क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शास्त्री फार खेचत होता आज पाकिस्तानची.
शर्माने ओवरहाईप पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांची जागा दाखवून दिली म्हणाला...
बाकी अफगाण गोलंदाजीला मारावे तसेच मारत होता.. सुरुवातीला काही शॉट हवेत सुद्धा उडाले.. पण त्यातूनही इंटेंट दिसत होता..

रोहित शर्मा गाजवणार हा पण वर्ल्ड कप.

Submitted by बोकलत on 5 October, 2023 - 10:50>>>> या धाग्यावरची दुसरीच कमेंट आहे. हि कमेंट अशीच नव्हती लिहिली. बॅकेन्डला मोठे कॅल्क्युलेशन आहेत. बोललो होतो ना चिते कि चाल, बाझ कि नजर और बोकलत कि क्रिकेट ज्ञान पर कभी शक नही करते कभी भी मात दे सकती है.

भारतीय संघाचे अभिनंदम Happy

क्लीन स्वीप!!

बाय द वे, DRS च्या वेळी K L Rahul इतका क्लूलेस कसा असतो Uhoh

अगदिच वन साय्डेड झाली मॅच. रोहित सेंचरी ठोकेल असं वाटंत होतं; स्लो बॉलला फसला..

पण मॅचचा हायपॉइंट - बुमराने रिझवानची काढलेली दांडी. मझा आगया...

असाम्या, ही न्यूज पाहिलीस का? >> हो रे. हाच हायपर बोल म्हणत होतो मी . अँकी म्हणतो तसे बीसीसीआय ने अगदी कमर्शियलाईज्ड केलय नि लोक पण बळी पडताहेत.

बुमराने रिझवानची काढलेली दांडी. >> मॅजिक बॉल होता खरच.

DRS च्या वेळी K L Rahul इतका क्लूलेस कसा असतो >> स्वरुप फक्त तेंव्हाच क्लूलेस वाटतो का तुला ? Wink

अरे म्हणजे DRS मध्ये विकेटकीपरचा से बऱ्यापैकी महत्त्वाचा असताना हे साहेब "मला काय माहित?" टाईप्स तोंड करुन बसलेले असतात!!
याबाबतीत कोहली लकी होता Wink

हो, मजा येत आहे..

या वर्ल्डकप आधी माझी एका पोस्ट होती..
<<<<<<< हा गुरबाझ मस्त आहे. क्लासिकल रिस्क फ्री शॉट असतात. हा एक तरी मोठी सेंच्युरी मारणार या वर्ल्डकपला..>>>>>>

आता अर्धशतक झाले आहे. आजच मारेल का?

Drink Break.
सर, इंग्लंडचे खेळाडू ते एक "पेग" मारू शकतात का? They need it.
Is it allowed?

श्या गुरबाझ रन आऊट झाला
५७ बॉल ८०
आता घसरली गाडी रुळावरून

१३ ओवरच्या आत शतकी सलामी दिलेली.. आणि अननुभवी पद्धतीने विकेट टाकत १५२-४ झाले..
अफगाणने मोठा स्कोअर करायचा चान्स आपल्या कर्माने घालवला.
स्पिनरना आता मदत मिळत आहे पण संध्याकाळी मिळेल का याची खात्री नाही.
एका तरी मोठ्या टीमला धक्का द्यायला हवा अफगाणने.

वूड आणि रशिद कंफर्टेबली बॅटिंग करतायत
>>>>
आणि दाखवत आहेत की खेळणे इतके अवघड नव्हते...

भारत अफगाण सामना सुद्धा दिल्लीला होता.
दोन्ही सामन्यात अफगाणने पावणे तीनशे असा जवळपास सेम स्कोअर केला.
पण आपला शर्मा तिथे जे तुटून पडला की त्यांना डोके वर काढायची संधीच मिळाली नाही.
इंग्लंडला मात्र झुंजावे लागतेय..

जिंकले अफगाण
इंग्लंड फेवरेट होते या वर्ल्डकपचे Proud

ऑस्ट्रेलिया नंबर १० >>> Lol

खरेच अभूतपूर्व आहे हे!

याआधी बहुधा १९९२ मधे ऑस्ट्रेलिया नॉक आउट स्टेज पर्यंत पोहोचली नव्हती. आता किती चान्सेस आहेत माहीत नाही.

हो, अर्थात. किती वर उडी मारतेय ते आता बघावे लागेल. आता तर सुरुवातच आहे.
जसे ऑस्ट्रेलिया दोन हरले आहेत तसे ईग्लंड सुद्ध दोन हरले आहेत. आणि त्यात एक सामना अफगाणसोबत. हे जास्त चिंतेचे आहे. कारण ते कवर करायला मोठ्या संघाशी जिंकावे लागेल.

Pages