मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन सिम्बा!!
कृपया सराव स्पर्धेच्या अनुभवांवर स्वतंत्र लेख लिहा ..

हार्दिक अभिनंदन सिम्बा, proud of you.
तुला इतकं थोडक्यात आटोपते घेण्याची परवानगी नाही.
ह्या दैदिप्यमान कामगिरीला मान देण्यासाठी वेगळा धागा काढून लिहिणे आवश्यक आहे.

हार्दिक अभिनंदन सिम्बा, proud of you.
तुला इतकं थोडक्यात आटोपते घेण्याची परवानगी नाही.
ह्या दैदिप्यमान कामगिरीला मान देण्यासाठी वेगळा धागा काढून लिहिणे आवश्यक आहे. +१

प्लीज वेगळा धागा काढून लिहा. एकूणच तुमच्या मॅरेथॉन मध्ये धावायच्या सुरवातीपासून आतापर्यंतचा प्रवास आणि स्पेशली या स्पर्धेची तयारी आणि तिथला अनुभव या सगळ्यांबद्दल लिहा.

अभिनंदन सिम्बा. एकदम भारी.

आता पुढील लक्ष १०० किमी. Ultra Marathon करा. त्यासाठी आधीच शुभेच्छा.

माझा १ मित्र साऊथ आफ्रिकेत ही १०० किमी रेस करतो. अधिक माहिती हवी असेल तर विचारून सांगू शकेन.

जबरदस्त अभिनंदन सिम्बा......

तुला इतकं थोडक्यात आटोपते घेण्याची परवानगी नाही. >>> +१००
ह्या दैदिप्यमान कामगिरीला मान देण्यासाठी वेगळा धागा काढून लिहिणे आवश्यक आहे. >>>> +१०००

मनापासून अभिनंदन
ह्या दैदिप्यमान कामगिरीला मान देण्यासाठी वेगळा धागा काढून लिहिणे आवश्यक आहे. >>>> +१०००

या वेळेस मुंबई मॅरेथॉन मध्ये कोण कोण आहेत ? मी यावर्षी पण हाफ मॅरेथॉन करतोय. पूर्वतयारी म्हणून आज वसई विरार येथील हाफ मॅरेथॉन १:५३:१९ मध्ये पूर्ण केली.

मी धावायला सुरु केले त्याला दहा वर्ष पुर्ण झाली. मायबोलीकर आणि हा धागा त्याला साक्षी आहे.
सातव्या पानापासून ते तेहेतीसाव्या पानापर्यंत धावतोच आहे मी Proud
मुंबईत फुल मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण करण्याची ही नववी वेळ.
मध्यंतरी कोविड मुळे मॅरेथॉन झाली नव्हती.

ह्यावर्षी अनेक कारणांमुळे तयारी फारशी झालेली नव्हती.
असे असतानाही साडेचार तासात मॅरॅथॉन संपवली ह्याचा आनंद आहे.
नेहेमीप्रमाणे स्पर्धामार्गावरील मुंबईकरांचे प्रोत्साहन हुरूप वाढवणारे होते.
इतक्या वर्षांचा अनुभव, पहाटे पाच वाजता झालेली सुरुवात आणि मुंबईचे सुखद हवामान ह्या सगळ्या गोष्टी कामी आल्या.

अभिनंदन हर्पेन. या वेळेस खूप ढिसाळ कारभार होता असं वाचलं. अनेक जणांना मेडल्स, रिफ्रेशमेंट्स पण नाही मिळालं रेसनंतर असं वाचलं. वॅाटर स्टेशन्स नव्हती, बॅग कलेक्शनचा पण गोंधळ होता सगळा.

अभिनंदन हर्पेन!!
मी तुमची वेळ / प्रोग्रेस TMM च्या ॲप वर ट्रॅक केली होती !

फुल मॅरेथॉन मध्ये ५ तासांच्या पुढे आलेल्यांना मेडल्स मिळाली नाहीत. आता courier नी पाठवणार आहेत म्हणे.

मी हाफ मॅरेथॉन साठी माझी सर्वोत्तम वेळ नोंदवली - १:५१.

धन्यवाद आडो, आदित्य, निर्मल, कुंतल, पराग आणि धनश्री
धन्यवाद आणि अभिनंदन चिन्मय_१ - छान वेळ साधली. मुंबईच्या गर्दीत ही वेळ म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे.

आडो - खूप ढिसाळ कारभार वगैरे नव्हता. हो हे खरे आहे की उशीरा पोचलेल्यांना मेडल्स मिळाली नाहीत पण असे कळते की मेडलची काही खोकी चोरीस गेली / मिस्प्लेस झाली. वर चिन्मयनी सांगीतली त्याप्रमाणे ज्यांना मेडल मिळाली नाहीयेत त्यांचे बिब नंबर टिपून घेतले आहेत आणि त्यांना मेडल्स घरपोच मिळतील असे सांगण्यात आले आहे.

बॅगेज काऊंटरच्या तिथे रॅक पडला की काहीतरी झाले आणि काही काळ जरा गैरसोय झाली पण ते तसे किरकोळच म्हणायचे.

यंदा ह्या स्पर्धेत विक्रमी संख्येने सहभाग होता पण तरीही पाणी किंवा रिफ्रेशमेंट मिळाली नाही असे काही झाल्याचे ऐकीवात आले नाही. उलट स्पंज स्टेशन्स मागच्या वेळे पेक्षा जास्तच होती. खरेतर त्या रिफ्रेशमेंट पॅक मधे केळी सोडली तर पौष्टीक असे काहीच नसते. चंद्रावर डाग म्हणून सोडून द्यायचे.

हर्पेन, ८००+ मेडल्स लेबररनी चोरली असं वाचलं. ही मेडल्स चोरून काय मिळणार त्यांना ते काही कळलं नाही.

यावेळेस, मुंबई मॅरेथॉन ला प्रेक्षक म्हणून !
हर्पेन, तुम्ही येताय का ?
यावेळेस, लोणावळ्याला टाटा अल्ट्रा मध्ये करतोय ३५ km.

हो मी आहे.
टाटा अल्ट्रा करता शुभेच्छा चिन्मय

Pages