क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन स्पिनर आहेत आपले. कसोटी दर्जाचे.
वेगवान गोलंदाजी मध्ये बुमराह सिराज यांनी लवकर विकेट काढून फ्लाईंग स्टार्ट रोखली तर स्पिनरना फायद्याचे ठरेल. मॅच गोलंदाजांनाच सेट करावी लागणार..

मस्त घेतल्या २ आत्ता मगाशी जडेजानी. फुल्ल टू प्रेशर ऑन आहे!

जरा रँट/वेंट करतो.
एकतर एशिया कप सुरु असताना इएस्पिएन नी कुठेही आम्ही वर्ल्ड कप प्रसारित करु ह्याचा उल्लेख केला नाही. विच इज वियर्ड. अमेरिकेत खुप देशी लोकं आहेत.

हे काही दाखवणार नाहीत आणि ऑनलाईन माहितीनुसार अमेरिकेत राईट्स विलोकडे आहेत म्हणून मी विलोची मेंबरशिप घेऊन ठेवली. आता परवा नेहमी सारखं लॉग ईन केलं तर म्हणे हा ब्रॉड्कास्ट फक्त विलो टिवि टिवि एवरिव्हेअर कस्टमर्स करताच आहे. Uhoh
हे टिवि एवरिव्हेअर म्हणजे तुमच्या प्रोवाईडर थ्रु लॉग इन करायचे!
काहीही मैंटलपणा! मग आज सकाळी सुगावा लागला कि इ एस्पि एन वर दिसतोय वर्ल्ड कप. येरे माझ्या मागल्या करत परत इ एस्पिएन सब्सक्रिप्शन घेतलं.

110/2 वरून ऑसी 140/7
स्पिन नाही खेळता आला
(पण आपले लोक पण आजकाल तेव्हडा चांगला खेळत नाहीत)

इंडियन बॅट्समेनला हा पेपर नीट सोडवावा लागेल. विकेट फसवी आहे. स्पिन, पेस-ऑफ, कटर्स हे विकेट-टेकर्स आहेत. ऑस्ट्रेलियाला संधी देऊन चालणार नाही.

कांगारू च्या शेपटानी 60 धावा जोडल्या
आपली (स्लिप) फील्डिंग शेवटी गचाळ झाली. कॅच सुटले, धावा गेल्या. एकुणात थोडं गृहीत धरल्याचा फील आला.

आता बॅटिंग कशी होते बघू...

किशन पहिल्या बॉल वर गेला
वडापाव दुसऱ्या ओव्हर मधे अंपायर्स कॉल वर गेला
अय्यर नी आम्लेट साठी तिसरं अंडं घातलं

बोंबला

इतके सब्स्क्रिप्शन्स घेण्यापेक्षा ip tv का घेत नाही बुआ...
ऑस्ट्रेलिया ने निराशा केलीय.. तीनशे तरी पाहिजे होता म्हणजे चेस बघायला मजा आली असती...

शर्माची एक विकेट छान सेट अप करून घेतली. बाकी दोघांनी सरळ फेकल्या आहेत. पीच चे टेन्शन न घेता खेळले हे दोघेच तर पुन्हा येऊ एक पार्टनरशिप ने गेममध्ये...

बुवा - सेम हिअर. माहिती क्लिअर नाही कोठेही.

त्यात हायलाइट्स पॅकेज मधे गोंधळ आहे. काल द. आफ्रिका वि श्रीलंका चे शोधत होतो. हुलू व इसपीएन दोन्हीवर या टायटल वर प्रत्यक्षात बांगला देश वि अफगाणिस्तान दाखवत होते - म्हणजे त्यांच्याकडे रिलीज केलेली क्लिप गंडलेली असावी. शेवटी यू ट्यूबवर "ऑल इंडिया कबड्डी" या युजर ने लोड केलेली क्लिप पाहिली Happy

अमेरिकेत फार लफडे आहेत वाटते बघायचे..
आमच्याकडे कोणी टीव्ही बघत नाही म्हणून टाटा स्काय रिचार्ज करणे सोडून दिलेय केव्हाच..
मोबाईलवर हॉटस्टार फ्री दाखवत आहे.
पण वर्ल्डकप कोण मोबाईलवर बघणार म्हणून टीव्ही ला कास्ट करायला गेलो तर पैसे मागितले.
किती तर फक्त १४९ रुपये ३ महिने.
झाली सोय वर्ल्डकपची १४९ रुपयात Happy

हौ फा! ऑल इंडिया कब्बडी फार उपयोगाला येतो Lol

ऋन्मेष, वांदे असे नाही पण नीट माहिती दिलेली नाही. अ‍ॅक्सेस आहे. मार्केटिंग नीट नाही केलं. ह्यावेळेस वेगळं म्हणजे विलो कडे राईट्स असून त्यांना डायरेक्ट त्यांच्या वेबसाईट आणि अ‍ॅप फर स्ट्रिमिंग करायचे राईट्स नाही. ह्या आधी असं काही मी तरी अनुभवलेलं नाही. विलो कडे राईट्स असले की फक्त विलो घेतलं की काम व्हायचं.

धन्यवाद कोहली आणि राहूल! नैया पार लगा दी (ऑर ऑल्मोस्ट लगा दी)!

बाकी पीच बद्दल काय मत लोखो? फास्ट आणि स्पिन दोघांना सपोर्ट मिळाला असं वाटलं मला. आपण बॉलिंग करत होतो तेव्हा बुमराहचे काही बॉल तुफान स्किड होताना बघितले मी. जडेजाचे काही बॉल तर काहीच्या काही वळले. हे नवीन वाटलं मला.
नवीन पीच मेकिंग प्रयोग वाटत आहेत. जाणकारांनी उजेड पाडा जरा.

ऋन्मेष, वांदे असे नाही >>> हो ते असेच गमतीने म्हटले.. पण जनरली अशी स्पर्धा सुरू झाली की इथे तुम्हा लोकांची कुठे बघायची यावर चर्चा सुरू होते. मी वाचत नाही ती मन लाऊन. असेच म्हटले..

ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी घ्यायचा निर्णय चुकला.
कॉमेंट्रीला बहुतेक इरफान पठाण की कोणीतरी हे सुरुवातीलाच म्हणालेला की पीच दुसऱ्या इनिंगला अंडरलाईट चांगला होईल.. गूड टॉस टू लूज.. आणि मलाही तसेच वाटलेले की हा पीच नंतर सेटल होईल.. म्हणून वर मी म्हटलेले की आपण तीन विकेट अश्याच फेकल्या आहेत. या दोघांची पार्टनरशिप आणि मॅच आपलीच आहे..

Pages