रिटींना बोलावून नाच गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. पॉलितिकल इव्हेंट होण्याची शक्यता आहे.
अजून म्हणजे मॅच चालू असतानाच संपूर्ण ब्लॅकआउट करतात. कालच्या मॅच मध्ये शर्मा जरा रागाला गेल्या सारखा दिसत होता. ह्याची काहीही गरज नाही तेही मॅच चालू असतानाच.

रोहित रंगात आला की डोळ्याचं पारण फिटतं. काल नेमकं तेंच झालं ! किती सहजसुंदर, शैलीदार फटकेबाजी !!!! सलाम !

*ह्याची काहीही गरज नाही तेही मॅच चालू असतानाच.* - खरंय, पण कोहलीसारखा तो नेहमीच तसा नसतो, हेही आहेच. ! Wink

रोहित रंगात आला की डोळ्याचं पारण >>> +७८६ त्याने पाहिला बॉल स्विंग होणारा स्पेल खेळून काढावा. मग नंतर राडा घालावा. हे असे पूर्ण वर्ल्डकप चालावे..
कोहली सुद्धा अशा फॉर्मला आहे की तो आता आउट होणे कठीण...

हो मला कळले. भाऊंचा बहुधा गैरसमज झाला असावा म्हणून क्लिअर केले. मी पाहिला नाही वाटते तो प्रसंग. कॉल वर असेन तेव्हा. पण याने एकाग्रता भंग होतच असेल

३१२ टारगेट
मला वाटते की आज आफ्रिका जिंकेल. नाही मारत ऑस्ट्रेलिया. डाऊन वाटत आहे त्यांची टीम अजून..

पण आज तर दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली नि ऑस्ट्रेलिया ने नंतर. मग ऑस्ट्रेलियाच्या एकेक दिग्गज फलंदाजांना पिच चा फायदा मिळाला नाही वाटते? का रबाडाने कमाल केली?

प्रत्येक मॅच एकाच पिचवर खेळवली जात नाही आहे झक्की. शहरही बदलले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया सुमार खेळले आहे. एकदम ढिसाळ बॉलिंग , फिल्डींग नि बॅटींग होती आज. स्टोनिस खरच बाद होता का ह्याबद्दल मला खात्री नाही. त्याचे हात एकमेकांना साईड ऑन वाल्या अँगलमधे तरी नक्की टेकलेले दिसत नव्हते. एकंदर सगळीच टीम त्यांच्या स्पेसिफिक रोलबद्द्ल साशंक वाटते आहे. इंजरी मूळे सारखे बदलते संघ नक्कीच एकसंध टीम बांधू देत नाही आहे. आता ते अधिक चिवटपणे खेळतील असे वाटते. बरं झाले आपली मॅच आधीच होऊन गेली आहे.

Pages